आयुष्यातील सवयी आणि संकल्प...
नवीन दिवस असो किंवा नवीन वर्ष, निसर्ग सर्वांना एकसारखीच सुरवात देतो, पण तरीही प्रत्येकाच्या दिवसाचा आणि वर्षाचा एण्ड वेग-वेगळा का..?.. काही यशस्वी होतात तर काही नाही असे का..?.. मित्रांनो चांगली सुरवात करणे म्हणजेच अर्धे काम फत्ते झाल्यासारखेच असते… ज्या पद्धतीने आपली सुरवात होत असते त्यावरच त्या दिवसाचा, वर्षाचा किंवा कामाचा एण्ड अवलंबुन असतो…
नवीन वर्ष आले की संकल्पांचा पाउस, पण आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी आणि योग्य दिशेने आगेकूच करण्यासाठी गरज आहे ती प्रभावी चॉइसेसची, ज्या फक्त चॉइसेसच नसून जगभरातील सफल लोकांच्या तीन सर्वोत्तम सवयी देखील आहेत… ज्या आपल्यालाही त्यांच्याप्रमाणे सफलता, समाधान, सन्तलुन, साहस आणि आत्मविश्वास देतील… सफल लोकांप्रमाणे सफलतेसाठी आपल्यालाही आपल्या दृष्टिकोनात आणि चॉइसेसमधे बदल करणे अनिवार्य आहे… कारण बदल, विकास आणि यश हे केवळ आपल्या निवडींवरच अवलंबुन असते…
अ) योग्य पारख करणे (Appreciation ) : यशापयश हे केवळ आपण केलेल्या चॉइसेस वरुन ठरते म्हणूनच आपल्याला पारखी बनणे गरजेचे आहे... खरा पारखी व्यक्ती तोच असतो जो स्वत:ला पूर्णपणे ओळखतो आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे व्यक्ती, वस्तू, निर्णय, गुंतवणूक व इतर बाबींमधे योग्य निवडी आपण तेंव्हाच करू शकतो जेंव्हा स्वत:ला स्वत:च्या विचारांची, ज्ञानाचि, वैशिष्ट्यांची व अनुभवांची पूर्ण पारख असते... पारखी बना व काम, दिवस आणि वर्ष यशस्वी बनवा...
ब) स्वीकृती करणे / मान्य करणे (Acceptance) : आपण विकासाकडे तेंव्हाच वळतो जेंव्हा एखादे ध्येय मान्य करतो... यानंतर आपल्या उणीवा, चूका व नकारात्मक गुणांची स्वीकृती केल्यावरच वयक्तिक तसेच व्यावहारिक बदल, सुधार आणि विकास शक्य आहे...
- स्वीकार करा योग्य बदलांचा, विचारांचा व आचरणांचा...
- खरं जीवन असो किंवा फेसबुक स्वीकार करा मर्यादा, शिस्त, नियम, आदर व जवाबदार्या पाळण्याचा...
- स्वीकार करा सतत शिकण्याचा, विचारी, वास्तविक आणि संतुलित बनण्याचा... स्वीकार करा प्रोत्साहन व पाठिंबा देण्याचा आणि योग्य गुंतवणुकीचा...
- स्वीकार करा शब्द पाळण्याचा, वचनबद्ध राहण्याचा, दुसऱ्याचे मन, मान, सन्मान आणि आदरभाव जपण्याचा तरच आपणास योग्य ते सर्व मिळेल...
- घर, समाज, देश असो किंवा पर्यावरण प्रत्येकाच्या छोट्यातल्या-छोट्या योगदानानेच मोठ्यातले-मोठे बदल घडत असतात म्हणून स्वीकार करा जागरूक, सतर्क व कर्तव्यदक्ष राहण्याचा, निस्वार्थ सेवा करण्याचा, निसर्ग जपण्याचा आणि स्वभावात सौम्यता ठेवण्याचा...
क) प्रतिकार करणे (Resistance) : मित्रांनो, प्रतिकार करणे म्हणजे कोणाच्या विरूद्धात जाणे नसून नकारात्मक बाबींनपासून स्वत:ला थांबवणे व त्यापासून दूर राहणे... काही इइच्छा वा व्यसने तुम्हाला गुलाम करतील... भ्रष्ट्र आचार तुम्हाला कमजोर करील तर आळस तुम्हाला पराक्रमशून्य बनवेल मग असे असतांना आपले काम, दिवस किंवा वर्ष यशस्वी होईल कसे..?.. यासाठीच समृद्ध, सन्मानयुक्त आणि समाधानकारक प्रतिकार गरजेचा आहे... प्रतिकार करणे म्हणजे स्वता:ला खालील बाबींपासून दूर ठेवणे...
१) प्रतिकार करा नकारात्मक विचारांचा, वाइट सांगतीचा, वेळेच्या अपव्ययाचा व अयोग्य लोकांचा...
२) प्रतिकार करा अज्ञानाचा, अवास्तविकतेचा, असंतुलित आहाराचा व वागण्याचा... काम नसतांही अयोग्यात बिझी राहण्याचा, राग व अहंकाराचा...
३) प्रतिकार करा सुविधांचा दूरउपयोग करण्याचा, टाळाटाळ करण्याचा, कारणे देण्याचा व इतरांना दुखावणार्या कृत्यांचा प्रतिकार करा...
४) प्रतिकार करा शॉर्टकट मारण्याचा, इतरांचे श्रेय लाटण्याचा, इतरांवर अन्याय करण्याचा... व्यसन, व्यंग व वायफळ गोष्टी करण्याचा...
मित्रांनो, आयुष्यात सर्व काही आपल्या चॉइसेसवर निर्भर आहे आणि म्हणूनच वरील तीन चॉइसेस निरंतर लक्षात ठेवा... कारण “अमल करो तो बनती है जिंदगी जन्नत भी, जहन्नुम भी”... मग करा तर एक दमदार सुरवात नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने, दर दिवशी आणि दरवर्षी... शेवटी परत एकदा सांगतो मित्रांनो, शेवट चांगला असो किंवा वाईट, सुखद असो किंवा दु:खद फरक असतो तो फक्त योग्य चॉइसेसचा...
No comments:
Post a Comment