Wednesday 20 March 2013

New Presentation of Thoughts By Chetan K....     

I know I am Wise, Fearless and Strong..... Because I know myself.... and I was put here for a reason.... We all were... We've all been given a gift, the gift of life..... What we do with our lives is our gift back..... ॐ श्री गुरुदेव दत्त....
You Are Great If You Can Find Your Fault.... Greater If You Can Correct Them.... But Greatest... If U Accept And LOVE Others With Their Faults.... Don't Find Fault, Find A Remedy.... ॐ श्री गुरुदेव दत्त....

We are grand source.... Grand source is the origin for everything.... It is Knowledge Zone of everything.... Know that, we are creating situations to Experience and to understand and further expand our consciousness..... ॐ श्री गुरुदेव दत्त....

It's a great feeling to be Indian.... let's spread the cheer all over..... let’s Celebrate Republic Day by Promoting a Human rights Culture in which respect.....dignity and equality become a code for living..... Our life is full of colors and I hope this 26th January will add more colors in your life...... Happy Republic Day.......

The Depth of Your Personality will be Revealed by the Way You Respond to Situations You Dislike…. Know that It is wise to direct your anger towards problems…. not people..!!... and also try To focus your energies on answers…. not excuses..!!...  ॐ श्री गुरुदेव दत्त....


A little knowledge is a dangerous thing… but a little want of knowledge is also a dangerous thing.... know that not only the quest for knowledge but the good application of that knowledge is very essential… If you have knowledge, let others light their candles at it…. ॐ श्री गुरुदेव दत्त....


Darkness cannot drive out darkness, only light can do that. ….  That’s why true spiritual master (गुरुतत्त्व) Lead your life in a way that.. always choose the harder right… rather than the easier wrong.. for lesson of true life light… Know that this kind of leadership is not about titles, positions or flowcharts…. It is about one life influencing another to become the leader of true life… and know truly that your success and happiness lie in you only.… ॐ श्री गुरुदेव दत्त.... 


   

अयोग्य जगण्यात गुंतलेली माणसं कधीचीच मेलेली असतात.... ज्यावेळी त्यांना योग्य मार्गाची जाणीव होते त्यावेळी त्यांचा पुनर्जन्म होतो..... जर तुम्हाला जगाला समजून घ्यायचे असेल तर दोन्ही डोळे उघडे ठेवा.... आणि जर तुम्हाला स्वतःचे खरे स्वरूप समजून घ्यायचे असेल तर दोन्ही डोळे बंद करा.... ॐ श्री गुरुदेव दत्त....

समजूनही चूक दुरुस्त केली नाही, तर ती चूक न राहता अपराध होतो.... ज्याने यश दूर जाऊन अपयश जवळ येते.... यश हे आपल्या आजूबाजूला कुठेतरी आपली वाट पाहात असते.. ते मिळविण्यासाठी त्याच्या दिशेने झालेल्या चुकांमधून योग्य धडा घेऊन आत्मविश्वासाने योग्य पाऊल टाकण्याची फक्त गरज असते.... ॐ श्री गुरुदेव दत्त....

You can not suddenly change your future... but you can change your habits... and surely your habits will change your future... ॐ श्री गुरुदेव दत्त....

When it is about breathing,.. all of us understand what to hold on to and when to let go... Let us do the same with life experiences... Anything that makes you feels glad, hold on to that... Anything that makes you feel sad, let go of that... The facts will remain the same but Life will change..!!.. ॐ श्री गुरुदेव दत्त...

GOD will never give up on you…. SO NEVER GIVE UP..!..  Anyone who is going through 'hard times'…. Just because everyone else, even the strongest, gives up…. You don't have to.... if you keep going, soon your storm will be over and the sun will shine upon your face again….   Keep deep faith on who helps you in hard times….  Listen to them…. Even During Tough Times God Still Speaks…. but Are You Listening him..?.. God Uses Tough Times to Shape Our Lives with creation of new thoughts.... Know that,  Most of the important things in the world have been accomplished by people who have kept on trying when there seemed to be no hope at all.... ॐ श्री गुरुदेव दत्त....


