Tuesday 26 June 2012

New Presentation of Thoughts By Chetan K.... 


Until you value yourself.... you won't value your time..... Until you value your time..... you will not do anything with it..... Look inside yourself and you'll find a world of things .... try to know yourself..... The major value in life is not what you get.... The major value in life is what you become..... ॐ श्री गुरुदेव दत्त .....

गुरुपौर्णिमा.... एक स्मरणांजली ..... 
आज गुरुपौर्णिमा..... आता ह्यदिवसाच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी, अनेक घटना अन अनेक पूजनीय... गुरुतुल्य व्यक्तींचे स्मरण होते.... पण सगळ्यात ज्याचे नेहमी विस्मरण होते तो गुरु म्हणजे निसर्ग होय..... निसर्गाकडून तर आपण शिकावे तेवढे कमी..... सजीव चरांपासून ते निर्जीव धरेपर्यंत प्रत्येक घटक आपला गुरुच….. आपल्यातला हरेक सद्गुण निसर्गाकडून घेता येतो, जोपासता येतो..... आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अशा गुरुंचे, सद्गुरुंचे स्मरण होणंही तेवढेच आवश्यक नाही का ?..... निसर्गाला नमन करताना .... संत तुकोबांच्या भावना .... वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षीही सुस्वरें आळविती ॥.... चला तर आपाल्या जाणीवा जागृत करा.... निसर्गदत्त गुरूला वंदन करा....   ॐ श्री गुरुदेव दत्त....


(प्रकाश वाटा : चिंतामणी) - चांगल्या लोकांचा मान वा इज्जत कधी कमी होत नाही... सोन्याचे शंभर तुकडे करा,.. किंमत कमी होत नाहीं... चुकणं ही प्रकृती आहे... मान्य करणं ही 'संस्कृती' आहे आणि सुधारणा करणं ही 'प्रगती 'आहे... हे रस्ते आपल्याला लक्ष्यापर्यंत घेऊन जातीलच... पण याचे प्रयोजन तुमच्याच हाती आहे... तुम्ही कृतीत सबुरी ठेवा... प्रकृती ठीक होईल... कधी ऐकलं आहे का... की रात्रीच्या काळोखानं सकाळ होऊच दिली नाही.!.. म्हणूनच जाणा संयम-सबुरी फार महत्वाची... तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देवू नका... कारण लोक नेहमी सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,.. लोखंडाच्या नाही... सर्वात महत्वाचे, जीवनात आपला सल्लागार कोण आहे... हे फार महत्वाचे आहे... कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा..!!.. ॐ श्री गुरुदेव दत्त... 


Know that…. this life is for loving, helping, sharing, learning, smiling, caring, forgiving, healing, and even more loving….. choose to live life this way….. Share your love,  knowledge,  happiness with others…..  It is a way to achieve immortality…… know that….  It takes a lot of courage to show your dreams to someone else…… ॐ श्री गुरुदेव दत्त.....

Know that... Anger is a wind which blows out the lamp of the mind..... Holding on to anger is like grasping a hot coal with the intent of throwing it at someone else.... you are the one who gets burned.....Remember that... Anger makes you smaller.... while Forgiveness forces you to grow beyond what you were..... ॐ श्री गुरुदेव दत्त.....

Our greatest strength lies not in how much we differ from each other.... but in how much - how very much - we are the same..... know that.... we have to live life with a special plan or purpose to help elevate humanity and life on earth through our own unique service.... It is our responsibility to be successful in carrying out our plan and to infuse our service with creativity, or our own special God-given talent..... ॐ श्री गुरुदेव दत्त ....






New Presentation of Thoughts By Chetan K.... 

Unless there is Commitment with yourself…. Life is Aimless…. Be Commited to your Goal…. Strength lies in Determination and Commitment to excellence..... that will enable you to achieve success…. Know that… Commitment is an act, not a word…. Change your life today…. With Good Commitment....  ॐ श्री गुरुदेव दत्त ...... 

