Thursday 30 August 2012

सर्व जीवाचे उदिष्ठ व्हावे साध्य` | स्वामी तुम्हीच सर्वांचे आराध्य

दुर्लभ असा नरदेह जाणावा.... परमार्थी सत्कारणी देह लावावा....
एकदा भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांच्यात वाद होतो.... लक्ष्मी मातेचं म्हणणं असं असतं, कि.... माणसाचे अस्तित्व असणे आणि आज हे जग चाललय.... ते फक्त माझ्यामुळे म्हणजेच धनामुळे - पैशामुळे.... आज ज्या माणसाकडे पैसा नाही, संपत्ती नाही.... त्याला काही किंमत नाही..... माणूस ओळखतो... जाणतो.... आणि बोलतो ते फक्त पैशानेच... 

यावर विष्णू भगवान हसून म्हणतात कि.... देवी,  असं काही नाहीये.... माणसाला खऱ्या अर्थाने तू अजून ओळखले नाहीस..... पण लक्ष्मी माता येन केन प्रकारे पटवून देण्याचा प्रयत्न करत असते.... कि धनालाच जास्त महत्व आहे.... तरीही विष्णू भगवान मान्य करत नाहीत.... म्हणून लक्ष्मी माता म्हणते... ठीक आहे, मी सिद्ध करून दाखवते.... मग तरी मान्य कराल कि नाही...?

विष्णू भगवान म्हणतात... हो हो चालेल.... त्यावर लक्ष्मी माता पृथ्वी वरील एक दृश्य दाखवते.... एक शोकमग्न अंत्ययात्रा चालली असते.... लक्ष्मी माता आकाशातून धनाचा वर्षाव सुरु करते.... आणि लगेच अंत्ययात्रेतील सगळे लोक आपण कुठे जातोय.... हे विसरून पैसे गोळा करू लागतात.... लक्ष्मी माता भगवान विष्णूंकडे पाहत म्हणते.... पाहिलंत...? धनासमोर माणूस आपण कोणाला तरी कायमचे गमावून बसलोय हे दुखः देखील विसरतो.... 

अगं पण त्या चौघांच काय...? जे मृत देहाला खांदा देऊन आहेत....? ते तर नाही ना वाकले पैसे उचलायला...? विष्णू भगवान हसत म्हणाले..... लक्ष्मी माता म्हणाली, " ठीक आहे..... आता हे बघाच.... एवढे म्हणून लक्ष्मी मातेने खांदा दिलेल्या त्या चौघांसमोर धनाचा वर्षाव सुरु केला..... त्या चौघांनी प्रेत बाजूला ठेवलं..... आणि जमेल तितके पैसे गोळा करायला सुरुवात केली..... 

यावर लक्ष्मी मातेने आपण जिंकलो या अविर्भावात भगवान विष्णूंना प्रश्न केला.... स्वामी आता तरी पटलं कि नाही....? माणसासाठी मी म्हणजेच सर्वकाही.... देवी, अजून ही एकजण बाकी आहे..... दृश्याकडे पाहत विष्णू भगवान म्हणाले.... तो जो तिरडीवर झोपलाय.... तो तर नाही उठला हे धन - पैसे उचलायला...?  लक्ष्मी माता म्हणली.... तो उठेल तरी कसा...? तो मृत आहे.... त्याच्या शरीरात आत्माच नाहीये.... 

तत्क्षणी भगवान विष्णू म्हणाले.... देवी, हेच तर सांगायचं मला.... जो पर्यंत मी शरीरात आहे तो पर्यंतच तुला म्हणजेच धन संपत्तीला मान आणि किंमत.... आज मनुष्य या मायारूपी धनाला भुलतो व मला विसरून नरदेह फुकट घालवतो..... ज्या क्षणी मी मनुष्य देहातून अंतर्धान पावलो.... त्या क्षणी त्या मनुष्यासाठी पैसा मातीमोल नव्हे का....

तात्पर्य : बघा हे अगदी खरे आहे..... आणि माणसा बद्दल हेच तर आश्चर्य आहे कि तो धन संपत्तीसाठी आपले जीवन पणाला लावतो.... पण मग तोच पैसा त्याचा जीव का नाही वाचवू शकत....? आज माणूस आयुष्य जगताना असा जगतो कि कधीच मरणारच नाही..... आणि मरताना असा मरतो कि कधी जगलाच नाही.... 