चिंव चिंव चिमणी.... 

मित्रांनो, चिमण्यांची संख्या कमी झाली आहे…. हे नक्की.... वाढते प्रदुषण आणि इतर काही घटकांमुळे चिमणीची प्रतिरोध क्षमता कमी होउन ती नामशेष होत आहे.... चिमण्यांची संख्या फारच कमी झाली असून काही ठिकाणहून संपूर्ण गायब झाल्या आहेत.... चिमण्या मानवाला निरुपद्रवी असून पर्यावरणाला उपयुक्त आहेत.... हीच चिऊताईची अगतिकता लक्षात घेऊन पर्यावरण प्रेमींनी जागतिक चिमणी दिवस साजरा करायच ठरवलय.... बघा, आज विकासाच्या नावाखाली झालेली वृक्षतोड, फ़ळ-धान्यात वापरण्यात येणाऱ्या किटकनाशकांचे अतिरिक्त प्रमाण, कॉंक्रीटीकरण, कारखाने, मोबाईल वेव्हज यांचा हा परीणाम आणि कमी झालेल चिमण्यांच प्रमाण ही त्याची सुरुवात.... म्हणजेच मानवासाठी धोक्याची घंटा.... 

मित्रांनो, आता हे थांबवायचे कसे... आज जर प्रत्येकाने एका झाडाला वाचवायचं ठरवलं तर ते होऊ शकत.... जितकी झाडं जास्त तितके पक्षी प्राणी जास्त जगतील व पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही.... पक्षांना पिंजऱ्यात कोंडून ठेवु नका त्यांना मुक्तपणे जगु दया.... तसेच पक्ष्यांसाठी थोडे गव्हाचे किवा इतर डाळींचे दाणे आपल्या अंगणात / गॅलरीत रोज थोडे थोडे फेकावेत... तसेच आपल्या पाण्याच्या बाटलीतून रोज एका झाडाला पाणी घालायचं जरी ठरवलं तरी पाण्याअभावी मरणारी झाड वाचतील.... झाडांमुळे पक्षी वाचतील.... तुम्हा सर्वांना विनंती आहे... त्या झाडांची वेदना समजून घ्या.... डांबर आणि सिमेंट ह्यात त्यांची मुळ गुदमरत आहेत... त्यानाही मोकळा श्वास घेऊ द्या.... निसर्गाचा समतोल राखणे आज आत्यंतिक गरजेचे आहे.... 

बघा, आज चिमण्यांच कमी झालेल प्रमाण हे खरच महत्वाच आहे का..?.. हो तर नक्कीच आहे.... या मागचा मह्त्वाचा आणि स्वार्थी मुद्दा असा की आपल्या अवति-भवति असणारे जीव हे केवळ प्राणि-पक्षी नसुन ते नैसर्गिकतेचे मापक आहेत..... एखादा पक्षी-प्राणि एखादा भाग सोडुन जातो किंवा त्याचे प्रमाण कमी होते.... तेव्हा ही गोष्ट निसर्गात झालेला नको तो बदल दर्शवीत असते.... त्या भागातील मूळ नैसर्गिकपणा कमी झालाय, आता हे ठिकाण रहाण्यास योग्य नाही, त्याचवेळी अशा गोष्टी घडतात..... 

बघा, चिमण्या या इतर पक्षांपेक्षा जास्त संवेदनशील आहेत.... याच उत्तम उदाहरण म्हणजे उन्हाळ्यात उष्माघाताच्या प्रकारांमध्ये चिमण्यांच्या बातम्या प्रामुख्याने आढळतात.... नुकतच इंटरनेटवर कुठेतरी वाचल होत की मोबाईल टॉवरच्या रेडीएशन्समुळे चिमण्यांच्या अंड्यांवर परिणाम होऊन त्यांच प्रजोत्पादन कमी झाल आहे.... माणसाच्या स्वार्थीपणातुन विचार केला तर ही धोक्याची घंटा आहे.... कारण माणसाच्या आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होताच आहे पण आपण अजून त्यापासून अनभिन्न आहोत.... निसर्गातील बदलांबद्दल, माणसाच्या अतिरेकाबद्दल.... त्यामुळे जरी माणसाने भूतदया वगैरेच्या नावाखाली गप्पा मारून, परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले तरी त्यात त्याचा सुद्धा फ़ायदा आहे..... 

