अर्जुन विषाद योग.....
प्रत्येक संभ्रमात पडलेल्या साधकाने अर्जुन विषाद योग जो भगवद्गीतेचा पहिला अध्याय आहे त्याचा अभ्यास करावा.... कोणाला काही विचारण्याची मग गरज नाही... उत्तरे सद्गुरुच तुम्हाला देतील.... काही वेळा होतं असे कि कुठल्या तरी व्यक्ती / प्रसंग-घटनेमुळे निराशा किंवा हतबलता निर्माण होते.... मग आपल्या कर्तव्याशी, स्वतःशी प्रामाणिक राहणारेही जगातला अधर्म पाहून विचार करतात.... यशासाठी वेडे होतात.... आमच्या कर्मात अशी काय कमी राहिली कि आम्हाला यश उशिरा मिळत आहे.... जिथे तुलना होते तिथेच भक्तीची घडी विस्कटते.... कारण आपले लक्ष आपल्या ध्येयापासून विचलित होवून अधर्मरूपी यशाच्या तेजाने अंध झालेले असते.... नकळत का होईना आपण आपला मार्ग चुकत जातो.... म्हणून वेळीच सावध होणे गरजेचे....
या अध्यायाला अर्जुन विषाद योग असे समर्पक नाव आहे.... विषाद, वैफल्य या भावनेचा अनुभव प्रत्येक जीवाला कधी ना कधी येतोच.... भयावह भवसागर म्हणतात, त्या जगात वावरताना प्रामाणिकपणे सद्गुणांची, सत्प्रवृत्तीची कास धरणाऱ्या विचारी, सुसंस्कृत जिवाचीच जास्ती परवड होते.... किरकोळ अपेक्षाभंग किंवा अपयश यांनी खचून जाण्याच्या फारच पुढे गेलेल्या त्या उन्नत जीवापुढे 'धर्मसंकट' उभे ठाकते....
मात्र सगळ्या गोष्टी ठीकठाक असतानाही त्या तशाच राहतील का म्हणून काळजी करत राहणारे चिंतातुर लोक, व्यवहारातले सरळ साधे निर्णय घेण्याची क्षमता नसलेले लोक, अपेक्षाभंग न पचवू शकणारे आणि जन्म कुंडली घेऊन उठसूठ एखादे बुवा, महाराज यांचे उंबरठे झिजवणारे आणि त्यांच्या व्यवसायाला बरकत आणणारे महाभाग जो विषाद अनुभवतात, त्याचा 'योग' कधीच होत नाही हे जाणून घ्या....
संकटांचा, आव्हानांचा आणि स्वधर्मापासून पद्च्युत करणाऱ्या प्रलोभनांचा सामना तर प्रत्येक जीवाला करावाच लागतो.... प्रारब्धाने वा परिस्थितीने येणारा तो अटळ भाग आहे.... कधी इच्छाशक्ती च्या बळावर, कधी निव्वळ काही काळ जाऊन देऊन, कधी कुणाचा आधार घेऊन, तर कधी सांत्वन करून घेऊन माणसाची पुढची वाटचाल सुरूच राहते.... कधी पार कोलमडून पडण्याची आणि अगदी आत्मघाताचीही वेळ येते....
अर्जुनाला पडलेले प्रश्न, त्याच्या शंका गैर नाहीत, त्या फक्त परिस्थिती संदर्भात योग्य नाहीत... असा 'विषाद योगी' विचार करण्यासाठी जीवाची एक उन्नत अवस्था असावी लागते.... एखाद्या विचारशील, सत्प्रवृत्त व्यक्तीची परिस्थितीमुळे नाही, तर निव्वळ अनाठायी आणि अवेळी अभद्र विचार करण्याने कशी दारुण स्थिती होते याचे अर्जुन प्रतीक आहे.... विचारांचा गोंधळ, त्यातून येणारी आत्मग्लानी असा प्रवास एकदा सुरू झाला की त्याचा शेवट आत्मघातच.... अशी मनस्थिती ज्यांनी अनुभवली, त्यांनाच हे पटेल....
सद्गुरू सोडून कुणीही अशा व्यक्तीला मार्ग दाखवू शकत नाही.... समजूत, धीर देण्याचे जे प्रयत्न इतर लोक करतात त्याचा नेमका विपरीत परिणाम होतो.... उलट अहंकारच वाढतो.... शिष्याच्या जन्मोजन्मीच्या प्रवासाचे सहचर असणारे सद्गुरू अशा वेळी स्वस्थ राहू शकत नाहीत.... अर्जुनाची अशी अवस्था होण्यामागे ईश्वरी संकेत होता... त्याच्या निमित्ताने जगाच्या उद्धारासाठी श्रीहरिना आपले हृद्गत प्रकट करायचे होते.... तो काहीसा गूढ असणारा भाग आहे....
लौकिक जगातही निव्वळ अभद्र विचारांच्या भोवऱ्यात गटांगळ्या खाल्ल्यामुळे जेव्हा सत्शिष्याची अशी केविलवाणी अवस्था होते, तीच सद्गुरूंचे कार्य सुरू होण्याची वेळ असते.... आजही तसा प्रत्यय येतो.... आई भीक मागू देई ना, बाप जेवू घाले ना अशा कचाट्यात अडकलेल्या आणि आत्मघात करायला प्रवृत्त होऊन गणेशपुरीला निघालेल्या पोरसवदा 'राम' ला नेमके नित्यानंद बाबा भेटतात, 'विलायत जाना, डॉक्टर बन के आना' असा एक वाक्यात आदेश देतात, आणि 'दिव्यस्पर्शी' डॉक्टर राम भोसले जन्माला येतात.....
पण अर्जुन सद्गुरूला शरण गेलेला आहे.... अनेक अनाठायी, अवेळी आणि अप्रस्तुत शंका कुशंकांनी ग्रस्त अर्जुनानं स्वःताच अस्तित्ववादासारखं भंपक, भोंगळ तत्त्वज्ञान मांडलं नाही.... विवेकावर अविचार मात करतो आहे, अशी पुसटशी जाणीव असणारा तो युक्तिवाद करून आपल्याच भूमिकेवर अडून राहिला नाही.... 'मीच शहाणा, आणि माझंच खरं' अशी वृत्ती मात्र घात करते, तशी अर्जुनाची नव्हती.... सद्गुरूला शरण जाऊन आपल्या साऱ्या मनोव्यथा विश्वासाने सांगाव्या इतका प्रांजळपणा त्याच्याजवळ होता....
अशा भूमिकेतला सत्शिष्य अर्जुन, आणि त्याच्या साऱ्या शंका कुशंकांचे निरसन करून त्याला निष्काम वृत्तीने आपले कर्म करायला समर्थ करणारे सद्गुरू श्रीकृष्ण अशी ती अलौकिक जोडी होती.... म्हणूनच 'गीता' हा सर्वकल्याणकारी ग्रंथ जन्माला आला.... आपल्या 'स्वधर्माची' स्पष्ट जाणीव अर्जुनाला झाली.... ती प्रत्येक व्यक्तीला व्हावी हेच श्रीहरीचे खरे मनोगत आहे, गीतेचे प्रयोजन आहे.... सद्धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी, आणि दुराचारी प्रवृत्तींचा बीमोड करण्यासाठी अपरिहार्य असणारं प्रलयंकारी महायुद्ध झालं....
आपणही आपलं सारं औदासीन्य, मालिन्य झटकून श्रीगुरूला सर्वभावे शरण जावे.... तोच सर्व योग्य ते जाणतो.... मग आपण अयोग्य ते का करावे.... त्याच्याकडूनच योग्य काय ते जाणून घ्यावे.... मग जीवनात काहीच विषाद उरणार नाही....
ॐ श्री गुरुदेव दत्त
स्वरूपी मनोबोध चिंतन,,,
अभंग मनोबोध गणाधीश जो ईश
सर्वा गुणांचा । मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा । नमूं शारदा मूळ चत्वारि वाचा । गमूं
पंथ आनंत या राघवाचा ॥१॥ नमस्कार माझा । मूळ पुरुषासी । गणेश हे ज्यासी । नाम असे
॥१॥
गणांचा अधीश । त्रिगुणांचा ईश । नमन तयास । भक्तिभावे ॥२॥ त्रिगुणांचा स्वामी
। आरंभ विश्वाचा । श्रीगणेशाचा । जय असो ॥३॥ आहे तो निर्गुण । विश्वाचे कारण । होई
तो सगुण । उपाधीने ॥४॥ माया ही शारदा । गणेशाची शक्ती । जेथूनी निर्मिती जगतासी
॥५॥ करितो नमन । देवी शारदेसी । चारही वाणींची मूळ असे ॥६॥ परा नि पश्यंती । मध्यमा
वैखरी । या त्या चार वाणी । प्रसिद्धचि ॥७॥ चारही वाणींसी । हिने प्रसविले ।
कर्तृत्व ते आले । हिच्या गुणे ॥८॥ नमन तियेसी । ग्रंथारंभी करी । मन बुद्धी भरी ।
वागर्थाने ॥९॥ अनादि अनंत । राघवाचा पंथ । सांगताती संत । मोक्षदायी ॥१०॥ तीच
ब्रह्मविद्या । व्हावी अपरोक्ष । म्हणोनि उपदेश॥ मना तुज ॥११॥ मना सज्जना
भक्तिपंथेचि जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे । जनीं निंद्य ते सर्व सोडोनि
द्यावे । जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥२॥ पंथ अनंताचा । ब्रह्माच्या प्राप्तीचा
। हाचि अर्थ याचा । जाण मना ॥१२॥ आत्मा ब्रह्मरूप । पडला विसर । अज्ञान निर्झर ।
उद्भवला ॥१३॥ अरे ते अज्ञान । समूळ नाशाया । करी तू उपाया । काही मना ॥१४॥ बा मना
सर्वदा । जाई भक्तिपंथे । राम जेथे असे पथदर्शी ॥१५॥ अन्य मार्गाहून । भक्तिमार्ग
सोपा । ईश्वरी तद्रूप । होई मन ॥१६॥ भक्तीने श्रीहरी । पावतो सर्वांसी । देई
दर्शनासी । दाखला हा ॥१७॥ भक्तिमार्गातील । पहिला नियम । जे जे निंदनीय । त्यजावे
ते ॥१८॥ वंदनीय जो जो । असेल आचार । तो तो तू स्वीकार । मनोभावे ॥१९॥ शास्त्राचे
प्रामाण्य । असे ज्या कर्मास । ते कर्म प्रशस्य । जाण मना ॥२०॥ भक्ती हवी जर ।
निंद्य सोड सर्व । वंद्य ते ते सर्व । करी भावे ॥२१॥ भाव तेथे देव । उक्ती ही
प्रसिद्ध । अनुभवे सिद्ध । झाली असे ॥२२॥ रे परमार्थाचा । श्रद्धा असे पाया ।
श्रद्धेवीण वाया । सर्व काही ॥२३॥ अश्रद्धेने करी । जे जे इहलोकी । ते ते विफल की
। जाण मना ॥२४॥ प्रभाते मनीं राम चिंतीत जावा । पुढे वैखरि राम आधी वदावा । सदाचार
हा थोर सांडू नये तो । जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥३॥ श्रवण चिंतन । नि
नामस्मरण । अर्चन वंदन । अणि दास्य ॥२५॥ पादसेवन ते । गुरुभक्तिरूप । आत्मनिवेदन ।
आणि सख्य ॥२६॥ अशी नवविधा । सांगितली भक्ती । त्यातील कोणती । आचरावी ॥२७॥ अशी मना
शंका । असे जरी तुज । सांगतो रे गुज । ऐके बापा ॥२८॥ नामस्मरणाची । वाट जवळची ।
प्राप्ती ईश्वराचि । वेगे होई ॥२९॥ उष:काली होती । सर्व शांत वृत्ती । चित्त
भगवंती । जडतसे ॥३०॥ म्हणोनि सकाळी । चिंतन रामाचे । मग व्यवहाराचे । काम करी ॥३१॥
परा नि पश्यंती । मध्यमा वैखरी । असती या चारी वाणी बापा ॥३२॥ परावाणीचे ते ।
नाभीमाजी स्थान । पश्यंतीचे स्थान । हृदयात ॥३३॥ मध्यमेचे स्थान । कंठामाजी जाण ।
वैखरीचे स्थान । रसनाग्र ॥३४॥ वैखरीने नाम । उच्चरण्यापूर्वी । हृदयात करी । स्मरण
रे ॥३५॥ हृदयीं स्मरण । जिह्वे उच्चारण । एकाग्र ते मन । होत असे ॥३६॥ नामाचे
स्मरण । शुद्ध आचरण । धन्य रे जीवन । त्या नराचे ॥३७॥ सदाचरणाने । होसी कृतकृत्य ।
या मर्त्यलोकात । जन्म जरी ॥३८॥ दैवी गुणे युक्त तोचि असे भक्त । असे सर्व संत ।
सांगताती ॥३९॥ म्हणोनिया मना । भक्ती हवी जर । विशुद्ध आचार । श्रेष्ठ मानी ॥४०॥
मना वासना दुष्ट कामा नये रे । मना सर्वथा पापबुद्धी नको रे । मना धर्मता नीति
सोडू नको हो । मना अंतरी सार विचार राहो ॥४॥ बाह्याचार जसा । असावा निर्मळ ।
तैसेचि निर्मळ । अंतरंग ॥४१॥ शुद्ध बाह्याचार । अशुद्ध अंतर । तो रे मिथ्याचार ।
असे बापा ॥४२॥ वासनांचा संग । नेई नाशाप्रत । बोले भगवंत । गीतेमाजी ॥४३॥ त्यागी
सर्वथैव । वाईट वासना । स्वीकारी रे मना । सद्वासना ॥४४॥ जेणे देवप्राप्ती । ती
दैवी संपत्ती । आसुरी संपत्ती । नाश करी ॥४५॥ विशुद्ध वासना । दैवीसम्पत्खूण ।
करिते पावन । जीवालागी ॥४६॥ विषयवासना । दु:खासी कारण । भोगवी मरण । आणि जन्म ॥४७॥
जन्म घेणे लागे । वासनेच्या संगे । म्हणोनी तू वेगे । सोडावी ती ॥४८॥ पराच्या
नाशाची । नको पापबुद्धी । वेगे अंत:शुद्धी । करी आता ॥४९॥ कायिक वाचिक । आणि
मानसिक । पाप ते बंधक । जीवालागी ॥५०॥ दुर्लभ हा देह । प्राप्त झाला तुज ।
धर्मबुद्धीसाज । घाली त्यासी ॥५१॥ नीती आणि धर्म । अध्यात्मसाधन । ईश्वरदर्शन ।
प्राप्त होई ॥५२॥ एक परब्रह्म । जगी ते शाश्वत । बाकी अनिश्चित । सर्वकाही ॥५३॥
हाच सारासार । विवेक अंतरी । सुदृढ तू धरी । बा रे मना ॥५४॥ मना पापसंकल्प सोडोनि
द्यावा । मना सत्यसंकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको वीषयांची । विकारे घडे हो
जनी सर्व ची ची ॥५॥ जे संकल्पी मन । तैसे आचरण । तैसेचि वर्तन । घडतसे ॥५५॥
संकल्पाचे मूळ । असे अज्ञानात । विषयीं प्रवृत्त । होई जीव ॥५६॥ स्वरूपनेणीव । हा
पापसंकल्प । सोडूनी तू जप । रामनाम ॥५७॥ सत्य एक ब्रह्म । मनीं हे तू धर । अविद्या
तू सार । दूरवरी ॥५८॥ विषयचिंतन । नको रे सर्वथा । तेच भवतापा । मूळ असे ॥५९॥
विकाराआधीन । होऊनी जो वागे । सर्वांना जो सांगे । मी हे केले ॥६०॥ त्याची रे
फजिती । होते पुरेपूर । हा रे वाया नर । असे जगी ॥६१॥ तादात्म्य देहाशी । मन
विषयांशी । मग भवपाशी । बद्ध होसी ॥६२॥ देह नव्हे तू रे । आत्मा तो तू जाण ।
कर्माचे कर्तृत्व । देहाकडे ॥६३॥ कर्तृत्व देहाचे । मानसी स्वत:चे । मग त्या
कर्माचे । फल भोग ॥६४॥ म्हणोनि करून । घेई अकर्तृत्व । हेचि असे तत्व । गीतेमाजी
॥६५॥ नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नाना विकारी नको रे मना सर्वदा
अंगिकारु । नको रे मना मत्सरु दंभभारु ॥६॥ ह्यासाठी अभ्यास- । योग तू आचारी ।
क्रोध खेदकारी । सांडी वेगे ॥६६॥ काम पूर्ण होता । लोभ बळावतो । मग हव्यास तो ।
वाढतसे ॥६७॥ क्रोध बळावतो । काम जो अपूर्ण । मग ते पतन । निश्चयेसी ॥६८॥ काम आणि
क्रोध । जना नाडिताती । बुद्धिसीही घेती । अपुल्या हाती ॥६९॥ घेरता पुरते । होते
नागवण । यांची आठवण । नको बापा ॥७०॥ क्रोध पश्चात्तापा । काम विकारांसी । होती
कारणासी । ऐके बापा ॥७१॥ मोह आणि मद । दंभ नि मत्सर । नको अंगिकार । करु यांचा
॥७२॥ षड्रिपु हे जाण । भारासी कारण । यांनी नागवण । केली असे ॥७३॥ हेच ते षड्रिपु
। जन्म नि मृत्यूसी । संसारतापासी । कारण की ॥७४॥ यांचा नको स्पर्श । तुजला सर्वदा
। हरिनाम छंदा । आड येई ॥७५॥ मना श्रेष्ठ धारिष्ठ्य जीवीं धरावे । मना बोलणे नीच
सोशीत जावे स्वये सर्वदा नाम वाचे वदावे । मना सर्व लोकांसी रे नीववावे ॥७॥
कामक्रोधादिक । आसुरी संपत्ती । तेथे तू विरक्ती । स्वीकारावी ॥७६॥ अहिंसा अभय ।
सौजन्य स्वाध्याय । दैवी गुणाश्रय । करावा रे ॥७७। सात्विक ते धैर्य । धरी अंतरात
। श्रीरामनामात । धुंद होई ॥७८॥ बोलणे दुजांचे । सोशीत ते जावे । जगन्नाथ धावे ।
अंतकाळी ॥७९॥ क्रोधावरी जय । मिळण्याकारण । हाचि मार्ग जाण । असे एक ॥८०॥ कोणीही
भेटोत । कोणी लाथाडोत । नको घालू खत । क्रोधाचे तू ॥८१॥ क्षमेने लोकांना । करूनिया
वश । दुर्जनांचा रोष । मिटवावा ॥८२॥ सदा नम्र वाचे । दुजा तोषवावे । हेचि जीवेभावे
। व्रत घेई ॥८३॥ अरे नम्रतेने । बोल मृदु शब्द । सर्वांसी सुखद । वाटतसे ॥८४॥
जिव्हाग्रे मरण । जिव्हाग्रे बंधन । जिव्हाग्रे बांधव । राहताती ॥८५॥ मनात असता ।
घोर ती कटुता । वाणीत मृदुता । येई कैची ॥८६॥ बोलणे ते सत्य । नि हितकारक । तप ते
वाचिक । जाण बापा ॥८७॥ षड्रिपूंच्यावरी । मिळवण्या जय । हीच धरी सोय । बा रे मना
॥८८॥ देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी । मना सज्जना हेचि क्रिया धरावी मना चंदनाचे
परी त्वा झिजावे । परी अंतरी सज्जना नीववावे ॥८॥ सर्व योनींमधे । नरदेह श्रेष्ठ ।
ज्ञान जे वरिष्ठ । प्राप्त होय ॥८९॥ नरदेह प्राप्त । नाम ना मुखात । काय जीवनात ।
अर्थ आहे ॥९०॥ देह हा नश्वर । नाम ते अमर । करूनी गजर । सांगे श्रुती ॥९१॥
देहापाठी मना । कां गा रे धावसी । आणि श्रीरामासी । विसरसी ॥९२॥ अरे बा रे मना ।
ऐसा नित्य वागे । जेणे कीर्ती मागे । डंका पिटे ॥९३॥ देख चंदनासी । झिजे
सर्वांगासी । आणि सुगंधासी । वाटे सर्वा ॥९४॥ येत नसे पुष्प । येत नसे फळ । जीणे
ते सफळ । चंदनाचे ॥९५॥ तूही बारे मना । रहाट स्वधर्मे । निष्काम तू कर्मे । करी
नित्य ॥९६। परमार्थसार । संतसज्जनांनी । प्रकटले जनी । वंदी त्यांना ॥९७॥ संत-आशीर्वादे
। देहबुद्धि जाई । आत्मबुद्धी होई । प्राप्त तुज ॥९८॥ जर होई मना । स्वरूपाची
प्राप्ती । तर तुज कीर्ती । माळ घाली ॥९९॥ आता देहबुद्धी । जाई झिजवीत । परी राहो
चित्त । समाधानी ॥१००॥ नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे । अती स्वार्थबुद्धीने रे
पाप साचे । घडे भोगणे पाप ते कर्म खोटे । न होता मनासारिखे दु:ख मोठे ॥९॥ नको तुज
लोभ । दुजांच्या धनाचा । रे पापबुद्धीचा । त्याग करी ॥१०१॥ अती जेथे स्वार्थ । अती
जेथे अर्थ । जीणे रे निरर्थ । जाण बापा ॥१०२॥ म्हणोनी तू मना । सोडी स्वार्थबुद्धी
। व्यर्थ या उपाधी । गुंतू नको ॥१०३॥ अपार आसक्ती । नको धरू मना । तेणे रे कामना ।
वाढताती ॥१०४॥ कामना वाढता । मार्ग रे पापाचा । धरीशील साचा । बा रे मना ॥१०५॥ बीज
जे पेरावे । तेच ते उगवे । हे तो रे स्वभावे । असे येथे ॥१०६॥ कर्म तैसे फळ ।
येथील नियम । मग का स्वधर्म । नाचरिसी ॥१०७॥ अनेक कामना । पूर्ण का होतील । दु:खची
देतील । तुजलागी ॥१०८॥ सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी । दुखाची स्वये सांडी जीवी
करावी । देहेदु:ख ते सूख मानीत जावे । विवेके सदा स्वस्वरूपीं भरावे ॥१०॥ संग
कामनांचा । नको म्हणोनिया । येरझार वाया । घडतेसे ॥१०९॥ म्हणोन सर्वदा । रामावीण
आस । नकोच जीवास । दुजी काही ॥११०॥ करी तू रे मना । प्रीति रामावर । माय बाप घर ।
