Friday, 24 January 2014


सद्गुरू तत्व....
 ** WHAT IS SADGURU TATVA.?. Tattva means the essence or the element... Guru Tattva, thus means Guru Essence or Element... In the most complete sense, Guru Tattva is the natural, inexorable mechanism or process by which manifest life moves from a relative state of ignorance of SELF to total awareness or SELF REALIZATION... obeying the orders of the spiritual master with faith and devotion and following in the footsteps under the direction of the spiritual master…
** सद्गुरुतत्व काय आहे.?.. ब्रह्म हे व्यापक असल्यामुळे सर्व पदार्थांना व्यापून आहे म्हणून त्याचे तत् हे नांव होय…. त्याला भाव या अर्थी त्व प्रत्यय लागून तत्व शब्द तयार झाला…. गुरुतत्त्व म्हणजे निर्गुण ब्रह्माचे स्वरुप होय... जर शाश्वत काय असेल तर ते आहे सद्गुरुतत्व..!.. त्याचे अढळत्व वादातीत आहे, त्याचा वास सूक्ष्मतम सूक्ष्म आहे... अन त्याचा विस्तार अनंत आहे…. यां सद्गुरुतत्वाचे आदेश आज्ञापालन धृढ श्रद्धा-विश्वासाने करीत आपली मार्गक्रमणा त्याच्या पावलावर पाउल ठेऊन करणे हेच खऱ्या साधकाचे कर्तव्य आहे...   
** If you have unshakeable faith on the Guru Tattva, then there is no need for anything else... MORE U SURRENDER HIS LIABILITY INCREASES....
** एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा.... जर तुमच्याकडे गुरुतत्वाबद्दल संदेह न धरता जे होईल ते गुरुतत्वानुसार हा विश्वास दृढ असेल तर.... तुम्हाला दुसऱ्या कशाचीच गरज नाही.. तुम्ही जेव्हढे सद्गुरु तत्वाला शरण जाल, तेव्हढीच सद्गुरूची तुमच्यासाठीची जबाबदारी वाढेल... आणि सर्व काही सद्गुरुच करेल....  
** CONFESSION IS THE FIRST STEP TOWARDS CORRECTION....
आत्मसुधारणा - आत्मबदलासाठी प्रथम पायरी.... आपल्या चुकांची कबुली आणि आत्मपरीक्षणाने आत्मनिरीक्षण करून आत्मसुधारणा आणि हळू हळू होत जाणारे आत्मपरीवर्तन म्हणजेच  आत्मविकास....    
** TRY TO REALISE HIS ORDER & TUNE YOUR ACTIVITIES ACCORDINGLY... THEN NOT ONLY THE PATH BUT WAY TO DESTINATION WILL  BE FULL OF HAPPINESS....
** सद्गुरू आदेश-गुरुबोध ओळखायला शिका आणि आपले कृती कर्म त्यानुसार करा... मगच आपला जीवनाचा पथच नव्हे तर.... ध्येयमार्गही समाधान आनंदाने भरून संसार मोक्षमय होऊन आपला आत्मउद्धार होतो....
** BE CAREFUL, BE AMBITIOUS, HAVE FAITH IN HIM, YOUR SUCCESS IS ASSURED....
** खरे साधक व्हा... नेहमी सावध रहा... निश्चित निग्रहाने योग्य ते साधायचे पहा... सद्गुरुंतत्वावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा... आणि पहा यश समृद्धी तुमचीच असेल...   

Thursday, 23 January 2014

चिंतन - बोध...