म्हणूनच चिमणी सांगते.... माणसा माणसा डोळे उघड..... आता माणसाने डोळे उघडायचे की अजून घट्ट बंद करायचे ते त्यानेच ठरवायच.... 

ॐ श्री गुरुदेव दत्त....

Tuesday 19 March 2013

रंगपंचमीला ड्राय होळी खेळा.....

मित्रांनो, होळी साजरी करताना हे विसरू नका.... महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ.... पाण्याच्या एका थेंबापासून लाखो लोक वंचित.... शेतकरी ठरतोय दुष्काळाचा बळी.... 

मित्रांनो... रंगाचा सोपस्कार जरूर असू द्या.... पण पाण्याची नासाडी नकोच.... बघा, या गोष्टीला मुळात धार्मिक रंग द्यायची गरजच नाही..... हा आपला सण आहे ना.... पण मग ओता पाणी असा अविर्भाव नको.... आज दुष्काळाने पाण्यावाचून मरताहेत ती माणसे पण आपलीच आहेत.... आज काही मंडळी इथे फक्त पैसे कमवायला आहेत.... त्यांची मुले नंतर परदेशात जाऊन रहाणार.... इथे राहायचं ते आपल्याला.... मग या मातीचा विचार आपणच करायचाय.... आपल्याला जे शक्य आहे ते करा.... दुसऱ्याकडून अपेक्षा करून काही होणार नाही.... 

बघा, पाण्यावाचून लोक मरतात म्हणून काय आपण आंघोळ करणे थांबवायचे का..?.. लोक उपाशी मरतात म्हणून काय आपण उपाशी राहायचे का..?.. म्हणजेच असा प्रयत्न पाहिजे जेणेकरून "पाण्याची / अन्नाची नासाडी नको व्हायला" इतकीच अपेक्षा..!.. म्हणूनच 'सोपस्कार' शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे.... म्हणजेच धुळवडीला पाण्याची नासाडी आणि उधळपट्टी करणारे रेन डान्स सारखे कोणतेही प्रकार नको.... आपल्या सणाला महत्व असावेच.... पण त्याचे अवडंबर कदापी नको.... 

बघा, दुष्काळासारखी कोणती ना कोणती विपरीत परिस्थिती सतत येत राहणारच.... आपण केवळ दार बंद करून घेऊन काय साधणार आहोत..?.. यासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज आहे.... युवकांनी बुद्धीमत्तेच्या बळावर संघटितपणे संघर्ष करून राष्ट्र घडवले पाहिजे.... युवकांमध्ये सुधृढ राष्ट्र घडवण्याची क्षमता असतेच.... युवकांनो जागे व्हा... संघटीत व्हा... वैचारिक परिवर्तनासाठी जनजागृती करणे तुमच्याच हाती आहे.... 

ॐ श्री गुरुदेव दत्त....

