Thursday 14 March 2013



दुष्काळदेशी हवा शाश्वत उपाय.... 

मित्रांनो.... दरवर्षी उन्हाळे पावसाळे येतात तरी ही पाणी टंचाई आणि दुष्काळ ह्यावर उपाय निघत नाही…. टोलवा टोलवी करण्यात मात्र राजकारणी अत्यंत हुशार.... पण सत्य परिस्थितीवर मात्र उपाय सुचतच नाही…. आज मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा म्हणणारे, मोठमोठया इमारती बांधू शकतात, स्वतःसाठी करोडोंच्या किंमति असलेल्या १०-१० गाडया घेवु शकतात, स्वतःसाठी आलिशान बंगले बांधू शकतात, सभेसाठी भाडयाची गर्दी जमवु शकतात.... पण दुष्काळग्रस्त गावांसाठी ५०० रुपयांची मदत करू शकत नाहीत.... 

बघा, अवघा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना आपल्या नेत्याना, लाखो रुपये खर्च करुन सभा घेणे.... एकमेकांवर चिखलफेक करणे आणि गोरगरिबांच्या जखमेवर मिठ चोळणे बरे जमते... पण तोच पैसा दुष्काळग्रस्त गावांवर खर्च करणे का जमत नाही.... बघा, नाही म्हटले तरी महाराष्ट्रातील बहुतेक नेतेमंडळी हे गडगंज श्रीमंत आहेत.... अगदी त्यांच्या ५० पिढया घरात बसून आरामात खातील तरी पैसा संपणार नाही.... एवढी संपत्ति असताना मनाचा मोठेपणा मात्र अजिबात नाही, फक्त भडकपणा, दिखावू वृत्ति तेवढी ठासून भरलेली आहे.... 

बघा, तीच तऱ्हा मोठमोठया बाता करणारे आणि अरबोंची संपत्ति असणाऱ्या किती तरी इतर नेते, उद्योगपति, सिनेमातील नट-नटी, मोठ्या खेळाडूंची.... आपल्या देशाची ही शोकांतिकाच म्हणायची.... परिस्थती बिकट पण एकाच्याही मनाला मदतीचा पाझर फुटू नये.... नुसते पेपर किंवा इंटरनेटवर स्टेटस अपडेट करून हळ हळ व्यक्त करायची.... आणि हेच अरबोपति मंदिर-देवांना सोन्याचे हार आणि हिऱ्याचे मुकुट मात्र नेहमीच दान करताना दिसतात.... खरच.. आश्चर्यच आहे ना..!!.. 

बघा, आज महाराष्ट्रात दुष्काळ आपले रौद्ररूप दाखवायला लागलाय, तोच दुष्काळ ज्यात सामान्यतः पहिला बळी जातो तो माणुसकीचा..... म्हणूनच मित्रांनो, सामाजिक बांधिलकी जपत व मदतीचा खारीचा वाट उचलत आपण आपल्या परीने भीषण दुष्काळग्रस्त गावातील लोकांना मदत करा.... दुष्काळावर कशी मात करता येईल किंवा त्याला कसे सामोरे जावे.... यासाठी पाणी नियोजना-सारख्या काही उपाययोजना जर आपल्या डोक्यात असतील.... तर त्या उपाययोजना व्यवस्थितरित्या मांडून त्याची एक छानसी पोस्ट आणि अहवाल बनवा.... 

बघा, आज दुष्काळावर उपाय शोधताना अजूनही शाश्वत गोष्टींऐवजी.... पॅकेज, मदत, अनुदान, माफी यांचीच जास्त चर्चा होते.... मदत करणारे, जनतेचे आश्रयदाते असल्याचा आव आणतात.... त्याच वेळी दुष्काळग्रस्तांना दयेवर जगण्यास व अधू बनण्यास भाग पाडतात.... असला हा दुष्काळ माणसाच्या चुका-बेशिस्त-दुर्लक्षामुळे निर्माण होतो.... 

बघा, आज काय होतंय.... जे आपल्या हातात आहे, ते सुधारायचं नाही आणि जे नियंत्रणापलीकडं आहे त्यावर मात्र भरभरून बोलायचं..!. खरंच त्यामुळेच दुष्काळावरचे प्रश्न जसे आहेत तसेच राहिलेत.... खरेतर दुष्काळाची उत्तरंसुद्धा दुष्काळी भागातच सापडतात.... ती अनेकांना माहीतही आहेत.... आणि डोळ्यावर चढवलेली पट्टी काढण्याचा अवकाश, ती ठळकपणे दिसतील आणि मग दुष्काळाच्या मुळापर्यंत पोहोचता येईल.... एकदा का प्रश्नाच्या मुळाशी गेल्यावर त्यावरचा मार्ग सापडला नाही तरच नवल..!. आज तरुणांनीच पुढे येऊन ही उत्तरं राबवण्यासाठी, यातून योग्य मार्ग काढण्याची गरज आहे.... 

बघा, राजकारण्यांनी देखील हे समजायला पाहिजे आजची गरज विकासाची आहे.... निव्वळ देखावे दाखवून काय उपयोग.... तसेच तरुणांनी त्यांची जबाबदारी ओळखून आपल्या भागाचा अभ्यास करून देशापुढील आव्हानांना सामोरे गेले पाहिजे.... देशाला पुढे नेतृत्व देणारी पहिली पायरी ही तरुणांचीच असेल.... मात्र कल्पक आणि मेहनती तरुणांची, आज देशाला गरज असून ग्रामीण भागातील जनतेचे दुःख तरुणांनी ओळखून ते कमी होण्यासाठी काम करावे.... बघा, समाजाला कोणत्या दिशेला वळवायचं हे तरुणाच्या आत्मविश्वास, इच्छाशक्तीवर आणि ध्येयाच्या अंमलबजावणीवर अवलंबून असेल.... आज तरुण पिढीने मनावर घेतलं तर दुष्काळ कायमचा घालविणं शक्य आहे.... पण दुर्लक्ष केलं तर सर्व व्यवस्था कायमच्या ढासळायला फार वेळही लागणार नाही..!!.. तरुणांनो वेळीच जागे व्हा.... देशाच्या व स्वहिताच्या भवितव्याच्या दृष्टीने ते महत्वाचे ठरणार आहे....


ॐ श्री गुरुदेव दत्त.....

No comments:

Post a Comment