Friday, 14 September 2012

New Presentation of Thoughts By Chetan K....    

Never give up, hope is aways there whatever hapened….. Magic of hope is believing in yourself…. If I start something, I will finish it and do it well… Nothing is out of your reachas long as you believe…. Know that our greatest glory is not in never failing, but in rising up every time we fail…. seize every moment…. Stop… look…. & listen…. And never give up….. ॐ श्री गुरुदेव दत्त .....

जग जिंकायचं असेल तर प्रथम स्वःताच मन जिंका.... मन पूर्णपणे निस्वार्थी असणे हेच प्रमुख ध्येय राहू द्या.... शरीराची, बुध्दीची आणि मनाची हीच खरी श्रीमंती असते.... जर ती आपल्याकडे असेल तर विश्वास आपोआप निर्माण होऊन खरा आनंद निर्माण करते.... ॐ श्री गुरुदेव दत्त ..... 

आज आपला हाच संकल्प..... स्वतःच्या परिश्रमाने स्वतःला जागृत करणे..... स्वतःचे आत्मनिरीक्षण करा.... आत्मसुधारणा करा.... आनंदात जीवन व्यतीत करा..... तुम्ही स्वःताच स्वतःचे शिल्पकार बना....  ॐ श्री गुरुदेव दत्त ..... 

सध्याच्या ताणतणावपूर्ण जीवनात जास्तीत जास्त आनंदी, आरोग्यपूर्ण राहण्यासाठी, मनाची चांगली मशागत करणारी स्वामी विवेकानंद यांचे विवेक विचार ही गुरुकिल्ली आहे..... समर्थ रामदासांनी दासबोधात म्हटलेच आहे.... धकाधकीचा मामला। कैसा घडे अशक्ताला।.... नाना युक्ती शक्ताला। म्हणोनि सिकवाव्या।।..... श्रीराम....

All truths are easy to understand once they are discovered... Real Truth is... we make them cry who really care for us.... We cry for those who never care for us.... And we care for those who never cry for us.... know this is the truth of life, Its strange but true.... and Once we realize it.... Remember that.. Its never too late to change.... ॐ श्री गुरुदेव दत्त .....

If you wait to do everything until you're sure it's right,….. you'll probably never do much of anything...... The key to change... is to let go of fear.... ॐ श्री गुरुदेव दत्त .....


Education is the most powerful weapon which you can use to change the world.... know that Education is a progressive discovery of our own ignorance.... Remember that Intelligence plus character.... that is the goal of true education.... ॐ श्री गुरुदेव दत्त .....


आपण काही जन.... एकत्र काही क्षण.....
शोधुया आपापले मन.... मिळवू अमूल्य विचारधन..... ॐ श्री गुरुदेव दत्त ..... 

नको धन्यवाद.... घडो सुसंवाद.... वाढवूनी मनशक्ती.... पेटवूया ज्ञानज्योती....  ॐ श्री गुरुदेव दत्त .....


आपली पृथ्वी असे अनमोल.... राखावा पर्यावरण सृष्टी तोल.... 
जाणुया काळाची गरज.... करुया उर्जा संवर्धन..... 
अक्षय उर्जा वारा सूर्य.... पर्यावरण उर्जा नवे पर्व..... ॐ श्री गुरुदेव दत्त .....

नको नको धन्यवाद.... घडो नित्य सुसंवाद.... घालू अंतरी साद... ऐकू चला अंतर्नाद.... ॐ श्री गुरुदेव दत्त ....


Believe in yourself.... If you don't believe in yourself then who else will believe in you.... Don't just think that you're the best.... prove it to yourself....Whenever you find yourself doubting how far you will go.... just remember how far you have come.... Remember everything you've faced.... All the battles you have won.... All the fears you've overcome....Remember the moments that came before, when you had this same doubt and overcame it.... You can go as far as you let yourself go.... but in this journey... always keep in mind that man should never neglect his family for business.....  ॐ श्री गुरुदेव दत्त....

I know I am Wise, Fearless and Strong..... Because I know myself.... and I was put here for a reason.... We all were... We've all been given a gift, the gift of life..... What we do with our lives is our gift back..... ॐ श्री गुरुदेव दत्त....