Sunday 17 March 2013



बघा, आज साधकाच्या जीवनात गुरु सिद्धांत महत्वपूर्ण आहे….. गुरु तत्व हे सर्व साधकात असते... साधकाने साधनेने ते जागृत करायचे असते... आपल्या आयुषयात काहीच इच्छा आकांश नसतात, तेव्हाच गुरु तत्व आयुष्यात येते... हे तत्व जेव्हा जागृत होते.... त्यावेळी अज्ञान लोप पावून ज्ञान प्राप्त होते.... सदगुरु सत्याचे ज्ञान, अंतिम वास्तविकता आणि स्वरूपाचे ज्ञान देतो.... यासाठी साधकाने साधनेचा.... अभ्यास, मनन, चिंतन या तीन सूत्रानी अभ्यास केला पाहिजे.... आता साधना अभ्यासासाठी सर्वात महत्त्वाचा असा सद्गुरु मार्गदर्शक लागतो.... आपण गुरूकडून ऐकलेले-वाचलेले मनन करणे गरजेचे आहे आणि सर्वात शेवटी या सर्वांवर चिंतन महत्त्वाचे आहे.... साधकाने नित्य गुरुभावात राहून मौन-चिंतन-मनन करावे.... यानेच आपल्या इच्छा-आकांक्षा कमी होऊन गुरुतत्त्व जागृत होते.... ॐ श्री गुरुदेव दत्त....




श्रीज्ञानेश्वरी महात्म 

प्रसन्न निर्मल | समई देव्हारी | तैसी ज्ञानेश्वरी | तेवतसे || १ ||

स्निग्ध प्रकाशात | उजळल्या ज्योती | अनुपम दिप्ती | शांतरुप || २ ||

दावी अंतरंग | गीता माऊलीचे | शब्द अमृताचे | करुनिया || ३ ||

भाव श्रीहरिचे | तैसेच पार्थाचे | प्रगटले साचे | मूर्तिमंत || ४ ||

शब्द रुप घेती | देव-भक्त गुज | ह्रदयींचे निज | वर्णियेले || ५ ||

ब्रह्म शब्दातीत | झळके यथार्थ | अफाट सामर्थ्य | ओवी ओवी || ६ ||

उपमा दृष्टांत | शोभे मनोहर | पुष्प परिवार | परिमळे || ७ ||

शांतरस थोर | वर्षतो अपार | निववी अंतर | भाविकांचे || ८ ||

भाषा मराठीसी | चैतन्याचे देणे | सात्विकाचे लेणे | लेवविले || ९ ||

चित्त अनायासे | लाभे विश्रामता | ऐकिता वाचिता | एक ओवी || १० ||

वसू दे वाणीत | नित्य ज्ञानदेवी | हेचि कृपा व्हावी | माऊलीची || ११ ||

ज्ञानेश्वरी गाथा | मनन चिंतन | स्वये नारायण | दृश्य होई || १२ ||

Thursday 14 March 2013



दुष्काळदेशी हवा शाश्वत उपाय.... 

मित्रांनो.... दरवर्षी उन्हाळे पावसाळे येतात तरी ही पाणी टंचाई आणि दुष्काळ ह्यावर उपाय निघत नाही…. टोलवा टोलवी करण्यात मात्र राजकारणी अत्यंत हुशार.... पण सत्य परिस्थितीवर मात्र उपाय सुचतच नाही…. आज मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा म्हणणारे, मोठमोठया इमारती बांधू शकतात, स्वतःसाठी करोडोंच्या किंमति असलेल्या १०-१० गाडया घेवु शकतात, स्वतःसाठी आलिशान बंगले बांधू शकतात, सभेसाठी भाडयाची गर्दी जमवु शकतात.... पण दुष्काळग्रस्त गावांसाठी ५०० रुपयांची मदत करू शकत नाहीत.... 

बघा, अवघा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना आपल्या नेत्याना, लाखो रुपये खर्च करुन सभा घेणे.... एकमेकांवर चिखलफेक करणे आणि गोरगरिबांच्या जखमेवर मिठ चोळणे बरे जमते... पण तोच पैसा दुष्काळग्रस्त गावांवर खर्च करणे का जमत नाही.... बघा, नाही म्हटले तरी महाराष्ट्रातील बहुतेक नेतेमंडळी हे गडगंज श्रीमंत आहेत.... अगदी त्यांच्या ५० पिढया घरात बसून आरामात खातील तरी पैसा संपणार नाही.... एवढी संपत्ति असताना मनाचा मोठेपणा मात्र अजिबात नाही, फक्त भडकपणा, दिखावू वृत्ति तेवढी ठासून भरलेली आहे.... 