तोचि एक ॥१११॥ देवप्रेमापुढे । देहदु:ख थोडे । ऐसे जरी घडे । तीच भक्ती ॥११२॥ दु:ख
वेगे सांडी । चरण तू धरी । उभा तो समोरी । रघुवीर ॥११३॥ दु:ख जे देहासी । ते तू
सुख मान । येते आठवण । श्रीरामाची ॥११४॥ कुंती मागे कृष्णा । संकट मालिका ।
ध्यानात येई का । तुझ्या हेतू ॥११५॥ सुखात लोळता । रामा विसरता । काय सार्थकता ।
आयुष्याची ॥११६॥ विवेक हा करी । हृदीं राम धरी । स्वरूप सागरीं । डुबी घेई ॥११७॥
आत्मारामीं प्रेम । जडे सहाजिक । उत्पन्न विवेक । अंतरात ॥११८॥ स्वरूपी रहाणे ।
हाचि रे स्वधर्म । विवेकाचे मर्म । ध्यानी घेई ॥११९॥ जनीं सर्वसूखी असा कोण आहे ।
विचारे मना तूंचि शोधूनि पाहे । मना त्वांचि रे पूर्वसंचित केले । तया सारिखे
भोगणे प्राप्त झाले ॥११॥ सर्वकाळ सुखी । असे जगी कोण । पाही तू शोधून । बा रे मना
॥१२०॥ पूर्वजन्मीं जैसे । केलेसी रे कर्म । मृत्युलोकीं जन्म । तुजला की ॥१२१॥
पूर्वजन्मीची ती । भोगावी लागती । फळे हीच नीती । येथील की ॥१२२॥ म्हणोनि दुजांसी
। देऊ नको दोष । मुकाट्याने सोस । सुख दु:ख ॥१२३॥ ऐक बा रे मना । सुखी आनंदून ।
दु:खी तू भिऊन । जाऊ नको ॥१२४॥ मना मानसी दु:ख आणू नको रे । मना सर्वथा शोकचिंता
नको रे । विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी । विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी ॥१२॥
संकटप्रसंगी । दु:खासी सादर । मागुती विचार । दु:खाचाचि ॥१२५॥ दु:खी तू असता ।
दु:खाचे विचार । आणिक साचार । दु:खी होसी ॥१२६॥ झाले ते रे झाले । व्यर्थ उगाळून ।
शोकाचे कारण । वाढविसी ॥१२७॥ झालेल्या गोष्टीचा । करू नको शोक । नको घेऊ दु:ख ।
आणीक तू ॥१२८॥ पूर्वजन्मी जे जे । केले तू होतेस । म्हणोनि सायास । तुजलागी ॥१२९॥
पुढे काय होई । ठावे ना कोणाला । चिंता ती कशाला । करितोसी ॥१३०॥ सद्यस्थितीमाजी ।
एक रामनाम । घेई तू सप्रेम । बा रे मना ॥१३१॥ देह नव्हे तू रे । आत्मा तो तू जाण ।
विवेक करून । पाही जरा ॥१३२॥ बंधनापासूनी । सोडवी स्वत:सी । मुक्तीच्या द्वारासी ।
पावसील ॥१३३॥ विवेकाने दृढ । धरी तू चरण । हाच रामबाण । उपाय की ॥१३४॥ मना सांग पा
रावणा काय जाले । अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले । म्हणोनि कुडी वासना सांडी वेगी
। बळे लागला काळ हा पाठीलागी ॥१३॥ देहबुद्धी जाण । वासनेकारण । जन्म नि मरणा ।
कारण की ॥१३५॥ रावणाची दशा । काय सांग झाली । होता बलशाली । तरीही रे ॥१३६॥ धन
राज्य पुत्र । सर्वस्व ते गेले । मागे ते उरले । दुष्कृत्य की ॥१३७॥ दुष्टपणाची रे
। ऐशीच की गती । जेणे अंती मती । भ्रष्टते रे ॥१३८॥ परद्रव्य पर - । दारा परधन ।
नाशासी कारण । जाण मना ॥१३९॥ यमाचा तो फेरा । तुझ्या पाठीमागे । जन्मा येण्यासंगे
। लागलासे ॥१४०॥ म्हणोनि वाईट । वासना तू सोड । धरी रामवेड । अंतरात ॥१४१॥ जिवा
कर्मयोगे जनीं जन्म जाला । परी शेवटी काळमूखी निमाला । महाथोर ते मृत्युपंथेचि
गेले । कितीयेक ते जन्मले आणि मेले ॥१४॥ पूर्वसंचिताने । जन्म तुझा लोकी । अंती
काळमुखी । पडणार ॥१४२॥ कोणी असो थोर । कोणी तो लहान । मृत्यू हा महान । वर त्यासी
॥१४३॥ अगणित आले । अगणित गेले । सर्वही ते मेले । जन्मले नि ॥१४४॥ प्रकृती आधीन ।
मानवी जीवन । क्षणात भंगून । जाईल रे ॥१४५॥ आहार नि निद्रा । भय नि मैथून । यातच
रंगून । जाऊ नको ॥१४६॥ अरे तू मानव । बुद्धीचे वैभव । याचि देही देव । बनशील ॥१४७॥
सकळही जाती । एकचि राहती । स्वरूपाचि स्थिती । पावती जे ॥१४८॥ मना पाहता सत्य हे
मृत्युभूमी । जिता बोलता सर्वही जीव मी मी । चिरंजीव हे सर्वहि मानिताती । अकस्मात
सांडूनिया सर्व जाती ॥१५॥ ही तो मरुभूमी । सर्व ते जाणार । जो जन्मा येणार । या
लोकात ॥१४९॥ परी नवल हे । सर्वही म्हणती । मी मी रे बोलती । जन्मताच ॥१५०॥ अहंभाव
व्यापी । सर्व शरीरास । मग नाचतोस । मोरावाणी ॥१५१॥ म्हणसी तू नित्य । माझे घरदार
। वित्त अलंकार । माझे माझे ॥१५२॥ आणि चिरंजीव । मानसी आपणा । मृत्यूच्या थैमाना ।
नाठविसी ॥१५३॥ अकस्मात येई । काळाचा तो घाला । मग पळायाला । जागा नाही ॥१५४॥ मरे
एक त्याचा दुजा शोक वाहे । अकस्मात तोही पुढे जात आहे । पुरे ना जनी लोभ रे क्षोभ
त्याते । म्हणोनि जनी मागुता जन्म घेते ॥१६॥ एक मरताच । दुजा करी शोक । सोडूनि हा
लोक । का रे जासी ॥१५५॥ घळा घळा रडे । हंबरडा फोडे । कळे ना एवढे । कसे त्यासी
॥१५६॥ आपणही याच । वाटेने जाणार । भक्ष्य ते होणार । काळाचे की ॥१५७॥ अतृप्त वासना
। घेता बरोबर । जन्मासी येणार । पुनरपि ॥१५८॥ जन्म मरणाची । अशी येरझार । अखंड
होणार । मर्त्यलोकी ॥१५९॥ विषयांच्या लोभी । पडसी म्हणून । एवढे बंधन । प्राप्त
तुज ॥१६०॥ मनीं मानव व्यर्थ चिंता वहाते । अकस्मात होणार होऊनि जाते । घडे भोगणे
सर्वही कर्मयोगे । मतिमंद ते खेद मानी वियोगे ॥१७॥ दो दिसांची वस्ती । जीवासी या
झाली । व्यर्थ चिंता केली । कासयासी ॥१६१ होणार ते होते । भोगावे लागते ।
पूर्वसंचिताते । प्रत्येकासी ॥१६२॥ जे घडे त्यावरी । नाही तुझी सत्ता । आणि व्यर्थ
चिंता । करितोस ॥१६३॥ सांग बा रे मना । कशास मानसी । हर्ष विषादासी । करितोस ॥१६४॥
धन पुत्र दारा । सर्व हा पसारा । नको मानू खरा । सांगे तुज ॥१६५॥ जे जे अकस्मात ।
होईल रे प्राप्त । ते सर्व भोगीत । जावे मना ॥१६६॥ मना राघवेवीण आशा नको रे । मना
मानवाची नको कीर्ती तूरे । जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे । तया वर्णिता सर्वही
श्लाघ्यवाणे ॥१८॥ परी रामावीण । नको दुजी आस । एक एक श्वास । नाम जप ॥१६७॥ एका
ईश्वराचे । नाम घेई वचे । नको तू दुजांचे । गुण गाऊ ॥१६८॥ ऐके रामावीण । मानव तो
थिटा । गुणांचा तो साठा । त्याच्या पाशी ॥१६९॥ वेद आणि शास्त्रे । पुराणे थकली ।
करिता हो भली । गुणगान ॥१७०॥ तोच एक राम । योग्य गाण्या गुण । दुजा त्याच्यावीण ।
भजू नको ॥१७१॥ मना सर्वथा सत्य सांडू नको रे । मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ।
मना सत्य ते सत्य वाचे वदावे । मना मिथ्य ते मिथ्य सोडूनि द्यावे ॥१९॥ सत्य जे
शाश्वत । एक भगवंत । त्याचा ना रे अंत । चारी युगी ॥१७२॥ कोणी म्हणे हरी । कोणी
म्हणे हर । कोणी म्हणे राम । कोणी ब्रह्म ॥१७३॥ सत्य वस्तु एक । नाही जी पृथक ।
सृष्टी ही मायिक । जाण मना ॥१७४॥ अशाश्वत जे जे । ते ते रे मायिक । ते मिथ्या नामक
। ओळखावे ॥१७५॥ मिथ्या मायावाद । नको मांडू मना । येईल करुणा । तुझी त्यासी ॥१७६॥
सर्वदा वाचेने । सत्य ते बोलावे । मिथ्य ते सोडावे । हेचि तप ॥१७७॥ भज त्या रामास
। गाई तू गुणांस । घेई तू नामास । त्याच्याच की ॥१७८॥ हे तप करता । दया त्याच्या
चित्ता । येई भगवंता । सत्य मानी ॥१७९॥ बहु हिंपुटी होईजे मायपोटी । नको रे मना
यातना तेचि मोठी । निरोधे पचे कोंडिले गर्भवासी । अधोमूख रे दु:ख त्या बाळकासी
॥२०॥ सत्य मानतोस । माया जी असत्य । परमात्मा सत्य । मानिसी ना ॥१८०॥ अज्ञानाची
गाठ । जोवरी रे दृढ । आत्मज्ञान गूढ । कैसे होई ॥१८१॥ तेणे देहबुद्धी । दृढ होत
असे । वासनेचे पिसे । मानेवरी ॥१८२॥ नाही जोवरी रे । वासनांचा क्षय । जन्ममृत्युभय
। जीवालागी ॥१८३॥ पुन्हा पुन्हा गर्भी । राहणे जीवास । मातेलाही त्रास । होत असे
॥१८४॥ आणि तुज येथे । काय सांगू सुख । बहुत रे दु:ख । भोगिसी तू ॥१८५॥ नाळेने
बांधले । उलटे टांगले । श्वासही कोंडले । मायपोटी ॥१८६॥ जन्मा आधी ऐसा । नरकी
निवास । येताच जन्मास । वृत्ती शून्य ॥१८७॥ पूर्वी जे स्मरण । होते गर्भवासी । आता
विसरसी । कोण मी ते ॥१८८॥ जन्मोनिया दु:ख । भोगतोस परी । वासनेच्या फेरी ।
गुंततोसी ॥१८९॥ पुढील तो जन्म । मानव योनीत । मिळेल हे सत्य । मानू नको ॥१९०॥ मना
वासना चूकवी येरझारा । मना कामना सांडि रे द्रव्य दारा । मना यातना थोर हे
गर्भवासी । मना सज्जना भेटवी राघवासी ॥२१॥ म्हणोनि सोडूनी । देई तू वासना । तेणे
या यातना । चुकतील ॥१९१॥ आसक्तीच मूळ । फेर्यांसी कारण । देई तू सोडून । अति वेगे
॥१९२॥ द्रव्य आणि दारा । नको हा पसारा । एक राम खरा । त्रिजगती ॥१९३॥ सुखासाठी बा
तू । केली वणवण । सोसलेस घण । दु:खाचेच ॥१९४॥ आता तरी बा रे । रामभेट घेई । अंती
तू रे जाई । मोक्षपदी ॥१९५॥ मना सज्जना हीत माझे करावे । रघुनायका दृढ चित्तीं
धरावे । महाराज तो स्वामी वायुसुताचा । जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ॥२२॥ बा मना
सज्जना । ऐकता या गोष्टी । नको होऊ कष्टी । साधी हीत ॥१९६॥ रामाचे चरण । नेती
उद्धरून । म्हणोनी स्मरण । करी त्याचे ॥१९७॥ हनुमंताने त्या । हृदयी धरिले । चरण
ते भले । श्रीरामाचे ॥१९८॥ म्हणोनि बा मना । चिरंजीव पद । त्य़ासी झाले प्राप्त ।
मृत्युलोकी ॥१९९॥ तू ही घेता नाम । उद्धरील तुज । एक रामराज । या जगती ॥२००॥ न
बोले मना राघवेवीण काही । जनीं वाउगे बोलता सूख नाही । घडीने घडी काळ आयुष्य नेतो
। देहांती तुला कोण सोडू पहातो ॥२३॥ वृद्धपणी काय । असे दुजे काम । तेव्हा बोलू
राम । म्हणू नको ॥२०१॥ धन-सुत-दारा । अफाट पसारा । त्यांचा बडिवार । कोण करी ॥२०२॥
प्रपंची सुवर्ण । बहु मेळवून । नामाचे स्मरण । मग करू ॥२०३॥ असा विचार तू । करू
नको मना । स्वत:ची वंचना । करू नको ॥२०४॥ नको मना करु । गोष्टी या बाष्कळ । न
थांबे रे काळ । कोणासाठी ॥२०५॥ क्षणभंगुर रे । आयुष्याचा खेळ । येईल तो काळ । कोणे
वेळी ॥२०६॥ काळाने धरिले । कोणी सोडवले । रामाची पाउले । समर्थ की ॥२०७॥ म्हणोनिया
मना । नको बोलू काही । रामावीण नाही । सत्य येथे ॥२०८॥ जन्म मृत्युभय । हारपोनी
जाय । रामनाम सय । जरी करी ॥२०९॥ रघुनायकावीण वाया शिणावे । जनासारिखे व्यर्थ का
वोसणावे । सदासर्वदा नाम वाचे वसो दे । अहंता मनी पापिणी ते नसो दे ॥२४॥ गेला क्षण
नाही । येई परतून । संसारी रमून । जाऊ नको ॥२१०॥ अरे मना व्यर्थ । रामावीण स्वार्थ
। रामच रे अर्थ । तिन्ही लोकीं ॥२११॥ अज्ञ मूढ जन । रंगोत विषयी । तू रे रामापायी
। मिठी घाली ॥२१२॥ सर्वदा वाचेने । जप रामनाम । कैवल्याचे धाम । गाठशील ॥२१३॥
पापाचे जी मूळ । अहंता नागीण । तिच्यावरी घण । घाली वेगे ॥२१४॥ वळीच जागृत । मना
होवोनिया । करी तुझी काया । रामरूप ॥२१५॥ नरदेह भला । तुजसी लाभला । देव तू आपुला
। करी आता ॥२१६॥ दूधातून यत्ने । मिळे नवनीत । करी तैसे हीत । प्रयत्नाने ॥२१७॥
मना वीट मानू नको बोलण्याचा । पुढे मगुता राम जोडेल कैचा । सुखाची घडी लोटता सूख
आहे । पुढे सर्व जाईल काही न राहे ॥२५॥ तेच तेच बोल । ऐके मना नीट । नको मानू वीट
। बोलण्याचा ॥२१८॥ झोप ती उडावी । जागृती ती यावी । अरे भवार्णवी । बुडशील ॥२१९॥
पुन्हा पुन्हा अन्न । लागते सेवावे । तैसेच बोलावे । लागतसे ॥२२०॥ कंटाळूनी जर ।
रामा लोटी दूर । अंती राखणार । कोणा तुज ॥२२१॥ भोगात लोळता । वाटे तुज सुख । परी
ते क्षणिक आहे बापा ॥२२२॥ ज्या संगे भोगसी अमूप सुखासी । आहे त्या देहासी ।
मृत्युपंथ ॥२२३॥ जोवरी तो प्राण । असे या देहात । गुंते तू नामात । त्वरा करी
॥२२४॥ देहेरक्षणाकारणे यत्न केला । परी शेवटी काळ घेऊन गेला । करी रे मना भक्ती या
राघवाची । पुढे अंतरी सोडी चिंता भवाची ॥२६॥ किती काळ करी । देह संरक्षण । अरे ते
मरण । टपलेले ॥२२५॥ देह तो जाईल । काळ त्या खाईल । मग तू घेशील । कैसे नाम ॥२२६॥
देहाचे मिथ्यत्व । जाण तू रे मना । आता नारायणा । हाक घाली ॥२२७॥ काळ घेवोनिया ।
अंती जातो तुज । म्हणोनि तू आज । नाम घेई ॥२२८॥ करी मना भक्ती । श्री रघुरायाची ।
चिंता संसाराची । सोडी सर्व ॥२२९॥ सर्वभावे भज । एक देवराज । तेणे रे सहज ।
मायानाश ॥२३०॥ भवाच्या भये काय भीतोस लंडी । धरी रे मना धीर धाकासी सांडी ।
रघुनायकासारिखा स्वामी शीरी । नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥२७॥ भवभयग्रस्त ।
अससी म्हणोन । तरी का भिऊन । जाशी मना ॥२३१॥ तुझ्या शिरावर । छत्र राघवाचे ।
घाबरावयाचे । कशासाठी ॥२३२॥ भय सांडी दूर । राम मनीं धर । राम तारणार । आहे बापा
॥२३३॥ राम पाठीराखा । रामच्या सारखा । दुसरा तो सखा । असे कोठे ॥२३४॥ पुराणाभीतरी
। हीच आहे साक्ष । न करी दुर्लक्ष । रघुनाथ ॥२३५। यम येवो जरी । क्रुद्ध होवोनिया
। एक रामराया । निवारितो ॥२३६॥ दिनानाथ हा राम कोदंडधारी । पुढे देखता काळ पोटी
थरारी । जना वाक्य नेमस्त हे सत्य मानी । नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥२८॥
अनाथांचा नाथ । तो हा रघुनाथ । सोडेल का साथ । कधी तरी ॥२३७॥ धनुष्य नि बाण ।
घेवोनिया हाती । नित्य भक्तांप्रती । सांभळितो ॥२३८॥ प्रतिपाळ करी । यमासी निवारी
। श्रीराम अंतरी । धरी बापा ॥२३९॥ भक्तवत्सल हा । दीनांचा कैवारी । तो ही भवफेरी ।
थांबवतो ॥२४०॥ सत्य सत्य मान । बा मना वचन । श्रीरामचरण । धरी वेगे ॥२४१॥ नुपेक्षी
सर्वदा । टाळी रे आपदा । त्या श्रीरामपदा । सोडू नको ॥२४२॥ पदी राघवाचे सदा ब्रीद
गाजे । बळे भाक्तरीपूशिरी कांबी वाजे ॥ पुरी वाहिली सर्व जेणे विमानी । नुपेक्षी
कदा रामदासाभिमानी ॥२९॥ ब्रीद त्याचे मना । रक्षिणे रे भक्त । हे असे गर्जत ।
त्रिभुवनी ॥२४३॥ भक्त शत्रुमाथा । धनुष्यप्रहार । करी निरंतर । रक्षितो हा ॥२४४॥
शत्रु मग कोणी । असो सान थोर । त्यासी सोडणार । नाही राम ॥२४५॥ भक्त त्याचा जो
त्या । नेतसे वैकुंठी । मना धरी कंठी । श्रीरामासी ॥२४६॥ अयोध्या नगरी । नेली रे
वाहून । वैकुंठाकारण । जाण मना ॥२४७॥ तो श्रीराम कधी । नुपेक्षी भक्तासी । सर्वदा
मानसी । दृढ धरी ॥२४८॥ समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।
जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही । नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥३०॥ भक्त
रक्षिण्याचे । ब्रीद श्रीरामाचे । कोण वक्र कैचे । पाहे बापा ॥२४९॥ कोण आहे सांग ।
या त्रिभुवनात । शत्रु भक्ताप्रत । वक्रदृष्टी ॥२५०॥ रामरायाप्रती । सर्वही
वर्णिती । प्रेमे हेलावती । तिन्ही लोक ॥२५१॥ असा तो श्रीराम । न टाकी भक्तासी ।
प्रेमे हृदयासी । धरीतसे ॥२५२॥ महासंकटी सोडिले देव जेणे । प्रतापे बळे आगळा
सर्वगूणे । जयाते स्मरे शैलजा शूलपाणी । नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥३१॥ देव
रावणाच्या । बंदीत पडले । त्यासी सोडवले । रामराये ॥२५३॥ असा हा प्रतापी ।
भक्तप्रेमग्रस्त । विश्वही समस्त । भजतसे ॥२५४॥ सर्वगुणयुक्त । भक्तरिपुशास्ता ।
त्या श्रेष्ठ अनंता । भज बापा ॥२५५॥ ज्यासी भजे शिव । पार्वतीसहित । होवोनिया मत्त
। भज त्यासी ॥२५६॥ असा तो श्रीराम । भक्त-अभिमानी । त्याच्याच भजनी । लागे बापा
॥२५७॥ अहिल्या शिळा राघवे मुक्त केली । पदी लागता दिव्य होवोनि गेली जया वर्णिता
शीणली वेदवाणी । नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥३२॥ गौतमाच्या शापे । दगडाचे रूप ।
मिळे आपोआप । अहिल्येसी ॥२५८॥ पदस्पर्श होता । झाली शापमुक्त । रूप पूर्ववत ।
प्राप्त झाले ॥२५९॥ अशा श्रीरामाचे । वर्णिता हो गुण । वेदांनाही शीण । आला असे
॥२६०॥ भक्तवत्सल हा । असे मना राम । त्याचेच तू धाम । गाठी वेगे ॥२६१॥ वसे
मेरुमंदार हे सृष्टीलीळा । शशी सूर्यतारांगणे मेघमाळा । चिरंजीव केले जगी दास
दोन्ही । नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥३३॥ अफाट हे विश्व । हीच त्याची लीला ।
व्योमीं मेघमाला । निर्मिल्या रे ॥२६२ अनंत पर्वत । चंद्रसूर्यतारे । अनंत हे सारे
