Thursday, 16 August 2012

आत्मपरीक्षण गरजेच आहे.... परिस्थितीला दोष न देता....

आज गोष्टीरूपाने जाणून घेऊ या..... स्वःताचे आत्मपरीक्षण गरजेच का ?....   बघा.... आपल्या आयुष्यात स्ट्रगल हा फार महत्वाचा घटक आहे..... किंबहुना माझ्यामते जर आपण त्याला positively carry केले तर..... त्यामुळेच आपण आपला उत्तमरित्या विकास घडवू शकतो..... कितीही संकटे आली तरी त्याचा आपण सामना सहजरीत्या करू शकतो.... आणी कित्येक आणीबाणी च्या वेळी स्वतःला सावरू शकतो.....   उपदेश / बोध गोष्टीरूपाने केला गेला... तर सहज समजणे होते.... म्हणून छोटीसी बोध कथा......   

एक मुलगा त्याच्या आईजवळ तक्रार करीत होता..... त्याला शाळेतील मुले त्रास द्यायची..... शिक्षक रागवायचे..... ग्रुपडांसमध्ये / इतर स्पर्धांमध्ये त्याच्या ऐवजी दुसऱ्यांना निवडले गेले..... वगैरे अनेक तक्रारी सांगत होता..... नेहमी परिस्थिती विरुद्धच असते म्हणुन तो नाराज होता..... आई म्हणाली तू स्वःतातील दोष आधी जाणून घे..... त्यावर उपाय शोध..... आईने त्याला एक प्रयोग करायला सांगितला..... एका भांड्यात एक दगड, व दुसऱ्या भांड्यात एक अंडे व तिसऱ्या भांड्यात कॉफीच्या बिया टाकल्या..... तीनही भांड्यात सारखेच पाणी टाकुन १० मिनिटे उकळविण्यास सांगितले.... नंतर तिघांची परिक्षणे करण्यास सांगितले..... 

दगडावर उष्णतेचा काहीही परिणाम झाला नव्हता.....  उलट तो आणखी स्वच्छ दिसु लागला होता..... अंड्याला थोडे तडे गेले होते..... अंतर्भाग बदलला होता, तर कॉफी बी स्वतः तशीच राहुन सर्व पाणी मात्र रंगीत व सुगंधी केले होते.... सगळे पाणी कॉफीमय व सुवासिक झाले होते..... आई मुलाला म्हणाली,  बघ.... आयुष्यही असेच असते.....  उकळते पाणी, उष्णता अशा कितीतरी विरुद्ध परिस्थितीत सर्वांनाच झगडावे लागते..... काही व्यक्तींमध्ये विरुद्ध परिस्थितीत काहीच बदल होत नाही.... ते निश्चल, व तटस्थ राहु शकतात.... उलट संघर्षातुन स्वतःची लकाकी वाढवुन घेतात.....  काही व्यक्तींची अंतर्मने बदलतात...... अंड्याप्रमाणे व्यक्तीमत्वाला तडे जातात......  तर फार थोड्या व्यक्ती कॉफी बी प्रमाणे आपल्या विरुद्ध परिस्थितीलाच बदलुन टाकतात..... स्वतःचे मूळ स्वरुप न सोडता, सुगंध, गुण स्वाद त्या विरुद्ध वातावरणातच मिसळुन टाकतात..... व ती परिस्थिती संघर्षाची न राहता उलट आल्हाददायक सर्वांना हवीहवीशी वाटणारी बनते..... 

आई मुलाला म्हणाली..... तुला शाळेतच नव्हे....  तर सर्वत्र मोठेपणीसुद्धा असेच अनुभव येतील..... तुलाच ठरवावे लागेल की दगड, अंडी कॉफी-बी  यापैकी तुला कशा प्रकारे परिस्थितीशी झगडायचे आहे ?.... यावरून बोध हाच कि परिस्थितीनुसार जर आपण स्वःताला तयार केले तर ... समग्र आयुष्य सुंदर होवून जाते ... कोणत्याही परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्ठीकोन सकारात्मक असायला हवा ....  "कठीण" असे काही नाही.... आयुष्यात निर्माण होणारी प्रत्येक घटना, परिस्थिती आपणास घड्वत असते..... मात्र  हे पटण्यासाठी आत्मपरिक्षण हवेच हवे....   स्वतःचे मूळ स्वरुप न सोडता, सुगंध, गुण स्वाद त्या विरुद्ध वातावरणातच मिसळुन टाकतात व ती परिस्थिती संघर्षाची न राहता उलट आल्हाददायक सर्वांना हवीहवीशी वाटणारी बनते.....  

संघर्षाची वेळ प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असते ......तेव्हाच आपली खरी कसोटी असते ..... यासाठी चांगल्या विचारांच्या  मदतीने  आत्मपरीक्षण  हवेच  हवे.....  मला कोणीच समजुन घेत नाही.... पण आपण दुसऱ्‍याला कीती समजुन घेतो..... असंच.. काहीतरी प्रत्येकाण परीस्थितीला दोष न देता, त्या परीस्थितीशी जुळवुन घ्यायला हवे..... वेळ आल्यास त्या परीस्थितीचा सामना हिकमतीने करावा..... एकुन काय? तर..... वारा येईल तसं त्याला चांगल्या प्रकारे तोँड द्याव..... संयम , सहिष्णुता , व संघर्ष ( भांडण नाही... बर का )  ह्या सद्गुणांचा सर्वथा अभाव होत चालला आहे..... परिस्थितीला दोष न देता.... परिस्थितीनुसार जर आपण स्वःताला तयार केले तर..... समग्र आयुष्य सुंदर होवून जाते..... चला आपणही आपल्या परीने प्रयत्न करूया.... आपले आयुष्य सुंदर करूया.....

ॐ श्री गुरुदेव दत्त ....

No comments:

Post a Comment