We must accept finite disappointment.... but never lose infinite Hope..... Remember that... Darkness cannot drive out darkness.... only light can do that.... know Hope is that Light.... Never Lose Hope, Never Give Up.... ॐ श्री गुरुदेव दत्त ....


Teamwork is essential because Life and any work is Team Game….. working together is Progress and Success….. know that you can move towards your Goals quickest by helping others to Succeed….. Remember that together Everyone Achieves More…. ॐ श्री गुरुदेव दत्त ...... 

Build your credibility before persuading.....Credibility has two key components.... Trustworthiness and Expertise..... Understand what builds and destroys it...... Protect it like a baby..... because once lost it can be impossible to recover...... you make your reputation and you have your success based upon credibility...... Remember credibility is commitment to honoring your promises...... take care about credibility.....  ॐ श्री गुरुदेव दत्त.....

Our attitude toward life determines life's attitude towards us….. Adopting the right attitude can convert a negative stress into a positive one….. Keep your face to the sunshine and you cannot see the shadows….. The control center of your life is your attitude…. ॐ श्री गुरुदेव दत्त .....

दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरु लागते.... तेव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात.....तुम्हाला हवे असलेले सर्व सहाय्य व सर्व बळ तुमच्यामध्येच आहे..... म्हणून तुम्हीच स्वत:चे भवितव्य घडवा..... शक्तिसंपन्न बना..... स्वत:चा विकास करा ..... मनः शक्ती हि सर्व शक्तींची जननी आहे .... ॐ श्री गुरुदेव दत्त .....




विठ्ठल नाम ब्रम्हानंदी..... 
जीवन रंगले विठ्ठल नामी  दंगले |
टाळासंगे आता अभंग रंगले ||
जाते दळता बनते ओवी |
नेते चिपळी विठूच्या  गावी || 
वारी मागून चाले दिंडी |
जाणा विठूनामाची हीच संधी || 
ध्यान लागता ब्रम्हानंदी |
काय काळ अन काय वेळ ती ||
मजला आता नाही चिंता |
विठूच आता मजला दिसता || 
अभंग आता नित्य भेट हि | 
चरणी तुझिया कधी रे घेसी || 
 श्री गुरुदेव दत्त.... 
आत्मस्वर : भूतां परस्परें पडो। मैत्र जीवाचें..!

मैत्री आणि मैत्रहे दोन शब्द तसे समानार्थी वाटतात..

तर मग पसायदानात ज्ञानेश्वरांनी भूतां परस्परे पडो, मैत्री जीवाचे असं न म्हणता

मैत्र जीवाचे असं का बरं म्हटलं असेल..?

 प्रेम जसं आपोआप होतं, तशीच मैत्री होते.. एक क्षण पुरे असतो मैत्रीला..

'समान स्वभाव, आवडी-निवडी.. यातून कळीचं अलगद फूल व्हावं तशी मैत्री होते..

सहवासातून, विचारांतून, एकमेकांच्या हृदयात जाऊ लागतो त्यावेळी मात्र मैत्र फुलतं..

हे फुलणं जाणीवेच्या पल्याड असतं.. शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले', असं घडतं..

मैत्रात देणं, घेणं, मागणं हे काहीच नसतं.. असतं ते केवळ संवेदन..!

त्यासाठी जवळ असण्याचीही गरज नसते, मैत्रात जाणवते फक्त एकरूपत्व.. सख्यभावात मैत्र अनुस्यूत असतं.. साधकाचा आत्मरूपाशी होणारा 'शब्देविण संवाद' म्हणजेच मैत्र..!

पत्नीच्या सांगण्यावरून सुदामा श्रीकृष्‍णाकडे, द्वारकेला गेला; पण काही मागावे असे त्याला वाटलेच नाही.. कृष्‍णाने मैत्रभावाने जाणलं होतं..

त्यानं मागितलं नाही, यानं दिलं नाही; पण मिळालं मात्र आपोआप..!

"मैत्र म्हणजे संवेदन एकरूपता".. असं साध्या शब्दांत म्हणता येईल..