। विश्व त्याचे ॥२६३॥ विश्वाचा जो स्वामी । त्यासी वारंवार । करी नमस्कार । बा मना
तू ॥२६४॥ अगाध ही लीला । चिरंजीवपद । बिभीषणा प्रद । दिले असे ॥२६५॥ आणि निजनाम ।
मारुतिरायासी । तयाच्या मानसी । रहातसे ॥२६६॥ तूही नाम घेता । नुपेक्षी कधी तो ।
तुजसी सांगतो । वारंवार ॥२६७॥ उपेक्षा कदा रामरूपी असेना । जिवां मानवा निश्चय तो
वसेना । शिरी भार वाहेन बोले पुराणी । नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥३४॥ म्हणोनिया
मना । नको धरू शंका । सदा रामडंका । पिटवी तू ॥२६८॥ अजून का तुज । खरे ना वाटत ।
कसे पटवीत । जाऊ तुज ॥२६९॥ भगवद्गीतेमाजी । बोले भगवान । चिंता मी वाहेन । सर्व
तुझी ॥२७०॥ योगक्षेमाचाही । वाहीन मी भार । कृपा दासावर । करी नित्य ॥२७१॥ बा मना
अखंड । घेई त्याचे नाम । बाकी सारे भ्रम । दूर ठेवी ॥२७२॥ असा रामराया । तारितो
भक्तास । सर्वही सायास । दूर करी ॥२७३॥ असे हो जया अंतरी भाव जैसा । वसे हो तया
अंतरी देव तैसा । अनन्यास रक्षीतसे चापपाणी । नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥३५॥ परी
जाण मना । जेवढी रे भक्ती । तेवढीच प्राप्ती । होय तुज ॥२७४॥ जैसे रे भजन । तैसे
समाधान । भाव होता न्यून । दुरावे तो ॥२७५॥ भाव जो माईक । देव होतो ठक । असे हे
कौतुक असे मना ॥२७६॥ लेकरु वा माता । पती किंवा पिता । सखा स्वामी त्राता । सवंगडी
॥२७७॥ ज्या ज्या भावनेने । त्यासी भजशील । रुप ते घेईल । तुजसाठी ॥२७८॥ जाणे एक
भक्ती । तो रे रामराणा । भावाचा पाहुणा । म्हणोनिया ॥२७९॥ मना जेव्हा होई । भाव
घनीभूत । रूप होई प्राप्त । निर्गुणासी ॥२८०॥ भावार्थाच्या बळे । दृढ भगवंत । धरी
जीवनात । सांगतसे ॥२८१॥ अरे मना देव । पावला न जर । तुझा राग दूर । करी तूच ॥२८२॥
ऐके मना बापा । वाढवी तू भक्ती । तोच तुज शक्ती । देईल रे ॥२८३॥ रामावीण काही ।
अन्य तू ना मागे । तरी होसी वेगे । रामरूप ॥२८४॥ अनन्य वृत्तीने । भजताच त्यासी ।
राम दर्शनासी । देई बापा ॥२८५॥ राम कल्पतरु । प्रेमाचे आगरु । नेईल तो तारु ।
पैलतीरी ॥२८६॥ सदा सर्वदा देव संनीध आहे । कृपाळुपणे अल्प धारिष्ट पाहे । सुखानंद
आनंद कौवल्यदानी । नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥३६॥ देव आहे मना । हृदयाकशात ।
बाहेरी धुंडत राहू नको ॥२८७॥ नाही तीर्थक्षेत्री । नाही मंदिरात । देव हॄदयात ।
वास करी ॥२८८॥ असा तो श्रीराम । आहे तुजपासी । सोऽहंसाधनेसी । दृढ करी ॥२८९॥
संकटांसी वेगे । का न दूर करी । श्रीराम अंतरी । आहे तरी ॥२९०॥ ऐसी शंका मना ।
घेसी तरी ऐक । श्रीराम कौतुक । पाहातसे ॥२९१॥ तुझी रामावरी । भक्ती एकनिष्ठ । आहे
का ते स्पष्ट । पाहातसे ॥२९२॥ संकट सोसण्या । देतो तो सामर्थ्य । आता काय व्यर्थ ।
चिंता करी ॥२९३॥ पटताच खूण । देईल दर्शन । अल्प धैर्य जाण । पाहातसे ॥२९४॥ मग
आनंदासी । येईल भरती । आत्माराम प्राप्ती । होई तुज ॥२९५॥ मग काय उणे । तुजलागी
मना । आनंदभुवना । जाशील तू ॥२९६॥ आता करुनिया । एकरूप मन । रामाचे चरण । मनीं कोर
॥२९७॥ नुपेक्षी कदा तो । आपुल्या भक्तासी । बोल हे मानसी । दृढ धरी ॥२९८॥ सदा
चक्रवाकासी मार्तंड जैसा । उडी घालतो संकटी स्वामी तैसा । हरी भक्तीचा घाव गाजे
निशाणी । नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥३७॥ सूर्य मावळला । चक्रवाक दु:खी ।
चक्रवाकी सुखी । असे काय ॥२९९॥ विरह वेदना । मिटे रे सर्वथा । सूर्य उगवता ।
त्यांची सर्व ॥३००॥ सुखदु:खालागी । सूर्यचि कारण । असे मना जाण । चक्रवाका ॥३०१॥
नेणता रामासी । तुजलागी दु:ख । तुजलागी सुख । जाणता त्या ॥३०२॥ मनीं जरी होय ।
भक्तीचा उदय । देईल सदय । सुखालागी ॥३०३॥ परी प्रापंचिक । मागू नको सुख । असे वर्म
देख । येथील की ॥३०४॥ भक्त संकटात । सापडला जरी । करी तोच दूरी । सर्व घाव ॥३०५॥
भक्तीचा महिमा । गर्जतसे जनीं । भक्त-अभिमानी । धावे राम ॥३०६॥ मना प्रार्थना
तूजला एक आहे । रघूराज थक्कीत होऊनि पाहे । अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे । मना
सज्जना राघवी वस्ती कीजे ॥३८॥ सांगितले तुज । रामराजगुण । ध्यानी ते आणून । भक्ती
करी ॥३०७॥ भक्ती करी ऐशी । राम होई थक्क । प्रार्थना ही एक । तुज आहे ॥३०८॥ अवमान
करु । नको बोलण्याचा । नि अविश्वासाचा । थारा नको ॥३०९॥ रे मना सज्जना । रामाचे
चिंतन । करी रात्रंदिन । सांगे तुज ॥३१०॥ निष्काम प्रेमाने । करी त्याची भक्ती ।
स्मर त्यासी चित्ती । निरंतर ॥३११॥ जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे । जयाचेनि योगे
समाधान बाणे । तयालागी हे सर्व चांचल्य दीजे । मना सज्जना राघवी वस्ती कीजे ॥३९॥
वेद आणि शास्त्रे । पुराणे वर्णिती । एका रामाप्रती । बा रे मना ॥३१२॥ एकरूप होता
। मिळे समाधान । देई तू सोडून । चंचलता ॥३१३॥ सर्वही व्यापार । मनी जे उठती ।
रामराजाप्रती । अर्पावे की ॥३१४॥ सर्वभावे एक । दृढ धरी मना । अरे रामराणा ।
हृदयात ॥३१५॥ मना पाविजे सर्वही सूख जेथे । अती आदरे ठेविजे लक्ष तेथे । विवेके
कुडी कल्पना पालटिजे । मना सज्जना सज्जन्नी वस्ती कीजे ॥४०॥ मना पावशील । सुख तू
सर्वही । जेथे राम राही । सर्वकाळ ।३१६॥ रामाचे चिंतन । करी आदराने । आणिक तू मने
। घेऊ नको ॥३१७॥ वाईट वासना । विवेके सोडावी । आणिक धरावी । शुद्ध बुद्धी ॥३१८॥
भक्तवत्सल हे । ब्रीद मिरवतो । भक्तासी पाहतो । अति प्रेमे ॥३१९॥ म्हणोनिया मना ।
धरी एक छंद । रामनाम वद । नित्य वाचे ॥३२०॥ बहु हिंडता सौख्य होणार नाही । शिणावे
परी नातुडे हीत काही । विचारे बरे अंतरा बोधवीजे । मना सज्जना राघवी वस्ती कीजे
॥४१॥ बा मना सज्जना । नको वणवण । करु, सारे क्षण । व्यर्थ जाती ॥३२१॥ हिंडसी देऊळे ।
हिंडसी राऊळे । तीर्थी ना आढळे । सुख बापा ॥३२२॥ सर्व वेद ग्रंथ । वाचलेस जरी ।
सुख नाही परी । खरे त्यात ॥३२३॥ रामा विसरसी । तीर्थात हिंडसी । असे गया काशी ।
धोंडा पाणी ॥३२४॥ नाना मार्ग तुज । कथिले लोकांनी । सर्व त्या मार्गांनी । धाऊ नको
॥३२५॥ तीर्थ व्रत कर्म । दान दया धर्म । पाळावा स्वधर्म । म्हणतील ॥३२६॥ परी
सारासार । विचार करावा । अरे ओळखावा । आत्माराम ॥३२७॥ विवेक सार्थक । वैराग्य भेदक
। प्रयत्न अचूक । करावा रे ॥३२८॥ राम-आत्माराम । होती एकरूप । विचार निष्कंप ।
ठसवी तू ॥३२९॥ बहुतांपरी हेचि आता धरावे । रघूनायका आपुलेसे करावे । दीनानाथ हे
तोडरी ब्रीद गाजे । मना सज्जना राघवी वस्ती कीजे ॥४२॥ किती प्रकारांनी । समजाऊ तुज
। एक रामराज । दृढ धरी ।३३०॥ एक रामरत्न । हातमधे येण्या । करावे प्रयत्ना ।
बहुतसे ॥३३१॥ प्रेमाने ते जन । वश, अनुभव । मग काय देव । वश नाही ॥३३२॥ पायीचे
तोडर । सांगते गर्जून । “ मी भक्त रक्षण । करीतसे ” ॥३३३॥
कंठरव त्याचा । ऐकूनिया मना । रामाच्या चरणा । भज नित्य ॥३३४॥ तन-मन-धन । रामासी
अर्पून । कौसल्यानंदन । दृढ धरी ॥३३५॥ मना सज्जना येक जीवी धरावे । जनीं आपुले हीत
तूवा करावे । रघुनायकावीणा बोलो नको हो । सदा मानसी तो निदिध्यास राहो ॥४३॥ बा मना
सज्जना । एक ध्यानीं धर । जन्मलास नर । हीत करी ॥३३६॥ रामा न भजता । रामा न पाहता
। तसाच तू जाता । जिणे व्यर्थ ॥३३७॥ रामावीण काही । बोलू नको पाही । निदिध्यासी
राही । निरंतर ॥३३८॥ श्रवण मनन । ध्यास निरंतर । तरी साक्षात्कार । होई तुज ॥३३९॥
जन्मल्यासारिखे । स्वहीत तू साधी । निरर्थ उपाधी । गुंतू नको ॥३४०॥ मना रे जनीं
मौन मुद्रा धरावी । कथा आदरे राघवाची करावी । नसे राम ते धाम सोडूनि द्यावे ।
सुखालागी आरण्य सेवीत जावे ॥४४॥ वश जरी जिव्हा । राम मिळे तेव्हा । विचार पहावा ।
हही एक ॥३४१॥ व्यर्थ बडबड । करू नको मना । कलह कारणा । तीच होते ॥३४२॥ अरे
परमार्थी । मौन हे साधन । तेणे सच्चिद्घन । प्राप्त होई ॥३४३॥ न बोलणे नव्हे । खरे
खरे मौन । मौनात चिंतन । श्रीरामाचे ॥३४४॥ श्रवण रामाचे । चिंतन रामाचे । मनन
रामाचे । करी नित्य ॥३४५॥ बोलावेसे वाटे । तेव्हा हरिकथा । तेणे श्रोता वक्ता ।
आनंदेल ॥३४६॥ जिथे नाही राम । सोडावे ते धाम । सेवी मना नाम । अखंडित ॥३४७॥
सुखासाठी करी । एकांतात वास । मौनाचा अभ्यास । दृढ करी ॥३४८॥ एकांत वासासी । जाशील
अरण्यीं । विषय ते मनीं । घेवोनिया ॥३४९॥ कसा होई सांग । अरण्यीं अभ्यास ।
विषयांचा ध्यास । जरी मनीं ॥३५०॥ विषयांचा त्याग । करुनिया घरी । राहशील तरी ।
अरण्य ते ॥३५१॥ हीच योगयुक्ती । हीच रे विरक्ती । हीच अनासक्ती । हीच भक्ती ॥३५२॥
जयाचेनि सांगे समाधान भंगे । अहंता अकस्मात येऊनि लागे तिये संगतीची जनीं कोण गोडी
। जिये संगतीने मती राम सोडी ॥४५॥ मौनव्रत आणि । हरिकथा दुजे । एकांत हे तिजे ।
साधन रे ॥३५३॥ करु नको मना । दुर्जन संगती । सज्जनसंगती । लाभ तुज ॥३५४॥
दुर्जन-संगती । नाही समाधान । अरे अहंपण । फोफावते ॥३५५॥ अशा संगतीची । नको रे
आवडी । विषयांची गोडी । वाटे जेणे ॥३५६॥ विषयात मन । रंगून राहता । राम हातोहाता ।
निसटेल ॥३५७॥ मना जे घडी राघवेवीण गेली । जनीं आपुली ते तुवा हानी केली ।
रघुनायकावीण तो शीण आहे । जनीं दक्ष तो लक्ष लाऊनी पाहे ॥४६॥ जाई जो जो क्षण ।
रामरायावीण । तुजलागी शीण । होवो मना ॥३५८॥ तुझे तू अहित । मना करितोसी । रामा न
भजसी । म्हणोनिया ॥३५९॥ विषयांचे विष । सेवोनिया नित्य । परमात्मा सत्य । मिळे
कैसा ॥३६०॥ आत्महितासाठी । होई रे तू दक्ष । लाऊनिया लक्ष । रामापायी ॥३६१॥ मनीं
लोचनी श्रीहरी तोचि पाहे । जनीं जाणता भक्त होऊनि राहे । गुणीं प्रीती राखे क्रमू
साधनाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥४७॥ आत्मस्वरूपात । असे जो निरत । जाणता
तो भक्त । असे मना ॥३६२॥ दृष्टीने तो पाही । अंतर्बाह्य हरी । आत्मसाक्षात्कारी ।
म्हणोनिया ॥३६३॥ सगुण निर्गुण । तयासी समान । तरीही साधन । करी नित्य ॥३६४॥
त्य़ाचिया दृष्टीसी । सर्वत्र श्रीराम । दिसे सर्व काम । राममय ॥३६५॥ भक्त होवोनिया
। राहे श्रीरामाचा । आणिक भवाचा । त्याग करी ॥३६६॥ पाही सर्वत्र श्रीराम । घेई
त्याचे नित्य नाम ॥३६७॥ पाही सम सर्वाठायी । त्याची थोरी वर्णू कायी ॥३६८॥ भक्त
होवोनिया राहे । सुखदु:ख सर्व साहे ॥३६९॥ प्रीती असे रामगुणीं । आणि भक्ती
रामचरणीं ॥३७०॥ दास धन्य जगी तोचि । करी भक्ती जो रामाची ॥३७१॥ सदा देवकाजी झिजे
देह ज्याचा । सदा रामनामे वदे नित्य वाचा । स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा । जगी
धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥४८॥ देह विवेके झिजवी । सदा नामामृत सेवी ॥३७२॥ रामनाम
वदे नित्य । सोडी सर्व जे अनित्य ॥३७३॥ स्वधर्माचे आचरण । हेचि त्याचे रे जीवन
॥३७४॥ तो रे उत्तम पुरुष । असे रामाचा जो दास ॥३७५॥ नाही विषय आहार । रामनामावरी
भर ॥३७६॥ दास धन्य जगी तोचि । करी भक्ती जो रामाची ॥३७७॥ सदा बोलिण्यासारिखे
चालताहे । अनेकी सदा एक देवासी पाहे । सगूणीं भजे लेश नाही भ्रमाचा । जगी धन्य तो
दास सर्वोत्तमाचा ॥४९॥ जैसा बोले तैसा चाले । बोले ते जे अनुभवले ॥३७८॥ नित्य पाही
अनेकात । एक तो रे भगवंत ॥३७९॥ निर्गुण नि निराकार । व्यापे तोच चराचर ॥३८०॥ असे
असूनीही ज्ञान । करी सगुण भजन ॥३८१॥ जरी सगुणात रंगे । राही निर्गुणाच्या संगे
॥३८२॥ एक सगुण निर्गुण । ज्ञान त्याचे परिपूर्ण ॥३८३॥ परिपूर्ण ज्ञान असता । नाही
भ्रमाची ती सत्ता ॥३८४॥ दास धन्य जगी तोचि । करी भक्ती जो रामाची ॥३८५॥ नसे अंतरी
कामकारी विकारी । उदासीन जो तापसी ब्रह्मचारी । निवाला मनी लेश नाही तमाचा । जगी
धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५०॥ नाही अंतरात काम । नाही विकार मलीन ॥३८६॥ फाटा देई
विकारांसी । मन रामरायापासी ॥३८७॥ वृत्ती अती उदासीन । सदा स्वरूप-चिंतन ॥३८८॥ राही
विषयी अलिप्त । होत नाही कदा तप्त ॥३८९॥ नैष्ठिक तो ब्रह्मचारी । तपस्वी नि
सदाचारी ॥३९०॥ राही मनाने जो शांत । तोचि असे खरा भक्त ॥३९१॥ अज्ञानाचा अंध:कार ।
राही सारूनिया दूर ॥३९२॥ नाही तमोगुण लेश । नित्य विवेक-प्रकाश ॥३९३॥ दास धन्य जगी
तोचि । करी भक्ती जो रामाची ॥३९४॥ मदे मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी । प्रपंचिक
नाही जयाते उपाधी । सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा
॥५१॥ मद नाही तारुण्यात । नाही मत्सर मनात ॥३९५॥ नाही मनीं स्वार्थ बुद्धी । नाही
रंगत उपाधी ॥३९६॥ नाही प्रपंची गुंतणे । नाही आसक्ती रंगणे ॥३९७॥ त्याचे बोलणे
चालणे । असे अति नम्रपणे ॥३९८॥ करी मधुर भाषण । ऐकताच तृप्त कान ॥३९९॥ सत्य बोलणे
रे त्याचे । आणि असते हिताचे ॥४००॥ दास धन्य जगी तोचि । करी भक्ती जो रामाची ॥४०१॥
क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे । न लिंपे कदा दंभवादे विवादे । करी सूखसंवाद जो
ऊगमाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५२॥ धरी परमात्वतत्व । सोडोनिया सर्व
स्वत्व ॥४०२॥ करी रामाचे चिंतन । बोले त्या अनुसरून ॥४०३॥ ऐसा वेळ क्रमितसे । राम
सर्वत्रच भासे ॥४०४॥ होई वादात प्रबोध । रमेना तो विवादात ॥४०५॥ कधी नाही सोंग
ढोंग । भरे जगी रामरंग ॥४०६॥ परब्रह्माकडे धावे । त्याचे मन रे स्वभावे ॥४०७॥ घेई
उगमाचा शोध । होई त्यालाच रे बोध ॥४०८॥ दास धन्य जगी तोचि । करी भक्ती जो रामाची
॥४०९॥ सदा आर्जवी प्रिय जो सर्वलोकी । सदासर्वदा सत्यवादी विवेकी । न बोले कदा
मिथ्य वाचा त्रिवाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५३॥ वायु रवी शशी जळ । तैसा
सर्वांशी प्रेमळ ॥४१०॥ नाही निष्कपटवृत्ती । सर्व त्याचे गुण गाती ॥४११॥ गोड बोले
सदा वाचे । नित्य चिंतन रामाचे ॥४१२॥ सर्वांना तो वाटे प्रिय । नाही क्षूद्रता
संशय ॥४१३॥ सत्य बोलतो सर्वदा । अविवेक ना करी कदा ॥४१४॥ नाही परेत असत्य । कैसे
येई वैखरीत ॥४१५॥ दास धन्य जगी तोचि । करी भक्ती जो रामाची ॥४१६॥ सदा सेवी आरण्य
तारुण्यकाळी । मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी । चळेना मनीं निश्चयो दृढ ज्याचा । जगी
धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५४॥ त्यास वैराग्य आवडे । यौवनीं गिरवी धडे ॥४१७॥ ध्येय
परमेशप्राप्ती । राही म्हणोनि एकांती ॥४१८॥ असता तरुणपण । करी एकांतसेवन ॥४१९॥
नाही चित्ताचा विक्षेप । त्याची ब्रह्माकडे झेप ॥४२०॥ कल्पनांच्या गोंधळात । नाही
कदा सापडत ॥४२१॥ सदा स्वरूपचिंतन । नाही विषयांचे भान ॥४२२॥ चुकोनिया विचलित ।
नाही कधी मनीं होत ॥४२३॥ त्याचा अढळ निश्चय । त्य़ाचे धारिष्ट्य अक्षय ॥४२४॥ नाही
प्रपंच विचार । राम दर्शना अधीर ॥४२५। दास धन्य जगी तोचि । करी भक्ती जो रामाची
॥४२६॥ नसे मानसी नष्ट आशा दुराशा । वसे अंतरी प्रेमपाशा पिपासा । ऋणी देव हा
भक्तिभावे जयाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५५॥ मनीं नाही दुष्ट आशा । नाही
वाईट आकांक्षा ॥४२७॥ असे नि:स्वार्थी निरिच्छ । मन विशुद्ध नि स्वच्छ ॥४२८॥ त्यासी
एकचि तहान । करी रामप्रेमपान ॥४२९॥ देवदर्शनाचा ध्यास । साक्षात्कार आशापाश ॥४३०॥
भक्तिभावाची कहाणी । देव त्याचा होई ऋणी ॥४३१॥ ऋण भक्ताचे त्यावरी । प्रेम व्याज
देई हरी ॥४३२॥ मावळला द्वैतभाव । एक भक्त एक देव ॥४३३॥ दास धन्य जगी तोचि । करी
भाक्ती जो रामाची ॥४३४॥ दिनाचा दयाळु मनाचा मवाळु । स्नेहाळु कृपाळु जनीं दास पाळू
। तया अंतरी क्रोध संताप कैंचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५६॥ दया
दीनदुबळ्यांची । येई करुणाही त्यांची ॥४३५॥ दीन असहाय पाहून । दास जाई कळवळून
