उत्तम विचार संस्कार रुजवावे.... संयमी आत्मविश्वासे यशोशिखर गाठावे....
कोणतीच भाषा, विचार, व्यक्तिमत्व गोष्टी घेऊन माणूस जन्माला येत नाही.... त्यामुळे स्वतःला घडवणे हे
ज्याच्या त्याच्या हातात असते.... या जगात तशी सर्वाना समान संधी
असते.... बघा, जन्मतःच भरपूर कष्ट मेहनत करणे आणि जिद्दीने
आपल्याला हवे ते काम करणे.... अश्या कोणत्याही
गोष्टी व्यक्तीला मिळत नाहीत.... तर त्या त्याला स्वतःहूनच विकसित
कराव्या लागतात, रुजवाव्या लागतात.... आणी मग त्यातूनच घडते
उत्तम विचारशील व्यक्तिमत्व व यशोशिखरावर गरुडभरारी....
आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे.... अनेकांना अवघड बाब
वाटते.... परंतु आपण एक विसरतो.... आपल्या रोजच्या जीवनात आपण जसे वागतो... विचार करतो.... तसेच
आपले व्यक्तिमत्त्व घडते.... बघा, रोजच्या घटनांचाही आपल्या जीवनावर सकारात्मक / नकारात्मक परिणाम होतो.... कधी कधी आपण याकडे दुर्लक्ष करतो.... तर कधी त्यातून
नैराश्य येते.... शेवटी आपला आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे....
आपण जेव्हा तुम्ही
एखादी क्रिया करतो त्यावेळी एक वेगळी ऊर्जा
उत्पन्न होत असते.... ही ऊर्जा तुमच्यातील आत्मविश्वासाची असते.... पण हा आत्मविश्वास सहजासहजी मिळत नाही..... त्यासाठी तुम्हाला कष्ट मेहनत करावीच लागते....
तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगही जिंकू शकता..... परंतु तो आत्मविश्वास
टिकवावा लागतो.... आणि यासाठीच तुमच्याकडे संयम असणे गरजेचे आहे....
आत्मविश्वासाने नवी
आव्हाने स्वीकारणे.... हेच आपले आयुष्याचे ध्येय असले पाहिजे.... तर ती व्यक्ती कधीच
एका जागी थांबून- साचून राहणार नाही..... आणि यशाचे एक शिखर सर केल्यावर स्वतःकडे
कौतुकाने पाहत बसण्याऐवजी अशा व्यक्तीला पुढचे आव्हान खुणावेल.... एका आव्हानातून
दुसऱ्या आव्हानाला यशस्वीपणे भिडणारा नेहमीच यशोशिखरावर राहू शकतो....
चांगल्या वेगळ्या वाटेने जाणारी माणसे स्वतःच्या मनाची हाक ऐकून चालू
लागतात….. तेव्हा
अपयशाची काळजी नसते….. तर यशाची खात्री असते..... आपल्याला जे वाटते ते जीव ओतून केले, की आपोआप समाधानाची
वेगळी वाट तयार होते.... साध्या माणसांत किती ताकद असते आणि योग्य दिशा दिली गेली, तर ती काय करू
शकतात याचीही मग उदाहरण दिसून येतात....
चला तर मित्रांनो, जिद्दीने मेहनतीने आपले काम करुया,
आत्मविश्वासाने येणाऱ्या अडथळ्यांवर मात करुया... आपल्या ध्येय शिखरावर यशस्वीपणे
गरुडभरारी घेऊया....
ॐ श्री गुरुदेव दत्त .....