गुरुंनी आपल्या पाठीशी असावं कि बरोबर असावं...!!..
माझ्यामते हे आपल्यावरतीच अवलंबून आहे.... आज जर तुम्ही स्वःताला साधक म्हणवून घेत असाल तर... मुख्य म्हणजे तुमचे ध्येय काय.... यावर सर्व परिस्थिती अवलंबून आहे.... साधना कशासाठी..?... संसारी जीवनातलं प्रचंड दडपण घालवण्यासाठी तुम्ही साधना करत आहात का...?... साधना करतानाचा तुमचा दृष्टीकोन कोणता ?.... तुम्ही किती वेळ यासाठी देऊ शकता ?.... तुमचा खरा कल संसाराकडे आहे का..?...
गुरुकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत..?... साधनेसाठी तुम्ही किती गंभीर आणि बांधील राहू शकता..?.. म्हणूनच आपण आधी स्वःतालाच जोखणे महत्वाचे.... अध्यात्मिक साधना त्याचे प्रकार, माहिती आपल्याला किती प्रमाणात आहे.... आपल्या मनाचा निग्रह किती होऊ शकतो.... आपण कर्मबंधनातून सुटण्यासाठी गुरूप्रती किती बांधील राहू शकतो.... यावरच आपला पुढचा प्रवास कसा होईल ते निश्चित होते....
ज्यावेळी तुमची खरी साधना चालू होते... त्यावेळी सद्गुरू तुमच्या पाठीशी असतात.... म्हणजे कसे... बघा, एक उदा. देतो.... जशी सायकल चालवताना एकतर बॅलेन्स सांभाळता येतो किंवा येत नाही.... अधलीमधली स्थितीच नाही.... याचप्रकारे आपली खरी साधना ज्यावेळी चालू होते... त्यावेळी गुरु आपल्या साधनारूपी सायकलला पाठून आधार देतात आपल्याला साधनेचा बॅलेन्स सांभाळायला शिकवतात.... अभ्यास सातत्याने एकदा का बॅलेन्स सांभाळायला जमले की..... त्यानंतर सायकल चालवायचा आनंद आणि पुन्हा पुन्हा सायकल चालवून येणारे पर्फेक्शन.... यामुळे विनासायास सायकल चालवणे जमते.... बॅलेन्सची दखल घ्यायची गरज उरत नाही.... पण एक जाणून घ्या, बॅलेन्स ज्याचा त्यालाच जमायला हवा.... यासाठी कष्ट व सातत्य महत्वाचे.. मग बॅलेन्स सांभाळण्यासाठी काहीही करावे लागत नाही...
बघा, फक्त आपल्याला बॅलेन्स जमतोय याची एकदा जाणीव झाली की बस्स.... आपल्या साधनेचेही तसेच आहे.... साधना-अभ्यासाचे ज्याचे त्यालाच आकलन व्हावे लागते... गुरु त्यावेळी पाठीशी असतातच.... साधनेचा बॅलेन्स एकदा जमला कि गुरुकृपेने आपोआप साधना होत जाते.... जसजशी साधना होत जाते तस तशी आपण एक एक पायरी वर चढतो आणि मग गुरु आपल्या बरोबर असतो.... आपले व गुरुतत्वाचे मिलन होते... आपल्या अंगी गुरु साक्षीभाव जागृत होतो.... गुरु आणि आपण एकरूपच होतो.... ॐ श्री गुरुदेव दत्त....
No comments:
Post a Comment