॥४३६॥ त्यांची संकटे पाहून । करी दु:खनिवारण ॥४३७॥ असे मनाने कोमल । तापल्याला
गंगाजल ॥४३८॥ त्याला विश्वचि सोईरे । मनीं करुणा पाझरे ॥४३९॥ स्नेहभाव सर्वांभूती
। जणू ईश्वरी विभूती ॥४४०॥ पडे जो जो आपत्तीत । त्यासी करी हा मदत ॥४४१॥
सर्वांभूती ऐक्यबोध । नाही कोणावरी क्रोध ॥४४२॥ कधी होई ना जो रागी । नाही जळफळाट
अंगी ॥४४३॥ दास धन्य जगी तोचि । करी भक्ती जो रामाची ॥४४४॥ जगी होईजे धन्य या
रामनामे । क्रिया भक्ती ऊपासना नित्यनेमे । उदासीनता तत्वता सार आहे । सदा सर्वदा मोकळी
वृत्ती राहे ॥५७॥ सांगितले तुज । दासाचे लक्षण । त्यासी जे भूषण । होत असे ॥४४५॥
मना आता तैसा । वागता आपैसा । भेटेल राजसा । रामराज ॥४४६॥ जगी होसी धन्य । घेता
रामनाम । कैवल्याचे धाम । गाठशील ॥४४७॥ करी तू सत्कर्मे । जाई भक्तिमार्गे ।
आणिकांची वर्मे । बोलू नको ॥४४८॥ सतत अभ्यास । हीच उपासना । करी नित्य मना । सांगे
तुज ॥४४९॥ नको व्रते नेम । नको तीर्थाटन । करी तू स्मरण नित्यनेमे ॥४५०॥ पाण्याची
ती धार । फोडिते पत्थर । वासनांचे थर । नष्ट होती ॥४५१॥ नित्य नियमाचे । महत्व तू
लक्षी होवोनिय साक्षी । राहे आता ॥४५२॥ अनासक्ती हेच । साधनांचे सार । उदासीन धर ।
वृत्ती अंगी ॥४५३॥ यदृच्छेने लाभ । जो रे जीवनात । संतुष्ट तयात । राही बापा ॥४५४॥
मी कर्ता मी भोक्ता । नको अहंकार । तो चि रे आधार । पुनर्जन्मा ॥४५५॥ राहतील दूर ।
विषय-विकार । वृत्ती आत्माकार । होता बा रे ॥४५६॥ वृत्ती निरासक्त । होसी
जीवन्मुक्त । याच जीवनात । बा रे मना ॥४५७॥ जीवनी राहून । मुक्ती अनुभव । घेशील
सदैव । बा रे मना ॥४५८॥ नको वासना वीषई वृत्तीरूपे । पदार्थी जडे कामना पूर्वपापे
। सदा राम निष्काम चिंतीत जावा । मना कल्पनालेश तोही नसावा ॥५८॥ विषय चिंतन ।
करिसी रे मना । वाढती वासना । नाना रूपे ॥४५९॥ प्रथम कल्पना । त्यातून वासना । मग
ती कामना । जन्म घेई ॥४६०॥ कामनेने होते । बहिर्मुख वृत्ती । विषय प्रवृत्ति ।
वाढतसे ॥४६१॥ मग जन्मोजन्मी । भोगावेत भोग । हा तो भावरोग । जीवापाठी ॥४६२॥
पूर्वसंचिताने । वाढता आसक्ती । मग तुज मुक्ती । कदा नाही ॥४६३॥ या जन्मी जे केले
। पुढे ते भोगावे । असे सांग घ्यावे । किती जन्म ॥४६४॥ आसक्तीच जाण । जन्मासी कारण
। होते रे म्हणून । सोडी तीच ॥४६५॥ बुद्धीचा विलास । कल्पनांचा सोस । त्यापाठी
कशास । धावावे रे ॥४६६॥ निष्कामभजने । होते चित्तशुद्धी । स्वरूपात बुद्धी । स्थिर
होई ॥४६७॥ मग कल्पनेचा । लेश तो न उरे । स्वस्वरूपाकारे । रंगशील ॥४६८॥ सकाम भजने
। मिळे पुनर्जन्म । म्हणोन निष्काम । सर्वश्रेष्ठ ॥४६९॥ मना कल्पना कल्पिता
कल्पकोटी । नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी । मनीं कामना राम नाही जयाला । अति आदरे
प्रीती नाही तयाला ॥५९॥ कोट्यावधी युगे । आली आणि गेली । परी ना संपली । कल्पना ती
॥४७०॥ कल्पना अनंत । तयांसी ना अंत । सांगताती संत । ऐके बापा ॥४७१॥ कल्पना अतीत ।
राम आहे सत्य । कल्पनेने प्राप्त । कसा होई ॥४७२॥ येवो मृत्यु, निज
। कल्पनांचे बीज । रहाते सहज । अक्षय की ॥४७३॥ कल्पना आधारे । नाही राम-भेटी ।
पदरी शेवटी । फोलपट ॥४७४॥ ज्याच्या मनीं काम । त्यासी नाही राम । त्यासी नाही
प्रेम । रामापायी ॥४७५ कल्पनांचा नाश । जेव्हा रे होईल । तेव्हा तो मिळेल ।
आत्माराम ॥४७६॥ मग आत्मारामी । जडेल रे प्रीती । मग नाही गती । कल्पनांची ॥४७७॥
मना राम कल्पतरु कामधेनु । निधी सार चिंतामणी काय वानूं । जयाचेनि योगे घडे सर्व
सत्ता । तया साम्यता कायसी काय आता ॥६०॥ राम कल्पतरु । राम कामधेनु । तयाचे मी
वानू । काय गुण ॥४७८॥ सारंचेही सार । कुबेराचा धनी । आणि चिंतामणी । राम आहे ॥४७९॥
ज्याचिया संयोगे । अस्तित्व विश्वाला । त्या रामरायाला । भज नित्य ॥४८० रामसी उपमा
। द्यावी रे कशाची । बरोबरी त्याची । तोच करी ॥४८१॥ उभा कल्पवृक्षतळी दु:ख वाहे ।
तया अंतरी सर्वदा तोचि आहे । जनीं सज्जनीं वाद हा वाढवावा । पुढे मागुता शोक जीवीं
धरावा ॥६१॥ कल्पवृक्षाखाली । रहूनिया उभे । मनीं दु:ख राहे । जरी सदा ॥४८२॥ कैसी
मग तया । प्राप्ती रे सुखाची । भोगील दु:खचि । सर्वकाळ ॥४८३॥ कल्पतरुतळी । सुखाची
कामना । होईल रे मना । परिपूर्ण ॥४८४॥ अखंडित सुख । कामना नाशात । हे तुज माहीत ।
असे बापा ॥४८५॥ तैसे राहूनिया । रामापासी मना । करु नको नाना । विवाद रे ॥४८६॥
वादविवादाने । किंवा चातुर्याने । किंवा तो चर्चेने । प्रप्त नाही ॥४८७॥ वाद
वाढविता । अंती तुज शोक । होईल नि:शंक । ऐके बापा ॥४८८॥ शुष्क वाद वेड्या । वाढवू
नको रे । भक्तिमार्गाने रे । प्राप्त हरी ॥।४८९॥ निजध्यास तो सर्व तूटोनि गेला ।
बळे अंतरी शोक संताप ठेला । सुखानंद आनंद भेदे बुडाला । मना निश्चयो सर्व खेदे
उडाला ॥६२॥ आत्माराम असा । आत्माराम तसा । हा वाद कायसा । हवा तुज ॥४९०॥ वाद हा
घातक । वाद हा मारक । अहितकारक । वाद आहे ॥४९१॥ चिंतनसी थारा । नाही रे मिळत ।
जाशी वाढवीत । वाद जरी ॥४९२॥ वाद करी नाश । साधन अभ्यास । संशयाचा पाश । दृढ होई
॥४९३॥ अंतरात वस्ती । शोक संतापाची । होते सर्वदाचि । वादामुळे ॥४९४॥ जिंकण्या
स्पर्धक । विवाद प्रवृत्ती । अभिमानवृत्ती । वाढतसे ॥४९५॥ स्वचे विस्मरण ।
षड्रिपुसर्पण । द्वैतवाढवण । विवाद हा ॥४९६॥ द्वैतबुद्धीनेच । लोपे सुख शुद्ध ।
मावळे आनंद । मानसीचा ॥४९७॥ अंतरात खेद । मनीं ना आनंद । तो स्वरूपानंद । भेटे
कैचा ॥४९८॥ पुनवेनंतर । चंद्र जैसा क्षीण । तैसी निष्ठा जाण । क्षीण वादे ॥४९९॥
घरी कामधेनू पुढे ताक मागे । हरिबोध सांडूनि वेवाद लागे । करी सार चिंतामणी काचखंडे
। तया मागता देत आहे उदंडे ॥६३॥ ताक मागे मूर्ख । दुसर्याच्या घरी । कामधेनू घरी
। असोनिया ॥५००॥ तैसा तो स्वानंद । तुझा तुझ्यापाशी । कशास फिरसी दारोदार ॥५०१॥
तुझे सुख असे । तुझ्यापाशी मना । विवाद तू नाना । नको करू ॥५०२॥ परमात्मरूप ।
बुद्धिचातुर्याने । वादविवादाने । कळेना रे ॥५०३॥ त्वचेच्या पदरा । दूध असे आड ।
रक्त ते गोचीड । पीत असे ॥५०४॥ तैसा परमात्मा । अहे तुझ्यापाशी । आणि तू शोधीसी ।
इतरत्र ॥५०५॥ चिंतमणी हाती । असोनि मागती । कांचखड्याप्रती । अज्ञ जन ॥५०६॥ आत्मा
चिंतामणी । आहे तुजपासी । संवाद तयासी । साधावा रे ॥५०७॥ आत्मसंवदात । पूर्ण ते
इच्छित । कामनांचा अंत । होत असे ॥५०८॥ अती मूढ त्या दृढ बुद्धी असेना । अती काम
त्या राम चित्ती वसेना अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा । अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा
॥६४॥ काम आणि लोभ । द्वार नरकाचे । बोल श्रीकृष्णाचे । गीतेमाजी ॥५०९॥ कामी आणि
लोभी । मानव तो मूढ । नसे बुद्धी दृढ । हरिपायी ॥५१०॥ वसत नाही रे । चित्तांतरी
राम । अंतरात काम । असे ज्याच्या ॥ ५११॥ काम जो अपूर्ण । येई क्रोध वेगे ।
क्रोधाचिया संगे । सर्वनाश ॥५१२॥ काम जो पुरला । लोभ बळवला । लोभाने जीवाला ।
अशांतीच ॥५१३॥ काम-लोभे वाढे । तामसी प्रवृत्ती । जी नाही रे अंती । हितावह ॥५१४॥
काम-लोभासक्त । असेल जो कोणी । त्याची दीनवाणी । स्थिती होई ॥५१५॥ नको दैन्यवाणे
जिणे भक्तीऊणे । अति मूर्ख त्या सर्वदा दु:ख दूणे । धरी रे मना आदरे प्रीति रामी ।
नको वासना हेमधामी विरामी ॥६५॥ भक्तिवीण जिणे । नको दैन्यवाणे । भगवंताकारणे । भज
नित्य ॥५१६॥ ज्याने जन्म दिला । त्यासी विसरला । भोगात रमला । नरदेही ॥५१७॥ आहार
मैथून । निद्रा आणि भय । हे तो नसे काय । अन्य योनीं ॥५१८॥ मानवासी दिली ।
बुद्धीची देणगी । विषयोपभोगी । रमण्यास ? ॥५१९॥ श्वान वा सूकर । किंवा म्हणू खर । केवळ
आकार । मानवाचा ॥५२०॥ असा तो मानव । विषयवासनी । स्वसुखची हानी । करीतसे ॥५२१॥
सुखापाठी धावे । दु:ख ते भोगावे । आपुल्या स्वभावे । लागे त्याला ॥५२२॥ खरे सुख
नाही । त्यासी भक्तिवीण । असे नुकसान । दुहेरी ते ॥५२३॥ दु:ख तो भोगतो । दु:ख
उगाळतो । आणि मनीं होतो । दु:खी सदा ॥५२४॥ जाऊनिया दु:ख । यावे सुख जर । भगवंतावर
। प्रेम करी ॥५२५॥ रामावरी प्रीती । रामावरी भक्ती । रामाचीच प्राप्ती । होईल रे
॥५२६॥ प्रासादी राहीन । वैभवी लोळीन । पक्वान्ने खाईन । पंच पंच ॥५२७॥ नको धरु मना
। ऐशी तू कामना । त्यज त्या वासना । झडकरी ॥५२८॥ नव्हे सार संसार हा घोर आहे । मना
सज्जना सत्य शोधूनि पाहे । जनीं वीष खात पुढे सूख कैचे । करी रे मना ध्यान या
राघवाचे ॥६६॥ विषय क्षणिक । अंती दुखरूप । चिरंतन सुख । त्यात नाही ॥५२९॥ विषय
भोगावे । मरावे जन्मावे । असे सांग घ्यावे । किती फेरे ॥५३०॥ जेथे संसरण । तो हा
रे संसार । हा तो भवपार । नेईना रे ॥५३१॥ मना सारासार । विचार तू कर । कसा पडणार ।
बाहेरी तू ॥५३२॥ हा तो भयानक । अनुभवसी हे । संग लवलाहे । सोड त्याचा ॥५३३॥ विषय
ते कडू । वाटती ते गोड । अरे अवघड । प्रमेय हे ॥५३४॥ सत्य ते शोधता । कळेल तत्वता
। त्यात असारता । आहे बापा ॥५३५॥ भरले संसारी । आसक्तीचे विष । मोहाचा तो पाश ।
गळी पडे ॥५३६॥ या विषापासून । व्हावया सुटका । पीट रामडंका । सर्वकाळ ॥५३७॥ घेई
रामनाम । सोडी सर्व काम । तुजसी आराम । मिळे बापा ॥५३८॥ श्रीराम तो आहे । भक्तांचा
कैवारी । त्य़ाचे ध्यान करी । नित्यनेमे ॥५३९॥ घन:शाम हा राम लावण्यरूपी । महाधीर
गंभीर पूर्णप्रतापी । करी संकटी सेवकाचा कुडावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा
॥६७॥ सगुण आधारे । पाविजे निर्गुण । त्यासाठी तू ध्यान । करी नित्य ॥५४०॥ राम हा
सावळा । नि अति सुंदर । असे रूप धर । मनामाजी ॥५४१॥ राम धैर्यवंत । तो प्रतापवंत ।
तोच शक्तिवंत । असे जाणा ॥५४२॥ ध्यान सदोदित । करूनि हो शांत । वृत्ती विचलित । न
च होई ॥५४३॥ संकटी पडल्या । भक्तास तो रक्षी । हीच आहे साक्षी । पुराणाची ॥५४४॥
प्रभात समयी । ऐसे करी ध्यान । रूप ते अगुण । चिंतूनिया ॥५४५॥ बळे आगळा राम कोदंड
धारी । महाकाळ विक्राळ तोही थरारी । पुढे मानवा किंकरा कोण केवा । प्रभाते मनीं
राम चिंतीत जावा ॥६८॥ राम धनुर्धारी । संकट निवारी । नाही याची सरी । कोणासीही
॥५४६॥ सामर्थ्य संपन्न । राम असे जाण । त्यासी रे शरण । जाई वेगे ॥५४७॥ काळाचाही
पाड । नाही रामापुढे । म्हणून तू जोडे । श्रीरामासी ॥५४८॥ क्षुद्र मानवा रे । काळा
घाबरसी । आणि अहंतेसी । का रे धरी ॥५४९॥ सोडोनि अहंता । श्रीराम चिंतिता । तुज एक
त्राता । तोचि होई ॥५५०॥ म्हणोनि रे मना । श्रीराम चिंतावा । एक ध्यानी घ्यावा ।
रामराज ॥५५१॥ सुखानंदकारी निवारि भयाते । जगी भक्तिभावे भजावे तयाते । विवेके
त्यजावा अनाचार हेवा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥६९॥ भय ते निवारी । दु:ख दूर
करी । सुखाची ती सरी । घाली गळा ॥५५२॥ देहबुद्धी तोडी । आत्मबुद्धी जोडी । येईल
रोकडी । प्रचीती रे ॥५५३॥ हवे जर तुज । सुख चिरंतन । प्रेमाने भजन । करी त्याचे
॥५५४॥ प्रेमभावे मना । श्रीरामासी भज । तोच देई तुज । निजधन ॥५५५॥ टाकी अनाचार ।
मत्सरासी दूर । लोटोनि तू धर । रामपाय ॥५५६॥ नेती षड्विकार । तुजसी सुदूर । नरकात
घोर । घालिताती ॥५५७॥ अनाचार हेवा । त्यजूनि सत्वर । करी अंगिकार श्रीरामाचा ॥५५८॥
प्रभात समयी नाव त्याचे घेई । पळोनिया जाई । भवदु:ख ॥५५९॥ सदा रामनामे वदा
पूर्णकामे । कदा बाधिजेना पदा नित्यनेमे । मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७०॥ रामनाम मंत्र । नित्य वदे वाचे । त्रिविध
तापांचे । भस्म होई ॥५६०॥ निष्काम मनाने । श्रीराम जपता । आपत्तीची बाधा । तुज
नाही ॥५६१॥ नामा आड येती । आळस नि गर्व । ते तू तोडी सर्व । झडकरी ॥५६२॥ मन:पूर्वक
तू । करी रे चिंतन । रामनामधन । जोडी वेगे ॥५६३॥ जयाचेनि नामे महादोष जाती ।
जयाचेनि नामे गती पाविजेती । जयाचेनि नामे घडे पुण्यठेवा । प्रभाते मनीं राम
चिंतीत जावा ॥७१॥ श्रीरामस्मरणे । दोष दूर होती । म्हणोनिया धरी । श्रीराम तू
॥५६४॥ पुण्याचा संचय । भक्तीचा उदय । रामनामे होय । ऐके बापा ॥५६५॥ पावशील मना ।
उत्तम गतीसी । जरी नाम घेसी । भक्तिभावे ॥५६६॥ नामाचे स्मरण । हेचि पुण्य जाण ।
नामविस्मरण । हेचि पाप ॥५६७॥ न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही । मुखे नाम उच्चारता
कष्ट नाही । महाघोर संसार शत्रु जिणावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७२॥ नाम
उच्चारण । सोपे हे साधन । सुखे मोक्षधन । हाती येई ॥५६८॥ नको यज्ञयाग । नको
तीर्थाटन । सुलभ साधन । नाम जप ॥५६९॥ नको व्रत नेम । ब्राह्मण भोजन । मंत्रांचे
पठण । नको नको ॥५७०॥ नको वनांतर । नको रे मंदिर । एक बरे घर । नाम घेण्या ॥५७१॥
नाम उच्चारता । कष्ट नाही जीवा । श्रीराम जपावा । सदोदित ॥५७२॥ किंवा सांग काय ।
खर्च होई धन । श्रीराम स्मरण । करिता रे ॥५७३॥ महाघोर ऐसा । संसार हा जरी । तरशील
तरी । नाम घेता ॥५७४॥ म्हणोनिया मना । रामनाम स्मर । काळाचाही दर । नाही तुज ॥५७५॥
देहेदंडणेचे महादु:ख आहे । महादु:ख ते नाम घेता न राहे । सदाशीव चिंतीतसे देवदेवा
। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७३॥ उपास तापास । चांद्रायण व्रत । कथिले शास्त्रात
। उपाय ते ॥५७६॥ देहदंडनास । विविध साधना । तयात यातना । कितीतरी ॥५७७॥ नामापरते
अन्य । नाही रे साधन । सुलभ सोपान । हाचि बापा ॥५७८॥ कितीही ते दु:ख । प्राप्त जरी
तुज । जाशील सहज । भवपार ॥५७९॥ त्रैलोक्य कल्याण । सधावया जाण । विष ते प्राशन ।
केले शिवे ॥५८०॥ त्या देहयातना । अरे शमविण्या । स्मरे रामराणा । अंतरात ॥५८१॥ ऐसा
रे प्रभाव । श्रीरामनामाचा । जप तू ग वाचा । भावबळे ॥५८२॥ बहुतांपरी संकटे
साधनांची । व्रते दान उद्यापनें ती धनाची । दिनाचा दयाळू मनी आठवावा । प्रभाते
मनीं राम चिंतीत जावा ॥७४॥ बा मना सज्जना । साधने अनेक । श्रीराम पावक । मिळविण्या
॥५८३॥ परी सर्व जाण । कष्टासी कारण । वाया तुज शीण । होईल रे ॥५८४॥ देह तो दुर्बळ
। स्थिती प्रतिकूल । नाही अनुकूल । स्थल काल ॥५८५॥ ह्यांच्यावरी मात । तूही करशील
। परी तू जाशील । थकुनी रे ॥५८६॥ म्हणसील करू । व्रते उद्यापने । श्रीहरी दानाने ।
तोषतो की ॥५८७॥ परी सांगे काय । आहे पासी धन । तो रमारमण । मिळविण्या ॥५८८॥
नामावीण सोपे । नाही रे साधन । स्मरी तू म्हणोन । सर्वकाल ॥५८९॥ दीनाचा दयाळु ।
राम कनवाळू । तयासी ओवाळू । पंचप्राण ॥५९०॥ मनी धरूनिया । त्याची नाना रूपे ।
रामनाम सोपे । बाणवूया ॥५९१॥ समस्तांमधे नाम साचार आहे । कळेना तरी सर्व शोधूनि
पाहे जिवा संशयो वाऊगा तो त्यजावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७५॥ श्रेष्ठ
रामनाम । सर्व साधनात । नामस्मरणात । राहे नित्य ॥५९२॥ घेई अनुभव । पाही पडताळून ।
अनेक साधनी । कष्ट काय ॥५९३॥ सर्वही बोलती । नाम एक सार । ग्रंथांचा संभार । हेचि
सांगे ॥५९४॥ आता तरी मना । धरू नको शंका । सर्व त्या आशंका । दूर ठेवी ॥५९५॥ आणि
भक्तिभावे । रामनाम घ्यावे । चरण धरावे । श्रीरामाचे ॥५९६॥ नव्हे कर्म ना धर्म ना
योग काही । नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही म्हणे दास विश्वास नामीं धरावा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७६॥ आसक्तीरहित । घडे ना रे कर्म । यथायोग्य धर्म ।
नाचरिसी ॥५९७॥ योगसाधनही । घडे ना रे बापा । काय सांग सोपा । दुजा मार्ग ॥५९८॥
देवतादिकांची । पूजा करायासी । नाही तुजपासी । साधने ती ॥५९९॥ त्याग करावया । चातुर्मास