यावर नक्कीच विचार करायला पाहिजे.... आणि म्हणूनच पैश्यापेक्षा सुद्धा लाख मोलाचा असलेला आपला सजीव देह सत्कारणी लावावा.... आता प्रपंच काय किंवा परमार्थ काय, काहीही करताना हा देह आवश्यकच आहे.... आणि सजीव देहाशिवाय माणसाला काहीच करता येत नाही.... हा जो मानवी देह आहे.... तो माणसाला काही सुखासुखी प्राप्त झालेला नाही.... या जगातील चौर्‍यांशी लक्ष योन्यांत जन्म घेता घेता नर-तनु प्राप्त झाली आहे.... म्हणूनच समर्थ रामदासांनी सांगितले आहे....

बहुता जन्मांचा शेवट.... नरदेह सांपडे अवचट.... नरदेह संसारी.... परम दुर्लभ असे....
नाना सुकृतांचे फळ.... तो हा नरदेह केवळ.... जन्मा आलियाचे फळ....कांही करावे सफळ.... 
पाप पुण्य समता घडे.... तसेच नरदेह जोडे.... नरदेहाचे उचित.... काही करावे आत्महित.... ( समर्थ दासबोध ) 

म्हणजेच या संसारात नरदेह हा फार दुर्लभ आहे नाना सुकृतांचे फळ या स्वरूपात नर-शरीर लाभते..... पाप-पुण्य जेव्हा समान होते, तेव्हाच आपल्याला नर-तनूची प्राप्ती होते.... म्हणूनच असा दुर्लभ नरदेह मिळाल्यावर तो आपण सफळ केला पाहिजे.... नरदेह प्राप्त झाला असता, त्याला उचित असे आत्महित साधून घ्यावयास हवे.... आणि आत्महित करावयाचे म्हणजे परमार्थ करावयाचा.... देहाचा उपयोग जर परमार्थांसाठी केला तरच त्या शरीराचे-देहाचे सार्थकच होणार आहे.... व परिणाम स्वरूपी देह बंधनातून मुक्त होऊन आत्मरुपात विलीन होईल....

ॐ श्री गुरुदेव दत्त....



स्वामी प्रार्थना : 