यशस्वी नात्याचे आधारस्तंभ...
मन बुद्धीसह अहंकाराचे स्फुरण | श्वासांचा उगम जेथोनि रे ||
चित्तवृत्ती होवू दे, सरळ निर्मळ | परपीडा गरळ, टाकी वेगी ||
जाईन मी प्रेमे, तिथे माय माझी | भक्तजन वत्सल सद्गुरु राय ||
जिव्हेचे रमण रामरंगी होवो | स्मरण सोहम् भावे सर्वकाळ ||
जगातला प्रत्येक जीव एकमेकाशी एका अदृश्य धाग्याने जोडला गेला आहे.. असं अध्यात्म सांगतं.... यातील मैत्री नातेसंबंध म्हणजे माणसाच्या अस्तित्वाचा पाया.... नात्याची अंत:प्रेरणा ही माणसाला मिळालेली अद‍्भुत भेट आहे.... जगातले सगळे जीव या सूत्रात बांधले गेले आहेत..... जे. कृष्णमूर्ती म्हणतात, “To be is to be related and to be related is to be in conflict....”.... दोन माणसं एकत्र आली की त्यांच्यात विसंवादाचं का होईना, पण एक नातं निर्माण होतंच..... मात्र माणसा-माणसामधलं नातं क्वचितच निकोप आणि सहज असतं.... कारण खूपवेळा ते निरपेक्ष नसतं.....
कधी कधी एखादी अनपेक्षित घटना व्यक्तीला अंतरबाह्य बदलून टाकते.... अनेक वेळा आपण आपल्या एखाद्या नात्याचा आणि व्यक्तीचा जो विचार करत असतो... त्याला धक्का बसून आपला दृष्टीकोन पूर्णतः बदलून जातो.... आपल्याच काही भावना एक मोठ प्रश्न चिन्ह घेऊन समोर येतात मग त्याची उत्तर शोधताना मनाची प्रचंड दमछाक होते.... खरच खर प्रेम म्हणतात ते असत का ह्या जगात..?.. की अनेकवेळा भावनिक गरजांच्या खेळाला प्रेमाच गोंडस रूप देऊन आपण मोकळे होतो..?.. असा प्रश्न सामोरा येतो....
व्यवहाराच वर्गीकरण आपण करू शकतो... पण प्रेमाच तस करता येत नाही.... विशिष्ट संवेदना म्हणजे प्रेम अस... आपण नाही म्हणू शकत.... प्रेमाची अनेक रूप अनेक भावनिक पदर ते उलगडणे खूप कठीण.... प्रेमात जस आधी मी म्हटलं, की सगळ्यात महत्वाचा असतो तो आपल्या प्रेमाविषयी आणि व्यक्तीविषयी आदर.... हा आदर असतो त्या व्यक्तीच्या भावनांचा, त्याच्या आपल्याविषयी असलेल्या संवेदनेचा.... आपल्याच व्यक्तीचा अपमान जेव्हा आपण सहज करून मोकळे होतो... तेव्हा त्याला लागणारी भावनिक ठेच आपण कल्पना करू शकत नाही.... व्यक्ती जवळ असो की दूर कुणीतरी आपल्याशी आणि आपण त्याच्याशी प्रेमाच्या नात्याने निगडीत आहोत.... अस जेव्हा माहित असत, तेव्हा आपल्या मनावर संयम असण... ही तर अतिशय महत्वाची गोष्ट.... चंचलता नात्याला लौकर ग्रहण लावते....
पर्याय म्हणून आपल्या व्यक्तीचा विचार करण... हा त्यांच्यावर नकळत केलेला अन्याय असतो आणि सगळ्यात महत्वाच आपल्या व्यक्तीची मनापासून घेतलेली काळजी.... प्रेम हे भावनिक दृष्ट्या कुणावरतरी आणि कुणीतरी आपल्यावर अवलंबून रहाण आहे आणि जेव्हा हे माहित असत... तेव्हा होता होई तो त्या व्यक्तीची आणि त्याच्या हिताची काळजी हा आपल्या कर्तव्याचाच एक अविभाज्य भाग असतो.... वरील पैकी एका जरी गोष्टीला तिलांजली दिली गेली तर प्रेम कोमेजून जात.... परिस्थिती आणि वेळ कशीही असली... तरी आपल्या व्यक्तीच्या आत्मसन्मानाला ठेच पोचणार नाही... ह्याची काळजी घेण खूप गरजेच.... पण शेवटी आत्मसन्मान हा देखील अहंकारच त्याला मैत्रीच्या नात्यापेक्षा किती महत्व दयायचे हे व्यक्तीच्या विचार प्रगल्भतेवर अवलंबून असते....    
तुझ्यावाचून माझ काहीही अडत नाही... ह्या शब्दांपेक्षा तू आहेस म्हणून मी आहे... हे शब्द त्या व्यक्तीची तुम्हाला असलेली गरज अधोरेखित करत.... एकमेकांना एकमेकाची गरज ही असतेच....  हे सगळ पुस्तकी वाटत, पण पण खऱ्या अर्थाने तीच नाती बहरतात... ज्यात ह्या गोष्टी अंतर्भूत असतात.... शब्द आणि आपली वागणूक ह्याचा ताळमेळ असायला हवा.... अर्थात ज्यांना आपल प्रेम आणि व्यक्ती हवी असते तिथेच हे घडू शकत.... अन्यथा बोलायचे एक आणि करायचे एक.. अशी वृत्ती असेल तर.... काळाच्या ओघात वाहून जाणाऱ्या अनेक नात्यांपैकी एक नात... म्हणून प्रेम आयुष्यात आठवण म्हणूनच रहात….
त्याचप्रमाणे आपल्या जवळच्या व्यक्तीच्या एखाद्या कृत्याचा काहीवेळा काहीजण चुकीचा अर्थ घेऊन.... त्या कृत्यामुळे त्याच्याबद्दलचे मत काहीजण चुकीचा घेत असतील... तेव्हा त्याच्या त्या कृत्याबदलची दुसरी बाजू त्याला दाखवणे.... म्हणजे त्या व्यक्तीकरता आपल्या मनात असणारी आदराची भावनाच दर्शवते असे मला वाटते.... कारण ती बाजू दाखवण्यामागे हेतू एवढाच असतो कि त्याचा तो आदर सर्वांनी करावा....