बघा, तीच तऱ्हा मोठमोठया बाता करणारे आणि अरबोंची संपत्ति असणाऱ्या किती तरी इतर नेते, उद्योगपति, सिनेमातील नट-नटी, मोठ्या खेळाडूंची.... आपल्या देशाची ही शोकांतिकाच म्हणायची.... परिस्थती बिकट पण एकाच्याही मनाला मदतीचा पाझर फुटू नये.... नुसते पेपर किंवा इंटरनेटवर स्टेटस अपडेट करून हळ हळ व्यक्त करायची.... आणि हेच अरबोपति मंदिर-देवांना सोन्याचे हार आणि हिऱ्याचे मुकुट मात्र नेहमीच दान करताना दिसतात.... खरच.. आश्चर्यच आहे ना..!!.. 

बघा, आज महाराष्ट्रात दुष्काळ आपले रौद्ररूप दाखवायला लागलाय, तोच दुष्काळ ज्यात सामान्यतः पहिला बळी जातो तो माणुसकीचा..... म्हणूनच मित्रांनो, सामाजिक बांधिलकी जपत व मदतीचा खारीचा वाट उचलत आपण आपल्या परीने भीषण दुष्काळग्रस्त गावातील लोकांना मदत करा.... दुष्काळावर कशी मात करता येईल किंवा त्याला कसे सामोरे जावे.... यासाठी पाणी नियोजना-सारख्या काही उपाययोजना जर आपल्या डोक्यात असतील.... तर त्या उपाययोजना व्यवस्थितरित्या मांडून त्याची एक छानसी पोस्ट आणि अहवाल बनवा.... 

बघा, आज दुष्काळावर उपाय शोधताना अजूनही शाश्वत गोष्टींऐवजी.... पॅकेज, मदत, अनुदान, माफी यांचीच जास्त चर्चा होते.... मदत करणारे, जनतेचे आश्रयदाते असल्याचा आव आणतात.... त्याच वेळी दुष्काळग्रस्तांना दयेवर जगण्यास व अधू बनण्यास भाग पाडतात.... असला हा दुष्काळ माणसाच्या चुका-बेशिस्त-दुर्लक्षामुळे निर्माण होतो.... 

बघा, आज काय होतंय.... जे आपल्या हातात आहे, ते सुधारायचं नाही आणि जे नियंत्रणापलीकडं आहे त्यावर मात्र भरभरून बोलायचं..!. खरंच त्यामुळेच दुष्काळावरचे प्रश्न जसे आहेत तसेच राहिलेत.... खरेतर दुष्काळाची उत्तरंसुद्धा दुष्काळी भागातच सापडतात.... ती अनेकांना माहीतही आहेत.... आणि डोळ्यावर चढवलेली पट्टी काढण्याचा अवकाश, ती ठळकपणे दिसतील आणि मग दुष्काळाच्या मुळापर्यंत पोहोचता येईल.... एकदा का प्रश्नाच्या मुळाशी गेल्यावर त्यावरचा मार्ग सापडला नाही तरच नवल..!. आज तरुणांनीच पुढे येऊन ही उत्तरं राबवण्यासाठी, यातून योग्य मार्ग काढण्याची गरज आहे.... 