सर्व जीवाचे उदिष्ठ व्हावे साध्य` | स्वामी तुम्हीच सर्वांचे आराध्य | नित्य वंदावे तव पाद्य | नमोनिया त्रिकाळी ||१||
सानिध्य लाभले तव चरणाचे | भाग्य उजळले शरणागताचे | भेद मिटले जन्मान्तराचे | जगण्याची हीच इच्छा ||२||
तव इच्छेनेच घडती जनभेटी | असो सभोवती सज्ज्नांची दाटी | भिऊ नको मी तुझ्या पाठी | ऐकून घडते दर्शन तुमचे ||३||
जे काम हाती आले | त्यातूनच साधावे भले | डोळे आश्रुनी व्हावेत ओले | तव चरणक्षालनासी ||४||
इच्छेची तुमच्या आवाज्ञा नसावी | हीच दक्षता अंगी यावी | मलीनता निघोनी जावी | सत्वर तव कृपेने ||५||
तुम्ही इच्छिलेले कर्म | तोच असावा आमचा धर्म | तव सेवेचे जाणुनी वर्म | वर्तत असावे सदा||६||
जो तुम्हाला आहे त्याग | तोच मनी नसावा भोग | हा वरकरणी आहे रोग | नसावी हानी काही ||७||
सकार बोलण्याचा परिणाम | करतो तुमच्या दर्शनाचे काम | नित्य असावे आमही ठाम | तव दर्शनासी ||८||
तुम्हीच आमचे राम | तुम्हीच आमचे शाम | तुमच्या चरणीच चारी धाम | आम्ही असू दर्शनाभिलाषी ||९||
अनुसंधान साधते सुविचाराने | त्रस्त होतो जीव कुविचाराने | दोन्ही येते तुमच्या इच्छेने | आता करवून घ्यावे योग्यते ||१०||
अज्ञानाची हि आपत्ती | वाढवते ज्ञानाची संपत्ती | त्यात दर्शन हीच प्राप्ती | तळमळ नित्य असावी ||११||
कष्ट अपार घडो ज्ञानासाठी | तो संचय असावा देण्यासाठी | झोळी फाटकी नसावी घेण्यासाठी | कदापीही ||१२||
जनास रुचेल तेच मी द्यावे | सर्वांतच तुम्हाला पहावे | परोपकारासाठीच जगावे | सर्वकाळ ||१३||
अनुभव जनाचे हेच दर्शन | त्यात मानाचे नसावे आकर्षण | तरीच होईल पुनर्वषण | तव कृपेचे ||१४||
कार्मातुनच मिळावे ज्ञान | शंकेचेही व्हावे समाधान | फुकाचा नसावा अभिमान | कष्टातुनी आता ||१५||
तुमच्या कृपेने संचय होवो | वितरणात निस्वार्थ राहो | अहंभाव हि सरो |.आत्मसुखासाठी ||१६||
भेटणाऱ्यातच आमचे भले असे | न मिळणारे कामाचे नसे | तेथे हि टिकावे सेवेचे पिसे | नम्रतेने स्वामीराया||१७||
मर्यादित यशाची व्यथा | असे आमुची कमतरता | यातही तुमची उदारता | व्हावे आम्ही महान ||१८||
ज्यांची मजप्रती अपेक्षा | त्यांची न व्हावी उपेक्षा | तुमच्या आशीर्वादाची भिक्षा | चोख व्यवहारा साठीच ||१९||
स्वार्थापोटी नको फसवणे | उदिष्ठा साठी नसावे अडवणे | देहास हि दंड देणे | नसावे कृत्य आमचे||२०||
क्षमावा हा अपराध | इच्छेला तुमच्या द्यावी दाद | सत्कर्मासाठी नको वाद | अनुसंधान साधावे||२१||
अव्दितीय असे तुमचे देणे | आता संयमा वाचून न रहाणे. |तुमचा कौल आहे घेणे | हानी टळण्या वळणावरी ||२२||
अभिमानाची व्यथा न जडो | परोपकार सतत घडो | सत्संगती सदा वाढो | इच्छा माझी स्वामिया ||२३||
उगाच नको तर्क वितर्क | फसवणुकीने होउ नये गर्क | सत्वाचाच पीत असावा अर्क | तव कृपेने स्वामीराया||२४||
अपात्र म्हणुनी नका दूर लोटू | मग तुम्हावीण कोणास भेटू? | दु:ख हे कोणासवे वाटू ? | स्वामीराया ||२५||
तव आशीर्वाद असे माझा श्वास | तव चरणाशी नम्र हा दास | आम्हा न करा उदास | प्रभो कालत्रयी ||२६||
दुष्कर्माच्या भोगाचे फटके | नसावे परी रहाटके | रागावणे असावे लटके | ठेऊन तळाशी प्रेमभाव ||२७||
जर नको ते घडले | तरी काही कमी न पडले | मात्र तुमच्या कृपे वाचून सर्व नडले | राहो सदा स्मरणात||२८||
हेच ठसावे मनात | तरच योग्य मी जनात | तव सेवेचा ध्यास स्मरणात | अखंड वसो ||२९||
माझी न योग्यता | तुम्ही निवाराव्या सर्वच खंता | अभिमानाने सर्व नासता | कर्म गहन मी म्हणतसे ||३०||
येथे खुंटते माझी प्रगती | वेळेच्या सदुपयोगाने मिळावी गती | अनुसरावी योग्य नीती | साधावया हित माझे ||३१||
हि आहे मनीची व्यथा | दासाच्या जीवनाची रंगवा कथा | नतमस्तक होऊनी ठेवितो माथा | चरणावरी स्वामिया ||३२||




राम नाम अभंग - ओवी ..... chetank....

जाणावे भक्ती मार्ग मर्म.... असावे राम पदी कर्म.... देईल गुरु सत्य ज्ञान.... जरी नित्य साधन ध्यान.... श्रीराम....

नको जप तप पूजा..... होई देहास व्यर्थ सजा.... मनी सदा रामकृष्ण भजा..... प्रसन्न चित्ती असे रामराजा.... श्रीराम....

नाम स्मरणी इंद्रिय वश.... टाळा मोह पाशे नाश.... जाई सर्व विकार भोग.... राम नामी विवेक जाग.... श्रीराम....

