Sunday, 17 March 2013



बघा, आज साधकाच्या जीवनात गुरु सिद्धांत महत्वपूर्ण आहे….. गुरु तत्व हे सर्व साधकात असते... साधकाने साधनेने ते जागृत करायचे असते... आपल्या आयुषयात काहीच इच्छा आकांश नसतात, तेव्हाच गुरु तत्व आयुष्यात येते... हे तत्व जेव्हा जागृत होते.... त्यावेळी अज्ञान लोप पावून ज्ञान प्राप्त होते.... सदगुरु सत्याचे ज्ञान, अंतिम वास्तविकता आणि स्वरूपाचे ज्ञान देतो.... यासाठी साधकाने साधनेचा.... अभ्यास, मनन, चिंतन या तीन सूत्रानी अभ्यास केला पाहिजे.... आता साधना अभ्यासासाठी सर्वात महत्त्वाचा असा सद्गुरु मार्गदर्शक लागतो.... आपण गुरूकडून ऐकलेले-वाचलेले मनन करणे गरजेचे आहे आणि सर्वात शेवटी या सर्वांवर चिंतन महत्त्वाचे आहे.... साधकाने नित्य गुरुभावात राहून मौन-चिंतन-मनन करावे.... यानेच आपल्या इच्छा-आकांक्षा कमी होऊन गुरुतत्त्व जागृत होते.... ॐ श्री गुरुदेव दत्त....




श्रीज्ञानेश्वरी महात्म 

प्रसन्न निर्मल | समई देव्हारी | तैसी ज्ञानेश्वरी | तेवतसे || १ ||

स्निग्ध प्रकाशात | उजळल्या ज्योती | अनुपम दिप्ती | शांतरुप || २ ||

दावी अंतरंग | गीता माऊलीचे | शब्द अमृताचे | करुनिया || ३ ||

भाव श्रीहरिचे | तैसेच पार्थाचे | प्रगटले साचे | मूर्तिमंत || ४ ||

शब्द रुप घेती | देव-भक्त गुज | ह्रदयींचे निज | वर्णियेले || ५ ||

ब्रह्म शब्दातीत | झळके यथार्थ | अफाट सामर्थ्य | ओवी ओवी || ६ ||

उपमा दृष्टांत | शोभे मनोहर | पुष्प परिवार | परिमळे || ७ ||

शांतरस थोर | वर्षतो अपार | निववी अंतर | भाविकांचे || ८ ||

भाषा मराठीसी | चैतन्याचे देणे | सात्विकाचे लेणे | लेवविले || ९ ||

चित्त अनायासे | लाभे विश्रामता | ऐकिता वाचिता | एक ओवी || १० ||

वसू दे वाणीत | नित्य ज्ञानदेवी | हेचि कृपा व्हावी | माऊलीची || ११ ||

ज्ञानेश्वरी गाथा | मनन चिंतन | स्वये नारायण | दृश्य होई || १२ ||

No comments:

Post a Comment