Tuesday 26 June 2012

आत्मस्वर : भूतां परस्परें पडो। मैत्र जीवाचें..!

मैत्री आणि मैत्रहे दोन शब्द तसे समानार्थी वाटतात..

तर मग पसायदानात ज्ञानेश्वरांनी भूतां परस्परे पडो, मैत्री जीवाचे असं न म्हणता

मैत्र जीवाचे असं का बरं म्हटलं असेल..?

 प्रेम जसं आपोआप होतं, तशीच मैत्री होते.. एक क्षण पुरे असतो मैत्रीला..

'समान स्वभाव, आवडी-निवडी.. यातून कळीचं अलगद फूल व्हावं तशी मैत्री होते..

सहवासातून, विचारांतून, एकमेकांच्या हृदयात जाऊ लागतो त्यावेळी मात्र मैत्र फुलतं..

हे फुलणं जाणीवेच्या पल्याड असतं.. शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले', असं घडतं..

मैत्रात देणं, घेणं, मागणं हे काहीच नसतं.. असतं ते केवळ संवेदन..!

त्यासाठी जवळ असण्याचीही गरज नसते, मैत्रात जाणवते फक्त एकरूपत्व.. सख्यभावात मैत्र अनुस्यूत असतं.. साधकाचा आत्मरूपाशी होणारा 'शब्देविण संवाद' म्हणजेच मैत्र..!

पत्नीच्या सांगण्यावरून सुदामा श्रीकृष्‍णाकडे, द्वारकेला गेला; पण काही मागावे असे त्याला वाटलेच नाही.. कृष्‍णाने मैत्रभावाने जाणलं होतं..

त्यानं मागितलं नाही, यानं दिलं नाही; पण मिळालं मात्र आपोआप..!

"मैत्र म्हणजे संवेदन एकरूपता".. असं साध्या शब्दांत म्हणता येईल..

मैत्रीजपूयाच पण जाणीवपूर्वक मैत्र देखील जपण्याचा प्रयत्न करु या..!!

ॐ श्री गुरुदेव दत्त...

















विश्वास....  आयुष्यात खूपच महत्वाचा.....


ज्ञान, पैसा, विश्वास, तिघे चांगले मित्र असतात.... त्यांच्यात प्रेम पण खूप असते पण एक वेळ अशी येते कि तिघांना वेगळे व्हावे लागते....

तिघे मग एकमेकांना प्रश्न विचारतात..... कोण कुठे कुठे जाणार ?....  ज्ञान म्हणते..... मी पवित्र ठिकाणी.... मंदिर, मस्जिद ,चर्च, विद्यालय मध्ये जाणार.....

पैसा म्हणतो.... मी मात्र मोठ्या महालात आणि श्रीमंत हुशार, बुद्धिवान लोकांकडे जाणार.... पण विश्वास शांत राहतो....

ज्ञान व पैसा दोघेजण त्याला शांत राहण्याचे कारण विचारतात.... त्यावर विश्वास म्हणतो..... मी मात्र एकदा निघून गेलो तर परत कधी नाही येणार...!!

म्हणूनच मित्रानो हि गोष्ट लक्षात ठेवा.... नातं कोणतेही असू द्या..... नात्यात महत्वाचा असतो तो एकमेकावरचा विश्वास..... एकदा का नात्यांमधला विश्वास उडाला कि आयुष्य रंग उडालेल्या भिंतीसारखं बेरंग बनत हे जाणून घ्या.... भिंतीना रंग परत देता येतो पण बेरंग आयुष्यात रंग भरणं.... विश्वास आणण खुप कठिण होउन बसतं......

आयुष्यात आपण किती प्रसिद्धि, यश, कीर्ति मिळवली यापेक्षा किती जिवाभावाची माणस जमवली हे महत्वाचे आहे... किती जणांचा विश्वास आणि प्रेम संपादन केले आणि किती जणांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला हे महत्वाचे आहे......

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

No comments:

Post a Comment