नको देही विकार वाद..... अखंड नामे भगवंता साद..... अंतरी श्रवण राम नाद.... जाण मुक्ती राम पाद.... श्रीराम....

नको विषयी गुंतवू मन.... असावे चित्ती नाम ध्यान.... जाण विरक्ती सूक्ष्म ज्ञान.... राम नामी सरे अज्ञान.... श्रीराम....

पापे अनंत जन्मी झाली..... सोडवील यातुनी गुरु माउली.... रामनाम अखंड हृदयी असावे.... जन्म मुक्त स्वरूप जाणावे.... श्रीराम..... 

साधका प्रती नको देह्तादात्म्य..... जाणावे देह ईश्वरी आत्म्य..... अखंड नामे देहबुद्धी नसे.... शुद्ध चित्ती बलराम वसे.... श्रीराम....

नको व्यर्थ अभिमान.... अहंकारे क्षीण बुद्धी.... अखंड राम नामे.... वाढवू मनाची शक्ती....  करूया भगवंताची भक्ती..... मिळे जन्मापासुनी मुक्ती.... श्रीराम..... 

करावा मनी विवेक विचार.... असावा नित्य शुद्ध आचार..... जीवन होई सुंदर साकार..... रामनामे साध्य स्वरूप आकार.... श्रीराम.....


नको स्वार्थ राहो आमुच्या मना….  अंतरी अहंता न जाणवो तना.... श्रीराम.... 

Sunday 19 August 2012

पैशाची हाव.... कशासाठी.... किती.... कोणासाठी....

जसे आपल्याला, टॉलस्टॉयच्या कथेतून माणसाला जमीन किती लागते याचे उत्तर मिळते..... पण यातून आपण काहीच बोध घेतला नाही असेच चित्र दिसते.... तसे, बघितले तर माणूस अनेक गोष्टींच्या पाठीमागे असा धावत असतो...... सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, पैसा यांसारख्या गोष्टींचा लोभ सारखा त्याला पुढे ओढत असतो.... 

शेवटी माणसाचे खरे आयुष्य किती असते..... सत्य हेच कि माणसाचे खरे आयुष्य विलक्षण भयानक असते..... आणि या आयुष्याचे ध्येय काय असते..... पैसा, संपत्ती..... आता... पैशाशिवाय माणसाला जगता येणार नाही हे खरे, पण पैशाशिवाय माणूस जगू शकतो हेही खरे आहे...... 

प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस नाही का..... आकाशातील सगळाच पाऊस अंगावर कोसळावा तसे आयुष्य आपल्यावर कोसळते..... पण नियती तुम्हाला जे आयुष्य देते.... त्याचा तुम्ही काय अन्वय लावता, हेही महत्त्वाचे ठरते.... आयुष्यात पैसा आणि संपत्ती, प्रतिष्ठा, याचे महत्त्व अपार आहे..... पण त्याहून माणसात जे जगायचे स्पिरिट असते..... ते अधिक महत्त्वाचे.... खूप उपेक्षा मिळाली आणि खूप प्रसिद्धीही मिळाली..... तर दुःख कशाला मानायचे..... पदरात पडलेले यश मला सदैव भानावर ठेवेल, सावध ठेवेल हेच बघायचे..... पैशासाठी झुरू नये..... 

ज्या पैशासाठी आपण आपले आयुष्य पणाला लावतो, तो पैसा माणसाला किती लागतो? असा प्रश्न विचारला.... तर आजकाल हेटाळणी होते, म्हंटले जाते..... अरे, अरे तुम्ही संन्यस्त वृत्तीचे झाला आहात किंवा तुम्हाला नैराश्य आले आहे वा आध्यात्मिक झाला आहात..... पण आज आपण पैसा पैसा करून आपला आनंद मात्र हरवून बसलो आहोत.... अधिक पैसा मिळवून आपण काय करतो.... रोजच्या जीवनात पेट्रोल, मोबाइल्स, टेलिफोन्स, लाइट बिल्स, कॉपोर्रेशन टॅक्स, इन्कमटॅक्स असे टॅक्स व बिले आपण भरत राहतो..... हे खर्च आता दैनंदिन गरजेचे बनतात.... 