बघा, राजकारण्यांनी देखील हे समजायला पाहिजे आजची गरज विकासाची आहे.... निव्वळ देखावे दाखवून काय उपयोग.... तसेच तरुणांनी त्यांची जबाबदारी ओळखून आपल्या भागाचा अभ्यास करून देशापुढील आव्हानांना सामोरे गेले पाहिजे.... देशाला पुढे नेतृत्व देणारी पहिली पायरी ही तरुणांचीच असेल.... मात्र कल्पक आणि मेहनती तरुणांची, आज देशाला गरज असून ग्रामीण भागातील जनतेचे दुःख तरुणांनी ओळखून ते कमी होण्यासाठी काम करावे.... बघा, समाजाला कोणत्या दिशेला वळवायचं हे तरुणाच्या आत्मविश्वास, इच्छाशक्तीवर आणि ध्येयाच्या अंमलबजावणीवर अवलंबून असेल.... आज तरुण पिढीने मनावर घेतलं तर दुष्काळ कायमचा घालविणं शक्य आहे.... पण दुर्लक्ष केलं तर सर्व व्यवस्था कायमच्या ढासळायला फार वेळही लागणार नाही..!!.. तरुणांनो वेळीच जागे व्हा.... देशाच्या व स्वहिताच्या भवितव्याच्या दृष्टीने ते महत्वाचे ठरणार आहे....


ॐ श्री गुरुदेव दत्त.....

Sunday 10 March 2013


 ऋषितुल्य व्यक्तिमत्व.... भाई (प्रभाकर नाईक-साटम) दि. १९-१२-२०१२ 


आज बापूकाका (प्रवीण देशमुख) म्हणाले.... चला भाईना भेटायला जाऊ.... ते भारतातील एकमेव टॅपेस्ट्री चित्रकार आहेत.... आज जगात ते नावाजलेले सर्वोत्कृष्ट टॅपेस्ट्री चित्रकार आहेत.... मलाही त्यांच्या भेटीची उत्सुकता होतीच.... आम्ही भेटल्यावर त्यांनी आमचे स्वागत केले.... भाईनां भेटल्यावर-जाणल्यावर मनात भावना दाटून आल्या.... बघा, आयुष्यातले काही क्षण, अनुभव असे असतात कि मनात हळुवार जपून ठेवाव्या.... जसे अत्तराच्या कुपीत अत्तर असत... ती कुपी उघडताच ते अत्तर सर्वदूर पसरत.... तसच काही व्यक्तींचा सुगंध आपल्याला तर येतोच... पण इतरांना सुद्धा त्याची अनुभूती होते... अशा व्यक्ती आपल्या आयुष्याला वेगळी कलाटणी देतात... त्याचं निरंतर मनात वास्तव्य असत.... त्यातीलच एक व्यक्ती म्हणजे भाई..... 

मला जाणवलेले भाई म्हणजे.... एक मनस्वी व्यक्तिमत्व.... संवेदनशील कलामहर्षी कलाकार.... एक मुक्त... स्वैर... स्वछंदी जीवन.... आणि पारिजातकासारखी लयलुट करायची ती सुगंधाचीच.... एक प्रभावित करणारे व्यक्तिमत्व.... अत्यंत गुणी, प्रेमळ व उत्तुंग व्यक्तिमत्त्व.... 

भाईनी प्रतिकुल आयुष्य जगताना लहानसहान गोष्टींतून चांगले संस्कार ग्रहण केले..... पण विचारांनीही स्वःताला सुसंस्कारीतही केले..... भाईंचे आयुष्य म्हणजे त्रिस्थळी यात्राच जणू.... कारण जन्म कोकणातल्या बांदिवड्यात.... जन्म-बालपण कोकणात आणि शिक्षण मुंबईत झाले असले तरी त्यांची कर्मभूमी राहिली ती जपान.... तिथे धाग्यांद्वारे कापडी चित्रकृती साकारण्यात रममाण झाले.... या जीवन प्रवासाचे संचित म्हणजे आज जगाला त्यांनी दिलेली उत्कृष्ट चित्र कलाकृती.... 

संपूर्ण मानवजातीच्या उत्क्रांतीतून विकसित झालेली निसर्गाची एक अद्भुत किमया म्हणजे माणसाचे मन.... माझ्यामते भाईंनी याच मनाचा खोलवर जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न आपल्या चित्रकृतीतून केला आहे.... भाईंनी मनाच्या संकल्पना बदलल्या.... निरनिराळे पैलू उलगडले... अशा मनाचा इतिहास.... त्यावर झालेले संशोधन, निष्कर्ष आणि त्याचे वेगवेगळे रूप आपल्याला आज त्यांच्या कलाकृतीत बघता वाचता येईल.... 

