Thursday 13 September 2012

आयुष्याचा सूर्योदय..... 

सूर्योदय म्हणजे प्रकाशाचा अंधारावरचा विजय....... सूर्योदय नेहमीच नवीन आशा, नवीन उत्साह घेऊन येतो....... हा उत्साह, हा उल्हास मानवी मनापुरताच मर्यादित नसतो........ तर तो आपल्या भोवतीच्या सृष्टीतही आपल्याला जाणवतो..... 

उजाडताच टवटवीत होणाऱ्या हिरवाईतून.... किलबिलणाऱ्या पक्षांमधे...... उगवणारा हा आगीचा गोळा जणू आपल्याला सांगत असतो....... " मित्रा " ... गेला दिवस विसरून जा...... कुढत बसू नकोस..... रडू नकोस...... हा घे एक नवीन दिवस....... नव्याने सुरुवात कर आणि लवकर जागा हो.... स्वःताला ओळखण्यासाठी....

खरे तर आपले सद्गुरूच आपल्या आयुष्यात खरा सूर्योदय घडवून आणतात.... बघा, अंधार म्हणजे अज्ञान व प्रकाश म्हणजे शुद्ध ज्ञान..... ज्ञानरूपी ज्योत प्रज्वलित झाली कि अज्ञान रुपी अंधःकार दूर होतो.... व आपला स्वविकास सुरु होतो.... सद्गुरूंच्या कृपा प्रसादाने हि ज्ञान ज्योत प्रगट होते...  

सद्गुरूंच्या कृपेने अज्ञानाचा, अविचाराचा, विकार विकृतीचा मनामनातील अंधार घालवून शुद्ध ज्ञानाचा, शुद्ध विचारांचा उजेड निर्माण होतो..... आपल्या जीवनातील ज्ञान, कला, आरोग्य हा प्रकाश उजळत राहिला.... तरच जीवन आनंदी राहणार....

                          सद्गुरू करी नवा सूर्योदय..... नवी वाट चेतनेचा उदय....
                                                           अंधार अज्ञान दूर सरे.... अंतरी शुद्ध ज्ञान भरे....
ॐ श्री गुरुदेव दत्त .....



तोरा मन दर्पण कहलाये...

काय हवं..?.. या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगळ असलं तरी, त्यातली एक गोष्ट कॉमन असते… प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आपल्याच "मनातली" हवी असते...

 ‘अपने आप को पहचानिए’ असेही हिंदीत म्हटले जाते... व्यक्तिमत्त्व हे त्यावरून घडते... अशा विचारांचे मनन, चिंतन, वाचन माणसाने सातत्याने करावे... हे फारच उपयुक्त ठरते... त्यामुळे स्वत:ची ओळख होते... आपणास सहज स्वत:विषयी काही विचारलं तरी आपण बोलण्यास कचरतो... स्वरूप ओळखा असे संत सांगतात... ज्यांना स्वरूप कळाले त्यांनीच जगावर राज्य केले अन् तेच आजही करताहेत...

संत कबीर यांचा एक दोहा आहे...  
अपने अपने चोर कोसब कोय डारै मार
मेरा चोर मुझको मिलैसरबस डारू वार
संत कबीर दोह्यात आपणास हेच सांगतात... जगातले सर्वच आपापल्या शत्रूंना मारून टाकतात... मात्र पकडले न जाणारे मन मला मिळाले तर मी त्याला मारणार तर नाहीच उलट माझे सर्वस्व त्याला अर्पण करेन, त्याच्याशी मैत्री करेन... स्वत:ची ओळख होण्यासाठी स्वत:चे मन, प्रवृत्ती, कल, सवयी यांचा अभ्यास होणे महत्त्वाचे... एकदा का हा अभ्यास झाला म्हणजे गुण-दोष दिसतात... दोष कमी करत गेलो की मग गुण वाढीस लागतात...

आपण काय करतो, का करतो, त्याचे काय परिणाम होणार हे कळते... त्यावेळी आपले मन आपणास सापडते... ‘तोरा मन दर्पण कहलाये’ असं दर्पणासमान मन आपणास सारे काही दाखवते... मग काय हा अल्लाऊद्दीनचा दिवा असलेलं आपलं मन हवं ते मिळवून देतं व आयुष्यातल्या अडचणी, संकटे, दु:ख यावर उपाय सापडतो व आपल्या आयुष्याला आकार मिळतो...

आपल्याही आसपास सकारात्मक विचार करून आपल्या स्वत:च्या आयुष्याला, दुस-याच्या आयुष्यालाही आकार देण्याचा सातत्याने प्रयत्न करणारी व्यक्तिमत्त्वे आढळतात... फक्त उघड्या डोळ्यांनी त्यांना अनुभवण्याची गरज असते... जसा कुंभार ओल्या मातीला आकार देत असतो, प्रसंगी तो धपाटाही देतो व आतून आधारही...

थोडक्यात सांगायचं तर अडचणीपासून कोणीही सुटलेला नाही... अडचणीविना जीवन एक भ्रम आहे... वाळवंटातल्या मृगजळाप्रमाणे अशा जीवनामागे धावून मानसिक व शारीरिक शक्ती वाया घालविण्याऐवजी अडचणी पेलून त्यावर मात करण्यातच खरे कौशल्य आहे... आयुष्याचा भागाकार करतांना बाकी शून्य येते, यात काही नवीन नाही... पण तुम्ही भाग कोणत्या गोष्टींनी देतात हे फार महत्त्वाचे आहे..!.. 

अशा सुविचारातून गुण घेऊ या अन् म्हणू या ‘सकारात्मक विचारच देतील आयुष्याला आकार’ आणि चला आयुष्य सकारात्मक विचारानं जगू या..!.. ॐ श्री गुरुदेव दत्त... 

No comments:

Post a Comment