म्हणजेच आपण जास्त पैशाच्या मागे लागून आपल्या गरजा नाहक वाढवत असतो..... या धावपळीत काही पाहायला, काहींचा आनंद घ्यायलाही वेळ मिळत नाही..... मग पैशाच्या या धावपळीत आनंदाची व आवडीची कामं राहून जातात..... याच पैशासाठी अनेकदा आपण आक्रमक होतो, विवेकबुद्धी व नैतिकता विसरतो..... इतरांना दुखावतो, अपशब्द वापरतो, आपणच आपले अवमूल्यन करत जातो..... शेवटी या पैशाचा इतका अतिरेक होतो कि एक दिवस सहन होत नाही व माणूस कोसळून पडतो.... 

कशासाठी पैसा? किती पैसा? कोणासाठी पैसा?..... खरोखरच पैशाशिवाय जगता येऊ शकते हे आपण जाणले पाहिजे.... पैशाचा अतिरेक टाळा..... पैसा पैसा करून आयुष्य फुकट घालवू नका..... आज गरजा ज्याने कमी केल्या तोच खरा आनंदी आहे..... जीवनात गरजांची जागा जेव्हा अपेक्षा घेतात तेव्हा ताण तणाव निर्माण होत जातात व जीवनात संघर्ष सुरु होतो.... आनंद हळू हळू हरवत जातो..... म्हणूनच आनंदी जीवनाचे रहस्य म्हणजे गरजा कमी करणे व समाधान मानणे..... 

बघा लवकर जागे व्हा... आनंदी जीवन जगा....

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

Thursday 16 August 2012

आत्मपरीक्षण गरजेच आहे.... परिस्थितीला दोष न देता....

आज गोष्टीरूपाने जाणून घेऊ या..... स्वःताचे आत्मपरीक्षण गरजेच का ?....   बघा.... आपल्या आयुष्यात स्ट्रगल हा फार महत्वाचा घटक आहे..... किंबहुना माझ्यामते जर आपण त्याला positively carry केले तर..... त्यामुळेच आपण आपला उत्तमरित्या विकास घडवू शकतो..... कितीही संकटे आली तरी त्याचा आपण सामना सहजरीत्या करू शकतो.... आणी कित्येक आणीबाणी च्या वेळी स्वतःला सावरू शकतो.....   उपदेश / बोध गोष्टीरूपाने केला गेला... तर सहज समजणे होते.... म्हणून छोटीसी बोध कथा......   

एक मुलगा त्याच्या आईजवळ तक्रार करीत होता..... त्याला शाळेतील मुले त्रास द्यायची..... शिक्षक रागवायचे..... ग्रुपडांसमध्ये / इतर स्पर्धांमध्ये त्याच्या ऐवजी दुसऱ्यांना निवडले गेले..... वगैरे अनेक तक्रारी सांगत होता..... नेहमी परिस्थिती विरुद्धच असते म्हणुन तो नाराज होता..... आई म्हणाली तू स्वःतातील दोष आधी जाणून घे..... त्यावर उपाय शोध..... आईने त्याला एक प्रयोग करायला सांगितला..... एका भांड्यात एक दगड, व दुसऱ्या भांड्यात एक अंडे व तिसऱ्या भांड्यात कॉफीच्या बिया टाकल्या..... तीनही भांड्यात सारखेच पाणी टाकुन १० मिनिटे उकळविण्यास सांगितले.... नंतर तिघांची परिक्षणे करण्यास सांगितले..... 

दगडावर उष्णतेचा काहीही परिणाम झाला नव्हता.....  उलट तो आणखी स्वच्छ दिसु लागला होता..... अंड्याला थोडे तडे गेले होते..... अंतर्भाग बदलला होता, तर कॉफी बी स्वतः तशीच राहुन सर्व पाणी मात्र रंगीत व सुगंधी केले होते.... सगळे पाणी कॉफीमय व सुवासिक झाले होते..... आई मुलाला म्हणाली,  बघ.... आयुष्यही असेच असते.....  उकळते पाणी, उष्णता अशा कितीतरी विरुद्ध परिस्थितीत सर्वांनाच झगडावे लागते..... काही व्यक्तींमध्ये विरुद्ध परिस्थितीत काहीच बदल होत नाही.... ते निश्चल, व तटस्थ राहु शकतात.... उलट संघर्षातुन स्वतःची लकाकी वाढवुन घेतात.....  काही व्यक्तींची अंतर्मने बदलतात...... अंड्याप्रमाणे व्यक्तीमत्वाला तडे जातात......  तर फार थोड्या व्यक्ती कॉफी बी प्रमाणे आपल्या विरुद्ध परिस्थितीलाच बदलुन टाकतात..... स्वतःचे मूळ स्वरुप न सोडता, सुगंध, गुण स्वाद त्या विरुद्ध वातावरणातच मिसळुन टाकतात..... व ती परिस्थिती संघर्षाची न राहता उलट आल्हाददायक सर्वांना हवीहवीशी वाटणारी बनते..... 

