सरकार खाते तुपाशी....
महागाईने जनता उपाशी....
आज महागाई कुणालाच सोडत नाही.....
बघा, आपल्या भारतीय राजकारणामध्ये
सामान्यांच्या हिताच्या गप्पा केल्या जातात..... मात्र सर्वसमान्यांचेच अहित कसे
केले जाईल याचा विचार केला जातो असे दिसते..... आजच्या गॅस - डिझेल दरवाढीने नेमके
हेच साध्य केले आहे..... मालवाहतूक महागली की सर्वच वस्तु महाग होतील अन्
सामान्यांना फटका बसेल....
महागाईमुळे बेहाल अगोदरच सुरू
आहे..... आज अन्नधान्याच्या किमती वाढल्या आहेतच..... मात्र, त्याचा फायदा शेतकऱ्याना मिळत नाही हे देखील एक कटू
वास्तव.....पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, महाग झाले की त्याचा जीवनावश्यक
वस्तुच्या किमतीवर फरक पडतो..... आधीच पावसामुळे दुष्काळाचे सावट निर्माण झाले
असतानाच दुष्काळात महागाईचा तेरावा महिना, अशी
स्थिती सर्व सामान्यांची झाली आहे.....
आज परिस्थिती खूपच तणावपूर्ण.....
एका बाजूला डिझेलच्या दरवाढीने जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ होण्याची
धास्ती आणि दुसरीकडे वर्षातून सहाच गॅससिलिंडर नियमित दराने देण्याच्या निर्णयाने
सर्वसामान्यांचे जगणेच कठीण झालंय..... वाढत्या महागाईने आधीच सर्वसामान्य हैरान
आहेत..... सर्वच जनतेला प्रश्नच प्रश्न डोळ्यासमोर दिसू लागले आहेत.....
सर्वच क्षेत्रात महागाई वाढल्याने
सर्व सामान्यांनी जगायचे तरी कसे ....? इंधनाच्या
किमतीत भाववाढ झाल्याने आता सगळ्याच किमती वाढणार.... गॅस सिलेंडर तर न परवडणारे
झाले आहे.... सर्व सामान्यांनी काही खरेदी करायचे की नाही...? आज अशा या महागाईत हातावर पोट
भरणार्यांवनी करायचं काय...? मजुरीतून
पोरांचं शिक्षण करायचं की पोटाला पोटभर खायचं...? मजुरी वाढत नाही, पण
जीवनावश्यक वस्तूंचे भाव मात्र दररोज वाढत आहेत..... अशावेळी सरकारनं मदत करायचं
सोडून महागाईचे चटके द्यायचा मात्र सपाटा लावलाय....
आज दुर्दैवीपणे असे चित्र आहे....
कोणत्याही सत्ताधारी सरकारला निवडणुकांनंतर आपलेच सरकार यावे..... याव्यतिरिक्त
जनतेच्या त्रासाशी काहीही घेणे नाही.... जेव्हा हवे तेव्हा भाव कमी..... नाहीतर
वाढवुन.... जेव्हा निवडणुका असतात.... तेव्हा जागतिक बाजारपेठेतील वाढलेल्या
भावाबद्दल या तेल कंपन्या काही बोलत नाहीत..... म्हणजे सत्तेवर असणारे ते कोणीही
असो.... भाववाढ स्वपक्षाचे हित व निवडणुका पाहून केली जाते.....
सरकार दरवाढीला नेहमीच जागतिक
बाजारपेठ,
रुपयाचे अवमूल्यन, विकासदर अशी अर्थशास्त्रीय कारणे
देते..... भारतातील सर्वासामान्य माणसाचा यामध्ये विचार केला जात नाही.... महागाई
कमी का होऊ शकत नाही.... याची प्रमुख कारणे म्हणजे सदोष करपद्धती.... कमोडिटी
मार्केटमधील सट्टेबाजी आणि ‘इझीमनी’मध्ये गेल्या काही वर्षांत झालेली
वाढ (भ्रष्टाचार)..... उलट आपला विकासदर, रुपयाचे
अवमुल्यन टाळण्याचे कीतीतरी उपाय चांगल्या सकारात्मक कल्पकतेने केल्यास भारताचा
कायापालट होऊ शकतो.... हवी फक्त मानसिकता, देशाभिमान, त्यागी वृत्ती, जिद्द..... यासाठीच आजच्या तरुण
पिढीने विवेक विचार आत्मसात करणे गरजेचे ठरते.....
बघा, सरकार डीझेल - पेट्रोलच्या किंमती
कितीही वाढू देत.... शेवटी प्रश्न आहे तो परवडण्याचा..... आणि दोनच प्रकारच्या
व्यक्तींना कोणतीही किंमत परवडू शकते.... आणि त्या प्रकारच्या व्यक्ती म्हणजे
राजकिय पक्षात / सरकारी नोकरीत एखादी महत्त्वाची जागा धरून ठेवणारा आणि सरकार
मध्ये मंत्रिपद भोगणारा दोघांनाही स्वतःची गाडी वापरण्याचीच काय विकत घेण्याची
सुद्धा गरज नाही.... आता जनतेकडे या सर्व बाबींवर जन आंदोलनाशिवाय पर्याय दिसत
नाही....
ॐ श्री गुरुदेव दत्त .....
No comments:
Post a Comment