Wednesday 8 January 2014


 
 
गुरु बोध…. सदगुरुंच्या शिकवणी प्रमाणे चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू या..!..

सेवा देउनि कृपा करी प्रभो | फेडी ऋणानुबंध कर्ज ||
तव चरणाचा दास करी मज | म्हणुनी अर्पितो तुज हा अर्ज ||

हे सद्गुरो.... विप्पत्तीमध्ये तू माझे रक्षण कर, हि माझी प्रार्थना नाही.... विपत्तीमध्ये मी अस्थिर होऊ नये.... एवढीच माझी इच्छा..!.. दुखःतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे, तू सांत्वन करावेस अशी माझी अपेक्षा नाही.... दुखाःवर योग्य रीतीने आणि नीतीने जय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा..!..

जगात माझे नुकसान झाले, केवळ फसवणूकच वाट्याला आली.... तर माझे मन खंबीर राहावे एवढीच माझी इच्छा..!.. मला तारावेस, ही माझी प्रार्थना नाही.... पण तरून जाण्याचे सामर्थ्य माझ्यात असावे एवढीच माझी इच्छा..!.. सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखावा.... दुखाच्या रात्री सारे जग जेव्हा माझी फसवणूक करेल.... तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा..!..

ॐ श्री गुरुदेव दत्त....

No comments:

Post a Comment