आई मुलाला म्हणाली..... तुला शाळेतच नव्हे....  तर सर्वत्र मोठेपणीसुद्धा असेच अनुभव येतील..... तुलाच ठरवावे लागेल की दगड, अंडी कॉफी-बी  यापैकी तुला कशा प्रकारे परिस्थितीशी झगडायचे आहे ?.... यावरून बोध हाच कि परिस्थितीनुसार जर आपण स्वःताला तयार केले तर ... समग्र आयुष्य सुंदर होवून जाते ... कोणत्याही परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्ठीकोन सकारात्मक असायला हवा ....  "कठीण" असे काही नाही.... आयुष्यात निर्माण होणारी प्रत्येक घटना, परिस्थिती आपणास घड्वत असते..... मात्र  हे पटण्यासाठी आत्मपरिक्षण हवेच हवे....   स्वतःचे मूळ स्वरुप न सोडता, सुगंध, गुण स्वाद त्या विरुद्ध वातावरणातच मिसळुन टाकतात व ती परिस्थिती संघर्षाची न राहता उलट आल्हाददायक सर्वांना हवीहवीशी वाटणारी बनते.....  

संघर्षाची वेळ प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असते ......तेव्हाच आपली खरी कसोटी असते ..... यासाठी चांगल्या विचारांच्या  मदतीने  आत्मपरीक्षण  हवेच  हवे.....  मला कोणीच समजुन घेत नाही.... पण आपण दुसऱ्‍याला कीती समजुन घेतो..... असंच.. काहीतरी प्रत्येकाण परीस्थितीला दोष न देता, त्या परीस्थितीशी जुळवुन घ्यायला हवे..... वेळ आल्यास त्या परीस्थितीचा सामना हिकमतीने करावा..... एकुन काय? तर..... वारा येईल तसं त्याला चांगल्या प्रकारे तोँड द्याव..... संयम , सहिष्णुता , व संघर्ष ( भांडण नाही... बर का )  ह्या सद्गुणांचा सर्वथा अभाव होत चालला आहे..... परिस्थितीला दोष न देता.... परिस्थितीनुसार जर आपण स्वःताला तयार केले तर..... समग्र आयुष्य सुंदर होवून जाते..... चला आपणही आपल्या परीने प्रयत्न करूया.... आपले आयुष्य सुंदर करूया.....

ॐ श्री गुरुदेव दत्त ....

Wednesday 1 August 2012

New Presentation of Thoughts By Chetan K....  


Some people come into our lives for awhile and leave footprints on our hearts.... And we are never, ever the same.... Let us be grateful to people who make us happy.... they are the charming gardeners who make our souls blossom.... ॐ श्री गुरुदेव दत्त .....


If we’re growing for Good, we’re always going to be out of our comfort zone… The more comfortable you get with being uncomfortable, the faster you grow… When you’re moving forward and making progress for Good, you will feel uncomfortable with Changes, and that’s okay… you are not losing your Identity, you are creating Solidity…  ॐ श्री गुरुदेव दत्त .....
We must know that the future is carved out of the present moment and tomorrow's harvest depends upon today's ploughing and sowing..... Remember that True education complements innovative excellence with character and personality development.... ॐ श्री गुरुदेव दत्त .....


Being different from others is always good.... Be different-no matter what other thinks.... There is something great about defining your individuality your uniqueness..... your imagination and creativity..... Show all when we allow ourselves to exist truly and fully.... we sting the world with our vision and challenge it with our own ways of being.... ॐ श्री गुरुदेव दत्त....

Even today with the problems that we face…. We have to remember that there are two sides to every issue… one side is right and the other is wrong…. A lot of times people look at the negative side and they feel they can't do… always look on the positive side of what we can do…. ॐ श्री गुरुदेव दत्त....