सत्य मार्ग सांडू नये | असत्य पंथे जाऊ नये ||
कदा अभिमान घेऊ नये |असत्याचा ||
कोणाशी सत्य लपवू नये | अयोग्य कृती करू नये ||
परपीडा करू नये | कोणाशी विश्वासघात ||
देह बुद्धी धरू नये | मागे उणे बोलू नये ||
वैरियास दंडू नये | शरण आलिया ||
अल्पधने माजो नये | हरिभक्तीस लाजू नये ||
मर्यादेविण चालो नये | पवित्र जनी || ----  समर्थ रामदास
आज हे समर्थांचे बोल वाचले आणि मनात भाव दाटले... सद्गुरु आम्ही तुला किती कष्टवितो... अज्ञानात सुख मानून त्यात लोळत पडतो... मग तुझा विचार कधी येणार मनात.?.. गुरु सदैव आपल्याला हाका मारतो, आपणच त्याला साद देत नाही आणि साथही.... कारण एकच आपलाच अहंकार.... मला खूप काही कळते आणि कळले आहे जीवन या भ्रमात वाहत जातो... एक दिवस असा साधक गुरूलाच सांगतो.... तुम्ही माझ्या आयुष्यातील घडामोडींपासून दूर राहा, मी बघतो काय करायचे ते.... तुम्हाला ते काही कळायचे नाही.... साधक अज्ञानाने चुकत जातो आणि गुरूलाच शिकवतो... कारण आम्हाला पाहिजे असतो, आपल्या सोयीप्रमाणे, आपल्याला वाटेल तेव्हा गुरु तत्व आणि त्याचे विचार... इतरवेळी ते परवडण्यासारखे नसतात... कारण ते विचार जीवनातील अडथळा वाटतात...
आपल्या कल्पना-सुख यांच्यावरती ते घाला घालतात... आपला मीपणा कोणाच्याही बंधनात अडकायला तयार नसतो... आणि मग तयार होते, आपल्या मन देहबुद्धीनुसार गुरुतत्त्व संकल्पना आणि धारणा... यां जाळ्यात परीस्थितीने गांजलेला भ्रमिष्ट साधक गुंतत जातो आणि आपलेच ते खरे असे मानून स्व-अहंकाराने फुलत स्व-अर्थ कृती कर्म करून भरकटतो... आपल्याला अनुकूल अशी तत्वे अयोग्यतेतून तयार करून ती गुरुतत्त्व असे सांगतात.... खऱ्या चलनाच्या अस्तित्वाबरोबर जसे खोटे चलनही बाजारात येते, तसे या खऱ्या वाटणाऱ्या ढोंगी साधकांना आज महत्त्व आल्याचे दिसते.... म्हणूनच वरील श्लोकात समर्थांनी मनाचे आचरण कसे असावे हे सांगितले आहे...
खरच, गुरुतत्त्व आपल्या जीवनात अडथळा आणते का..?.. नाही... नाही..!!. सद्गुरु कधीच आपल्याला आपल्या आत्म उन्नतीच्या आड येणारी गोष्ट शिकवत नाहीत... ते नेहमीच आपलं सामान्यपण लक्षात घेऊन, आपल्या विविध संसारी व्यवहारातल्या अडचणी लक्षात घेऊन कसं सन्मार्गावर राहता येईल ते शिकवतात... म्हणूनच आज थोडक्यात आपल्याला आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायचा आहे.... आनंद अनुभवण्याची भावदशा ओळखायची आहे.... गुरुबोध हाच.... आपले प्रत्येकाचे जीवन तेच असते... पण दृष्टी बदलताच सारे काही परिवर्तित होते.... दृष्टी बदलताच गुलाबातील काटेच न दिसता... त्या काट्यातून बहरलेला गुलाब देखील दिसू लागतो.... फक्त आपल्याकडे तो बदल घडवण्याची मानसिकता मात्र पाहिजे...
म्हणजेच श्रद्धा-विश्‍वासाचा अभाव असेल तर आपण काहीच योग्य करीत नाही.... मग चुकीचा दृष्टिकोन त्रासदायक ठरू शकतो.... आपण काहीच बोलू शकत नाही... काही गोष्टी आपण टाळतो... लपवा लपवी करतो... खोटे बोलणे वाढत जाते... मग काही वेळा यामुळे पीछेहाटही होते... एखादी गोष्ट जसे चिंतन-मनन अभ्यास... आपण करू शकणार नाही, हे मनात पक्के असेल, तर आपण प्रयत्नच करत नाही आणि आहे त्यावर समाधान मानतो... अशारीतीने प्रयत्न केले नाहीत, तर आत्मविश्‍वास डळमळीत होतो... ही गोष्ट आपल्या आवाक्‍याबाहेरची आहे, असे मनोमन पटत जाते... आपण आपलाच विकास खुंटवतो... म्हणूनच गुरुतत्त्व-नीती आपण पूर्णपणे अंगी बाणवली तर आपल्याला काय उणे राहील...
आज साधकाचे आद्यकर्तव्य असे... गुरु काहीही सांगो, आपल्याला कळो अथवा न कळो... त्याचा संग, सहवास, दृष्टी आणि वाणी आपलेच प्रभामंडळ आणि आत्मतेज वाढवत असते... तो संग... तो सहवास... जितका मिळेल तितका कमीच..!!..  पण शेवटी काहीजण असाही विचार करत असतील... क्षणभंगुर जीवन मनुष्याचे मागे काय उरते..???… एक दिवसाच्या मुलाचेही... कुठे आईवाचून अडते..???..  पण त्याचवेळी हेही लक्षात ठेवा...
Darkness cannot drive out darkness, only light can do that...  That’s why true spiritual master (गुरुतत्त्व) Lead your life in way that always choose the harder right… rather than the easier wrong for lesson of true life light… Know that this kind of leadership is not about titles, positions or flowcharts…. It is about one life influencing another to become the leader of true life… and know truly that your success and happiness lie in you only…
सद्गुरूला पूर्ण शरणभावाने शरण जा... आणि पहा आपले जीवन आमुलाग्र कसे बदलते... इथे अट एकच शरणागती खरी पाहिजे, श्रद्धा-विश्वास पूर्ण पाहिजे... थोडाही संदेह मनात नको... आणि निश्चय आणि निग्रहाने गुरुत्व विचार अंगी बानविणे हे साधकाचे अग्रिम कर्तव्य... मग मन गुरूप्रेमाने व्याकुळ होते... आणि म्हणते...
ज्ञानियाचा राजा | आदिगुरु माझा | तम अज्ञानाचा | दूर करी ||
अत्रिपुत्र दत्त | अनुसया माता | जगताचा त्राता | दिगंबर ||
शंकर आनंद | तोची पूर्णानंद | दावी स्वरूपाचे | निर्गुणत्व ||
जाहले जीवन | गुरुतत्व रूपी | चिंतामणी दास | सांगतसे ||
अशी ही सद्गुरु कृपेची वचने श्री सद्गुरुंना अर्पण.... श्री सद्गुरुचरणी समर्पित....
श्री गुरुदेव दत्त....        