काहीवेळा त्यात त्या व्यक्तीचा अपमान व्हावा असा केव्हाही हेतू नसतो.... पण काळजीपोटी, आपलेपणामुळे ती व्यक्ती चुकत असेल, तर योग्य भान येण्यासाठी प्रेमापोटी ती केलेली कृती असू शकते.... इथे प्रेम अतुच्च्य दर्जाचे असते.... कारण आपल्या निर्मळ प्रेमापोटी ती व्यक्ती अयोग्य मार्गी वळू नये.... यासाठी आपण केलेले आपल्या नात्याचे बलिदान असू शकते.... माझ्याबद्दल काही का वाटेना, माझे काही होवो, पण तू चुकू नकोस.... हाच समर्पण भाव या निर्मळ वैश्विक प्रेमात असतो....  अशा व्यक्ती या दुसऱ्याचा आधी विचार करणाऱ्या, प्रेमळ, संवेदनशील, हळव्या आणि खुपश्या दैवीदृष्ट्या द्रष्ट्या असतात.... आणि मग अशा व्यक्तीबाबत खूपवेळा गैरसमज लवकर होतात.... कारण त्यांचा खरेपणा या जगाला मान्य नसतो.... एवढे निस्वार्थ कोणी असेल का..?.. असा प्रश्न स्वार्थी जगाला पडतो.... आणि ती व्यक्ती नाकारली जाते.... खोटारडी म्हणून अवहेलना तिची होते.... अहंकारी-मोठा आव आणणारी म्हणून निंदा केली जाते.... अशावेळी ती व्यक्ती काही बोलली तरी ते मान्य होत नाही... मग ती एवढेच बोलू शकते....                             खर सांगू का..?.. माझ्याजवळ फक्त खरेपणा आहे....
कुणाला काही वाटेल, पण असं.... जगणं फार कठीण आहे...
      माझ्या दृष्टीने जीवनाचा प्रवास पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या सद्गुरूंच्या शिकवणीनुसार वागायला हवे.... आयुष्यात दोनच गोष्टी जपायच्या... सत्व आणि तत्व हेच खरे.... मग आपण कधीच भरकटत नाही वा घाबरत नाही.... चराचरात परमेश्वर आहे हे जाणायला हवे.... एखाद्या व्यक्तीचे गुण आणि स्वभाव... यामुळे त्यांच्यातील अंतर्यामीकडे पाहतांना मनाला विचलित होऊ देऊ नये.... आपला सभोवताल हा केवळ आपल्या स्वतःच्याच विचारांचे आणि कृतींचे प्रतिबिंब असते.... जर आपण चांगले असलो तर जग चांगले दिसते.... आणि जर आपण वाईट असलो तर सर्व वाईट भासते.... जर आपण आपले मन शुद्ध केले तर सर्व जगही निर्मळ सुंदर असे बनते....
बहुतेक वेळा आपण समोरच्या व्यक्तीकडे सोयीच्या दृष्टिकोनातूनच पाहतो.... नातं जुळलंच तरी ते व्यक्तीसापेक्ष, परिस्थितीसापेक्ष असतं.... सगळं अनुकूल असेल, तरच ते टिकून राहतं.... अशा नात्याने व्यक्ती म्हणून आपण समृद्ध होऊ शकत नाही.... ज्या नात्याने आपण झळाळून उठतो, जे नातं जोडणं किंवा तोडणं आपल्या हातात नसतं ते नातं एकच.... माणसाचं आणि ईश्वरी तत्त्वाचं.... गुरुचे आणि शिष्याचे.... गुरुतत्वाचे आणि साधकाचे.... त्वमेव माता च पिता त्वमेव... त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव....
ईश्वर, सद्गुरू मानणारे त्याची रूपं आयुष्यात आलेल्या प्रत्येक घटकाच्या माध्यमातून अनुभवतात.... जर हे नाते खरोखरीचे असेल तर ते निरपेक्ष असतं.... कदाचित म्हणूनच या नात्याची कसोशी टिकून राहते, मैत्रभाव उधळून दिला जातो.... या नात्यात ऋजुता असते, अहंकार नसतो.... या नात्याला अनेक विविध पदर असू शकतात.... या नात्यांतलं सौंदर्य कायम राहतं.... कारण यामागे अपार श्रद्धा असते.... श्रद्धा हाच यां नात्याचा मूळ गाभा असतो..... या साऱ्या नात्यांत फक्त देणं असतं, घेणं नसतं.....      
आपण नेहमीच योग्य विचार करतो असा काहीसा गैरसमज प्रत्येकाच्या मनात असतो.... परंतु कधीतरी असही घडत की समोर घडलेली घटना आपण किती चुकीचे होतो हे दाखवून देते.... अशा वेळी गरज पडते ती आपल्याच विचारांचे ऑडीट करण्याची.... टाळी कधीच एका हाताने वाजत नाही आणि ह्या दोन हातात एक हात आपलाही असतोच.... खूप वेळा एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवून आपण मोकळे होतो, परंतु ह्या सगळ्यात आपण कुठे चुकलो त्याची शहानिशा करायची गरज आपल्याला कधीच वाटत नाही.... आपला स्वाभिमान, आपल्या अपेक्षा ह्यांना ठेच पोचली... की दुसऱ्या व्यक्तीच्या भावनांची कदर आपणही करायला हवी होती हे लक्षात येत.... बघा, पण खूपवेळा असे होते... काहीजण लगेच सावरून घ्यायला तयार होतात, कारण चूक झाली, मान्य केली, झाल गेल विसरून जाउया... या मताचे ते असतात.... आणि खूपवेळा समोरचा भानावर येण्यासाठी किंवा अयोग्य चुकीच्या मार्गात अडकू नये म्हणाच ती कृती असते.... पण जे वारंवार चुका करतात, ती व्यक्ती मुळात अहंकारी, हट्टी, दुराग्रही, माझे तेच खरे अशी असू शकते.... अशी माणसे चूक, दोष मान्य न करता.... माझे काही होवो मी माझे तेच खरे करणार अशी टोकाची भूमिका घेऊन नाते तोडतात.... अशी माणसे जीवनात यशस्वी होत नाहीत.... खरे यश त्यांनी कधीच पाहिलेले नसते... कारण काम करताना, समाजात राहताना ते टीम वर्कने काम करू शकत नाहीत.... 
        
