चिंव चिंव चिमणी....
मित्रांनो, चिमण्यांची संख्या कमी झाली आहे…. हे नक्की.... वाढते प्रदुषण आणि इतर काही घटकांमुळे चिमणीची प्रतिरोध क्षमता कमी होउन ती नामशेष होत आहे.... चिमण्यांची संख्या फारच कमी झाली असून काही ठिकाणहून संपूर्ण गायब झाल्या आहेत.... चिमण्या मानवाला निरुपद्रवी असून पर्यावरणाला उपयुक्त आहेत.... हीच चिऊताईची अगतिकता लक्षात घेऊन पर्यावरण प्रेमींनी जागतिक चिमणी दिवस साजरा करायच ठरवलय.... बघा, आज विकासाच्या नावाखाली झालेली वृक्षतोड, फ़ळ-धान्यात वापरण्यात येणाऱ्या किटकनाशकांचे अतिरिक्त प्रमाण, कॉंक्रीटीकरण, कारखाने, मोबाईल वेव्हज यांचा हा परीणाम आणि कमी झालेल चिमण्यांच प्रमाण ही त्याची सुरुवात.... म्हणजेच मानवासाठी धोक्याची घंटा....
मित्रांनो, आता हे थांबवायचे कसे... आज जर प्रत्येकाने एका झाडाला वाचवायचं ठरवलं तर ते होऊ शकत.... जितकी झाडं जास्त तितके पक्षी प्राणी जास्त जगतील व पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही.... पक्षांना पिंजऱ्यात कोंडून ठेवु नका त्यांना मुक्तपणे जगु दया.... तसेच पक्ष्यांसाठी थोडे गव्हाचे किवा इतर डाळींचे दाणे आपल्या अंगणात / गॅलरीत रोज थोडे थोडे फेकावेत... तसेच आपल्या पाण्याच्या बाटलीतून रोज एका झाडाला पाणी घालायचं जरी ठरवलं तरी पाण्याअभावी मरणारी झाड वाचतील.... झाडांमुळे पक्षी वाचतील.... तुम्हा सर्वांना विनंती आहे... त्या झाडांची वेदना समजून घ्या.... डांबर आणि सिमेंट ह्यात त्यांची मुळ गुदमरत आहेत... त्यानाही मोकळा श्वास घेऊ द्या.... निसर्गाचा समतोल राखणे आज आत्यंतिक गरजेचे आहे....
बघा, आज चिमण्यांच कमी झालेल प्रमाण हे खरच महत्वाच आहे का..?.. हो तर नक्कीच आहे.... या मागचा मह्त्वाचा आणि स्वार्थी मुद्दा असा की आपल्या अवति-भवति असणारे जीव हे केवळ प्राणि-पक्षी नसुन ते नैसर्गिकतेचे मापक आहेत..... एखादा पक्षी-प्राणि एखादा भाग सोडुन जातो किंवा त्याचे प्रमाण कमी होते.... तेव्हा ही गोष्ट निसर्गात झालेला नको तो बदल दर्शवीत असते.... त्या भागातील मूळ नैसर्गिकपणा कमी झालाय, आता हे ठिकाण रहाण्यास योग्य नाही, त्याचवेळी अशा गोष्टी घडतात.....
बघा, चिमण्या या इतर पक्षांपेक्षा जास्त संवेदनशील आहेत.... याच उत्तम उदाहरण म्हणजे उन्हाळ्यात उष्माघाताच्या प्रकारांमध्ये चिमण्यांच्या बातम्या प्रामुख्याने आढळतात.... नुकतच इंटरनेटवर कुठेतरी वाचल होत की मोबाईल टॉवरच्या रेडीएशन्समुळे चिमण्यांच्या अंड्यांवर परिणाम होऊन त्यांच प्रजोत्पादन कमी झाल आहे.... माणसाच्या स्वार्थीपणातुन विचार केला तर ही धोक्याची घंटा आहे.... कारण माणसाच्या आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होताच आहे पण आपण अजून त्यापासून अनभिन्न आहोत.... निसर्गातील बदलांबद्दल, माणसाच्या अतिरेकाबद्दल.... त्यामुळे जरी माणसाने भूतदया वगैरेच्या नावाखाली गप्पा मारून, परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले तरी त्यात त्याचा सुद्धा फ़ायदा आहे.....
म्हणूनच चिमणी सांगते.... माणसा माणसा डोळे उघड..... आता माणसाने डोळे उघडायचे की अजून घट्ट बंद करायचे ते त्यानेच ठरवायच....
ॐ श्री गुरुदेव दत्त....
मित्रांनो, जर सर्वानी हातभार लावला तर निसर्ग - पर्यावरणाचा तोल नक्कीच सांभाळला जाईल.... होणाऱ्या विकासाबरोबरच निसर्गाचाही आस्वाद घ्या..... सुरवात मी करू का तू.... न करता आपल्यापासूनच करा.... बघा, सांगायला आनंद वाटतो.... आमच्या घरी बाहेरच्या गॅलरीत चिमण्यांनी अड्डाच बनवला आहे.... रोज सकाळी ६ वाजल्या पासून चिमण्या येतात आणि आम्ही रोज त्यांना चपाती / बाजरी / विविध पदार्थ देतो.... त्याही सर्व आनंदाने खातात.... चिमण्यां बरोबरच इतर पक्षीही याचा लाभ घेतात.... हे सर्व पक्षी गुण्यागोविंदाने संध्याकाळी ६-७ वाजेपर्यंत इथे बागडतात.... रात्री आप-आपल्या घरी जाऊन पुन्हा सकाळी हजेरी लावतात.... ॐ श्री गुरुदेव दत्त....
ReplyDelete