नेम । करिसी धाऊन नानाविध ॥६००॥ एकहि ना घडे । परी यथासांग । आता तरी जाग । येवो
तुसी ॥६०१॥ एक नामावीण । नाही रे साधन । म्हणोनिया म्हण । राम राम ॥६०२॥ करी काम
निष्काम या राघवाचे । करी रूप स्वरूप सर्वा जिवांचे । करी छंद निर्द्वंद्व हे गूण
गाता । हरीकीर्तनी वृत्तिविशस होता ॥७७॥ लया जाई काम । घेता रामनाम । घडे सर्व
कर्म । निष्कामत्वे ॥६०३॥ रामनाम घेता । लागे त्याचा छंद । मिळे मोक्षकंद । झडकरी
॥६०४॥ नामी बुद्धी स्थिर । होऊनि रहाते । भेदबुद्धी जाते । लयासी रे ॥६०५॥ मन
आत्मरूपी । रंगता संपूर्ण । पाहे जन वन । आत्मरूप ॥६०६॥ विश्वात्मक भाव । होतसे
उत्पन्न । आत्मरुपी मन । रंगता रे ॥६०७॥ येवो सुखदु:ख । आनंद ना खंत । भेदभेदातीत
। नामजपे ॥६०८॥ अरे हरिनाम । गाता श्रद्धायुक्त । एकनिष्ठ भक्त । होवोनिया ॥६०९॥
होसी तू रे मना । आनंदस्वरूप । तुझे निजरूप । मिळे तुज ॥६१०॥ हवा तुज मोक्ष । तरी
नाम स्मर । तेच तुज पार । नेईल रे ॥६११॥ अहो ज्या नरा रामविश्वास नाही । तया पामरा
बाधिजे सर्व काही । महाराज तो स्वामि कैवल्यदाता । वृथा वाहणे देहसंसार चिंता ॥७८॥
अश्रद्ध अभक्त । फक्त भोगासक्त । जगे दु:खयुक्त । जीवन रे ॥६१२॥ जीवनी असह्य । दु:खाशीच
नाते । अधोगति होते मरणांती ॥६१३॥ नामीं ना विश्वास । त्यासी रे सायास । मोक्ष कसा
त्यास । पुसतो रे ॥६१४॥ भवसागरी तो । बुडोनिया जाई । मग त्राता नाही । कोणी बापा
॥६१५॥ नको करू देह । संसाराची चिंता । राम मोक्षदाता । असे तुज ॥६१६॥ कर्ता करविता
। एक तो ईश्वर । ठेवी त्याच्यावर । दृढ श्रद्धा ॥६१७॥ मना पावना भावना राघवाची ।
धरि अंतरी सोडी चिंता भवाची । भवाची जिवा मानवी भूली ठेली । नसे वस्तूची धारणा
व्यर्थ गेली ॥७९॥ तुला ग्रासते रे । संसाराची चिंता । आणि त्या अनंता । विसरसी
॥६१८॥ परि आहे मना । असत्य संसार । व्यर्थ तू जोजार । करू नको ॥६१९॥ संसाराची भूल
। तुजसी पडली । आणि नष्ट झाली । बुद्धी तुझी ॥६२०॥ संसाराचे स्वप्न । तुजसी पडले ।
आणि तू मानले । खरे बापा ॥६२१॥ होतासि अव्यक्त । आता व्यक्त होसी । पुन्हा
अव्यक्तासी मिळशील ॥६२२॥ व्यक्त स्थिती खरी । मग सांगे काय । अव्यक्तात लय । होतो
जिचा ॥६२३ जी वस्तू नाहीच । आहे ती मानणे । मृगजळामागे । धावणे ते ॥६२४॥ करशील
प्रीती । रामावर जर । व्यर्थ हा संसार । कळे बापा ॥६२५॥ किती सांगू मना । उठ झडकरी
। दृश्याच्या पसारी । रमू नको ॥६२६॥ धरा श्रीवरा त्या हरा अंतराते । तरा दुस्तरा
त्या परा सागराते । सरा वीसरा त्या भरा दुर्भराते । करा नीकरा त्या खरा मत्सराते
॥८०॥ शिव अंतरंगी । रामाची वसती । त्या तू रामाप्रती । दृढ धरी ॥६२७॥ भवसागर हा
तरण्या कठिण । तरीही तरून । जाशी बापा ॥६२८॥ असे लवचिक । प्रेमाचा तो दोर । त्याने
बद्ध कर । ईश्वरासी ॥६२९॥ कठिण लाकूड । भृंग पोखरत । कमळदळात । स्नेहे बद्ध ॥६३०॥
सृष्टी मिथ्या ऐसे । वेदांत वचन । वाटे अप्रमाण । तुजलागी ॥६३१॥ सृष्टी मिथ्या जरी
। वावरावे तरी । मायेच्या बाजारी । जीवालागी ॥६३२॥ पोटोबा तो आधी । विठोबा नंतर ।
येथे व्यवहार । रोकडा हा॥६३३॥ मग कसा मानू । भ्रम हा संसार । टिकेना विचार ।
पोटापुढे ॥६३४॥ मना तुझे मत । आहे बापा खरे । पोटासाठी सारे । जग फिरे ॥६३५॥
भोगयोनी ही रे । धरावी शरीरे । तू ही पोट भरे । ना न म्हणो ॥६३६॥ जरी तुज पोट ।
तरी भरी बापा । परी मायबापा । स्मर नित्य ॥६३७॥ असे सर्वकाळ । पोट चिंतनात । हे तो
रे उचित । नाही तुज ॥६३८॥ अरे तू मानव । दिली तुज बुद्धी । येवो तुला शुद्धी ।
लवकरी ॥६३९॥ पशुतुल्य अशा । भोगांची वासना । करू नको मना । काही केल्या ॥६४०॥ भोग
परिमित । ऐसे योगयुक्त । करावे व्यतीत । जीवन तू ॥६४१॥ संसारापासून । थोडे दूर सर
। त्यासी तू विसर । रामनामे ॥६४२॥ खररूपी द्वेष । वसतो अंतरी । म्हणोनि संसारी ।
दु:ख तुज ॥६४३॥ द्वेष सार दूर । रामनाम स्मर । तेणे हा संसार । मोक्षमय ॥६४४॥ मना
मत्सरे नाम सांडू नको हो । अती आदरे हा निजध्यास राहो । समस्तांमधे नाम हे सार आहे
। दुजी तूळाणा तूळिताही न साहे ॥८१॥ होवोनिया मना । मत्सरा आधीन । श्रीरामाचे नाम
। सोडू नको ॥६४५॥ परी आदराने । नित ध्यानीं धरी । रामनाम स्मरी । सर्वकाळ ॥६४६॥ ना
कर्मबंधन । ना विधिविधान । नामासाठी जाण । ना नियम ॥६४७॥ आसनी भोजनी । अथवा शयनी ।
नाम ते स्मरणी असावे रे ॥६४८॥ चालता बोलता । खाता पिता देता । स्मर भगवंता ।
सर्वकाळ ॥६४९॥ सर्व साधनात । नाम हे वरिष्ठ । बोलती रे स्पष्ट । श्रुती स्मृती
॥६५०॥ बहु नाम या रामनामीं तुळेना । अभग्या नरा पामरा हे कळेना । विषा औषधा घेतले
पार्वतीशे । जिवा मानवा किंकरा कोण पुसे ॥८२॥ आहेत रे मना । नामे ती अनेक । रामनाम
एक । सर्वश्रेष्ठ ॥६५१॥ ज्ञान भक्ती आणि । वैराग्याकारण । रामनाम जाण । समर्थ रे
॥६५२॥ परी हा करंटा । कसा रे मानव । आहे त्याची धाव । संसारात ॥६५३॥ अनित्य संसार
। मानुनिया सार । मुक्तिसुख दूर । लोटतो रे ॥६५४॥ काय आहे सांग । बळ त्याच्यापाशी
। संसारगजाशी । झुंज घेई ॥६५५॥ प्रत्यक्ष शिवाने । नाम ते स्मरता । विषदाहबाधा ।
दूर झाली ॥६५६॥ तेथे सांग काय । मानवाचा पाड । भव अवघड । तरेल की ॥६५७॥ जेणे
जाळिला काम तो राम ध्यातो । उमेसी अती आदरे गूण गातो बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य
जेथे । परी अंतरी नामविश्वास तेथे ॥८३॥ दृष्टिक्षेपानेच । जाळी मदनास । त्या
श्रीशंकरास । नाम ध्यास ॥६५८॥ ऐसा महादेव । रामगुण गाई । नामखूण देई । पार्वतीसी
॥६५९॥ ज्ञान-वैराग्याने । असे परिप्लुत । आणि शक्तिवंत । असोनीही ॥६६०॥ रामनामजप ।
करितो अखंड । रामनामओढ । त्यासी सदा ॥६६१॥ असोनि तू दीन । दुबळा लाचार । का रे
नामावर । विश्वासी ना ॥६६२॥ एक रामनाम । तारे त्रिजगती । तेथे तुझी मती । वसो
नित्य ॥६६३॥ विठोनि शिरी वाहिला देवराणा । तया अंतरी ध्यास रे त्यास नेणा । निवाला
स्वये तापसी चंद्रमौळी । जिवा सोडवी राम हा अंतकाळी ॥८४॥ घेतो विठुदेव । भक्त
शिरावर । अरे तो शंकर । महादेव ॥६६४॥ मस्तकी मुकुट । करी भगवंत । आपुला जो भक्त ।
सर्वश्रेष्ठ ॥६६५॥ घेउनिया डोई । शीतलही चंद्र । विषबाधा काही । शमेना की ॥६६६॥
म्हणोनि सर्वदा । घेई रामनाम । जेणे मोक्षधाम । मिळतसे ॥६६७। म्हणोनिया मना ।
सोडोनि आळस । रामनाम ध्यास । घेई सदा ॥६६८॥ जन्मभरी जरी । रामनाम घेसी । अंतकाळी
तुसी । आठवेल ॥६६९॥ अंतकाळी जो रे । घेई रामनाम । त्यासी मोक्षधाम । बोले देव
॥६७०॥ म्हणोनिया मना । सोडोनि आशंका । एक रामसखा । हृदि धरि ॥६७१॥ भजा राम विश्राम
योगेश्वरांचा । जपु नेमिला नेम गौरीहराचा । स्वये नीववी तापसी चंद्रमौळी । तुम्हां
सोडवी राम हा अंतकाळी ॥८५॥ विश्रांतीचे स्थान । ऐक जे योग्यांचे । त्या तू
श्रीरामाचे । नाम जप ॥६७२॥ उमापती शिव । जपयज्ञीं रंगे । कधी न च भंगे । समाधी ती
॥६७३॥ गंगा सर्प चंद्र । जवळी असोन । शिवा न च जाण । देहशांती ॥६७४॥ देहशांतीसंगे
। आत्मशांती प्राप्त । शिव समाधीत । जपयज्ञे ॥६७५॥ जपयज्ञी वेगे । होई तू आरूढ ।
रामनामओढ । घेई मना ॥६७६॥ मना तुजप्रती । देहातही शांती । देहांतीही शांती ।
प्राप्त होई ॥६७७॥ मुखी राम विश्राम तेथेचि आहे । सदानंद आनंद सेवूनि राहे ।
तयावीण तो शीण संदेहकारी । निजधाम हे नाम शोकापहारी ॥८६॥ ज्याच्या मुखी राम । मनीं
नाही काम । मिळे त्या आराम । आत्मरूपी ॥६७८ तोचि आत्मानंद । भोगितो अखंड । जरी
अवघड । मिळविण्या ॥६७९॥ जे जे रामावीण । ते ते देइ शीण । मना तू म्हणोन । राम जप
॥६८०॥ विषयी आनंद । नाही नाही मना । अरे त्या वल्गना । वृथा होती ॥६८१॥ नको त्या
कल्पना । नको त्या वासना । नको त्या कामना । मनीं धरू ॥६८२ एक रामनाम । भावे
जपोनिया । जाई तरोनिया । भवसिंधू ॥६८३॥ रामनाम दु:ख । हरते सकळ । मनीचाही मळ ।
झडतसे ॥६८४॥ रामनाम हेच । वसतीचे स्थान । श्रीरामाचे जाण । बा रे मना ॥६८५॥ मुखी
राम त्या काम बांधू शकेना । गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना हरिभक्त तो शक्त
कामास मारी । जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥८७॥ म्हणोनिया मना । सोडी सर्व कामे
। एक रामनामे । स्थिर होई ॥६८६॥ नामाचा महिमा । सांगितला तुज । वासना सहज । दूर
जाती ॥६८७॥ नामाच्या संयोगे । मनाचे सामर्थ्य । होई तुज प्राप्त । बा रे मना ॥६८८॥
धारिष्ट्याने होसी । संकटा सामोरी । अंतरी श्रीहरी । जपता रे ॥६८९॥ नामाच्या
स्मरणे । हरिभक्त होसी । लोटसी कामांसी । दूरवरी ॥६९०॥ मनोविकारांची । नाही तुज
बाधा । जपता तू सदा । हरिनाम ॥६९१॥ पाही हनुमंता । झाला जगी धन्य । होताच अनन्य ।
रामपदी ॥६९२॥ सर्वदा कार्यात । असोनी निमग्न । स्वरूपी संलग्न । झाला असे ॥६९३॥
तूही त्याचपरी । नामजप करी । अंतरी श्रीहरी । प्रगटेल ॥६९४॥ बहु चांगले नाम या
राघवाचे । अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे । करी मूळ निर्मूळ घेता भवाचे । जिवा
मानवा हेचि कैवल्य साचे ॥८८॥ कल्याणकारी हे । श्रीरामाचे नाम । असे परब्रह्म ।
उघडच ॥६९५॥ उच्चारावयासी दोनच अक्षरे । सुंदर साजिरे । सोपे बहु ॥६९६॥ मिळविण्या
हरी । नको धन वेचू । नको प्राण खर्चू । बा रे मना ॥६९७॥ उदंड सायास । तुज रे कशास
। नको घेऊ त्रास । आणिक तू ॥६९८॥ नामाच्या परते । आणिक साधन । पाही तू शोधून ।
सापडे का ॥६९९॥ बसल्याच जागी । प्रणवाच्या वरी । नाम तू उच्चारी । सहजच ॥७००॥
श्वासोच्छ्वासावरी । नामजप करी । जो का सदा हरी जपतसे ॥७०१॥ जन्ममरणची । फेरी ती
चुकेल । मोक्षही पाहील । वाट तुझी ॥७०२॥ संसारचे मूळ । असे जी वासना । होत असे मना
। हद्दपार ॥७०३॥ वासनेचा क्षय । हीच मुक्ती होय । आणिक ते भय । नाही तुज ॥७०४॥
कैवल्य ते हेच । निजधाम हेच । मोक्षही याचेच । नाम बापा ॥७०५॥ जनीं भोजनी नाम वाचे
वदावे । अती आदरे गद्यघोषे म्हणावे । हरिचिंतने अन्न सेवीत जावे । तरी श्रीहरी
पाविजेतो स्वभावे ॥८९॥ करू न शकसी अखंड स्मरण । तरी तू भोजन घेसी जेव्हा ॥७०६॥
नामाच्या उच्चारे । अन्नाचे सेवन । सहज चिंतन । घडे त्याचे ॥७०७॥ परी तू ते नाम ।
घेइ आदराने । आणि निग्रहाने । ऐक बापा ॥७०८॥ भोजनाच्या वेळी । रामनाम स्मरी ।
तोषतो श्रीहरी । स्वाभाविक ॥७०९। सात्विक अन्नाने । सत्ववृत्ती जाण । उदरभरण ।
नोहे बापा ॥७१०॥ मनाच्या त्या उर्मी । जातील लयासी । सात्विक अन्नासी । सेविता रे
॥७११॥ ग्रासोग्रासी जर । नाम तू घेशील । अन्न ते होईल । अति शुद्ध ॥७१२॥ तेणे
चित्तशुद्धी । होईल रे मना । सर्व त्या वासना । दूर होती ॥७१३॥ वासना पडदा । दूर
तो होताच । रघुपती साच । तुजपासी ॥७१४॥ उठणे निजणे । उदर भरणे । हे आहे करणे ।
नित्य नेमे ॥७१५॥ या तीनही वेळी । नाम जो घेईल । सहज होईल । नित्यनेम ॥७१६॥ न ये
रामवाणी तया थोर हाणी । जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी हरिनाम हे वेदशास्त्री
पुराणी । बहु आगळे बोलली व्यासवाणी ॥९०॥ परी रामावीण । राहु नको बापा । नाममार्ग
सोपा । सांगितला ॥७१७॥ नामावीण लोक । म्हणसील जरी । राहती संसारी । बहु सुखे ॥७१८॥
परि सांग काय । दारा आणि द्रव्य । हे तो माप होय । सुखाचे रे ॥७१९॥ पूर्वकर्म जैसे
। सुखदु:ख तैसे । भोगसी आपैसे । बा रे मना ॥७२०॥ नामाशी संबंध । लौकिक सुखाचा ।
नाही जोडायाचा । कदाकाळी ॥७२१॥ पशूहून तुज । दिले रे अधिक । ज्ञान नि विवेक ।
नरजन्मी ॥७२२॥ त्याचा मना करी । काही उपयोग । संसाराचा संग । सुटे जेणे ॥७२३॥
नामावीण हानी । मनुष्यजन्माची । सांगितली साची । तुज बापा ॥७२४॥ जगण्यात राम ।
म्हणे जरी राम । नेईल तो राम । पैलतीरी ॥७२५॥ असेल जयाचा । निरर्थक जन्म । तयासीच
नाम । तुच्छ वाटे ॥७२६॥ हरिनाम श्रेष्ठ । आहे रे साधन । सांगे ती गर्जोन ।
व्यासवाणी ॥७२७॥ नामाची महती । शास्त्रात पुराणी । आणि वेदवाणी । बोललीसे ॥७२८॥
नको वीट मानू रघुनायकाचा । अती आदरे बोलिजे रामवाचा । न वेचे मुखी सापडे रे फुकाचा
। करी घोष त्या जानकीवल्लभाचा ॥९१॥ कंटाळू नकोस । रघुनायकासी । जप श्रीहरीसी ।
अंतरात ॥७२९॥ नाम आठवीता । रूप आठवावे । मनासी करावे । एकाकार ॥७३०॥ रूपावरी चित्त
। अंतरात नाम । आपोआप प्रेम । उपजेल ॥७३१॥ प्रेम आदराने । नाम उच्चारिसी । मग सांग
तूसी । काय कमी ॥७३२॥ द्रव्यखर्च नको । पूजापाठ नको । शरीरासी नको । कष्ट काही
॥७३३॥ केवळ वाणीने । राम सापडतो । मग आळस तो कासयासी ॥७३४॥ नामाचे अमोल । साधन हे
तूसी । भवसागरासी । पार करी ॥७३५॥ नाम जयघोष । करी तू सर्वदा । जेणे रामचंद्रा ।
यावे लागे ॥७३६॥ अती आदरे सर्वही नामघोषे । गिरिकंदरे जाईजे दूरि दोषे । हरि
तिष्ठतु तोषला नामतोषे । विशेषे हरा मानसी रामपीसे ॥९२॥ कल्मष आगर । पापांचे डोंगर
। जाताती ते दूर । नामघोषे ॥७३७॥ नामाचा महिमा । नाही तू जाणत । म्हणोनि सांगतो ।
तुज काही ॥७३८॥ नामाच्या घोषाने । तोषलेला देव । राहतो सदैव । शुद्ध चित्ती ॥७३९॥
आरसा धुळीने । माखलेला जर । रूप त्यात नर । पाही कैसे ॥७४०॥ हृदय हे जर । पापाचे
आगर । त्यात तो ईश्वर । वसे कैसा ॥७४१॥ परी नामघोषे । शुद्ध होते चित्त । प्रेम
अंतरात । उपजते ॥७४२॥। ऐशा शुद्ध चित्ती । श्रीहरीची वस्ती । नामप्रेममस्ती । घेई
मना ॥७४३॥ वेडांमधे वेड । श्रीरामाचे वेड । घेई मना गोड । नाम त्याचे ॥७४४॥
शिवासीही मना । रामनामपिसे । मग तूची कैसे । का न घेई ॥७४५॥ जगी पाहता देव हा
अन्नदाता । तया लागली तत्वता सार चिंता । तयाचे मुखी नाम घेता फुकाचे । मना सांग
पा रे तुझे काय वेचे ॥९३॥ श्रेष्ठ आहे कोण । जगी रामावीण । मना तू शोधून । पाही
जरा ॥७४६॥ म्हणसी रे मना । सर्व मी करतो । तुज पोटा देतो । सांगे कोण ॥७४७॥ मुंगी
नि माणूस । जन्मास घालून । सर्वांचे पोषण । करी तोच ॥७४८॥ करी सर्वथैव । चिंता
आमुचीच । परंतु त्यालाच । विसरसी ॥७४९॥ नाही तर नाही । यज्ञकर्म काही । व्रत नेम
काही । करू नको ॥७५०॥ परी फुकाचे ते । नाम मुखी बाण । तयासी शरण । जाई वेगे ॥७५१॥
ऐक नाम घेता । वित्तहानी नाही । शारीरिक काही । शीण नाही ॥७५२॥ काय सांगू तुज ।
नामाची ताकद । भवसागरात । बुडो नेदी ॥७५३॥ तिन्ही लोक जाळू शके कोप येता । निवाला
हरु तो मुखी नाम घेता जपे आदरे पार्वति विश्वमाता । म्हणोनि म्हणा तेचि हे नाम आता
॥९४॥ सामर्थ्य संपन्न । तो शिवशंकर । क्रोध येता थोर । जाळी विश्व ॥७५४॥ परी
रामनामे । प्राप्त त्यासी शांती । विषप्राशनांती । हलाहल ॥७५५॥ जगाची जननी ।
पार्वती माता ती । रामनामप्रीती । धरीतसे ॥७५६॥ तेचि आता जप । रामनाम मना । तोचि
रामराणा । तारेल की ॥७५७॥ अजामेळ पापी वदे पुत्रकामे । तया मुक्ती नारायणाचेनि
नामे । शुकाकारणे कुंटणी रामवाणी । मुखे बोलिता ख्याती जाली पुराणी ॥९५॥
पुत्राच्या मिषाने । नारायणा हाक । अजामेळ देख । मारीतसे ॥७५८॥ अंतकाळी नाम ।
येताच मुखात । मोक्षपदाप्रत । पापी गेला ॥७५९॥ पिंगलेने एक । पाळिला रे शुक । नाव
त्याचे देख । राघव रे ॥७६०॥ त्याच पोपटात । गुंतोनिया जीव । म्हणे हे राघव ।
अंतकाळी ॥७६१॥ याचि देही मोक्ष - । पद प्राप्त झाले । मुखात ते आले । रामनाम ॥७६२॥
अंतकाळी नाम । येताच मुखात । होसील तू मुक्त । बा रे मना ॥७६३॥ अरे जे चिंतन ।
करशील अंती । तैसी तुज गती । प्राप्त होई ॥७६४॥ ऐसे भगवंत । बोलिला गीतेत । येता
तुझा अंत । नाम स्मर ॥७६५॥ परी आयुष्यात । जे जे करशील । तेचि रे येईल । अंती मना
॥७६६॥ म्हणोनी जीवनी । रामनाम स्मरी । तेणे तुझी फेरी । चुकेल रे ॥७६७॥
योगायोगानेच । घेता रामनाम । अरे परंधाम । मिळतसे ॥७६८॥ मग ते श्रद्धेने । घेताच