    नाती का तुटतात..?.. ह्याच अनेकदा बीज ह्यातच असत.... जी व्यक्ती मनापासून तुमच्यावर प्रेम करते तिला सतत गृहीत धरून चालण, ती एखाद्या गोष्टीने दुखावते ते माहित असूनही तीच गोष्ट करून... त्यांची आपल्या आयुष्यात काहीच किंमत नाही.... हे अप्रत्यक्षपणे त्याला दाखवून देण आणि सगळ्यात महत्वाच त्यांना सतत दुर्लक्षित करून इतरांना महत्व देण.... टीम वर्कला काहीच महत्व न देणे.... खर तर कुणीतरी आपलंच आपल्यासाठी थांबलेलं असत, आपल्या सहवासासाठी, शब्दांसाठी आसुसलेल असत.... ते आपल्यावर भावनिकदृष्ट्या अवलंबून आहेत.... हे माहित असूनही आपण आपल्याच व्यक्तीच्या ह्या सगळ्या गरजांना दुर्लक्षित करतो.... पण ह्या सगळ्यात आपण अतिशय अमुल्य अशी गोष्ट गमावतो ते म्हणजे खऱ्या अर्थाने "आपल माणूस"….एकदा तरी ह्या गोष्टीचा विचार करावा.... एकदा तरी ह्या चुकीच्या विचारांचं ऑडीट कराव आणि शिलकीचा जमाखर्च होईल अस आयुष्याच अकाऊट बनवावं….
माणसांचं आपसातलं नातं इतकं सहजसोपं व्हायला हवं असेल, तर एकमेकांचा गुण-दोषासकट स्वीकार करता यायला हवा.... फक्त एकाने तो स्वीकार करून उपयोग नाही ते दोघांकडून झाले पाहिजे.... एकमेकांना दिलेला वेळ, शब्द, शुध्द-निर्मळ व्यवहार, एकमेकांवरील विश्वास, श्रद्धा, आश्वासकपणा आणि एकमेकांपासून काही न लपवणे.... हे कोणत्याही यशस्वी नात्याचे आधारस्तंभ असतात..... नातेसंबंधाच्या बाबतीत हे समजून घ्यायला हवं की आपल्याला जे हवं आहे ते आपण कधी दुसऱ्याला दिलं का..?.. (आपुलकी, जिव्हाळा, आदर) हे उमजलं तर तो खरा मैत्रभाव.... तो जपला तर आपसूक माणूस निर्वैर होऊ लागतो.... वात्सल्य, क्षमाशीलता, करुणा, कळकळ हा त्याचा स्वभावधर्म होतो.... मनातला मैत्रभाव बाह्य व्यक्तिमत्त्वात दिसतो....  अवघं जगणं सुंदर होऊन दडलेला नात्याचा खरा अर्थ गवसतो.... अशी पांखरून छाया, लावोनिया माया | आनंदाचे आसू लावी कोण ओघळाया ||....

