संवर्धिनी... आदिशक्ती...
स्त्री चे प्रत्येक नाते आजी, आई, बहिण, मैत्रीण, बायको, मुलगी आणि प्रेयसी अनुभवायची असेल तर आपणही स्त्री च्या ह्या प्रत्येक नात्याला जपण्याचा १०० % प्रयत्न नक्कीच केला पाहिजे... नात्यामधील सन्मानच नात्यात स्थिरता आणि जवळीक निर्माण करतो... स्त्री अश्या कित्येक भूमिका सहज रित्या पार पडते.... ती शिक्षित असली तरी वा अशिक्षित असली तरी.... संसारातले असो वा व्यवहारातले प्रश्न किती चूटकीनिशी सोडवते.... घरात रुचकर जेवण बनवणारी अन्नपुर्णा, मुलांना संस्काराचे बाळकडू पाजणारी संस्कारलक्षमी, शिक्षणाचे धडे देणारी सरस्वती ,चालायला बोलायला शिकवणारी माता, पतीने दिलेल्या सुखसोयींवर न जगता त्याच्या खांद्याला खांदा लावुन घर नोकरी सांभाळून घराला हातभार लावणारी अर्धांगिनी, घरातील आजारी व्यक्तींची काळजी घेणारी आया, घरावरील प्रत्येक संकटांना सामर्थ्याने पेलणारी रक्षिका.... ह्या प्रत्येक भूमिका ती प्रामाणिकपणाने निस्वार्थ मनाने पार पाडते....
मित्रांनो... स्त्री म्हणजे कुटुंबाचा पाया.... आदिमाया ,आदिशक्ती.. ह्या सगळ्या विशेषणांनी तीला गौरविल जात.... आणि ते उचितच आहे... स्त्रीमुळे कुटुंब बनत, घडत, साकारल जात आणि आकार ही घेत.... प्रत्येक नात्याला घडविण्याचा त्यांना एकसंध ठेवण्याचे काम हे त्या घरातील स्त्रीच करीत असते.... आणि अस असूनही आज मुलगी नको... का तर ती परक्याच धन, दुसऱ्याची वंशवेल वाढवणारी, कुटुंबाचा आधार न बनू शकणारी असा समज आहे.... आणि ह्या गैरसमजातूनच स्त्रीभृण हत्येसारखी महापातक घडत आहेत....
जो पर्यंत समाजाची ही विकृत मानसिकता बदलत नाही तोपर्यंत स्त्रीला तिचा स्वतःचा असा एकही दिवस गवसणार नाही... आणि स्त्री सबलीकरण होत नाही, तोवर एका पित्याला आपल्या लेकीचा, एका पतीला आपल्या पत्नीचा, एका भावाला आपल्या बहिणीचा दिवस घालायची वेळ येईल... हे सगळ जेंव्हा थांबेल तेंव्हाच स्त्री खऱ्या अर्थाने मुक्त श्वास घेवू शकेल आणि खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल.... ॐ श्री गुरुदेव दत्त....
No comments:
Post a Comment