मैत्रीजपूयाच पण जाणीवपूर्वक मैत्र देखील जपण्याचा प्रयत्न करु या..!!

ॐ श्री गुरुदेव दत्त...

















विश्वास....  आयुष्यात खूपच महत्वाचा.....


ज्ञान, पैसा, विश्वास, तिघे चांगले मित्र असतात.... त्यांच्यात प्रेम पण खूप असते पण एक वेळ अशी येते कि तिघांना वेगळे व्हावे लागते....

तिघे मग एकमेकांना प्रश्न विचारतात..... कोण कुठे कुठे जाणार ?....  ज्ञान म्हणते..... मी पवित्र ठिकाणी.... मंदिर, मस्जिद ,चर्च, विद्यालय मध्ये जाणार.....

पैसा म्हणतो.... मी मात्र मोठ्या महालात आणि श्रीमंत हुशार, बुद्धिवान लोकांकडे जाणार.... पण विश्वास शांत राहतो....

ज्ञान व पैसा दोघेजण त्याला शांत राहण्याचे कारण विचारतात.... त्यावर विश्वास म्हणतो..... मी मात्र एकदा निघून गेलो तर परत कधी नाही येणार...!!

म्हणूनच मित्रानो हि गोष्ट लक्षात ठेवा.... नातं कोणतेही असू द्या..... नात्यात महत्वाचा असतो तो एकमेकावरचा विश्वास..... एकदा का नात्यांमधला विश्वास उडाला कि आयुष्य रंग उडालेल्या भिंतीसारखं बेरंग बनत हे जाणून घ्या.... भिंतीना रंग परत देता येतो पण बेरंग आयुष्यात रंग भरणं.... विश्वास आणण खुप कठिण होउन बसतं......

आयुष्यात आपण किती प्रसिद्धि, यश, कीर्ति मिळवली यापेक्षा किती जिवाभावाची माणस जमवली हे महत्वाचे आहे... किती जणांचा विश्वास आणि प्रेम संपादन केले आणि किती जणांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला हे महत्वाचे आहे......

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

Friday 1 June 2012


मानसिकदृष्ट्या खंबीर असाल तर आपल्यातील क्षमतांचा योग्य वापर कराल ......

जीवनात जर आपल्याला मोठे काम करायचे असेल....  तर येणाऱ्या संकटाना योग्य प्रकारे हाताळण्यासाठी मानसिकदृष्ट्या खंबीर असावेच लागते....  कमकुवत मनाचे असाल.... तर संपूर्ण आयुष्याचा तोल बिघडू शकतो..... यादृष्टीने सचिन तेंडूलकरचे उत्कृष्ट उदाहरण पहा... त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा.... बलशाली भारत बनवा.... खालील गोष्ट विचारपूर्वक वाचा व त्यापासून बोध घ्या.....

सचिनने वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी पाकिस्तानमध्ये जाऊन इम्रान आणि अक्रमच्या गोलंदाजीचा सामना केला.... वकार युनुसचा बॉल जेव्हा त्याच्या नाकावर बसला तो प्रसंग....  त्याच्यासमोर नॉन-स्ट्रायकर एंडला उभा असणार्‍या सिद्धूच्या तोंडून ऐकण्यासारखा आहे.... सिद्धूचे बोलणे थोडक्यात लिहायचा मांडण्याचा प्रयत्न......

सिद्धू असे सांगतो..... गवताने पीच पूर्णपणे भरलेलं होतं, आणि इम्रान खानने आदेश दिला होता की, गवत कापलं तर मान कापून टाकीन..... तो सामन्याचा पाचवा दिवस होता.... भारताची २२ ला ४ अशी अवस्था होती.... परिस्थिती वाईट होती.... इथून बॉल जातोय , तिथून बॉल जातोय.... बॉल अंगाला शेकून छाती लाल झाली होती... माझं तर नुकतंच लग्न झालं होतं... मी सतत देवाकडे प्रार्थना करत होतो.... घरवालीला भेटू शकेन की नाही...?... ह्यापेक्षा देवा मला आऊटच कर.....