ॐ श्री गुरुदेव दत्त....
New Presentation of Thoughts By Chetan K....   


Anger is a completely normal human emotion.... But when it gets out of control and turns destructive.... it can lead to problems — problems at work, in your personal relationships, and in the overall quality of your life..... If you are patient in one moment of anger, you will escape a hundred days of sorrow.... It is wise to direct your anger towards problems -- not people..... understand and control anger before it control you... Remember best answer to anger is silence.... ॐ श्री गुरुदेव दत्त ......

Realized the importance of a kind and calm mind in a situation .... It is capable of resolving conflicts and making peace.... dissolve all kinds of conflicts and release a lot of energy for positive thinking.... ॐ श्री गुरुदेव दत्त ....


We are not always aware of our real needs..... and most of us improperly multiply our wants and thus..... unconsciously, make thieves of ourselves.....बऱ्याचदा जीवनात गरजांची जागा अपेक्षा घेतात व जीवनाचा बेरंग होतो..... ताण तणाव वाढतात..... आज गरजा ज्याने कमी केल्या तो खरा आनंदी..... ॐ श्री गुरुदेव दत्त .....

आपण नव्या युगाचे साक्षीदार आहोत.... समाज आणि संस्कृतीची जाणीव प्रत्येकाला व्हावी यासाठी प्रयत्न करू या.....  आज आपल्या प्रत्येकात गरुड लपलेला असतो.... तो प्रथम ओळखणे आवशक आहे..... जीवनात गरुड बनणे.... म्हणजे अशक्य हे शक्य करणे... अपयशाने न खचता परत नव उमेदीने काम करणे.... सकारात्मकतेची कायम कास धरणे.... व नंतर आपल्यात विविध गुण विकसित करून गरुड भरारी घ्यावी.....  तसेच जिद्द आणि हुन्नर, हुशारी, कर्तुत्व यांच्या बळावर आपण क्षितीजापलीकडे जाण्याचा प्रयत्न करुया..... गरुडझेप घेण्याचा प्रयत्न करू या..... ॐ श्री गुरुदेव दत्त ....

ग्रंथ हेच गुरू.... वाचाल तर वाचाल..... पुस्तकासारखा मित्र नाही...... प्रतिकूल परिस्थितीतही चांगले जीवन घडवण्याचे काम पुस्तके करतात....... विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वाचन करुन ज्ञान ग्रहण करायला हवे.,,,,, साहित्याकडे डोळसपणे पाहिल्यास उत्तम भवितव्य घडते....समृद्ध जीवनासाठी पुस्तक व ग्रंथांशी मैत्री आवश्यक आहे..... आज चांगले वाचन केले तर उद्या उत्तम नेतृत्व करू शकाल.... ॐ श्री गुरुदेव दत्त .....

