जीवन मार्गदर्शक तत्वे....
जेव्हा मनुष्याकडील धन नष्ट होते, तेव्हा
वास्तविक त्याचे काहीच नष्ट होत नाही….. जेव्हा मनुष्याचे
आरोग्य बिघडते, तेव्हा त्याचे थोडेफार काहीतरी नष्ट होते…. परंतु जेव्हा मनुष्याचे चारित्र्य बदनाम होते, तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ट होते.... लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते..... तोंडावर ओढुन घ्यावी तर लगेच खाली पाय
उघडे पडतात.... अशाप्रकारे जे घाईघाईने वर चढू पाहतात ते खूपवेळा कोसळतात हा जगाचा
नियम आहे.... म्हणूनच स्वतःची चूक
स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.... चारित्र्याचा
विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो हे लवकरात लवकर जाणा….. जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली
लाभते.... आयुष्यात काय गमावलंत आणि काय कमावलंत ह्याचा विचार करा..... बघा, बदलण्याची
संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का..?..
शेवटी सार
एकच... तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार..!.. आत्मउद्धार हा
ज्याचा त्याने करायचा.... मार्गदर्शक फक्त मार्ग दाखवू शकतो..!!.. आपल्या
दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात.... फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते
यासाठी मार्गदर्शक मदत करतो..... बघा, आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.....
कारण जे नंतर चांगले वाटते, तेच कृत्य नैतिक व जे नंतर दुःखकारक ठरते, ते अनैतिक असते..!... म्हणूनच आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार
असुन चालत नाही, सुविचार असावे लागतात....
सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे…. ज्या
माणसांकडे योग्य विचारांचा भक्कम पाया नाही, त्या माणसांच्या
आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही.... आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे
म्हणू शकत नाही.... जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात.... पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं
कुठल्याही प्रसंगी ठामपणे योग्यतेने उभी राहतात.... आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवूनच ध्येयपूर्तीसाठी धडपडणं योग्य आहे.... एखाद्या घटनेकडे
पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद योग्य विचारांमध्ये
असते.... कारण कोणत्याही कृतीच्या मुळाशी आपणच असतो.... आधी योग्य विचार करा मगच कृती करा आणि ओठी एक
पोटी दुजे.... असे वागणे आपलाच ऱ्हास करते....
स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका, चुकीचा व्यवहार माणसं
तोडतो म्हणून व्यवहार खोटे न बोलता सत्याने आणि सन्मानाने करा.... सत्याने मिळतं तेच टिकतं असे गीता सांगतेच, अयोग्य पद्धतीने केलेले काम
विविध प्रकारे त्रासदायक होते.... मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी
असते.... नेहमी तत्पर रहा, बेसावध आयुष्य जगू नका..... बघा, यश न मिळणे
याचा अर्थ अपयशी होणे असा कधीच होत नाही.... प्रत्येक क्षण अपल्याला काही ना
काही शिकवत असतो..... गरज असते ती फक्त आपण शिकण्याची, त्या क्षणातील बोध
जाणण्याची....
मित्रांनो, मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवावेत कारण ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी
येईल सांगता येत नाही.... तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.... म्हणूनच आपल्यातील
दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो, हे तत्व जीवनात पाळा....
स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता.... आयुष्यात असं ज्ञान मिळवा जे तुम्हाला आदर्श
बनवेल.... एक माणूस म्हणूश
यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायला हवं नव्हे, अगदी
१००% आचरणात आणायला हवं..!..
ॐ
श्री गुरुदेव दत्त .....
No comments:
Post a Comment