Thursday 16 January 2014

स्वामी विवेकानंद.... अध्यात्म विचार....
प्रत्येक साधकाच्या ध्यात्मिक जीवनात उत्थान-पतनांची युगे येत असतात.... त्याच्या जीवनप्रवाहात फिरून एक प्रचंड लाट उफाळत असते.... कधी कधी तर या उत्थानाला महापुराचे स्वरूप प्राप्त होते... यात तो साधक शरणागत, नम्र असेल तरच टिकतो... नाहीतर अज्ञानाने माझे माझे करीत लुप्त होतो.... हे सर्व साधकाच्या जीवनात घडवून आणणारा एक गुरुत्वरूपी सत्पुरुष असतो....
या उंच उसळलेल्या त्य प्रत्येक लाटेच्या शिरोभागी गुरुतत्वरूपी एखादा सत्पुरुष सभोवार आपल्या तेजाची मंगल प्रभा पसरवीत विराजमान आहे.... एकीकडे त्या लाटेच्या उसळण्याचे, त्या साधकाच्या अभ्युत्थानाचे तो सत्पुरुषच स्वःताच कारण असतो... तर परत दुसरीकडे, ती लाट शांत किंवा उसळविनाऱ्या शक्तीचे तो गुरुत्व आदेशे स्वःताच कार्यही असतो... उभयतांची एकमेकांवर याप्रमाणे क्रिया-प्रतिक्रिया होत असते... आणि म्हणून त्या सत्पुरुषाला एका दृष्टीने स्त्रष्टा किंवा जनक तर दुसऱ्या दृष्टीने सृष्ट किंवा जनित असेही म्हणता येईल...
हे सत्पुरुष समाजाची सेवा करीतच आपले आयुष्य घालवितात... समाजावर ते आपली प्रचंड शक्ती प्रयुक्त करीत असतात, तर उलट समाजच त्यांच्या त्या प्रचंड शक्तीच्या अविर्भावाचे कारण असतो... हे असले सत्पुरुषच अखिल जगाला ललामभूत झालेले थोर तत्वचिंतक होत.... हेच जगातील सर्वश्रेष्ठ आचार्य, गुरु, मंत्रद्रष्टे ऋषी होत... हेच जीवनदायी श्रेष्ठ भावांचे दिव्य वाहक-ईश्वर स्वरूप अवतार होत....  स्वामी विवेकानंद....  
 बोधसार... साधकाचे लाभलेल्या जीवनातील कर्तुत्व हेच असते... साधनेप्रत सातत्य राखून जागृत होणे आणि नित्य गुरुबोध-आदेश जाणून घेणे... योग्य मार्गक्रमनेसाठी जीवनात नित्य योग्य कृती करणे... यानेच ठरते... जीवनात गुरुत्वरूपी ज्ञानाची लाट आल्यावर साधकाच्या जीवनात ज्ञानरूपी सूर्याचा उदय आहे की अस्त.... कारण साधक अहंकारी की विनम्र यावरच ज्ञान ग्रहण अवलंबून असते.... ॐ श्री गुरुदेव दत्त....

No comments:

Post a Comment