पुस्तके समाजाला घडवतात..... पुस्तकांचा वास जगण्याचा आनंद देतात...... आपला पुस्तकसंग्रह वाढवा व स्वत:चं असं एक लघुग्रंथालय विकसित करा..... एखाद्या ग्रंथसंग्रालयाचे सभासद व्हा आणि आवडती पुस्तके वाचून काढा..... देशोदेशी फिरल्याने माणूस समृध्द होतो त्याचप्रमाणे.... वाचनाने माणूस समृध्द होतो.... ॐ श्री गुरुदेव दत्त .....


Anyone who’s ever tried to lose weight knows it takes work..... But it may not require as much as you think..... I can do this...I know I can..... It's just going to take time & patience..... ॐ श्री गुरुदेव दत्त .....


प्रेरणा नसेल तर मनःशक्ती निष्प्रभ राहते.... आपल्या प्रत्येकात इंधन असते, ते प्रेरणेच्या सहायाने प्रज्वलित करावे....  तसेच कोणत्याही गोष्टीचं ज्ञान होण्यासाठी प्रेरणा जशी हवी, तसाच मनाचा सहभागही अत्यावश्‍यक आहे...... कारण मन हे बुद्धी व इंद्रियांवरही आपला अधिकार गाजवू शकते..... मानस रोगांमध्ये शरीरशुद्धी सर्वप्रथम येते.....शरीर शुद्ध झाले की मनही शांत व्हायला मदत मिळते..... ॐ श्री गुरुदेव दत्त ......

प्रेरणा जर नसेल तर मनाच्या आंतरिक शक्ती ह्या सुप्त अवस्थेत राहतात.... यासाठी आपल्या मध्ये असलेले इंधन ध्येय रुपी अग्नीने प्रज्वलित करणे आवश्यक आहे.....  ॐ श्री गुरुदेव दत्त .....

आपल्या भारतीय संस्कृती मध्ये प्रत्येक गोष्टीची सुरवात हि संकल्प करून होते..... हि संकल्प शक्तीच आपली प्रेरणा बनते व आपले कार्य सिद्धीस नेण्यास आपल्याला सतत कार्य प्रवण बनवतात.... जीवनात सर्व क्षेत्रात संकल्प करणे आवश्यकच आहे....   ॐ श्री गुरुदेव दत्त .....
The nice thing about teamwork is that you always have others on your side…. If everyone is moving forward together, then success takes care of itself..... Remember you can succeed best and quickest by helping others to succeed…… Together Everyone Achieves More ….. Individually, we are one drop…. Together, we are an ocean.... Let us work together for unity and love..... ॐ श्री गुरुदेव दत्त .....



शहीद भगतसिंग, शहीद राजगुरू क्रांतीकारक होते...... पण हिंसेचे पुरस्कर्ते नव्हते...... त्यांनी पेटवलेली क्रांतीची ज्योत विद्यार्थ्यांनी मनात सतत तेवत ठेवणे...... हीच सर्व शहिदांना यांना खरी आदरांजली ठरेल..... वंदे मातरम .....

नेतृत्व म्हणजे आपल्याकडील कल्पना विचार यांची सांगड दूरदृष्टीने करून त्या वास्तवात रुपांतर करणे.... जर तुमची क्रिया कर्म सर्वाना प्रेरनादायी ठरून मोठी स्वप्न, शिकवण, कार्य प्रेरित ठरत असतील तर तुमच्याकडे नेतृत्व क्षमता नक्कीच आहे.....   ॐ श्री गुरुदेव दत्त .....


When you do nothing... you feel overwhelmed and powerless... But when you get involved... you feel the sense of hope and accomplishment that comes from knowing you are working to make things better..... ॐ श्री गुरुदेव दत्त .....

Key to success.... No fear of failure… Determine yourself and try try till you succeed.... ॐ श्री गुरुदेव दत्त ....



Thursday, 13 September 2012

आयुष्याचा सूर्योदय..... 

सूर्योदय म्हणजे प्रकाशाचा अंधारावरचा विजय....... सूर्योदय नेहमीच नवीन आशा, नवीन उत्साह घेऊन येतो....... हा उत्साह, हा उल्हास मानवी मनापुरताच मर्यादित नसतो........ तर तो आपल्या भोवतीच्या सृष्टीतही आपल्याला जाणवतो..... 

उजाडताच टवटवीत होणाऱ्या हिरवाईतून.... किलबिलणाऱ्या पक्षांमधे...... उगवणारा हा आगीचा गोळा जणू आपल्याला सांगत असतो....... " मित्रा " ... गेला दिवस विसरून जा...... कुढत बसू नकोस..... रडू नकोस...... हा घे एक नवीन दिवस....... नव्याने सुरुवात कर आणि लवकर जागा हो.... स्वःताला ओळखण्यासाठी....

