Sunday 11 January 2015






स्वामी विवेकानंद - गुरुतत्त्व स्मरण... 

आज स्वामी विवेकानंद जयंती.!.  गुरुतत्त्व स्मरण... वैदिकांचे अपार ज्ञान, बुद्धांची विश्व कवेत घेणारी करुणा, ख्रिस्ताचे प्रेम, इस्लामचा बंधुभाव हे सारे गुण एकत्र करून त्यापुढे मनुष्याचा अनंत विकास करता येईल असे सारे गुरुतात्विक विश्वधर्मात सामावलेले आहे..!!.. अयोग्य आचार-विचार यांचे सिंचन म्हणजे दुर्दैवी भूतकाळ... उज्ज्वल भविष्यासाठी याकडे Rearview aspect ठेऊन... शिस्त, बंधन, संयम, प्रेम, करुणा, सहिष्णुता, विश्वास यावर आधारलेल्या गुरुतत्वी विश्वधर्माच्या चिंतनाचा जणू थोडक्यात आराखडाच स्वामीजींनी गुरुतत्त्व विचारांनी सा-यांच्या डोळ्यापुढे उभा केला.!!.. स्वामीजींचे विचार तत्वसार म्हणजे... मनुष्यातले सुप्तावस्थेत असलेले ईश्वरी तत्त्व प्रत्यक्ष प्रकट करणे हेच धर्माचे एकमेव उद्दिष्ट आहे.!. (इथे धर्म म्हणजे सत्य अभिप्रेत)..


उठा, जागे व्हा..!!.. ध्येय प्राप्त होईपर्यंत क्षणभरही थांबू नका.!. ध्येय उदात्त असू द्या..!. क्षुद्र (सुखासीन इच्छा-आकांक्षा) ध्येयापेक्षा अपयश बरे... उदात्त ध्येय समोर ठेवून शरीर, मन, बुद्धी, पंचप्राण असे तुमचे सारे सामर्थ्य पणाला लावा... सूर्योदयाने सारे जग प्रकाशमान झाले की काजवे लुप्त होतात... तसाच ज्ञानाचा, पराक्रमाचा, सत्याचा, वैराग्याचा पवित्र सूर्य अंत:करणात प्रकाशू दे... मग धुके वितळून जावे, तसे सारे अमंगळ दुबळेच नाहीसे होईल... उठा, धैर्याने, कणखरपणाने सा-या जबाबदा-या स्वत:च्या खांद्यावर घ्या..!. आपणच स्वत:चे ध्येय निश्चित करीत असतो... आपण अमृततत्त्वाचे वारसदार आहोत..!. स्वामीजींचा विश्वधर्म संदेश आणि त्यातले सामर्थ्य आपण सर्वांनी हृदयी धारण करावे..!.. ॐ श्री गुरुदेव दत्त...