Thursday 13 September 2012


जीवनाचा संघर्ष..... शहाणा गाढव..... 

जीवनातील संघर्ष म्हणजे काय व आपण त्याला कसे सामोरे जावे.... हे पुढील बोधकथेतून जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करुया..... तर बघा,  एकदा एका शेतक-याच्या विहिरीत त्याचं गाढव पडलं..... ते जोरजोरात ओरडू लागलं..... शेतक-याने त्याला विहिरीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण त्याला काही ते जमलं नाही..... त्यानी गावातील गावक-याना बोलावून आणलं......

गावक-यांनी मात्र त्याला विचित्र सल्ला दिला की, नाहीतरी तुझं गाढव आता म्हातारं झालं आहे.... आणि तुझी विहीर पण कोरडी आहे..... मग उगाच गाढवाला बाहेर काढण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा सरळ सरळ विहिरच बुजवुन टाकू या..... सर्वजण सांगतात - बोलतात म्हणून शेतक-याला देखील ते पटलं आणि सर्वजण मिळून भराभर विहिरीत माती टाकू लागले.....

आता गाढव घाबरलं आणि ते आणखी जोरजोराने ओरडू लागलं..... पण थोडयाच वेळात त्याचा आवाज शांत झाला.... शेतक-याला वाटलं की मातीखाली दबून गाढव मेलं.... म्हणून त्यानी विहिरीत वाकून बघितलं.....  तर काय आश्चर्य !!.... 

गाढव मातीच्या ढीगा-यावर उभं होतं..... जसजशी माती त्याच्या अंगावर पडायची तसतसा तो ती माती झटकून तिच्यावर उभा राहून वर वर चढत जायचा..... थोडया वेळाने विहीर जशी पूर्ण बुजली तसं ते गाढव पण विहिरीच्या काठाशी आलं आणि उडया मारत मारत पळून गेलं.... 

तात्पर्य हेच कि....  बघा, आज आपल्या समाजात सुद्धा एखादी व्यक्ति जेंव्हा संकटात सापडते.... तेंव्हा तिला मदत करण्याऐवजी लोक तिच्यावर ओढवलेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेउन तिच्यावर चिखलफेक करुन लोक तिला दाबण्याचा प्रयत्न करतात..... 

त्या व्यक्तीने पूर्वी केलेल्या उपकारांचा सुद्धा त्याना विसर पडतो..... पण अश्या लोकांना न घाबरता, त्यानी आपल्यावर फेकलेला चिखल झटकून टाकुन तो तुडवून संयमाने आणि धैर्याने जो पुढे जातो तोच खरा शहाणा नाही का.... संकटकाळी आलेल्या परिस्थितीला जो धैर्याने- बुद्धीने सामोरा जातो तो यशस्वी होतोच..... 

आज समाजात चिखलफेक जास्त व प्रोत्साहन कमी अशी परिस्थिती आहे.... तेव्हा टीकेने खचून न जाता आपले ध्येय गाठण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत रहायचा व आपले ध्येय गाठायचे .....  बघा, प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस ..... समोर अंधार असला, तरी त्याच्या पलीकडे प्रकाश आहे हे लक्षात घ्या...... सगळेच निर्णय मनाने घेऊ नका..... काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या......संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात असे माना.... 

कल्पना विलासात झोपू नका..... जीवन एक संघर्ष आहे हे लवकरात लवकर ओळखा.... आणि आलेली प्रतिकूलता खरे तर आपल्या सर्व गुंणांची परीक्षा व आपलाच स्वविकास होण्यासाठीच असते.... असा विचार केल्यास त्या प्रतिकुलतेची धग कमी होते व आपण त्याला चांगल्या रीतीने न खचता सामोरे जाऊ शकतो..... प्रयत्नार्थी परमेश्वर असतोच.... हे जाणा....

                            अपयश जरी आले.... हिम्मत हारू नकोस....
                                                      स्वःताला कमी समजून..... उगाच खचू नकोस....
                          जीवनाच्या संघर्षात असतील..... अनेक अडथळे काटे....
                                                      यशस्वी होण्याचा विश्वास.... ध्येय नक्कीच गाठे.... 

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

No comments:

Post a Comment