Be happy... It's one way of being wise.... You just have to do your own thing, no matter what anyone says.... Remember that, If you want to live a happy life... tie it to a goal... not to people or things... and know that Happiness is not the absence of problems but the ability to deal with them.... ॐ श्री गुरुदेव दत्त....


You can have everything in life you want.... if you will just help other people get what they want.. A life built around helping others will yield not just the joys of relationships... but also the sweet success of achieving your own goals..... ॐ श्री गुरुदेव दत्त ..... 



आपला मेंदु हा बराचसा डोळ्यांच्या भरवशावर राहुन काम करत असतो..... त्यामुळेच जे काही आपण बघतो / आपल्याला दिसत ते आपण खरे समजुन चालतो..... यालाच इल्युजन असे म्हणतात.... आपली आजची धावपळ हि एक प्रकारचे illusion आहे.... आज आपण जी धावपळ, पैसा जमवत असतो तो उद्या..... सुखी जीवन जगण्यासाठी.....आपण उद्या असे करू ....तसे करू... असे आपण म्हणत राहतो...हे ही एका प्रकारचे illusion आहे...... पण या उद्या मध्ये आपण आजचे जीवन विसरतो...... जीवनात बऱ्याच वेळा आपण ह्या भ्रमालाच भुलतो..... जीवनाचे वास्तव सत्य ज्याने जाणले तो ह्या भ्रमात अडकू शकत नाही.... आपल्या संस्कृती मध्ये ह्या वास्तव सत्य सांगणाऱ्या माध्यमाला सत्गुरू म्हणतात.... ज्याला सत्गुरू कृपा लाभली तो ह्या भ्रमात कधीच अडकत नाही.... ॐ श्री गुरुदेव दत्त .....

माणसाचा दृष्टीकोन हा त्याच्या विचारांची सवय आहे..... सवयी ह्या अंगीकारता येतात.... एखादी परत परत केलेली कृती हि त्या माणसाची  सवय बनते.... अर्थात मग तीच होते त्याची जाणवलेली मानसिकता..... ॐ श्री गुरुदेव दत्त .....


You can have everything in life you want.... if you will just help other people get what they want.. A life built around helping others will yield not just the joys of relationships... but also the sweet success of achieving your own goals..... ॐ श्री गुरुदेव दत्त .....

कागद आपल्या नशिबाने उडत असतो... पण पतंग आपल्या कौशल्यावर उडतो... म्हणूनच लक्षात ठेवा नशीब नसेल तरी चालेल पण आपणाकडे कौशल्य हे हवेच....  ॐ श्री गुरुदेव दत्त .....

In my life, as far as i know…. To challenge others and be challenged by others is part of the play of the Ego…. Know that Ego itself is the Greatest Challenge…. So Before Accepting any Challenge..... Liberate yourself – Accept Accountability and Responsibility..!.. This is the first step to recognize that we are in control…. We need to accept Accountability and Responsibility for our responses, and recognize that they assert a powerful influence on our life…. How many times have you heard from your dear ones or someone who says, “That’s just how I am, can't change… I can’t help it..”  (this is poisonous Ego farming.)…  Until we accept Accountability and Responsibility we won’t have any reason to change…. Accountability and Responsibility are the keys to self fulfillment…. Accept your mistakes and change your Life….
As far as I know…. With good thoughts and principles….  Accepting responsibility is a wonderfully liberating experience…. It puts us in the driver’s seat of our own life…. That means that we are in control, and we can change…. It is one of the most empowering things you can do for yourself…. Some people shy away from responsibility because it brings with it accountability…. So let me ask you this, is it more empowering to be accountable for your own actions and attitudes, or to make somebody else responsible..?..  
You see, when we give away accountability, we create a state of helplessness…. So I encourage you, liberate yourself – Accept Accountability and Responsibility..!.. Know your True Responsibility towards your own Life and Family…. Also know that the main challenge presented by the ego…. Let your mistakes be your motivation, not your excuses…. You can’t always wait for the perfect moment…..  Sometimes you must dare to do it and change yourself…. because life is too short to regret and wonder what could have been… Decide right now that negative experiences from your past won’t predict your future…. Once that is an understood, progress itself is in the making….. ॐ श्री गुरुदेव दत्त .....