कलियुगी जीवन गीता...
पार्थ म्हणे 'गा हृषीकेशी | या संसार युद्धाची ऐशीतैशी |
बेहेत्तर आहे मेलो उपाशी | पण मी बदलणार नाही |
धोंड्यात जावो हा तत्वविचार | आपल्या कडून होणार नाही |
तुला नाही काही उद्योग | करी हा वाह्यातपणा कुठला |
अर्जुन म्हणे 'गा हरी | आता कटकट पुरे करी |
दहादा सांगितले तुला तरी | हेका का तुझा असला ? |
आपण काही लढत नाही | वेळ कोण देई तरी |
ढिला म्हण की भागूबाई | दे नाव वाटेल ते |
ऐसे बोलोनि आपला अर्जुन | दूर फेकूनि तत्व ज्ञान |
खेटरावाणी तोंड करून | मटकन खाली बैसला |
इति श्री अज्ञान गीतायाम प्रथमोध्यायः |
जयकृष्ण केशव उपाध्ये {१८८२-१९३७} यांनी लिहिलेली ही वरील कलियुगी गीता.... आज माणूस मायेच्या पाशात अडकून आपले खरे अस्तित्व विसरत चालला आहे... भरकटत अहंकाराने माझे माझे करीत विकृत बुद्धीचा होत आहे.... म्हणूनच आज आपण पाहतो... आचार भ्रष्टी…. सदा कष्टी…. कुणी वंदा… कुणी निंदा… माझा स्वहिताचा धंदा….
याचेच विनोदी विडंबनात्मक वर्णन श्री उपाध्ये यांनी केले आहे.... माणूस यां मोह माया सागरी अडकून कसा वाहत जातो आणि कुणाचेही ऐकत नाही, कारण आपण करतो, वागतो, बोलतो ते त्यास योग्य प्रतीत होत असते.... हेतू शेवटी हाच यां प्रकारच्या बोधातून तरी हसत खेळत माणसाने थोडे आत्मपरीक्षण करून स्वःताला काही प्रमाणात भानावर आणावे.... अहंकार मी पणा सोडून योग्य-अयोग्य ओळखून आपली मार्गक्रमणा करावी.... जीवन सार्थकी लावावे.... ॐ श्री गुरुदेव दत्त .....
No comments:
Post a Comment