खरे तर आपले सद्गुरूच आपल्या आयुष्यात खरा सूर्योदय घडवून आणतात.... बघा, अंधार म्हणजे अज्ञान व प्रकाश म्हणजे शुद्ध ज्ञान..... ज्ञानरूपी ज्योत प्रज्वलित झाली कि अज्ञान रुपी अंधःकार दूर होतो.... व आपला स्वविकास सुरु होतो.... सद्गुरूंच्या कृपा प्रसादाने हि ज्ञान ज्योत प्रगट होते...  

सद्गुरूंच्या कृपेने अज्ञानाचा, अविचाराचा, विकार विकृतीचा मनामनातील अंधार घालवून शुद्ध ज्ञानाचा, शुद्ध विचारांचा उजेड निर्माण होतो..... आपल्या जीवनातील ज्ञान, कला, आरोग्य हा प्रकाश उजळत राहिला.... तरच जीवन आनंदी राहणार....

                          सद्गुरू करी नवा सूर्योदय..... नवी वाट चेतनेचा उदय....
                                                           अंधार अज्ञान दूर सरे.... अंतरी शुद्ध ज्ञान भरे....
ॐ श्री गुरुदेव दत्त .....



तोरा मन दर्पण कहलाये...

काय हवं..?.. या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगळ असलं तरी, त्यातली एक गोष्ट कॉमन असते… प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आपल्याच "मनातली" हवी असते...

 ‘अपने आप को पहचानिए’ असेही हिंदीत म्हटले जाते... व्यक्तिमत्त्व हे त्यावरून घडते... अशा विचारांचे मनन, चिंतन, वाचन माणसाने सातत्याने करावे... हे फारच उपयुक्त ठरते... त्यामुळे स्वत:ची ओळख होते... आपणास सहज स्वत:विषयी काही विचारलं तरी आपण बोलण्यास कचरतो... स्वरूप ओळखा असे संत सांगतात... ज्यांना स्वरूप कळाले त्यांनीच जगावर राज्य केले अन् तेच आजही करताहेत...

संत कबीर यांचा एक दोहा आहे...  
अपने अपने चोर को, सब कोय डारै मार
मेरा चोर मुझको मिलै, सरबस डारू वार
संत कबीर दोह्यात आपणास हेच सांगतात... जगातले सर्वच आपापल्या शत्रूंना मारून टाकतात... मात्र पकडले न जाणारे मन मला मिळाले तर मी त्याला मारणार तर नाहीच उलट माझे सर्वस्व त्याला अर्पण करेन, त्याच्याशी मैत्री करेन... स्वत:ची ओळख होण्यासाठी स्वत:चे मन, प्रवृत्ती, कल, सवयी यांचा अभ्यास होणे महत्त्वाचे... एकदा का हा अभ्यास झाला म्हणजे गुण-दोष दिसतात... दोष कमी करत गेलो की मग गुण वाढीस लागतात...

आपण काय करतो, का करतो, त्याचे काय परिणाम होणार हे कळते... त्यावेळी आपले मन आपणास सापडते... ‘तोरा मन दर्पण कहलाये’ असं दर्पणासमान मन आपणास सारे काही दाखवते... मग काय हा अल्लाऊद्दीनचा दिवा असलेलं आपलं मन हवं ते मिळवून देतं व आयुष्यातल्या अडचणी, संकटे, दु:ख यावर उपाय सापडतो व आपल्या आयुष्याला आकार मिळतो...

आपल्याही आसपास सकारात्मक विचार करून आपल्या स्वत:च्या आयुष्याला, दुस-याच्या आयुष्यालाही आकार देण्याचा सातत्याने प्रयत्न करणारी व्यक्तिमत्त्वे आढळतात... फक्त उघड्या डोळ्यांनी त्यांना अनुभवण्याची गरज असते... जसा कुंभार ओल्या मातीला आकार देत असतो, प्रसंगी तो धपाटाही देतो व आतून आधारही...

थोडक्यात सांगायचं तर अडचणीपासून कोणीही सुटलेला नाही... अडचणीविना जीवन एक भ्रम आहे... वाळवंटातल्या मृगजळाप्रमाणे अशा जीवनामागे धावून मानसिक व शारीरिक शक्ती वाया घालविण्याऐवजी अडचणी पेलून त्यावर मात करण्यातच खरे कौशल्य आहे... आयुष्याचा भागाकार करतांना बाकी शून्य येते, यात काही नवीन नाही... पण तुम्ही भाग कोणत्या गोष्टींनी देतात हे फार महत्त्वाचे आहे..!.. 

