आत्मस्वर.. मनातील सर्व भावभावनांनी परिपूर्ण, मनाचे अंतरंग उलगडून दाखविणारा.. 'मनतरंग'.. माणसांच्या गर्दीत राहूनही संवेदनशील मनाने, सगळ्यांशी नाते मैत्र सांभाळून, आयुष्यात येणारे क्षण, मनाचे तरंग, भावनावेग उत्कटपणे वेचल्यास.. जीवन, निर्मळ झऱ्याप्रमाणे ओघवते, प्रवाही बनत जाते.. हळू हळू गुरुकृपेने आपला आत्मस्वर हृदयी प्रगटून आत्मरूपी गुजगोष्टी करतो.. गुरुकृपेने दृश्य स्वरूपात, सार काही आनंदाकडून आनंदाकडे नेणारा आपला प्रवास उलगडत जातो.. गुरुकृपाकार I दावी अंतरंग I हृदयीचे ब्रह्म I अनायासे IIॐ दत्त..
Tuesday, 26 January 2016
Tuesday, 12 January 2016
आज स्वामी विवेकानंद जयंती.!. गुरुतत्त्व स्मरण... वैदिकांचे अपार ज्ञान,
बुद्धांची विश्व
कवेत घेणारी करुणा, ख्रिस्ताचे प्रेम, इस्लामचा बंधुभाव हे सारे गुण एकत्र करून
त्यापुढे मनुष्याचा अनंत विकास करता येईल असे सारे गुरुतात्विक विश्वधर्मात
सामावलेले आहे..!!..
अयोग्य आचार-विचार यांचे सिंचन म्हणजे दुर्दैवी
भूतकाळ... उज्ज्वल भविष्यासाठी याकडे Rearview aspect ठेऊन... शिस्त, बंधन, संयम, प्रेम, करुणा, सहिष्णुता, विश्वास यावर
आधारलेल्या गुरुतत्वी विश्वधर्माच्या चिंतनाचा जणू थोडक्यात आराखडाच स्वामीजींनी गुरुतत्त्व
विचारांनी सा-यांच्या डोळ्यापुढे उभा केला.!!.. स्वामीजींचे विचार तत्वसार म्हणजे...
‘मनुष्यातले
सुप्तावस्थेत असलेले ईश्वरी तत्त्व प्रत्यक्ष प्रकट करणे हेच सत्याचे एकमेव
उद्दिष्ट आहे.!.
उठा, जागे व्हा..!!.. ध्येय योग्य प्रयत्नातून प्राप्त
होईपर्यंत क्षणभरही थांबू नका.!. ध्येय उदात्त असू द्या..!. क्षुद्र (सुखासीन इच्छा-आकांक्षा)
ध्येयापेक्षा अपयश बरे... उदात्त ध्येय समोर ठेवून शरीर, मन, बुद्धी, पंचप्राण असे तुमचे सारे सामर्थ्य पणाला
लावा... सूर्योदयाने सारे जग प्रकाशमान झाले की काजवे लुप्त होतात... तसाच
ज्ञानाचा, पराक्रमाचा, सत्याचा, वैराग्याचा पवित्र
सूर्य अंत:करणात प्रकाशू दे...
मग धुके वितळून जावे, तसे सारे अमंगळ दुबळेच
नाहीसे होईल... उठा, धैर्याने, कणखरपणाने सा-या जबाबदा-या स्वत:च्या खांद्यावर घ्या..!. आपणच
स्वत:चे ध्येय निश्चित करीत असतो... आपण अमृततत्त्वाचे वारसदार आहोत..!. स्वामीजींचा
विश्वधर्म संदेश आणि त्यातले सामर्थ्य आपण सर्वांनी हृदयी धारण करावे..!.. ॐ श्री
गुरुदेव दत्त...
Sunday, 3 January 2016
मनमोराचा पिसारा - कबीरांचं मानसशास्त्र
संत कबीरजींनी अनेक दोहे रचले, पदं लिहिली आणि गात
गात ते लोकांपर्यंत पोहोचवत गेले... प्रस्थापित शिक्षण, गाथा पांडित्य यांचा गंध नसलेल्या या
साध्या सुध्या विणकरानं, जगाला खूप ज्ञान आणि समज दिली...
विज्ञानशाखा म्हणून मानसशास्त्राचा उदय होण्यापूर्वी कबीरजींनी मनावर चिंतन केलं... मनाचं स्वरूप जाणलं आणि त्यावर दोहे लिहिले... याअर्थाने संत कबीर मानसतज्ञ होते फक्त पुढे डॉक्टर हि उपाधी नव्हती... तसे पाहिल्यास सर्वच spriritual acheivers मानसतज्ञ असत्तात...
