Friday 1 June 2012


मानसिकदृष्ट्या खंबीर असाल तर आपल्यातील क्षमतांचा योग्य वापर कराल ......

जीवनात जर आपल्याला मोठे काम करायचे असेल....  तर येणाऱ्या संकटाना योग्य प्रकारे हाताळण्यासाठी मानसिकदृष्ट्या खंबीर असावेच लागते....  कमकुवत मनाचे असाल.... तर संपूर्ण आयुष्याचा तोल बिघडू शकतो..... यादृष्टीने सचिन तेंडूलकरचे उत्कृष्ट उदाहरण पहा... त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा.... बलशाली भारत बनवा.... खालील गोष्ट विचारपूर्वक वाचा व त्यापासून बोध घ्या.....

सचिनने वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी पाकिस्तानमध्ये जाऊन इम्रान आणि अक्रमच्या गोलंदाजीचा सामना केला.... वकार युनुसचा बॉल जेव्हा त्याच्या नाकावर बसला तो प्रसंग....  त्याच्यासमोर नॉन-स्ट्रायकर एंडला उभा असणार्‍या सिद्धूच्या तोंडून ऐकण्यासारखा आहे.... सिद्धूचे बोलणे थोडक्यात लिहायचा मांडण्याचा प्रयत्न......

सिद्धू असे सांगतो..... गवताने पीच पूर्णपणे भरलेलं होतं, आणि इम्रान खानने आदेश दिला होता की, गवत कापलं तर मान कापून टाकीन..... तो सामन्याचा पाचवा दिवस होता.... भारताची २२ ला ४ अशी अवस्था होती.... परिस्थिती वाईट होती.... इथून बॉल जातोय , तिथून बॉल जातोय.... बॉल अंगाला शेकून छाती लाल झाली होती... माझं तर नुकतंच लग्न झालं होतं... मी सतत देवाकडे प्रार्थना करत होतो.... घरवालीला भेटू शकेन की नाही...?... ह्यापेक्षा देवा मला आऊटच कर.....

रवी शास्त्री दुसर्‍या बाजूला फलंदाजी करत होता.... त्याला वकारचा एक असा बाउन्सर पडला... त्याने बॅट घातली आणि गलीमध्ये झेल उडाला.... शास्त्री आऊट झाला... तो चरफडत निघून गेला.... मनात म्हणालो... अरेरे... मी का आउट झालो नाही....  आणि मी पाहिलं...  मला तेंडुलकर येताना दिसला.... मी मनात म्हणालो, ” गुरु… आता मात्र काम झालं... हा तर बळीचा बकरा आहे.... छोटू आहे, बच्चू आहे.. ... हा तर आऊट होणार.... आणि मग आहेच कोण..?   बस्स.…  कुंबळे शुम्बळे आहेत... सायकल स्टॅण्डप्रमाणे....  एकाला धक्का दिला की गड गड गड गड गड ठपाक .....

झाल... तेंडुलकर क्रिझवर आला.....  पहिला बॉल , झुम्म…! आतून गेला.... मी म्हणालो, ” गेला बॉस गेला गेला ” आणि पुढचा चेंडू……… मी.. मी.. माझ्या आयुष्यात तो चेंडू कधीच विसरू शकणार नाही.... वकारचा शॉर्ट बाऊन्सर, वेरी वेरी क्विक.... तेंडुलकरने पूल करायचा प्रयत्न केला.... बॅटची आतली कडा लागून बॉल सरळ तेंडुलकरच्या नाकावर बसला.... तेंडुलकर खाली कोसळला.... त्यावेळी पहिल्यांदा माझ्या मनात विचार आला तो म्हणजे, ‘ मेला पोरगा‘ तो खाली कोसळल्याबरोबर मी त्याच्या दिशेने धावत गेलो.... आणि मी पाहिलं, त्याचं नाक फुटलं होतं.... तोंड पूर्णपणे रक्ताने माखलेलं होतं.... सगळ्या शर्टवर रक्तच रक्त..... त्याचा श्वासोश्वास जोरजोरात चालू होता..... मला भीती वाटली..... वाचेल पोरगा की नाही वाचणार....?

मी जोरात किंचाळलो, ” बॉस स्ट्रेचर... स्ट्रेचर”.... मी समोर बघितलं... तर मला अली इराणी येताना दिसला.... मी कपाळावर हात मारला आणि माझ्या अंगातली ताकदच निघून गेली..... अलीचे उपचार म्हणजे तेंडुलकरच्या आजारपणापेक्षा वाईट होते.... त्याच्याकडे एक सॅरीडॉनची गोळी असायची..... आणि दुसरी डोकं शेकायची बर्फाची पिशवी.... आणि मला तो बर्फाची पिशवी घेऊन येताना दिसला..... त्याने तेंडुलकरला शेकवायला सुरुवात केली..... आणि सॅरीडॉनची गोळी त्याच्या तोंडात घातली.... मी माझ्या जागेवर जाण्यासाठी मागे फिरलो.... मनात विचार करत होतो.... ६ आऊट झालेत, हा वाचतोय की नाही काय माहिती...?  मी माझ्या जागेवर पोहोचणार....