अशा सुविचारातून गुण घेऊ या अन् म्हणू या ‘सकारात्मक विचारच देतील आयुष्याला आकार’ आणि चला आयुष्य सकारात्मक विचारानं जगू या..!.. ॐ श्री गुरुदेव दत्त... 

जीवनाचा संघर्ष..... शहाणा गाढव..... 

जीवनातील संघर्ष म्हणजे काय व आपण त्याला कसे सामोरे जावे.... हे पुढील बोधकथेतून जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करुया..... तर बघा,  एकदा एका शेतक-याच्या विहिरीत त्याचं गाढव पडलं..... ते जोरजोरात ओरडू लागलं..... शेतक-याने त्याला विहिरीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण त्याला काही ते जमलं नाही..... त्यानी गावातील गावक-याना बोलावून आणलं......

गावक-यांनी मात्र त्याला विचित्र सल्ला दिला की, नाहीतरी तुझं गाढव आता म्हातारं झालं आहे.... आणि तुझी विहीर पण कोरडी आहे..... मग उगाच गाढवाला बाहेर काढण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा सरळ सरळ विहिरच बुजवुन टाकू या..... सर्वजण सांगतात - बोलतात म्हणून शेतक-याला देखील ते पटलं आणि सर्वजण मिळून भराभर विहिरीत माती टाकू लागले.....

आता गाढव घाबरलं आणि ते आणखी जोरजोराने ओरडू लागलं..... पण थोडयाच वेळात त्याचा आवाज शांत झाला.... शेतक-याला वाटलं की मातीखाली दबून गाढव मेलं.... म्हणून त्यानी विहिरीत वाकून बघितलं.....  तर काय आश्चर्य !!.... 

गाढव मातीच्या ढीगा-यावर उभं होतं..... जसजशी माती त्याच्या अंगावर पडायची तसतसा तो ती माती झटकून तिच्यावर उभा राहून वर वर चढत जायचा..... थोडया वेळाने विहीर जशी पूर्ण बुजली तसं ते गाढव पण विहिरीच्या काठाशी आलं आणि उडया मारत मारत पळून गेलं.... 

तात्पर्य हेच कि....  बघा, आज आपल्या समाजात सुद्धा एखादी व्यक्ति जेंव्हा संकटात सापडते.... तेंव्हा तिला मदत करण्याऐवजी लोक तिच्यावर ओढवलेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेउन तिच्यावर चिखलफेक करुन लोक तिला दाबण्याचा प्रयत्न करतात..... 

त्या व्यक्तीने पूर्वी केलेल्या उपकारांचा सुद्धा त्याना विसर पडतो..... पण अश्या लोकांना न घाबरता, त्यानी आपल्यावर फेकलेला चिखल झटकून टाकुन तो तुडवून संयमाने आणि धैर्याने जो पुढे जातो तोच खरा शहाणा नाही का.... संकटकाळी आलेल्या परिस्थितीला जो धैर्याने- बुद्धीने सामोरा जातो तो यशस्वी होतोच..... 

आज समाजात चिखलफेक जास्त व प्रोत्साहन कमी अशी परिस्थिती आहे.... तेव्हा टीकेने खचून न जाता आपले ध्येय गाठण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत रहायचा व आपले ध्येय गाठायचे .....  बघा, प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस ..... समोर अंधार असला, तरी त्याच्या पलीकडे प्रकाश आहे हे लक्षात घ्या...... सगळेच निर्णय मनाने घेऊ नका..... काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या......संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात असे माना.... 

कल्पना विलासात झोपू नका..... जीवन एक संघर्ष आहे हे लवकरात लवकर ओळखा.... आणि आलेली प्रतिकूलता खरे तर आपल्या सर्व गुंणांची परीक्षा व आपलाच स्वविकास होण्यासाठीच असते.... असा विचार केल्यास त्या प्रतिकुलतेची धग कमी होते व आपण त्याला चांगल्या रीतीने न खचता सामोरे जाऊ शकतो..... प्रयत्नार्थी परमेश्वर असतोच.... हे जाणा....

                            अपयश जरी आले.... हिम्मत हारू नकोस....
                                                      स्वःताला कमी समजून..... उगाच खचू नकोस....
                          जीवनाच्या संघर्षात असतील..... अनेक अडथळे काटे....
                                                      यशस्वी होण्याचा विश्वास.... ध्येय नक्कीच गाठे.... 

ॐ श्री गुरुदेव दत्त .....