कुंभै बांधा जल रहै, जल बिन कुंभ न होय
ज्ञानै बांधा मन रहे, मन बिनु ज्ञान न होय – (संत कबीर)
ज्ञानै बांधा मन रहे, मन बिनु ज्ञान न होय – (संत कबीर)
मन म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम आणि मन म्हणजेच
हार्डडिस्क, मन म्हणजेच मेमरी आणि मन म्हणजेच मनाच्या विविध क्षमता, असं थोडक्यात कबीर
म्हणतात... त्या काळी संगणकीय शब्द नव्हते इतकंच... कुंभामध्ये पाणी साठवता येतं
कारण कुंभाला मातीच्या भिंती असतात... हा कुंभ बनविण्याकरिताही मातीत पाणी मिसळावं
लागतं... पाणी, कुंभ आणि माती यांच्या परस्परपूरक नात्यामधून ते शक्य होतं...
मन बांधण्याकरिता, ज्ञानाच्या आणि आत्मभानाच्या भिंती
लागतात... परंतु ज्ञान आणि आत्मभान या संकल्पनाही ‘मन’ या ऑपरेटिंग सिस्टमशिवाय
निर्माण होत नाहीत... ज्ञानार्जनासाठी मन हवं आणि मन जाणण्याचे ज्ञान हवे... ज्ञान,
मन आणि त्यांना
जोडणाऱ्या मनाच्या प्रक्रिया या परस्परपूरक गोष्टी असाव्या लागतात... म्हणजेच कबीरजीं
म्हणतात, मनाचं कार्य कसं चालतं याची चांगली जाण आहे...
मन आणि शरीर यांचं नातं कसं असतं..?. ते नातं
सशक्त नि परस्परसाहाय्यक असलं पाहिजे... तर मनाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी
शरीर साथ देतं आणि शारीरिक श्रम करण्यासाठी मनाचा पाठिंबा मिळतो... परंतु मन आणि
शरीर एकमेकांशी असं नातं जुळवत नाहीत... उलट एकमेकांना खोडय़ात टाकतात... विचलित
करतात... उदा.
काया देवल मन धजा, विषय लहर फहराय
मन चलते
देवल चले, ताका सरबस जाय – (संत कबीर)
आपलं शरीर म्हणजे एक देवालय आहे... त्या देवळावर
‘मन’ नावाची ध्वजा फडकते... हे मन विषयासक्त होतं, ऐहिक सुखाला लोलुप होतं आणि अस्थिर होतं,
विचलित होतं... ज्या
देवळावरची ध्वजा अस्थिर आहे, ज्या देवळावर स्वार्थी मनाची ध्वजा फडकते आहे,
ते देऊळ तितकंच
अस्वस्थ राहतं... अवघं जीवन चंचल मन आणि अस्थिर शरीरामुळे सर्वनाशाकडे वाटचाल
करतं...
मन आणि शरीर या दोन संकल्पना आहेत, त्या जणू काही
स्वतंत्रपणे आपापलं कार्य करतात, या सार्वत्रिक गैरसमजाची जाणीव कबीरजींना होती...
मन आणि शरीर या वस्तुत: स्वतंत्र गोष्टी वाटत असल्या तरी त्या एकजीव आणि एकजिनसी
असतात याचं भान होतं... मन आणि शरीर यांच्या अद्वैतावर त्यांनी इथे भाष्य केलं
आहे...
मनाच्या अस्थिरतेचं स्वरूप जाणण्याचा त्यांनी
प्रयत्न केला... मन दुभंग होण्याची अवस्था हा मानसिक विकारच, यावर कबीरजी म्हणतात-
धरती फाटै मेघ मिलै, कपडा फाटै डौर
तन फाटैको औषधि, मन फाटै नहिं ठौर – (संत कबीर)
तन फाटैको औषधि, मन फाटै नहिं ठौर – (संत कबीर)
आणि
मेरे मन में परि गई ऐसी एक दरार
फाटा
फटिक पषान ज्यूं, मिलै न दूजी बार – (संत कबीर)
कबीरजींच्या काळात त्यांना गवसलेल्या सत्याला आता
नवं वळण लागलंय असे मी म्हणतोय... कबीरजी..!.
फाटलेल्या जमिनीला पाऊस सांधतो, फाटक्या कपडय़ाला
दोर शिवतो, जखमी
शरीरावर औषध आहे... पण मन फाटलं तर औषध नाही... आता आहे हं.. कबीरजी... गुरुकृपेचे...
माझ्या मनाला (संशय नावाची) दरार पडलीय... दुभंगलेला
दगड जोडता येत नाही, तद्वतच तुटकं मन साधता येत नाही... कबीरजी प्रयत्न चाललेत या दिशेनं
तुमचेही कृपाशीर्वाद हवेत...
Subscribe to:
Posts (Atom)