रवी शास्त्री दुसर्‍या बाजूला फलंदाजी करत होता.... त्याला वकारचा एक असा बाउन्सर पडला... त्याने बॅट घातली आणि गलीमध्ये झेल उडाला.... शास्त्री आऊट झाला... तो चरफडत निघून गेला.... मनात म्हणालो... अरेरे... मी का आउट झालो नाही....  आणि मी पाहिलं...  मला तेंडुलकर येताना दिसला.... मी मनात म्हणालो, ” गुरु… आता मात्र काम झालं... हा तर बळीचा बकरा आहे.... छोटू आहे, बच्चू आहे.. ... हा तर आऊट होणार.... आणि मग आहेच कोण..?   बस्स.…  कुंबळे शुम्बळे आहेत... सायकल स्टॅण्डप्रमाणे....  एकाला धक्का दिला की गड गड गड गड गड ठपाक .....

झाल... तेंडुलकर क्रिझवर आला.....  पहिला बॉल , झुम्म…! आतून गेला.... मी म्हणालो, ” गेला बॉस गेला गेला ” आणि पुढचा चेंडू……… मी.. मी.. माझ्या आयुष्यात तो चेंडू कधीच विसरू शकणार नाही.... वकारचा शॉर्ट बाऊन्सर, वेरी वेरी क्विक.... तेंडुलकरने पूल करायचा प्रयत्न केला.... बॅटची आतली कडा लागून बॉल सरळ तेंडुलकरच्या नाकावर बसला.... तेंडुलकर खाली कोसळला.... त्यावेळी पहिल्यांदा माझ्या मनात विचार आला तो म्हणजे, ‘ मेला पोरगा‘ तो खाली कोसळल्याबरोबर मी त्याच्या दिशेने धावत गेलो.... आणि मी पाहिलं, त्याचं नाक फुटलं होतं.... तोंड पूर्णपणे रक्ताने माखलेलं होतं.... सगळ्या शर्टवर रक्तच रक्त..... त्याचा श्वासोश्वास जोरजोरात चालू होता..... मला भीती वाटली..... वाचेल पोरगा की नाही वाचणार....?

मी जोरात किंचाळलो, ” बॉस स्ट्रेचर... स्ट्रेचर”.... मी समोर बघितलं... तर मला अली इराणी येताना दिसला.... मी कपाळावर हात मारला आणि माझ्या अंगातली ताकदच निघून गेली..... अलीचे उपचार म्हणजे तेंडुलकरच्या आजारपणापेक्षा वाईट होते.... त्याच्याकडे एक सॅरीडॉनची गोळी असायची..... आणि दुसरी डोकं शेकायची बर्फाची पिशवी.... आणि मला तो बर्फाची पिशवी घेऊन येताना दिसला..... त्याने तेंडुलकरला शेकवायला सुरुवात केली..... आणि सॅरीडॉनची गोळी त्याच्या तोंडात घातली.... मी माझ्या जागेवर जाण्यासाठी मागे फिरलो.... मनात विचार करत होतो.... ६ आऊट झालेत, हा वाचतोय की नाही काय माहिती...?  मी माझ्या जागेवर पोहोचणार....

इतक्यात माझ्या कानावर नाजूक शब्द पडले... “मै खेलेगा...” मी गर्रकन मागे वळून पाहिलं.... त्याच्या नाकातून कापूस पडत होता.... रक्त सांडत होतं.... आणि तो अलीला सांगत होता, ” मै खेलेगा , मै खेलेगा…. अली मै खेलेगा..” अरे देवा... त्या परिस्थितीत मला लागलं असतं.... तर मी सामना संपल्यावर संध्याकाळी साडे-पाच नंतरच उठलो असतो.... मी त्याच्याकडे पाहिलं... आणि माझ्या अंतर्मनातून एक आवाज आला.... “ सरदारजी बघ त्याच्याकडे.... तू अठ्ठावीस-तीस वर्षाचा आहेस.... तो पंधरा वर्षाचा आहे.... तू बघ तर त्याच्याकडे.... ह्या वयात तो आपल्या देशासाठी लढायला तयार आहे.... आणि तू.. ? ... तू ह्या परिस्थितीमध्ये देशासाठी न खेळता....    आपल्या बायकोचा विचार करतो आहेस...? मिळेल भेटायला की नाही...?  त्यावेळी मला गदगदून आले.... एक  प्रेरणास्थान मिळाले जे माझ्यासमोर होते.... नवीन उर्जा प्राप्त झाली....   त्यावेळी मला एक ओळ आठवली.....   जो भरा नही है भाव वो.... बहती उस से रस धार नही... हृदय नही वो पत्थर है.... जिसमे स्वदेश का प्यार नही....