आज मलातरी असे जाणवले.... निसर्गातल्या गुढांशी एकतानेनं चटकन रमणाऱ्या या कलावंताला आजूबाजूच्या मानवतेच्या सुख-दुःखांच्या, आशा-आकांक्षांच्या आणि हालअपेष्टांच्या वेदना आणि संवेदना जाणवल्या आहेत.... दरी, डोंगर, वृक्ष, नदी-नाले, निसर्ग, प्राणी, मंदिराचे तपशील यात रमणारा हा भावनाप्रधान कलाकार..... तसा कोणताही कलाकर विलक्षण मनस्वी असतो.... कलाकार जे पाहतो... ते सामान्य माणसाला जाणवणार नाही.... म्हणून सामान्य माणसाची दुनिया आणि कलाकाराच्या नजरेतील जग यात खूप फरक असतो.... निसर्गावर प्रेम करणाऱ्या भाईनी चित्रांतून त्यांच्या नजरेला दिसलेला निसर्गही रेखाटला आहे.... 

आज भाईंच्या आयुष्याचा जीवनपट उलगड्ल्यास जाणवते..... त्यांनी अत्यंत मेहनतीनं, सर्वस्व झोकून सर्वोत्तम टॅपेस्ट्री चित्रकार बनण्याच्या ध्यासातून सगळे बारकावे शिकून घेतले.... आणि नंतर देवदुर्लभ यश आणि लौकिक लाभूनही त्याच नशेत वाहवत न जाता आजही त्यांचे पाय जमिनीवर आहेत.... आज आपण सर्वजण आपुलकीने व प्रेमाने त्यांना भाई असे संबोधतो.... वाचनात गुंगणारा, निसर्गात रमणारा आणि आपल्या माणसात हरवणारा एक संवेदनशील माणूस.... 

भाईंच्या आयुष्यातील दुसरी बाजू म्हणजे जपानी पत्नी काझुको.... भाई आणि काझुको म्हणजे जन्म जन्माचा ऋणानुबंध जणूच.... स्वार्थाच्या पलीकडचे नाते.... काझूको खरेतर भाईंच्या सर्व कामातील यशातील अदृश्य शक्ती आहेत.... बुद्धिमान, निग्रही, जिद्दी आणि अत्यंत कष्टाळू कलावती असाच त्यांचा प्रवास आहे.... मलाही काझूकोच्या जीवनाचा साधेपणा खुपच भावला.... 

बघा, कॉपोरेट क्षेत्रातील कामामुळे तसेच पर्यटनामुळे थोडेफार जागतिकीकरण मी अनुभवले आहे.... या बाबतीत मी स्वतःला भाग्यवान समजतो..... गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये जगातल्या अनेक देशांतील लोकांशी मी संवाद केला आहे.... खरेच त्यातून आयुष्यात न कळलेल्या अनेक नव्या गोष्टी शिकता आल्या.... कदाचित सुरुवातीपासूनच माझ्या मनात मानवी मनासंबंधी कुतुहल असल्यामुळे असेल.... मला वेगवेगळ्या देशातल्या लोकांच्या मानसिकतेचं निरीक्षण करण्याचा छंद लागला.... त्यातून माझा संवाद कोरियन, स्विस, रशियन, जपान, अमेरिका आणि जर्मनी अशा वेगवेगळ्या देशांच्या लोकांशी झाला.... आज काझुकोना भेटल्यावर वेगवेगळ्या देशांच्या लोकांच्या मानसिकतेची मी एकमेकांशी तुलना करू लागलो.... 