Wednesday, 22 January 2014


गुरुंनी आपल्या पाठीशी असावं कि बरोबर असावं...!!..

माझ्यामते हे आपल्यावरतीच अवलंबून आहे.... आज जर तुम्ही स्वःताला साधक म्हणवून घेत असाल तर... मुख्य म्हणजे तुमचे ध्येय काय.... यावर सर्व परिस्थिती अवलंबून आहे.... साधना कशासाठी..?... संसारी जीवनातलं प्रचंड दडपण घालवण्यासाठी तुम्ही साधना करत आहात का...?... साधना करतानाचा तुमचा दृष्टीकोन कोणता ?.... तुम्ही किती वेळ यासाठी देऊ शकता ?.... तुमचा खरा कल संसाराकडे आहे का..?...

गुरुकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत..?... साधनेसाठी तुम्ही किती गंभीर आणि बांधील राहू शकता..?.. म्हणूनच आपण आधी स्वःतालाच जोखणे महत्वाचे.... अध्यात्मिक साधना त्याचे प्रकार, माहिती आपल्याला किती प्रमाणात आहे.... आपल्या मनाचा निग्रह किती होऊ शकतो.... आपण कर्मबंधनातून सुटण्यासाठी गुरूप्रती किती बांधील राहू शकतो.... यावरच आपला पुढचा प्रवास कसा होईल ते निश्चित होते....

ज्यावेळी तुमची खरी साधना चालू होते... त्यावेळी सद्गुरू तुमच्या पाठीशी असतात.... म्हणजे कसे... बघा, एक उदा. देतो.... जशी सायकल चालवताना एकतर बॅलेन्स सांभाळता येतो किंवा येत नाही.... अधलीमधली स्थितीच नाही.... याचप्रकारे आपली खरी साधना ज्यावेळी चालू होते... त्यावेळी गुरु आपल्या साधनारूपी सायकलला पाठून आधार देतात आपल्याला साधनेचा बॅलेन्स सांभाळायला शिकवतात.... अभ्यास सातत्याने एकदा का बॅलेन्स सांभाळायला जमले की..... त्यानंतर सायकल चालवायचा आनंद आणि पुन्हा पुन्हा सायकल चालवून येणारे पर्फेक्शन.... यामुळे विनासायास सायकल चालवणे जमते.... बॅलेन्सची दखल घ्यायची गरज उरत नाही.... पण एक जाणून घ्या, बॅलेन्स ज्याचा त्यालाच जमायला हवा.... यासाठी कष्ट व सातत्य महत्वाचे.. मग बॅलेन्स सांभाळण्यासाठी काहीही करावे लागत नाही...

बघा, फक्त आपल्याला बॅलेन्स जमतोय याची एकदा जाणीव झाली की बस्स.... आपल्या साधनेचेही तसेच आहे.... साधना-अभ्यासाचे ज्याचे त्यालाच आकलन व्हावे लागते... गुरु त्यावेळी पाठीशी असतातच.... साधनेचा बॅलेन्स एकदा जमला कि गुरुकृपेने आपोआप साधना होत जाते.... जसजशी साधना होत जाते तस तशी आपण एक एक पायरी वर चढतो आणि मग गुरु आपल्या बरोबर असतो.... आपले व गुरुतत्वाचे मिलन होते... आपल्या अंगी गुरु साक्षीभाव जागृत होतो.... गुरु आणि आपण एकरूपच होतो....   ॐ श्री गुरुदेव दत्त....