इतक्यात माझ्या कानावर नाजूक शब्द पडले... “मै खेलेगा...” मी गर्रकन मागे वळून पाहिलं.... त्याच्या नाकातून कापूस पडत होता.... रक्त सांडत होतं.... आणि तो अलीला सांगत होता, ” मै खेलेगा , मै खेलेगा…. अली मै खेलेगा..” अरे देवा... त्या परिस्थितीत मला लागलं असतं.... तर मी सामना संपल्यावर संध्याकाळी साडे-पाच नंतरच उठलो असतो.... मी त्याच्याकडे पाहिलं... आणि माझ्या अंतर्मनातून एक आवाज आला.... “ सरदारजी बघ त्याच्याकडे.... तू अठ्ठावीस-तीस वर्षाचा आहेस.... तो पंधरा वर्षाचा आहे.... तू बघ तर त्याच्याकडे.... ह्या वयात तो आपल्या देशासाठी लढायला तयार आहे.... आणि तू.. ? ... तू ह्या परिस्थितीमध्ये देशासाठी न खेळता....    आपल्या बायकोचा विचार करतो आहेस...? मिळेल भेटायला की नाही...?  त्यावेळी मला गदगदून आले.... एक  प्रेरणास्थान मिळाले जे माझ्यासमोर होते.... नवीन उर्जा प्राप्त झाली....   त्यावेळी मला एक ओळ आठवली.....   जो भरा नही है भाव वो.... बहती उस से रस धार नही... हृदय नही वो पत्थर है.... जिसमे स्वदेश का प्यार नही....

त्या पुढचा वकारचा बॉल, यॉर्कर…. ताशी १५० किमी वेगाने सचिनच्या दिशेने आला.... हा असला यॉर्कर मी मागच्या सामन्यात भोगलेला होता.... एक तर आपले पाय वाचवायचे नाही तर विकेट फेकायची.... मी आणि कपिल पाजी अशा चेंडूंवर आधीच्या सामन्यात आऊट झालो होतो.... पण सचिनला वकारच्या ह्या चेंडूची जणू काही पूर्व कल्पनाच होती... तो आधीच दोन फुट मागे उभा राहिला होता.... १५० किमीने त्याच्या जवळ जाणारा चेंडू सचिनने ताशी १८० किमी वेगाने माझ्या दिशेने टोलवला.... मी माझे दोन्ही पाय फाकवले... आणि माझ्या दोन पायांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडच्या होल्डिंगवर लागून परत आला.... मैदानात पिन ड्रॉप सायलेन्स.... सर्व आवाज बंद.... वकार सचिनच्या दिशेने गेला... आणि खुन्नसने सचिनकडे पहायला लागला.... माझ्याकडे जर वकारने तसे पाहिले असते... तर मी चंद्र तारे पहायला लागलो असतो....

पण तुम्हाला सांगतो....  सचिन पुढे झाला.... त्याने वकारच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं.... आणि तो काय म्हणाला... ह्याचा अर्थ मला कळला नाही... कारण तो मराठीमध्ये बोलत होता.... पण ते त्याचे शब्द माझ्या अजून लक्षात आहेत.... मला त्याचा अर्थ माहिती नाही.... मी तो जाणून घ्यायचा कधी प्रयत्न पण नाही केला.... पण तो वकारच्या डोळ्याला डोळा भिडवून म्हणाला..... ” बटर , बटर तुझ्या आईचा घो…..” वकारने मान खाली घातली व शांतपणे मागे गेला..... त्या सामन्यात सचिन नाबाद ५७ आणि मी नाबाद ९७ राहून तो सामना अनिर्णीत राखला....”

वाचलीत हि गोष्ट... आता उठा... स्वतःचे आत्मपरीक्षण करा... स्वतःमध्ये  योग्य ते बदल करा... मानसिक व शारीरिकरीत्या बलशाली बना....  मानसिकदृष्ट्या खंबीर असाल तर  संधी मिळाल्यास अवघड काम तडीस नेण्याची क्षमता आपल्यामध्ये असते..... फक्त स्वत:वरील विश्‍वास ढळू देऊ नका..... आयुष्यात जे काही कराल, ते मनापासून करा..... तरच तुमच्याकडून महान कार्य घडू शकेल...... कुणाचेहि अनुकरण न करता नव्या वाटांचा शोध घेत असाल... तर यातून तुमचे वेगळेपण किंवा असामान्यत्व सिद्ध होऊ शकते..... यश आणि अपयश यातील सीमारेषा खूप धूसर आहे..... त्यामुळे अपयश पदरी येणार असेल, तरी आत्मविश्‍वास ढळू देऊ नका...... यातून पुढे उत्तुंग गरुड भरारी घेता येते..... आपल्यातील क्षमतांचा योग्य वापर करा.... समाजाला... देशाला बलशाली करा.....

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

No comments:

Post a Comment