अंतरी । राम तो समोरी । का न येई ॥७६९॥ महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी । जपे
रामनामावळी नित्यकाळी । पिता पापरूपी तया देखावेना । जनीं दैत्य तो नाम मूखे
म्हणेना ॥९६॥ दैत्यकुळी जन्म । असोनीही परी । प्रल्हाद तो स्मरी । रामनाम ॥७७०॥
हिरण्यकशिपु । करे त्याचा छळ । असोनिया बाळ । आपुलाच ॥७७१॥ अहंकामदे । होवोनिया
अंध । कोण तो गोविंद । पुसतसे ॥७७२॥ मग नारायणा । नरसिंहरूप । घेणे आपोआप ।
प्राप्त झाले ॥७७३॥ आणि त्या भक्ताचे । केलेच रक्षण । एक राम जाण । संरक्षक ॥७७४॥
हिरण्यकशिपू । जन्मानेही दैत्य । कर्मानेही दैत्य । असे मना ॥७७५॥ परी तुजलागी ।
जन्म तो नराचा । जेथे विवेकाचा । वास असे ॥७७६॥ विवेकाने मना । रामनाम स्मर ।
तेणेच उद्धार । होईल रे ॥७७७॥ असे तोच दैत्य । ज्याचिया मुखात । रामनाम सत्य । कदा
नसे ॥७७८॥ मुखी नाम नाही तया मुक्ती कैची । अहंतागुणे यातना ते फुकाची । पुढे अंत
येइल तो दैन्यवाणा । म्हणोनि म्हणा रे म्हणा देवराणा ॥९७॥ ज्याचिया मुखात । नाम
नाही येत । कसा व्हावा मुक्त । तो मानव ॥७७९॥ अहंतेने सर्व । होत आहे घात ।
नामावरी प्रीत । कशी होई ॥७८०॥ देहबुद्धीयोगे । अहंता निपजे । आणिक सहजे । विषयांध
॥७८१॥ मग मरणाचे । आणिक जन्माचे । फेरे होती साचे । कोट्यावधी ॥७८२॥ नामाचे स्मरण
। नाही रे होताच । अंती विषयच । आठविती ॥७८३॥ आणि जन्मभरी । केले सर्व तेच । जे
त्यजावयाच । योग्य होते ॥७८४॥ मग त्याची अंती । काय होते स्थिती । काय त्याची
ख्याती । वर्णू बापा ॥७८५ नाना रोगव्याधी । कराव्या सहन । येईल मरण । तेही नाही
॥७८६॥ आणि मरणही । आले जरी बापा । यमाचा दंडुका । बसे पाठी ॥७८७॥ मग तारणार । आहे
सांग कोण । एक रामाविण । बा रे मना ॥७८८॥ दैन्यवाणा अंत । नको तुज जर । रामनामावर
। प्रेम धर ॥७८९॥ रामनाम नौका । भवार्णवातून । तुजला नेउन । पार करी ॥७९०॥ नाम ना
घेतले । आधी कधी जर । प्रभू तारणार । कसा काय ॥७९१॥ वाहतो सर्वदा । प्रभुकृपावारा
। संशयासी थारा । देऊ नको ॥७९२॥ तुझिया नावेचे । शीड तू उभार । मग जाशी पार । सहजच
॥७९३॥ हरिनाम नेमस्त पाषाण तारी । बहु तारिले मानव देहधारी । तया नामरूपी सदा जो
विकल्पी । वदेना कदा जीव तो पापरूपी ॥९८॥ आता नको धरू । मनात विकल्प । सोपे नामतप
। आचरी तू ॥७९४॥ अनेक दाखले । सांगितले तुज । नामाने सहज । मुक्त होसी ॥७९५॥ तरला
मारुती । आणि बिभीषण । अरे ती कुंटिण । तरली रे ॥७९६॥ वाल्याचा वाल्मीकी । रामनाम
घेता । उलट जपता । महिमा हा ॥७९७॥ अरे रामनामे । पाषाण तरले । आणिक दाखले । किती
हवे ॥७९८॥ प्रत्यय पाहूनी । जरी रे संशय । मग कसा काय । मुक्त होसी ॥७९९॥ मनात
संशय । धरितो जो नर । पापरूपी खर । असे तोच ॥८००॥ संशयी तो आत्मा । पावे तो विनाश
। बोले जगदीश । गीतेमाजी ॥८०१॥ अशा नरापुढे । पाषाणही थोर । परी यासी घोर । नरक रे
॥८०२॥ जगी धन्य वाराणसी पुण्यराशी । तयेमाजी जाता गती पूर्वजांशी । मुखे
रामनामावळी नित्यकाळी । जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी ॥९९॥ सर्व तीर्थांमधे ।
तीर्थक्षेत्र काशी । असे पुण्यराशी । बा रे मना ॥८०३॥ करिता तर्पण । होता
गंगास्नान । करिता दर्शन । मिळे मुक्ती ॥८०४॥ पूर्वजही सर्व । जाताति तरून ।
वाराणसी जाण । पुण्य क्षेत्र ॥८०५॥ का की असे तेथे । शिवाचे वास्तव्य । सांगतो
गंतव्य । स्थान एक ॥८०६॥ उपदेशी सर्वा । रामनाम घ्या रे । रामरूप व्हा रे । सर्वजण
॥८०७॥ रामासी सर्वथा । जाऊनी शरण । स्वये रामनाम । घेत असे ॥८०८॥ असे रामनाम ।
सद्गतीकारण । संशय ते छिन्न । करी आता ॥८०९॥ यथासांग रे ते कर्म ते ही घडेना । घडे
धर्म तो पुण्य गाठी पडेना । दया पाहता सर्व भूती असेना । फुकाचे मुखी नाम ते ही
वसेना ॥१००॥ नित्यनैमित्तिक । आणि जे विहित । कर्म ते उचित । न घडे बापा ॥८१०॥
नाही शास्त्राधार । नाही धर्माधार । योग्य तो आचार । तो ही नाही ।८११॥ धर्मकृत्य
काही । न घडे हातून । यज्ञ तप दान । तेही नाही ॥८१२॥ आणि जरी केले । काही
धर्मकृत्य । अहंकार सत्य । आड येई ॥८१३॥ मी केले मी केले । म्हणे, मग
कैसे । पुण्य ते आपैसे । गाठी पडे ॥८१४॥ दया हेच आहे । मूळ रे धर्माचे । जेणे
भगवंताचे । दर्शन रे ॥८१५॥ परी तुझी दया । आहे मर्यादित । फक्त गणगोत । येई त्यात
॥८१६॥ म्हणूनी ही दया । नसूनी रे माया । सर्वांभूती दया । पाहिजे रे ॥८१७॥ हा थोर
हा सान । ही गाय हा श्वान । भेद हा सोडूनी । देसी जर ॥८१८॥ समत्वबुद्धीने । पाही
सर्वांभूती । तेणे आत्मस्थिती । बळावेल ॥८१९॥ तरीच ती खरी । होईल रे दया । आणि
तुझी काया । रामरूप ॥८२०॥ परी हे तो आहे । सर्वथा कठिण । तो रमारमण । मिळविण्या
॥८२१॥ परी आहे सोपा । तो रे नामजप । तेही सोपे तप । नाचरसी ॥८२२॥ नको करु मना ।
असा आत्मघात । साधी तू स्वहीत । याच जन्मी ॥८२३॥ जया नावडे नाम त्या यम जाची ।
विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची । म्हणोनी अती आदरे नाम घ्यावे । मुखे बोलिता
दोष जाती स्वभावे ॥१०१॥ ज्यासी नाम नाही । आवडत मना । देतो रे यातना । यमदेव ॥८२४॥
देहाहंता जाते । संपूर्ण लयासी । घेता नाम निसी । आणि दिनी ॥८२५॥ नाही तरी काम ।
क्रोधाचे माहेर । मग तो रे नर । नरकातिथी ॥८२६॥ जन्म-मृत्यु-जरा । व्याधी आणि दु:ख
। मग कैसे सुख । मिळे त्यासी ॥८२७॥ रामनामी जर । संशय धरीसी । मग रे तुजसी । कोण
त्राता ॥८२८॥ सर्वस्वाचा नाश । आणि अध:पात । होतो आत्मघात । नि:संशय ॥८२९॥ मग नाना
नरक । भोगावे लागती । यातना त्या किती । सोसशील ॥८३०॥ नको नको जर । आत्यंतिक त्रास
। रामनामध्यास । घेई मना ॥८३१॥ श्रेष्ठ हे साधन । सर्व साधनात । रामनामी चित्त ।
रंगू दे रे ॥८३२॥ देह अभिमान । आणि दोष सर्व । घेताती रे धाव । अती दूर ॥८३३॥ अती
लीनता सर्वभावे स्वभावे । जना सज्जनालागी संतोषवावे । देहेकारणे सर्व लावीत जावे ।
सगुणी अती आदरेसी भजावे ॥१०२॥ येथवरी मना । सांगितले तुज । नामाने सहज । राम
प्राप्त ॥८३४॥ होऊनि नि:शंक । भजणे रामासी । हेच असे तुसी । साधन रे ॥८३५॥ आता ऐक
मना । वागण्याची कला । नामसाधनाला । पोषक जी ॥८३६॥ लीनता हा तुझा । असू दे स्वभाव
। क्रोधाची जाणीव । नको ठेऊ ॥८३७॥ लीनतेने जातो । लया अहंकार । मनातील वैर । नासते
रे ॥८३८॥ आणि उपजते । प्रेम सर्वांभूती । जेणे जगजेठी । संतोषतो ॥८३९॥ सज्जन जे
संत । त्या संतोषवीत । त्यांचे मनोगत । ओळखूनी ॥८४०॥ तोषता ते संत । आपुला उद्धार
। निश्चये होणार । जाण मना ॥८४१॥ जनी वावरत । असती जे संत । तेचि भगवंत । जाण ऐसे
॥८४२॥ जगाचा उद्धार । करण्यासी आले । फेरे ते सोसले । अपुल्यासाठी ॥८४३॥ म्हणोनिया
भावे । करी त्यांची सेवा । तेच जडजीवा । उद्धारक ॥८४४॥ नरदेह तुज । असे जो मिळाला
। त्याचा काही केला । सदुपयोग ॥८४५॥ तरीच सार्थक । झाले या देहाचे । तेच रे हिताचे
। असे तुझ्या ॥८४६॥ आणि सगुणास । नको मानू भ्रम । निर्गुणाचे धाम । मिळे तेणे
॥८४७॥ सगुण मानता । निर्गुण ते प्राप्त । होते रे निश्चित । नि:संदेह ॥८४८॥ सगुण
निर्गुण । एकाच नाण्याच्या । भुजाच रे साच्या । आहेत की ॥८४९॥ ज्योती नि प्रकाश ।
हिम आणि नीर । सागर लहर । एक असे ॥८५०॥ त्याचपरी मना । सगुण निर्गुण । दोहीं भेद
जाण । काही नाही ॥८५१॥ निर्गुण कल्पना । करूच शकेना । म्हणूनि सगुणा । सत्य मान
॥८५२॥ लहर जाणता । सागर रे तुज । कळे तो सहज । बा रे मना ॥८५३॥ सगुण सोपान । चढोनिया
जासी । निर्गुण ब्रह्मासी । जाणशील ॥८५४॥ हरिकीर्तनें प्रीती रामीं धरावी ।
देहेबुद्धि नीरूपणीं वीसरावी । परद्रव्य आणीक कांता परावी । येदर्थी मना सांडी
जीवीं करावी ॥१०३॥ वाही रामापायी । पत्र पुष्प फळ । किंवा असो जळ । तेचि देई ॥८५५॥
किंवा मनानेच । वाहि सर्व त्यासी । मानसपूजेसी । नित्य करी ॥८५६॥ हरीचे कीर्तन ।
किंवा निरूपण । सगुण भजन । तेही करी ॥८५७॥ हरिगुण गाता । स्वत:सी संतोष । दुजासीही
तोष । होत असे ॥८५८॥ भक्तीचा प्रसार । होतो रे लोकात । आणि लाजतात । निंदकही ॥८५९॥
परी देहबुद्धि । विसरुन पूर्ण । होई निरूपण । तेचि श्रेष्ठ ॥८६०॥ जेणे श्रोता
वक्ता । होती एकरूप । आनंद अमाप । मिळतसे ॥८६१॥ तदाकार मन । दोघांचेही होई । मन ते
विषयी । खंतावेल ॥८६२॥ परद्रव्य आणि । परस्त्रीही जाण । मृत्तिकेसमान । मानी बापा
॥८६३॥ द्रव्य ते पाहून । करिसी कीर्तन । मग कसे मन । शुद्ध होई ॥८६४॥ आणि
परस्त्रीचा । लोभ जो मनात । सांग कीर्तनात । रंग कैसा ॥८६५॥ नष्ट रे होताच ।
समरसता ती । कीर्तन नव्हे, ती । प्रतारणा ॥८६६॥ तूही मना जासी । लोकांनाही
नेसी । रे रसातळासी । जाण ऐसे ॥८६७॥ करीशील मना । मग संभोगाचा । आनि समाधीचा ।
समन्वय ॥८६८॥ फसवणूकीसी । नाही पारावार । स्त्री तू मानी थोर । जगन्माता ॥८६९॥
परस्त्रीचिंतन । द्रव्याचेच ध्यान । फेर्यांसी कारण । होत असे ॥८७०॥ म्हणूनी बा
मना । लांब या पासून । शुद्ध करी मन । पूर्णपणे ॥८७१॥ क्रियेवीण नाना परी बोलिजेते
। परी चित्त दु:श्चित्त ते लाजवीते । मना कल्पना धीट सैराट धावे । तया मानवा देव
कैसेनी पावे ॥१०४॥ बोले तैसा चाले । वंदावी पाऊले । तुकोबा बोलिले । ध्यानी धरी
॥८७२॥ हरिकीर्तनात । भक्तीचा प्रसार । वैराग्यही थोर । सांगशील ॥८७३॥ मग या
गुणांनी । नको का तू युक्त । परमार्थ फक्त । बोलू नको ॥८७४॥ आधी केले मग । सांगितले
जर । तरीच पटेल । सर्व लोका ॥८७५॥ भक्तीचा प्रसार । तरीच तो मना । नाही तो वंचना ।
स्वत:चीही ॥८७६॥ बोलिल्या सारखे । नच जो आचरे । त्याहून दुसरे । निंद्य काय ॥८७७॥
मन त्याचे सदा । कुविचारयुक्त । आणि तो आसक्त । विषयात ॥८७८॥ अशी ती विषम । होता
वागणूक । त्यासी सर्व लोक । हिणाविती ॥८७९॥ उक्तीत क्रियेत । अरे हवा मेळ । नाही
तो केवळ नागवण ॥८८०॥ मग बोले सर्व । जे जे मनीं येई । घातकही होई । आचरण्या ॥८८१॥
ना शास्त्रप्रामाण्य । नसे भक्ती ज्ञान । वैराग्याचा पूर्ण । अभावच ॥८८२॥ अशा त्या
मानवा । कसा देव प्राप्त । काम-क्रोधयुक्त । मन होता ॥८८३॥ विवेके क्रिया आपुली
पालटावी । अती आदरे शुद्ध क्रिया धरावी । जनीं बोलण्यासारखे चाल बापा । मना कल्पना
सोडी संसारतापा ॥१०५॥ जे धर्मसंमत । विवेके आचरी । मग लोका करी । उपदेश ॥८८४॥ आचरण
शुद्ध । मन करी शुद्ध । नको होऊ बद्ध । संसारात ॥८८५॥ संसार मायावी । जनास सांगसी
। आणि गुरफटसी । आपणच ॥८८६॥ म्हणोनि आपुले । दोष हुडकुन । सर्वथा त्यागून । गुण
धरी ॥८८७॥ शुद्ध असे जर । आचार विचार । तर अधिकार । उपदेशा ॥८८८॥ संसार स्वरूप ।
कल्पना तरंग । भरिसी तू रंग । अहंभावे ॥८८९॥ मग भुलविती । तेच तुज रंग । जासी कसा
सांग । भवपार ॥८९०॥ म्हणोनि गुणांनी । दुर्गुणांच्या वरी । मात मना करी । अति वेगे
॥८९१॥ गुणांची कल्पना । जाण्यासी विरून । स्वरूप-संधान । पाहिजे रे ॥८९२॥ मन रे
होताच । सोऽहं-हंसाकार । संसार-सागर । तु्टेल रे ॥८९३॥ मग स्वानुभवे । जाणशील तूही
। कल्पनेच्या डोही । संसार हा ॥८९४॥ होमापक्षापरी । जाशील तू पार । हा भवसागर ।
तरूनिया ॥८९५॥ आता सांगू तुज । शुद्ध जो आचार । मन एकाकार । करी वेगे ॥८९६॥ बरी
स्नानसंध्या करी एकनिष्ठा । विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा । दया सर्वभूती जया
मानवाला । सदा प्रेमळु भक्तिभावे निवाला ॥१०६॥ जाणोनी स्वधर्म । आचरी स्वकर्म ।
वृथा कर्म धर्म । मानू नको ॥८९७॥ क्षत्रिय जो होसी । स्वदेश-प्रीतीसी । धरोनी
मानसी । धर्म रक्षी ॥८९८॥ या भूमीवरती । धर्मयुद्धानेच । रामराज्य साच । अवतरो
॥८९९॥ अससी ब्राह्मण । करी संध्या स्नान । करी जपध्यान । श्रीरामाचे ॥९००॥ परी
सर्वकाळ । हो रे कर्मरत । जेणे मन शांत । होत असे ॥९०१॥ विवेकाने मन । विषयांपासून
। धरी आवरून । रामनामे ॥९०२॥ रामापासूनिया । दूर दूर जासी । स्थानभ्रष्ट होसी । बा
रे मना ॥९०३॥ एकनिष्ठपणे । रामनाम घेसी । वेगे रामापासी । जाशील रे ॥९०४॥
सर्वभूतमात्री । असे भगवंत । जाई शिकवीत । स्वत:सी तू ॥९०५॥ मग सर्वांभूती । दया
उपजेल । प्रेमही येईल । आपोआप ॥९०६॥ मुलांवरी प्रेम । कसे ते करावे । काय शिकवावे
। लागे माते ॥९०७॥ अपत्यसी मानी । प्राणाहून थोर । सदा त्याच्यावर । लक्ष ठेवी
॥९०८॥ तैसे सर्वांभूती । पाहता श्रीराम । दया आणि प्रेम । उपजेल ॥९०९॥ मग
भक्तिभावे । होसी शांतचित्त । घेता भगवंत । हृदयात ॥९१०॥ मना कोप-आरोपणा ते नसावी
। मना बुद्धी हे साधुसंगी वसावी । मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी । मना होई रे
मोक्षभागी विभागी ॥१०७॥ शांतचित्त होण्या । रागालागी सार । अती दूर दूर । बा रे
मना ॥९११॥ क्रोधानेच होतो । बुद्धीचा विनाश । बोले जगदीश । गीतेमाजी ॥९१२॥
क्रोधाचा उद्भव । आहे विषयात । म्हणोनि ते नित । दूर ठेवी ॥९१३॥ विषय-चिंतने ।
आसक्तीचा जन्म । आसक्तीत काम । उपजतो ॥९१४॥ वासनाच तृप्त । जर झाली नाही । क्रोध
येतो पाही । लवलाही ॥९१५॥ क्रोध आवरण्या । उपाय कोणता । सांगू तुज आता । लक्ष देई
॥९१६॥ विषय-त्यागात । सुख घडोघडी । कामवृक्ष मोडी । सर्वथैव ॥९१७॥ संतसंगानेच ।
वासनांचे बीज । जळोनी सहज । जात असे ॥९१८॥ म्हणोनी संतांचा । धरी मना संग । जेणे
आत्मरंग । सहजच ॥९१९॥ पुनवेनंतर । कलेकलेनेच । चंद्र होई साच । क्षीण क्षीण ॥९२०॥
वासनाही तैशा । जातील लयासी । पौर्णिमा ज्ञानाची । उगवता ॥९२१॥ संगतीने गुण । दोष
वृद्धिंगत । जे असती सूप्त । मनामाजी ॥९२२॥ धरीशील मना । दुर्जनसंगती । मग सांगू
किती । अध:पात ॥९२३॥ गुणाकार पटी । विषय वाढती । तृप्त ना ते होती । म्हणोनिया
॥९२४॥ अधिक अधिक । पतनाचा मार्ग । स्वीकारणे भाग । पडे तुसी ॥९२५॥ अरे मन जैसे ।
आहे रे उदक । मिळे जैसा रंग । तैसे दिसे ॥९२६॥ साधुसंगतीत । होई पुण्यशील ।
म्हणोनी दुर्जन - । संग त्यागी ॥९२७॥ मोक्ष अधिकारी । होसी स्वाभाविक । जन्माचे
सार्थक । होईल रे ॥९२८॥ दुर्लभ हा देह । तुजसी मिळाला । त्याचा काही केला । उपयोग
॥९२९॥ जन्ममृत्युनावे । होई शून्याकार । जासी भवपार । सहजच ॥९३०॥ सदा सर्वदा
सज्जनाचेनि योगे । क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे । क्रियेवीण वाचाळता ते निवारी
। तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥१०८॥ सज्जनसंगती । क्रिया पालटते । भावभक्ती होते ।
निर्माण रे ॥९३१॥ अरे जर घडे । क्रियेत पालट । मोक्षसुखवाट । गवसेल ॥९३२॥ बीजाने
जो केला । उदकाचा त्याग । कशी होई सांग । वाढ त्याची ॥९३३॥ म्हणोनिया त्यागू । नको
संतसंग । सद्गुणांचे कोंब । निघतील ॥९३४॥ आचरणातून । संत सांगताती । सर्व जगाप्रती
। धर्म काय ॥९३५॥ थोतांड फोलट । करूनिया दूर । शुद्ध धर्मसार । हाती देती ॥९३६॥
पाहूनिया त्यांचे । शुद्ध आचरण । सामान्य ग्रहण । करीतसे ॥९३७॥ विषयचिंतनी ।
रंगणारे मन । भावे जनार्दन । पायी लागे ॥९३८॥ ऐसा असे संत - । संगाचा प्रभाव । मनी
भक्तिभाव । उपजतो ॥९३९॥ श्रवणोपयोग । करूनी घेशील । तरी पुण्यशील । होसील रे ॥९४०।
ऐकशील मना । जे संतसंगती । तैसाच तू वर्ती । सर्वभावे ॥९४१॥ येतील ज्या शंका ।
फेडून त्या घेत । संतसंगतीत । बा रे मना ॥९४२॥ संपूनिया वाद । होईल संवाद । तेच
हितप्रद । तुजलागी ॥९४३॥ सज्जनोपदेश । कानाने ऐकून । तैसे आचरण । करी बापा ॥९४४॥
जनीं वादवेवाद सोडूनी द्यावा । जनीं सूखसंवाद सूखे करावा । जगीं तोचि तो शोक संताप
हारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥१०९॥ सर्व लोकांसंगे । वाद करू नये । लोक तोडू
