Thursday 23 January 2014

चिंतन - बोध...

सत्य मार्ग सांडू नये | असत्य पंथे जाऊ नये ||
कदा अभिमान घेऊ नये |असत्याचा ||
कोणाशी सत्य लपवू नये | अयोग्य कृती करू नये ||
परपीडा करू नये | कोणाशी विश्वासघात ||
देह बुद्धी धरू नये | मागे उणे बोलू नये ||
वैरियास दंडू नये | शरण आलिया ||
अल्पधने माजो नये | हरिभक्तीस लाजू नये ||
मर्यादेविण चालो नये | पवित्र जनी || ----  समर्थ रामदास
आज हे समर्थांचे बोल वाचले आणि मनात भाव दाटले... सद्गुरु आम्ही तुला किती कष्टवितो... अज्ञानात सुख मानून त्यात लोळत पडतो... मग तुझा विचार कधी येणार मनात.?.. गुरु सदैव आपल्याला हाका मारतो, आपणच त्याला साद देत नाही आणि साथही.... कारण एकच आपलाच अहंकार.... मला खूप काही कळते आणि कळले आहे जीवन या भ्रमात वाहत जातो... एक दिवस असा साधक गुरूलाच सांगतो.... तुम्ही माझ्या आयुष्यातील घडामोडींपासून दूर राहा, मी बघतो काय करायचे ते.... तुम्हाला ते काही कळायचे नाही.... साधक अज्ञानाने चुकत जातो आणि गुरूलाच शिकवतो... कारण आम्हाला पाहिजे असतो, आपल्या सोयीप्रमाणे, आपल्याला वाटेल तेव्हा गुरु तत्व आणि त्याचे विचार... इतरवेळी ते परवडण्यासारखे नसतात... कारण ते विचार जीवनातील अडथळा वाटतात...
आपल्या कल्पना-सुख यांच्यावरती ते घाला घालतात... आपला मीपणा कोणाच्याही बंधनात अडकायला तयार नसतो... आणि मग तयार होते, आपल्या मन देहबुद्धीनुसार गुरुतत्त्व संकल्पना आणि धारणा... यां जाळ्यात परीस्थितीने गांजलेला भ्रमिष्ट साधक गुंतत जातो आणि आपलेच ते खरे असे मानून स्व-अहंकाराने फुलत स्व-अर्थ कृती कर्म करून भरकटतो... आपल्याला अनुकूल अशी तत्वे अयोग्यतेतून तयार करून ती गुरुतत्त्व असे सांगतात.... खऱ्या चलनाच्या अस्तित्वाबरोबर जसे खोटे चलनही बाजारात येते, तसे या खऱ्या वाटणाऱ्या ढोंगी साधकांना आज महत्त्व आल्याचे दिसते.... म्हणूनच वरील श्लोकात समर्थांनी मनाचे आचरण कसे असावे हे सांगितले आहे...
खरच, गुरुतत्त्व आपल्या जीवनात अडथळा आणते का..?.. नाही... नाही..!!. सद्गुरु कधीच आपल्याला आपल्या आत्म उन्नतीच्या आड येणारी गोष्ट शिकवत नाहीत... ते नेहमीच आपलं सामान्यपण लक्षात घेऊन, आपल्या विविध संसारी व्यवहारातल्या अडचणी लक्षात घेऊन कसं सन्मार्गावर राहता येईल ते शिकवतात... म्हणूनच आज थोडक्यात आपल्याला आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायचा आहे.... आनंद अनुभवण्याची भावदशा ओळखायची आहे.... गुरुबोध हाच.... आपले प्रत्येकाचे जीवन तेच असते... पण दृष्टी बदलताच सारे काही परिवर्तित होते.... दृष्टी बदलताच गुलाबातील काटेच न दिसता... त्या काट्यातून बहरलेला गुलाब देखील दिसू लागतो.... फक्त आपल्याकडे तो बदल घडवण्याची मानसिकता मात्र पाहिजे...
म्हणजेच श्रद्धा-विश्‍वासाचा अभाव असेल तर आपण काहीच योग्य करीत नाही.... मग चुकीचा दृष्टिकोन त्रासदायक ठरू शकतो.... आपण काहीच बोलू शकत नाही... काही गोष्टी आपण टाळतो... लपवा लपवी करतो... खोटे बोलणे वाढत जाते... मग काही वेळा यामुळे पीछेहाटही होते... एखादी गोष्ट जसे चिंतन-मनन अभ्यास... आपण करू शकणार नाही, हे मनात पक्के असेल, तर आपण प्रयत्नच करत नाही आणि आहे त्यावर समाधान मानतो... अशारीतीने प्रयत्न केले नाहीत, तर आत्मविश्‍वास डळमळीत होतो... ही गोष्ट आपल्या आवाक्‍याबाहेरची आहे, असे मनोमन पटत जाते... आपण आपलाच विकास खुंटवतो... म्हणूनच गुरुतत्त्व-नीती आपण पूर्णपणे अंगी बाणवली तर आपल्याला काय उणे राहील...
आज साधकाचे आद्यकर्तव्य असे... गुरु काहीही सांगो, आपल्याला कळो अथवा न कळो... त्याचा संग, सहवास, दृष्टी आणि वाणी आपलेच प्रभामंडळ आणि आत्मतेज वाढवत असते... तो संग... तो सहवास... जितका मिळेल तितका कमीच..!!..  पण शेवटी काहीजण असाही विचार करत असतील... क्षणभंगुर जीवन मनुष्याचे मागे काय उरते..???… एक दिवसाच्या मुलाचेही... कुठे आईवाचून अडते..???..  पण त्याचवेळी हेही लक्षात ठेवा...
Darkness cannot drive out darkness, only light can do that...  That’s why true spiritual master (गुरुतत्त्व) Lead your life in way that always choose the harder right… rather than the easier wrong for lesson of true life light… Know that this kind of leadership is not about titles, positions or flowcharts…. It is about one life influencing another to become the leader of true life… and know truly that your success and happiness lie in you only…
सद्गुरूला पूर्ण शरणभावाने शरण जा... आणि पहा आपले जीवन आमुलाग्र कसे बदलते... इथे अट एकच शरणागती खरी पाहिजे, श्रद्धा-विश्वास पूर्ण पाहिजे... थोडाही संदेह मनात नको... आणि निश्चय आणि निग्रहाने गुरुत्व विचार अंगी बानविणे हे साधकाचे अग्रिम कर्तव्य... मग मन गुरूप्रेमाने व्याकुळ होते... आणि म्हणते...
ज्ञानियाचा राजा | आदिगुरु माझा | तम अज्ञानाचा | दूर करी ||
अत्रिपुत्र दत्त | अनुसया माता | जगताचा त्राता | दिगंबर ||
शंकर आनंद | तोची पूर्णानंद | दावी स्वरूपाचे | निर्गुणत्व ||
जाहले जीवन | गुरुतत्व रूपी | चिंतामणी दास | सांगतसे ||
अशी ही सद्गुरु कृपेची वचने श्री सद्गुरुंना अर्पण.... श्री सद्गुरुचरणी समर्पित....
श्री गुरुदेव दत्त....        

No comments:

Post a Comment