Wednesday 13 February 2013


यश टिकवणं तुमच्याच हाती....

यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.... यशानंतर अपयश येतं अथवा अपयशानंतर यश येतं हे तपासणं म्हणजेच तुमच्या स्वत:च्या व्यक्तिमत्त्व विकासाचा शोध घेणं होय.... यश आधी त्यानंतर अपयश प्राप्त होतं किंवा अपयश आधी त्यानंतर यश प्राप्त होतं हे सांगणं कठीण आहे.... तसंच या यशाची आणि अपयशाची सुरुवात आपल्याकडून होते.... यशही तुमचेच आहे, अपयशही तुमचेच आहे.... कारण दोन्हीही यश- अपयश तुमच्याकडूनच तुम्हाला मिळाले आहे, हे नाकारून चालणार नाही. यश कधी येते.... ? आणि अपयश कधी येते....?

यश आले तर आपली मेहनत, योग्य नियोजन, कष्ट याचा हमखास आपण विचार करतो आणि आपणच आपली पाठ थोपटतो.... पण अपयश आले की, दैवाच्या पुडीत त्याला बांधतो..... दैवाने नशिबाने साथ दिली नाही, हा विचार आपण करतो.... यश-अपयशात ज्ञान- परिस्थिती, अनुभव इच्छाशक्ती, प्रयत्न, नियोजन, गुंतवणूक, मेहनत , परिश्रम, संवाद, अशा अनेक गोष्टींचा समावेश करता येतो..... जे ज्ञान आपल्याकडे आहे... त्याचा आपण वापर कसा करतो... या अगदी मूलभूत गोष्टी आहेत आणि सरळसुद्धा आहेत...... 

बघा, अपयश म्हणजे नेमकं काय.... एखादी गोष्ट तुम्हाला जमली नाही म्हणून ते अपयश असतं का..... किंवा एखादी गोष्ट तुम्हाला उत्तम जमली म्हणून त्याचा परिणाम म्हणजे यश असतं का..... अपयश आणि यश यात नेमकं किती अंतर असतं हे कुणालाच सांगता येत नाही.... खरं सांगायचं तर या दोन्हींमध्ये अगदी कमी अंतर असतं जे कदाचित आपल्याला कळत नाही.... म्हणूनच यश मिळवताना अपयशाची एक एक पायरी पार करावी लागते.... आणि हेच यश डोक्यात गेल्यावर अपयशाची फळं चाखावी लागतात....   

बघा,  या दोघांमध्ये फक्त फरक इतकाच की यश हे प्रत्येकाला हवंहवंस वाटतं.... अर्थात यात गैर काहीच नाही, कारण यशाची मजा ही काही औरच असते.... पण ते यश टिकवणं मात्र फार कठीण......!!! म्हणूनच  इच्छा- कृती आणि योग्य नियोजन करा म्हणजे माणूस अपयशी होत नाही.... एखादा माणूस यशाच्या शिखरावर पोहोचला म्हणजे कसा पोहोचला, कुठून आला..? त्याचे ते त्यासाठी झिजणं.... त्याचे कष्ट समजावून घ्या.....

 श्री गुरुदेव दत्त ......