नये । अहंभावे ॥९४५॥ आपलेच मत । ग्राह्य ते धरावे । लोकांनी वागावे । त्यापरीच
॥९४६॥ ऐशी ती वासना । असते मूळात । वाद ते होतात । म्हणूनिया ॥९४७॥ अज्ञान ते होते
। वादासी कारण । काय ते तारण । बा रे मना ॥९४८॥ टाळूनिया वाद । करीसी संवाद । होईल
आनंद । सर्व लोका ॥९४९॥ करी शास्त्रचर्चा । करी पूजाअर्चा । झेंडा तू भक्तीचा ।
फडकवी ॥९५०॥ बोलणे चालणे । असावे प्रेमाचे । परी त्या अहंचे । नाव नको ॥९५१॥ अशा
संवादाने । जगातील शोक । संताप आणिक । हरतो रे ॥९५२॥ सुख नि शांतीचे । नांदते
साम्राज्य । करिता रे वर्ज्य । वाद जनी ॥९५३॥ ऐसाच संवाद । साधशील जर । तुज हीतकर
। होईल ते ॥९५४॥ तुटे वाद संवाद तेथे करावा । विवेके अहंभाव हा पालटावा ।
अहंतागुणे वाद नाना विकारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥११०॥ कलह तुटोनी । शंका
निवारण । म्हणावे म्हणून । संवाद रे ॥९५५॥ प्रेम ते वाढते । मिटोनिया भेद । तोचि
तो संवाद । जाणावा गा ॥९५६॥ वितंडवादाचे । मूळ अहंकार । जेणे हा संसार । दुस्तर रे
॥९५७॥ अहंकारामुळे । मी मी म्हणतोसी । मी कोण ते तूसी । कळले का ॥९५८॥ देहासंगे
आत्मा । होवोनिया बद्ध । स्वरूप ते शुद्ध । विसरला ॥९५९॥ अहंकाराचीच । झापड येवोन
। माये नागवण । केली असे ॥९६०॥ संतसंगतीत । कळे जो विचार । तेचि दृढ धर । मनामधे
॥९६१॥ मग विवेकाने । जिंक अहंकार । शेवटी विकार । तुटतील ॥९६२॥ द्वेष काम क्रोध ।
मद नि मत्सर । यासी अहंकार । मूळ असे ॥९६३॥ मूळच तोडले । झाड उन्मूळले । मग ना
पावले । वृद्धी कदा ॥९६४॥ अहंकार मूळ । तोडोनिया पाही । विकार-शाखाही तुटतील ॥९६५॥
मग तो साधेल सहज संवाद । तुटताच वाद । पूर्णपणे ॥९६६॥ हिताकारणे बोलणे सत्य आहे ।
हिताकारणे सर्व शोधूनि पाहे । हिताकारणे बंड पाखांड वारी । तुटे वाद संवाद तो
हीतकारी ॥१११॥ जन्मामधे ह्याच । व्हावे वाटे हीत । म्हणोनी उचित । सांगतसे ॥९६७॥
इच्छुनी कल्याण । बोलणे पडते । जरी वाटे तूते । अप्रियही ॥९६८॥ बालकाचे हीत ।
पहावे लागते । म्हणोनी बोलावे । लागतसे ॥९६९॥ म्हणोनी कंटाळू । नको बा रे मना ।
ऐकूनी घे नाना । उपदेश ॥९७०॥ कडू औषध ते । सेवण्या कठिण । परी परिणामी । हितकर
॥९७१॥ म्हणोनिया मना । शास्त्रसम्मत जे । बोलितो सहजे । प्रेमभरे ॥९७२॥ वाटत असेल
। तुजसी हे मिथ्या । पडताळुनिया । पाहि तूच ॥९७३॥ परी लक्ष देई । मत पाखंडाचे ।
विपरित साचे । असते रे ॥९७४॥ देहाचीच पूजा । सदा सर्वकाळ । येता अंतकाळ । म्हणे
मुक्ती ॥९७५॥ भोजनावरीच । असे दृढ भक्ती । त्यासाठीच शक्ती । दवडिती ॥९७६॥ भोग
भोगण्यात । आयुष्य संपले । जवळ ते आले । मरण रे ॥९७७॥ सर्व गात्रे क्षीण ।
होवोनिया गेली । ताकद नुरली । जराशीही ॥९७८॥ त्यासी सर्व गोत । बाजूला सारिती ।
काय रे म्हणती । कटकट ॥९७९॥ ज्यांच्यासाठी सर्व । आयुष्य वेचले । त्यांनीच लोटले ।
दूरवरी ॥९८०॥ जन्मभरी नाही । आठवला राम । आता कसे प्रेम । उपजेल ॥९८१॥ मग मरणाचा ।
येता ससेमिरा । टाकूनी पसारा । जावे लागे ॥९८२॥ मग बा रे मना । उपयोग नाही । याच
नरदेही । करी हीत ॥९८३॥ वेदशास्त्रग्रंथ । मानुनी प्रमाण । कर आचरण । अति शुद्ध
॥९८४॥ तेच असे मना । तुज हितकर । पाखंडांचे सार । मत दूर ॥९८५॥ जेणे तुटे वाद ।
ऐसाची संवाद । राहोनी सावध । करी नित्य ॥९८६॥ जनीं सांगता ऐकता जन्म गेला । परी
वादवेवाद तैसाची ठेला । उठे संशयो वाद हा दंभभारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी
॥११२॥ अनादी काल हा । निघोनिया गेला । वाद ना मिटला । तसाच रे ॥९८७॥ विवादक अती ।
वादच करिती । सामान्यांची मती । गुंग होई ॥९८८॥ संशय प्रबळे । श्रद्धा डळमळे ।
सत्य ना आकळे । काही केल्या ॥९८९॥ अनेक साधना । असती रे मना । तुझ्या येई मना ।
तीच घेई ॥९९०॥ आणि भावबळे । तीच धरी दृढ । देवालाही ओढ । लागो तुझी ॥९९१॥ परी
कृतिशून्य । वाद नको करू । नको दंभभारु । होऊ मना ॥९९२॥ वाद मिटवूनि । करी तू
संवाद । तेणेचि आनंद । मिळे तुज ॥९९३॥ जनीं हीत पंडित सांडीत गेले । अहंतागुणे
ब्रह्मराक्षस झाले । तयाहूनि वित्पन्न तो कोण आहे । मना सर्व जाणीव सांडूनि राहे
॥११३॥ शब्दांचे पांडित्य । माजवूनि जगी । आत्मसुखालागी । विसरले ॥९९४॥ वादविवादात
। आत्मप्राप्ती नाही । अनुभव पाही । मुख्य तेथे ॥९९५॥ अथांग सागर । जोवरी ना
देखिला । तोवरी उरला । वाद तेथे ॥९९६॥ लढवूनिया रे । तर्क अनुमान । सागरवर्णन ।
करितात ॥९९७॥ सांगती रे ज्ञान । हे शब्दपंडित । अहंकारयुक्त । होवोनिया ॥९९८॥
मानसन्मानात । असे त्यांची प्रीती । मग नायकिती । कोणाचेही ॥९९९॥ स्वाधिपत्याखाली
। जग नाचवावे । आणि मिरवावे । जनात रे ॥१०००॥ ऐशा अभिमाने । मोहोनिया गेले ।
राक्षस ते झाले । मरणोत्तर ॥१००१॥ एक रामावीण । कोण असे ज्ञानी । म्हणोनी भजनी ।
लागे त्याच्या ॥१००२॥ अभिमान सर्व । बा ज्ञातेपणाचा । सोडोनी देवाचा । धावा करी
॥१००३॥ सर्वश्रेष्ठ राम । आहे त्रिभुवनी । त्याच्याच भजनी । लागे मना ॥१००४॥
फुकाचे मुखी बोलता काय वेचे । दिसंदीस अभ्यंतरी गर्व साचे । क्रियेवीण वाचाळता
व्यर्थ आहे । विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे ॥११४॥ व्यर्थ बडबड । करीत राहता । काय
रे तत्वता । मिळे तुज ॥१००५॥ ज्ञातेपणाचाच । वाढे अहंकार । सर्वश्रेष्ठ नर । मीचि
जगी ॥१००६॥ अरे जे बोलावे । तसे अचरावे । होशील स्वभावे । जगी वंद्य ॥१००७॥ परी
क्रियेवीण । बोल होती फोल । आयुष्य अमोल । रामी लावी ॥१००८॥ विचार करता । येईल
ध्यानात । काय ते जनात । सांगितले ॥१००९॥ अहंकार सूज । आली अंगावर । ज्ञाता मीच
थोर । मिरविले ॥१०१०॥ हे शब्दपांडित्य । अरे आहे व्यर्थ । आयुष्याते सार्थ । करावे
की ॥१०११॥ तुटे वाद संवाद तेथे करावा । विवेके अहंभाव हा पालटावा । जनीं
बोलण्यासारिखे आचरावे । क्रिया पालटे भक्तिपंथेचि जावे ॥११५॥ अहंकार त्याग ।
करावया लागे । मना तुज सांगे । वेळोवेळी ॥१०१२॥ विवेकाने युक्त । होशील तू जर ।
क्षीण अहंकार । होईल रे ॥१०१३॥ आचरण शुद्ध । होवोनी वागावे । बोल ते बोलावे ।
प्रचीतीचे ॥१०१४॥ ऐसा जर मार्ग । मना धरशील । लोकात होशील । वंदनीय ॥१०१५॥ वाद
मिटोनिया । संवाद होईल । लयास जाईल । दुराग्रह ॥१०१६॥ वाद मिटवण्या । हवेच रे
ज्ञान । परी भक्तिवीण । ज्ञान व्यर्थ ॥१०१७॥ भक्तीत असतो । प्रेमाचा ओलावा । जेणे
होई जीवा । समाधान ॥१०१८॥ भाकरीत जर । लाळ मिसळली । गोडीही वाढली । सहजच ॥१०१९॥
तैसी भक्ती जर । मिळता ज्ञानात । साखर दुधात । पडली रे ॥१०२०॥ आणि होईल रे । क्षीण
अहंभाव । जसा भक्तिभाव । वाढेल रे ॥१०२१॥ मना आचरण । शुद्ध ते असू दे । जेणे भक्ति
नांदे । अंतरात ॥१०२२॥ बहु श्रापिता कष्टला अंबऋषी । तयाचे स्वये श्रीहरी जन्म
सोशी । दिल्हा क्षीरसिंधू तया ऊपमानी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥११६॥ देव
भक्तीनेच । प्रसन्न होतोच । ऐसा आहे साच । दाखला हा ॥१०२३॥ अंबरीश राजा । एकनिष्ठ
भक्त । एकादशी व्रत । करीतसे ॥१०२४॥ दशेंद्रिय सर्व । युक्त त्या एकाशी । हीच
एकादशी । खरी खरी ॥१०२५॥ मनोभावे करी । देवाचे पूजन । सर्वदा चिंतन । त्याचेच रे
॥१०२६॥ पारण्याच्या दिनी । दुर्वासांची स्वारी । अंबरीशा दारी । अवचित ॥१०२७॥
करूनिया मग । अतिथी पूजन । भोजना सप्रेम । पाचारिले ॥१०२८॥ लागला विलंब । परी त्या
मुनींना । स्नान अनुष्ठान । करण्यासी ॥१०२९॥ साधन द्वादशी । होती थोडावेळ । तीर्थ
ते केवळ । घेवोनिया ॥१०३०॥ त्या भक्त राजाने । पारणे सोडले । दुर्वासा कळले ।
आल्यावरी ॥१०३१॥ अति क्रोधे मग । खवळला मुनी । घेता रे सोडोनी । द्वादशी ॥१०३२॥
घेशील तू राजा । जन्म नाना योनी । ऐशी शापवाणी । उच्चारिली ॥१०३३॥ ऐशा त्या संकटी
। देव घेई धाव । भक्त प्रेमभाव । पाहूनिया ॥१०३४॥ जन्म नाना योनी । विष्णूने
साहिले । भक्तालागी दिले । मोक्षधाम ॥१०३५॥ उपमन्यूलागी दूधही मिळेना । दारिद्र्य
यातना । काय सांगू ॥१०३६॥ परी त्याने केले । ईश आराधन । देव ते प्रसन्न । झाले
त्यासी ॥१०३७॥ क्षीराब्धीची वाटी । देऊनी, धूर्जटी । भक्तप्रेमासाठी । आसुसला ॥१०३८॥ ऐसा
हा भक्ताचा । महिमा अपार । म्हणून तू धर । श्रीचरण ॥१०३९॥ धुरू लेकरू बापुडे
दैन्यवाणे । कृपा भाकिता दीधली भेटी जेणे । चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी । नुपेक्षी
कदा देव भक्ताभिमानी ॥११७॥ ध्रुवबाळ अती । लहान असोनी । तप केले वनी । देवासाठी
॥१०४०॥ श्रीहरीने मग । दिधले दर्शन । बुझावोनी मन । ध्रुवाचे त्या ॥१०४१॥
नभोमंडळात । अढळपद ते । देवोनिया त्याने । मुक्त केले ॥१०४२॥ भक्त तिन्ही लोकी ।
चिरंजीव करी । भक्तांचा कैवारी । रघुनाथ ॥१०४३॥ मना म्हणोनिया । भक्ति करूनिया ।
रामपदछाया । उपभोगी ॥१०४४॥ गजेंद्रु महासंकटी वाट पाहे । तयाकारणे श्रीहरी धावताहे
। उडी घातली जाहला जीवदानी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥११८॥ पशूनेही मना ।
करिता स्मरण । तो रमारमण । धावतसे ॥१०४५॥ पाही गजेंद्राची । कथा पुराणात । कसा
रमानाथ । येई वेगे ॥१०४६॥ गजेंद्राचा पाय । नक्राने धरिला । सुटेना तो त्याला ।
काही केल्या ॥१०४७॥ सोबतीही त्यासी । संकटी सोडून । गेले रे पळून । घाबरून ॥१०४८॥
सर्व मना जाण । सुखाचे सोबती । संकटी सोडिती । एकट्यासी ॥१०४९॥ गजेंद्राने मग ।
जलाशयातील । एक ते कमळ । तोडोनिया ॥१०५०॥ श्रीचरणांवरी । भावे वाहोनिया । आर्त
होवोनिया । धावा करी ॥१०५१॥ श्रीहरीही मग । धावोनिया आले । नक्राला मारले ।
भक्तप्रेमे ॥१०५२॥ गजेंद्र तो बघ । पशूही देहाने । या नारायणाने । मुक्त केले
।१०५३॥ पत्र पुष्प फळ । प्रेमाने अर्पिता । करितो मुक्तता । नारायण ॥१०५४॥ परी
अंतरात । भक्तिभाव हवा । व्यर्थ तो देखावा । करू नको ॥१०५५॥ अजामेळ पापी तया अंत
आला । कृपाळुपणे तो जनी मुक्त केला । अनाथांसी आधार हा चक्रपाणी । नुपेक्षी कदा
देव भक्ताभिमानी ॥११९॥ पापी अजामीळ । येता अंतकाळ । पुत्रासी केवळ । हाका मारी
॥१०५६॥ नारायण नाम । मुखाने उच्चारी । माया मुलावरी । अतिशय ॥१०५७॥ विष्णुदूत मग ।
यमाच्या दूतांसी । पाश टाकण्यास । देईनात ॥१०५८॥ मोक्षधामी मग । कृपळूपणाने । देवे
नारायणे । बसविले ॥१०५९॥ अनाथांसी तारी । भाक्तंचा कैवारी । कृपाळू श्रीहरी । अति
प्रेमे ॥१०६०॥ नुपेक्षी तो कदा । संकटी आपदां । नाम घेइ सदा । भक्तिभावे ॥१०६१॥
विधीकारणे जाहला मत्स्य वेगी । धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी । जना रक्षणकारणे नीच
योनी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२०॥ कल्पकाली ब्रह्म - । देव ते निजले ।
वेद ते हरले । हयग्रीवे ॥१०६२॥ समुद्रामधे ते । घेऊनी जाताच । भगवंतानेच ।
मत्स्यरूप ॥१०६३॥ घेऊनिया मग । मारिले दैत्यासी । आणोनी विधीसी । दिले वेद ॥१०६४॥
समुद्रमंथना - । वेळी कासवाचे । रूप भव्य साचे । घेवोनिया ॥१०६५॥ महासागरात । मंदर
बुडता । आधार तो देता । झाला देव ॥१०६६॥ पृथ्वी सागरात । बुडत असता । वराहाचे घेता
। झाला रूप ॥१०६७॥ पृथ्वी काढी वर । जना रक्षिण्यासी । मारिले दैत्यासी ।
श्रीहरीने ॥१०६८॥ सत्कार्याकरता । धाऊनिया येतो । जन्मही तो घेतो । नीच योनी
॥१०६९॥ भक्तांची उपेक्षा । मग करी कशी । त्या श्रीरामासी । भज नित्य ॥१०७०॥
महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला । म्हणोनी तयाकारणे सिंह झाला । न ये ज्वाळ वीशाल
संन्निध कोणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२१॥ हिरण्यकशिपु । हरिभक्तद्वेषी ।
मारी प्रल्हादासी । नाम घेता ॥१०७१॥ बापाने छळिले । हाल हाल केले । परी ना सोडिले
। नाम त्याने ॥१०७२॥ ऐक बा रे मना । नसे जो विभक्त । तोचि असे भक्त । एक जगी
॥१०७३॥ भक्ताचे रक्षण । दुष्ट निर्दालन । धर्मसंस्थापन । करण्यासी ॥१०७४॥ यावे
त्यासी लागे । भगवंत स्वत: । जाहला बोलता । गीतेमाजी ॥१०७५॥ नरसिंहरूप । घेई
हृषीकेशी । आणि त्या भक्तासी । रक्षिले रे ॥१०७६॥ दैत्यासी मारिले । भक्तसी तारिले
। परी ना निमाले । ऊग्ररूप ॥१०७७॥ शांत करण्यासी । त्या नारायणासी । भक्त
प्रल्हादासी । पुढे केले ॥१०७८॥ स्तुती करूनिया । भक्त प्रल्हादाने । साष्टांग
नमिले । श्रीचरण ॥१०७९॥ अष्टसात्विक ते । भाव पाहोनिया । देवे तोषोनिया । धरी पोटी
॥१०८०॥ संकटे ती मना । येती आणि जाती । परी नाम चित्ती । वसू दे रे ॥१०८१॥ उपेक्षा
भक्तांची । नाहीच करत । येतो रक्षणार्थ । भक्तप्रेमे ॥१०८२॥ म्हणोनी तल्लीन । मना
होवोनिया । नामीं गुंगूनिया । जाई वेगे ॥१०८३॥ कृपा भाकिता जाहला वज्रपाणी ।
तयाकारणे वामनु चक्रपाणी । द्विजांकारणे भार्गव चापपाणी । नुपेक्षी कदा देव
भक्ताभिमानी ॥१२२॥ व्हावे म्हणोनिया । इंद्रपद प्राप्त । करी शतयज्ञ । बळीराजा
॥१०८४॥ पाहोनिया कृत्य इंद्र घाबरला । विष्णुपदी गेला । शरण रे ॥१०८५॥ अदितीच्या
पोटी । रूप मानवाचे । घेवोनिया साचे । हरि येई ॥ १०८६॥ त्रिपाद भूमीचे । मागोनिया
दान । विराट वामन । रूप घेई ॥१०८७॥ पारिपत्य केले । देवाने राजाचे । परी पाताळाचे
। राज्य दिले ॥१०८८॥ त्याच्या रक्षणार्थ । द्वारपाळ हरी । होवोनिया करी । सेवा
त्याची ॥१०८९॥ द्विज रक्षणार्थ । परशुरामाचा । घेवोनिया साचा । अवतार ॥१०९०॥
नि:क्षत्रिय पृथ्वी । एकवीस वेळा । करिता निमाला । राग त्याचा ॥१०९१॥ अहल्येसती लागी
आरण्यपंथे । कुडावा पुढे देव वंदी तयाते । बळे सोडिता घाव घाली निशाणी । नुपेक्षी
कदा राम दासाभिमानी ॥१२३॥ गौतमाचे रूप । इंद्राने घेतले । अहल्येसी केले । भ्रष्ट
त्याने ॥१०९२॥ पतीच्या शापाने । ती सती अहल्या । होवोनिया शिला । पडली रे ॥१०९३॥
वनवासी राम । अरण्यात हिंडे । स्पर्श त्या दगडे । झाला त्याचा ॥१०९४॥ पदस्पर्श
होता । पूर्वरूप प्राप्त । अंती मोक्षाप्रत । जाती झाली ॥१०९५॥ रावणाच्या बंदी ।
देव अडकले । श्रीराम धावले । स्वसामर्थ्ये ॥१०९६॥ घेवोनिया धाव । सोडवले देव ।
शत्रुवरी घाव । घालीतसे ॥१०९७॥ असा तो श्रीराम । दासाच्या रक्षणा । धाव घेई का ना
। सांगे मज ॥१०९८॥ तये द्रौपदीकारणे लगवेगे । त्वरे धावतो सर्व सांडूनी मागे ।
कळीलागी जाला असे बौद्धमौनी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२४॥ पाहे द्रौपदीचा
। वाली असे कोण । श्रीकृष्णावाचून । सांग मना ॥१०९९॥ दु:शासने तिला । खेचून आणता ।
वस्त्र पुरविता । घन:शाम ॥११००॥ पातली वनात । दुर्वासाचि स्वारी । द्रौपदीच्या
दारी । शिष्यांसह ॥११०१॥ रागीट दुर्वास । आला भोजनास । काय अतिथीस । वाढावे ते
॥११०२॥ शापाच्या भयाने । माधवाचा तेव्हा । द्रौपदीने धावा । केला असे ॥११०३॥ केली
रे व्यवस्था । ऋषीभोजनाची । रीत श्रीकृष्णाची । न्यारी असे ॥११०४॥ संकटी असता ।
धावला तो एक । श्रीकृष्णनायक । बा रे मना ॥११०५॥ कलियुगातच । अधर्म वाढला । जन्म
तो घेतला । पुन्हा त्याने ॥११०६॥ परोपकारार्थ । असावे जीवित । दया प्रेम सत्य ।
समदृष्टी ॥११०७॥ अशा सद्गुणांचा । उपदेश देत । बुद्धावतारात । ईश्वर तो ॥११०८॥
अनाथां दिनांकारणे जन्मताहे । कलंकी पुढे देव होणार आहे । तया वर्णिता शीणली
वेदवाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२५॥ दीन दुबळ्यांचे । रक्षण करण्या ।
जन्म त्यासी घेण्या । भाग पडे ॥११०९॥ अनाथ म्हणजे । ज्यासी नाही नाथ । कोणी या
जगात । देवावीण ॥१११०॥ म्हणोनी सर्वही । असती अनाथ । परी त्या वाटत । नाही तसे
॥११११॥ असे कोण दीन ?। दर्शनावाचोन । असे भाग्यहीन । तोचि दीन ॥१११२॥ देवाचे दर्शन ।