Thursday, 16 January 2014

स्वामी विवेकानंद.... अध्यात्म विचार....
प्रत्येक साधकाच्या ध्यात्मिक जीवनात उत्थान-पतनांची युगे येत असतात.... त्याच्या जीवनप्रवाहात फिरून एक प्रचंड लाट उफाळत असते.... कधी कधी तर या उत्थानाला महापुराचे स्वरूप प्राप्त होते... यात तो साधक शरणागत, नम्र असेल तरच टिकतो... नाहीतर अज्ञानाने माझे माझे करीत लुप्त होतो.... हे सर्व साधकाच्या जीवनात घडवून आणणारा एक गुरुत्वरूपी सत्पुरुष असतो....
या उंच उसळलेल्या त्य प्रत्येक लाटेच्या शिरोभागी गुरुतत्वरूपी एखादा सत्पुरुष सभोवार आपल्या तेजाची मंगल प्रभा पसरवीत विराजमान आहे.... एकीकडे त्या लाटेच्या उसळण्याचे, त्या साधकाच्या अभ्युत्थानाचे तो सत्पुरुषच स्वःताच कारण असतो... तर परत दुसरीकडे, ती लाट शांत किंवा उसळविनाऱ्या शक्तीचे तो गुरुत्व आदेशे स्वःताच कार्यही असतो... उभयतांची एकमेकांवर याप्रमाणे क्रिया-प्रतिक्रिया होत असते... आणि म्हणून त्या सत्पुरुषाला एका दृष्टीने स्त्रष्टा किंवा जनक तर दुसऱ्या दृष्टीने सृष्ट किंवा जनित असेही म्हणता येईल...
हे सत्पुरुष समाजाची सेवा करीतच आपले आयुष्य घालवितात... समाजावर ते आपली प्रचंड शक्ती प्रयुक्त करीत असतात, तर उलट समाजच त्यांच्या त्या प्रचंड शक्तीच्या अविर्भावाचे कारण असतो... हे असले सत्पुरुषच अखिल जगाला ललामभूत झालेले थोर तत्वचिंतक होत.... हेच जगातील सर्वश्रेष्ठ आचार्य, गुरु, मंत्रद्रष्टे ऋषी होत... हेच जीवनदायी श्रेष्ठ भावांचे दिव्य वाहक-ईश्वर स्वरूप अवतार होत....  स्वामी विवेकानंद....  
 बोधसार... साधकाचे लाभलेल्या जीवनातील कर्तुत्व हेच असते... साधनेप्रत सातत्य राखून जागृत होणे आणि नित्य गुरुबोध-आदेश जाणून घेणे... योग्य मार्गक्रमनेसाठी जीवनात नित्य योग्य कृती करणे... यानेच ठरते... जीवनात गुरुत्वरूपी ज्ञानाची लाट आल्यावर साधकाच्या जीवनात ज्ञानरूपी सूर्याचा उदय आहे की अस्त.... कारण साधक अहंकारी की विनम्र यावरच ज्ञान ग्रहण अवलंबून असते.... ॐ श्री गुरुदेव दत्त....

Wednesday, 8 January 2014


 
 
गुरु बोध…. सदगुरुंच्या शिकवणी प्रमाणे चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू या..!..

सेवा देउनि कृपा करी प्रभो | फेडी ऋणानुबंध कर्ज ||
तव चरणाचा दास करी मज | म्हणुनी अर्पितो तुज हा अर्ज ||

हे सद्गुरो.... विप्पत्तीमध्ये तू माझे रक्षण कर, हि माझी प्रार्थना नाही.... विपत्तीमध्ये मी अस्थिर होऊ नये.... एवढीच माझी इच्छा..!.. दुखःतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे, तू सांत्वन करावेस अशी माझी अपेक्षा नाही.... दुखाःवर योग्य रीतीने आणि नीतीने जय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा..!..

जगात माझे नुकसान झाले, केवळ फसवणूकच वाट्याला आली.... तर माझे मन खंबीर राहावे एवढीच माझी इच्छा..!.. मला तारावेस, ही माझी प्रार्थना नाही.... पण तरून जाण्याचे सामर्थ्य माझ्यात असावे एवढीच माझी इच्छा..!.. सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखावा.... दुखाच्या रात्री सारे जग जेव्हा माझी फसवणूक करेल.... तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा..!..

ॐ श्री गुरुदेव दत्त....