त्या पुढचा वकारचा बॉल, यॉर्कर…. ताशी १५० किमी वेगाने सचिनच्या दिशेने आला.... हा असला यॉर्कर मी मागच्या सामन्यात भोगलेला होता.... एक तर आपले पाय वाचवायचे नाही तर विकेट फेकायची.... मी आणि कपिल पाजी अशा चेंडूंवर आधीच्या सामन्यात आऊट झालो होतो.... पण सचिनला वकारच्या ह्या चेंडूची जणू काही पूर्व कल्पनाच होती... तो आधीच दोन फुट मागे उभा राहिला होता.... १५० किमीने त्याच्या जवळ जाणारा चेंडू सचिनने ताशी १८० किमी वेगाने माझ्या दिशेने टोलवला.... मी माझे दोन्ही पाय फाकवले... आणि माझ्या दोन पायांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडच्या होल्डिंगवर लागून परत आला.... मैदानात पिन ड्रॉप सायलेन्स.... सर्व आवाज बंद.... वकार सचिनच्या दिशेने गेला... आणि खुन्नसने सचिनकडे पहायला लागला.... माझ्याकडे जर वकारने तसे पाहिले असते... तर मी चंद्र तारे पहायला लागलो असतो....

पण तुम्हाला सांगतो....  सचिन पुढे झाला.... त्याने वकारच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं.... आणि तो काय म्हणाला... ह्याचा अर्थ मला कळला नाही... कारण तो मराठीमध्ये बोलत होता.... पण ते त्याचे शब्द माझ्या अजून लक्षात आहेत.... मला त्याचा अर्थ माहिती नाही.... मी तो जाणून घ्यायचा कधी प्रयत्न पण नाही केला.... पण तो वकारच्या डोळ्याला डोळा भिडवून म्हणाला..... ” बटर , बटर तुझ्या आईचा घो…..” वकारने मान खाली घातली व शांतपणे मागे गेला..... त्या सामन्यात सचिन नाबाद ५७ आणि मी नाबाद ९७ राहून तो सामना अनिर्णीत राखला....”

वाचलीत हि गोष्ट... आता उठा... स्वतःचे आत्मपरीक्षण करा... स्वतःमध्ये  योग्य ते बदल करा... मानसिक व शारीरिकरीत्या बलशाली बना....  मानसिकदृष्ट्या खंबीर असाल तर  संधी मिळाल्यास अवघड काम तडीस नेण्याची क्षमता आपल्यामध्ये असते..... फक्त स्वत:वरील विश्‍वास ढळू देऊ नका..... आयुष्यात जे काही कराल, ते मनापासून करा..... तरच तुमच्याकडून महान कार्य घडू शकेल...... कुणाचेहि अनुकरण न करता नव्या वाटांचा शोध घेत असाल... तर यातून तुमचे वेगळेपण किंवा असामान्यत्व सिद्ध होऊ शकते..... यश आणि अपयश यातील सीमारेषा खूप धूसर आहे..... त्यामुळे अपयश पदरी येणार असेल, तरी आत्मविश्‍वास ढळू देऊ नका...... यातून पुढे उत्तुंग गरुड भरारी घेता येते..... आपल्यातील क्षमतांचा योग्य वापर करा.... समाजाला... देशाला बलशाली करा.....

ॐ श्री गुरुदेव दत्त .....