शेवटी मानवी मन हे जगभर सगळीकडे सारखंच असणार.... असं आपण मानतो.... त्यात तथ्य हे आहेच पण तरीसुद्धा प्रत्येक देशाची म्हणून एक मानसिकता असते... त्या देशाचा इतिहास, तिथं झालेली आक्रमणं, तिथला निसर्ग, तिथली संस्कृती या सगळ्याचं प्रतिबिंब तिथे जन्मलेल्या आणि राहणा-या माणसांच्या वागण्यात दिसतं.... ज्या देशोदेशीच्या निवडक लोकांशी माझा संपर्क आला.... त्यातून तरी हेच जाणवले.... 

आजपर्यंत मलातरी त्यात सगळ्यात जपानी माणूस हा अत्यंत शांत आणि सुसंस्कृत असा दिसला.... तो अत्यंत मृदुभाषी असतो.... तो फारसं बोलत नाही.... याचं एक कारण इंग्रजी येत नाही, हेहि असतंच.... पण एरवीसुद्धा जपानी लोकांत तो जेवढा मोकळा असेल तेवढा तो बाहेर कधीच नसतो.... त्याच्या बोलण्यात तो ज्ञानाचं प्रदर्शन कधी करत नाही.... एखादा प्रश्न त्याला विचारला तर तो त्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर माहिती असेल तरच ते देतो.... बहुतेक जपानी लोकांना ते करत असलेल्या कामाचं सखोल ज्ञान असतं..... पण समोरच्याला तसं न भासवणं हे त्यांच्या संस्कृतीत चांगलं लक्षण मानलं जातं.... जपानी माणसं, त्यांची पारंपरिक, कणखर मानसिकता, दीर्घद्योगी वृत्ती, आधुनिक जपानच्या घडणीतली त्यांची समर्पितता, तिथली प्राचीन संस्कृती, अनवट प्रथा-परंपरा 

शिस्त आणि नीटनेटकेपणा याबाबतीत जपानी लोक खूपच काटेकोर असतात.... असे अनुभवले एखादी मिटिंग झाली की, जपानी माणूस असेल तर लगेच एक व्यवस्थित कागद घेऊन अतिशय सुंदर अक्षरात ते लिहून काढतो.... त्यामध्ये मिटिंगचे शक्य तेवढे तपशील भरतो.... आवश्यकता असेल तर आकृत्या, नकाशे आणि तक्ते यांचासुद्धा वापर करतो.... तो कागद नंतर वाचावा असा असतोच पण जपूनही ठेवावा इतका सुंदर असतो.... 

हेच जपानी व्यक्तिमत्व विशेष.... आज काझुको यांना भेटल्यावर जाणवले.... त्यांचा चेहरा अगदी शांत होता..... भाषा येत नव्हती, भाषेची अडचण होती.... उडालेला मानसिक गोंधळ.... त्यात त्यांचे हळुवार बोलणं.... ते न बोलता नजरेतून सारं सारं सांगणं.... अतिशय शिस्त-प्रिय अस व्यक्तिमत्व.... शांत, संयमी, सुशिल, निरागस, निर्मळ शांत आयुष्य आज मी पाहिले... अनुभवले.... आम्ही बोलत असताना त्या बसून शांतपणे ऐकत होत्या.... आमच्या बोलण्यातून असं काय त्यांना जाणवत होतं ते त्याचं तेच जाणोत.... 

आज भाईना भेटल्यावर.... एक विचारांनी, कलेने पूर्णत्वास गेलेल्या व्यक्तिमत्व दर्शनाने अनामिक असे मानसिक समाधान लाभले.... त्यांचा संवाद सहवास खरेच सुखावून गेला.... आज जे काही थोडेफार त्यांची माहिती त्यांनी दिली त्यातून जाणलेले-जाणवलेले भाई मला असे दिसले.... पुढेही त्यांच्याशी संवादाची संधी मला मिळेल अशी आशा आहे.... त्यांचे अनुभव – जीवनपट यातून खूप काही शिकायलाही मिळेल.... अशा ऋषीतुल्य व्यक्तीमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल मी बापुकाकांचा खरेच खूप आभारी आहे.... 

ॐ श्री गुरुदेव दत्त .....