घडावे म्हणोन । ज्याचे पंचप्राण । व्याकुळती ॥१११३॥ या दीना-अनाथा- । साठी घेई
जन्म । आणि निजधाम । दाखवी रे ॥१११४॥ आता ते कलीचे । रूप भयंकर । चांगले द्वापर ।
कोटिगुणे ॥१११५ ॥ एकमेकांचे रे । जना वाटे भय । भक्त असहाय्य । होतील ते ॥१११६॥
दहावा तो मग । कल्की अवतार । बा या धरेवर । होईल रे ॥१११७॥ धर्म आणि राज्य ।
करोनिया क्रांती । होई महारथी । जगद्वंद्य ॥१११८॥ वेदांचीही मती । गुंग होई तेथे ।
मग झाले घेते । मौनव्रत ॥१११९॥ जनाकारणे देव लीलावतारी । बहुतांपरी आदरे वेषधारी ।
तया नेणती ते जन पापरूपी । दुरात्मे महा नष्ट चांडाळ पापी ॥१२६॥ जनांसी रक्षिण्या
। घेई अवतार । घेई धरेवर । नाना रूपे ॥११२०॥ दुष्ट-निर्दालन । सज्जन-रक्षण । ब्रीद
असे जाण । त्याचे मना ॥११२१॥ नानाविध रूपे । अरे घेवोनिया । धर्मासी रक्षाया ।
स्वत:सिद्ध ॥११२२॥ परी त्याचे रूप । नाही जे जाणत । चांडाळ ते होत । पापमूर्ती
॥११२३॥ महानष्ट आणि । दुरात्मेही तेच । सदा धि:कारच । असो त्यांचा ॥११२४॥ जगी धन्य
तो रामसूखे निवाला । कथा ऐकता सर्व तल्लीन झाला । देहेभावना रामबोधे उडाली ।
मनोवासना रामरूपी बुडाली ॥१२७॥ रामभक्तीनेच । होई जो रे सूखी । तोच तिन्ही लोकी ।
धन्य होय ॥११२५॥ कानाने ऐकावी । एक रामकथा । पहावे तत्वता । रामरूप ॥११२६॥
रामाच्या भक्तीत । रहावे तल्लीन । मुखाने भजन । गावे त्याचे ॥११२७॥ ऐसे सर्वकाळ ।
रामाचेच ध्यान । राम सच्चिद्घन । अनुभवी ॥११२८॥ रामाचे स्वरूप । दिसता अंतरी । सदा
घरी दारी । राम पाही ॥११२९॥ ज्ञेय ज्ञाता ज्ञान । मावळे त्रिपुटी । हृदयसंपुटी ।
राम राम ॥११३०॥ सत्यस्वरूपाचे । घडता दर्शन । देहबुद्धी पूर्ण । नष्ट होई ॥११३१॥
रामरूप होती । वासना विषय । मनाचाही लय । होई बा रे ॥११३२॥ मना वासना वासुदेवीं
वसो दे । मना कामना कामसंगी नसो दे । मना कल्पना वाउगी ते न कीजे । मना सज्जना
सज्जनीं वस्ती की जे ॥१२८॥ रामरूप एक । सर्वत्र पहाण्या । प्रथम बा मना । शुद्ध
होई ॥११३३॥ सर्वव्यापक जो । आत्माराम आहे । त्याचे करी पाहे । स्मरण तू ॥११३४॥
सर्वदा एकच । रामा भेटण्याची । इच्छा धरी साची । बा रे मना ॥११३५॥ विषय कामना ।
सोडोनिया देई । ध्यास एक घेई । राम राम ॥११३६॥ विषय असती । नरकाचे द्वार । बा रे
त्वरा कर । निघ निघ ॥११३७॥ नको बा रे मना । तयांची संगती । दु:ख देती अंती । विषय
ते ॥११३८॥ देई सोडोनिया । वाईट कल्पना । असती ज्या नाना । मनामध्ये ॥११३९॥ यांचा
असे संग । अती भयानक । रौरव नरक । भोगशील ॥११४०॥ वासुदेव भेट । करोनी जे देती ।
त्या संतसंगती । राही नित्य ॥११४१॥ मनाने संगत । करावी ती कशी । ऐसा प्रश्न तूसी ।
पडला का ॥११४२॥ सज्जनसंगती । देहाने रहावे । कसे शक्य व्हावे । सर्वकाळ ॥११४३॥
वेदांतशास्त्राचा । विचार करावा । हाती ग्रंथ घ्यावा । परमार्थी ॥११४४॥ अंतरी
विवेक । होवोनी जागृत । असंग संगत । त्यागावी रे ॥११४५॥ सर्वदा चिंतन । मनन करावे
। उपदेश घ्यावे । ध्यानामधे ॥११४६॥ गतीकारणे संगती सज्जनांची । मती पालटे सूमती
दुर्जनांची । रतिनायकेचा पती नष्ट आहे । म्हणोनी मनातीत होवोनि राहे ॥१२९॥ सज्जन
संगत । अति आवश्यक । रामपद एक । प्राप्त होई ॥११४७॥ सज्जनसंगती । ज्ञानही आकळे ।
सद्गतीही मिळे । बा रे मना ॥११४८॥ अंतरात जागे । प्रेम-प्रीती-भाव । सर्वथा अभाव ।
दुर्बुद्धीचा ॥११४९॥ सज्जनसंगती । दुर्बुद्धी घाबरे । सद्बुद्धी ती वरे । तुजलागी
॥११५०॥ रतिनायकेचा । पती जो का काम । तव मुखी राम । येवो नेदी ॥११५१॥ कामवासनेच्या
। अतीत होऊन । राहे तू जाऊन । बा रे मना ॥११५२॥ ऐक बा रे मना । असे जेथे काम ।
तेथे नसे राम । कदाकाळी ॥११५३॥ कामवासनेचा । मना म्हणोनिया । त्याग करूनिया । राहे
बापा ॥११५४॥ मना अल्प संकल्प तोही नसावा । सदासत्य संकल्प तोही वसावा । जनी जल्प
वीकल्प तोही त्यजावा । रमाकांत एकांतकाळी भजावा ॥१३०॥ अल्पही संकल्प । नको बा रे
मना । तेणेचि कामना । उद्भवति ॥११५५॥ सत्य नि शाश्वत । एक भगवंत । त्याच्या ठायी
चित्त । जडू दे रे ॥११५६॥ अनुभवावीण । बोल निरर्थक । बोलू नको व्यर्थ । जनांमधे
॥११५७॥ संशय ते सर्व । सोडोनि देवोन । श्रीरामचरण । भज आता ॥११५८॥ एकांतात नित्य ।
श्रीराम आठव । पोटी भक्तिभाव । धरुनिया ॥११५९॥ मना जेथे होतो । एकाचाहि अंत । तोचि
तो एकांत । सत्य सत्य ॥११६०॥ मीपण-ऊर्मीचा । जेव्हा होई अंत । तेव्हाच एकांत ।
साधेल रे ॥११६१॥ भजाया जनी पाहता राम एकु । करी बाण एकु मुखी शब्द एकू । क्रिया
पाहता उद्धरे सर्व लोकू । धरा जानकी-नायकाचा विवेकू ॥१३१॥ भजावे रे एका । त्या
श्रीरामप्रती । जयाची महती । गर्जतसे ॥११६२॥ दुष्ट निर्दालन । सुष्ट संरक्षण ।
त्यासाठीच बाण । श्रीरामाचा ॥११६३॥ ब्रीद रे तयाचे । एकवचनी हे । उक्ती कृती पाहे
। एक असे ॥११६४॥ बंधु पती पुत्र । शिष्य स्वामी मित्र । नाती सर्व मात्र । आदर्श
रे ॥११६५॥ दातृत्व नि धैर्य । धर्म आणि शौर्य । विवेक नि वीर्य । त्याच्याठायी
॥११६६॥ तोच सर्वकाळी । अनुसरणीय । मना धरी पाय । नित्य त्याचे ॥११६७॥ श्रीराम तो
एक । नव्हे रे मानव । धरी भक्तिभाव । त्याचे पायी ॥११६८॥ अंतरात धरी । सगुण ते रूप
। तेच पाही रूप । भूतमात्री ॥११६९॥ विचारूनि बोले विवंचूनि चाले । तयाचेनि संतप्त
तेही निवाले । बरे शोधल्यावीण बोलो नको हो । जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो ॥१३२॥
जैसा रे आचार । तैसाची विचार । लोकंसी आधार । सज्जन तो ॥११७०॥ विचारपूर्वक ।
सर्वदा बोलतो । विवेके चालतो । जनांमधे ॥११७१॥ तयाच्या संगती । संतप्त तो शांत ।
तोचि खरा संत । सज्जन रे ॥११७२॥ सुहास्य वदन । प्रसन्न दर्शन । मधुर भाषण । तयाचे
रे ॥११७३॥ असते निर्मळ । तयाचे रे मन । सत्य आचरण । करी सदा ॥११७४॥ तयापरी तूही ।
विवेकाने वाग । शुद्ध अंतरंग । करी बापा ॥११७५॥ नियमानुसार । वागे तू जगात । तेणे
तुझे हीत । होईल रे ॥११७६॥ हरीभक्त वीरक्त विज्ञानरासी । जेणे मानसी स्थापिले
निश्चयासी । तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे । तया भाषणे नष्ट संदेह मोडे ॥१३३॥
असा हा सज्जन । हरिभक्त जाण । वैराग्य संपन्न । असतो रे ॥११७७॥ हरिभक्त आणि ।
वैराग्यसंपन्न । तोचि संत जाण । बा रे मना ॥११७८॥ नित्यानित्य काय । पाहतो विवेके
। शाश्वतासी देखे । लक्षूनिया ॥११७९॥ शाश्वत पाहता । सरली आसक्ती । वरिते विरक्ती
। तयासी रे ॥११८०॥ धन सुत दारा । सर्व हा पसारा । नाशिवंत खरा । जाणतसे ॥११८१॥ स्वानुसंधानात
। देवोनिया बुडी । शुद्ध झाली कुडी । त्याची मना ॥११८२॥ विषयात मग । नाही रे गुंतत
। आत्मस्वरूपात । मग्न राही ॥११८३॥ अशा संताचे त्या । दर्शनही घेता । पुण्य
प्राप्त हाता । झडकरी ॥११८४॥ तयाचा स्पर्शही । आनंददायक । शांत चित्त मग । सर्वकाळ
॥११८५॥ पाहता तयाचे । आचार विचार । संशय ते दूर । होती सर्व ॥११८६॥ नसे गर्व आंगी
सदा वीतरागी । क्षमा शांती भोगी दयादक्ष योगी । नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा ।
इही लक्षणी जाणिजे योगिराणा ॥१३४॥ गर्वाचा तो अंगी । नाही लवलेश । वासनेचा पाश ।
नाही नाही ॥११८७॥ आसक्तीरहित । जीवन व्यतीत । एक भगवंत । मनीं वसे ॥११८८॥ दयेने
भरले । तयाचे अंतर । कृपा सर्वांवर । करितसे ॥११८९॥ क्षमेनेच शांती । मिळते मनास ।
दाखवी जनास । स्वानुभवे ॥११९०॥ मन भगवंती । जडले सर्वदा । अनेक आपदा । असताही
॥११९१॥ षड्रिपूंच्यावरी । करोनिया मात । सदा स्वरूपात । डूब देई ॥११९२॥ लोभ मोह
यांचे । नाव ही नकोच । अरे वासनाच । त्यासी नाही ॥११९३॥ विषयांचा भोग । मिळाला जो
नाही । क्षोभ होई पाही । मानवाचा ॥११९४॥ क्षूद्र सुखासाठी । धडपडे जाण । दीनवाणेपण
। येइ त्यासी ॥११९५॥ सज्जनासी मना । नाही रे वासना । दीनवाणेपणा । कसा त्यासी
॥११९६॥ देवापासुनी जो । नाही रे विभक्त । तोचि असे भक्त । जाण मना ॥११९७॥ ऐशा
लक्षणांनी । युक्त योगिराणा । पाही त्याच्या खुणा । मनोमनी ॥११९८॥ धरी रे मना
संगती सज्जनांची । जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनांची । बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग
लागे । महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे ॥१३५॥ म्हणोनिया मना । सज्जन संगत । धरावी तू
नित । अत्यादरे ॥११९९॥ विषय वासना । नाहीशा होतात । एक भगवंत । सत्य वाटे ॥१२००॥
वासनेचे बीज । जाताच जळोन । आपोआप ज्ञान । प्राप्त होई ॥१२०१॥ दुर्लभ सद्बुद्धी ।
प्राप्त संतसंगे । शांतीही ना भंगे । मनाची रे ॥१२०२॥ योग्य तोच मार्ग । धरुनिया
मना । थोर योगिराणा । होशील तू ॥१२०३॥ वाट आंधळ्यास । दावी रे डोळस । तैसे
सत्संगास । जाण मना ॥१२०४॥ सज्जन-संगती । स्वरूपाची प्राप्ती । मोक्ष मग हाती ।
येत असे ॥१२०५॥ पंचभूतात्मक । देहाचा विनाश । अटळ तयास । कळो येई ॥१२०६॥ शरीर
अनित्य । आत्म एक नित्य । त्रिवार हे सत्य । मनीं ठसे ॥१२०७॥ अनेक ते जन्म ।
देहासीच आले । आत्म्यासी न आले । उणेपण ॥१२०८॥ अज नि अव्यय । अपार अनंत । नित्य नि
शाश्वत ।आत्मरूप ॥१२०९॥ स्वरूपाचे ज्ञान । होताची स्वभावे । मरणच्या नावे ।
शून्याकार ॥१२१०॥ महाक्रूर अशा । काळाचेही भय । तुजलागी काय । वाटेल रे ॥१२११॥
म्हणोनिया मना । सज्जनसंगती । रहावे तू राती । आणि दिनी ।१२१२॥ भये व्यापिले सर्व
ब्रह्मांड आहे । भयातीत ते संत आनंत पाहे । जया पाहता द्वैत काही दिसेना । भयो
मानसी सर्वथाही असेना ॥१३६॥ सर्वही ब्रह्मांड । भयाने ग्रासले । कोणी ना पाहिले ।
भयातीत ॥१२१३॥ ऐसी जर शंका । घेतलीस मनी । विचार करोनी । पाही जरा ॥१२१४॥ भय कारे
वाटे । सर्वांस मानसी । एकच रे त्यासी । कारण रे ॥१२१५॥ सर्वांस वाटते । विनाशाचे
भय । मृत्यूचेच भय । त्रास देई ॥१२१६॥ जे जे जन्मा येई । ते ते लया जाई । सर्वदा
हे पाही । सत्य जरी ॥१२१७॥ तरी लया जाणे । नावडे लोकांना । अखंड कामना । जगण्याची
॥१२१८॥ जगण्यासी आड । जे जे येई मना । मृत्यू आणि जरा । त्याचे भय ॥१२१९॥ ऐसा हा
संघर्ष । जैसा रे वाढेल । तैसे ते वाढेल । भय मना ॥१२२०॥ भयातीत मग । कोणीच नाही
का । ऐसी जर शंका । घेशील तू ॥१२२१॥ परी भयातीत । ब्रह्म जे अनंत । आणि साधुसंत ।
ब्रह्मरूप ॥१२२२॥ अज आणि नित्य । पुराण शाश्वत । ब्रह्म जे अनंत । असे बा रे
॥१२२३॥ जन्म आणि मृत्यू । देशकालाचीही । सीमा त्यासी नाही । कदाकाळी ॥१२२४॥ असे
ब्रह्मरूप । साधु आणि संत । होती भयातीत । सहजच ॥१२२५॥ भय ते वसते । सर्वदा ।
द्वैतात । गुंते उपाधीत । म्हणोनिया ॥१२२६॥ उपाधी वेगळा । आत्मा जो रे पाही ।
त्यासी भीती नाही । कदाकाळी ॥१२२७॥ स्वरूप स्वत:चे । ब्रह्मरुप रे जे । पाहे ते
सहजे । भयातीत ॥१२२८॥ द्वैत त्यासी कदा । दिसतच नाही । प्राणिमात्र पाही ।
ब्रह्मरूप ॥१२२९॥ समदर्शी बुद्धी । बळावता मग । श्वान आणि शुक । ब्रह्मरूप ॥१२३०॥
भयाचे ते मग । कारणच नाही । आत्मरूप पाही । जेथे तेथे ॥१२३१॥ वेगळेपणाने । जग
अनुभवा । येईच ना मना । त्यासी कदा ॥१२३२॥ ऐशा संतजना । करू नमस्कार । मना वारंवार
। सर्वभावे ॥१२३३॥ जिवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगूनि गेले । परी जीव अज्ञान तैसेचि
ठेले । देहेबुद्धीचे कर्म खोटे टळेना । जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥१३७॥ तत्वमसि ऐसे
। महावाक्य भले । संत ते बोलले । तुजलागी ॥१२३४॥ अज्ञानाची निद्रा । उडविण्यासाठी
। ज्ञानबोधे तुसी । जागे केले ॥१२३५॥ देहपांघरूण । परी ते घेऊनी । खुशाल होवोनी ।
झोप घेसी ॥१२३६॥ आशा ममतेसी । सवे तू घेतले । बोटासी धरिले । लोभ मोह ॥१२३७॥ क्रोध
आणि मद । तुजसी चढले । स्वप्नामाजी बोले । मीच मीच ॥१२३८॥ देहबुद्धी दृढ । असते
म्हणून । चक्रव्यूहातून । फिरणे रे ॥१२३९॥ देहानेच पूर्ण । विषय वासना । म्हणोनिया
मना । देहबुद्धी ॥१२४०॥ असोनी संनिध । पाही गोड दूध । पितो तो गोचिड । रक्तचि रे
॥१२४१॥ अक्षय्य तो ठेवा । असोनी संनिध । जीवाचे अगाध । अज्ञान रे ॥१२४२॥ मीपणाचा
जोर । जोवरी ना तुटे । जुने ठेवणे ते । आकळेना ॥१२४३॥ भ्रमे नाढळे वित्त ते गुप्त झले
। जिवा जन्मदारिद्र्य ठाकूनी आले । देहेबुद्धीचा निश्चयो ज्या टळेना । जुने ठेवणे
मीपणे आकळेना ॥१३८॥ आत्मरूपी धन । जवळी असोनी । भ्रमाने वेढोनी । घेतलेसे ॥१२४४॥
द्रव्याचा तो साठा । भूमिमाजी असे । परी वरी बैसे । भीक मागे ॥१२४५॥ तैसी मानवाची
। झाली रे अवस्था । स्वस्वरूपता । विसरला ॥१२४६॥ भ्रमाने मानले । देहासीच सत्य ।
विषय ते नित्य । सेवीतसे ॥१२४७॥ असोनिया राजा । स्वप्नी मागे भीक । येताच ती जाग ।
श्रीमंत तो ॥१२४८॥ जीव तो मूळात । असे सुखरूप । देहबुद्धीसाप । वेढी त्यासी ॥१२४९॥
मग पूर्णत्व तो । विसरे आपुले । सुखभिक्षा मागे । जन्मोजन्मी ॥१२५०॥ देहशी
तादात्म्य । पावल्यामुळेच । भ्रम वाटे साच । मानवासी ॥१२५१॥ देहतादात्म्यता ।
जोवरी ना दूर । स्वरूपाचा सूर । गवसेना ॥१२५२॥ पुढे पहता सर्वही कोंदलेसे ।
अभग्यास हे दृश्य पाषाण भासे । अभावे कदा पुण्य गाठी पडेना । जुने ठेवणे मीपणे ते
कळेना ॥१३९॥ परब्रह्म सर्व । ठिकाणी भरले । जर ते पाहिले । ब्रह्मदृष्टी ॥१२५३॥
देहात्मबुद्धी ती । सोडली रे जर । ब्रह्मदृष्टी तर । येई साच ॥१२५४॥ द्वैतबुद्धी
मना । जोवरी असते । साक्षीस न येते । परब्रह्म ॥१२५५॥ अशा अभाग्यास । नामरूपात्मक
। अनुभवा जग । येत असे ॥१२५६॥ मी आणि हे माझे । भावना बळावे । दुजांचे ते गावे ।
दोष नित्य ॥१२५७॥ सर्व कर्ता आणि । करविता मीच । मधे पाषाणाचे । काय काम ॥१२५८॥
करोनिया तो रे । देव दगडाचा । आणि पूजा-अर्चा । कशासाठी ॥१२५९॥ ज्यासी असे ना रे ।
जराही स्वातंत्र्य । अशाचे त्या मंत्र । का रे गावे ॥१२६०॥ अशा अज्ञानाचे । करी
प्रदर्शन । जडरूप जग । भासे त्यासी ॥१२६१॥ मनी नाही भाव । मनी नाही भक्ती । ऐशी
त्याची मती । भ्रष्टते रे ॥१२६२॥ जे क्षणभंगुर । त्यावरीच प्रेम । नित्य असे
ब्रह्म । नावडे ते ॥१२६३॥ वेदश्रुतीवरी । नाही रे विश्वास । मानी ना संतास ।
अज्ञानाने ॥१२६४॥ मग पुण्य त्याच्या । पदरी पडावे । केवी हे घडावे । सांगे मज
॥१२६५॥ पेरावे जे तेच । उगवता दिसे । हा तो तुज असे । अनुभव ॥१२६६॥ अरे नाठविता ।
कर्ता करविता । एका भगवंता । सश्रद्धेने ॥१२६७॥ त्यासी कसे व्हावे । स्वरूपाचे
ज्ञान । ठायीचे अज्ञान । जावे कसे ॥१२६८॥ जयाचे तया चूकलें प्राप्त नाही । गुणे
गोविले जाहले दु:ख देही । गुणावेगळी वृत्ती तेही वळेना । जुने ठेवणे मीपणे ते
कळेना ॥१४०॥ भूमीमाजी असे । पुरलेले धन । परी आठवण । नाही त्याची ॥१२६९॥ नाभीमधे
जरी । सुगंधी कस्तुरी । धावतो कस्तुरी - । मृग जैसा ॥१२७०॥ झाली असे स्थिती । तैसी
मानवाची । नाही स्वरूपाची । ओळखण ॥१२७१॥ म्हणे माझा देह । म्हणे माझे गेह । पुत्र
वित्त सर्व । माझे माझे ॥१२७२॥ देहासवे सर्व । कोण भोगणारा । ऐसिया विचारा । थारा
नाही ॥१२७३॥ सत्व रज तम । गुणांनी वेढले । दु:ख प्राप्त झाले । म्हणोनिया ॥१२७४॥
तमोगुणामुळे । वाढते अज्ञान । मोह तो उत्पन्न । होत असे ॥१२७५॥ दुसर्याच्या घाते
। नर होई सुखी । नर हा त्रिलोकी । अति निंद्य ॥१२७६॥ तमोगुणामुळे । प्राप्त अधोगती
। पतन निश्चिती । होत असे ॥१२७७॥ अज्ञान दाखवी । ज्ञाना आच्छादून । ऐसा तमोगुण ।
बद्धकारी ॥१२७८॥ कामजनित तो । असे रजोगुण । इच्छी धन मान । मनी सदा ॥१२७९॥
विषयभोगाच्या । लागतो हा मागे । अंध प्रेम जागे । मनामधे ॥१२८०॥ प्रपंचसुखाच्या ।
आसक्तीने मग । कष्टाचे काबाड । उपसतो ॥१२८१॥ ऐसा रजोगुण । करीतसे बद्ध ।
आत्मस्वरूपस्थ । होवो नेदी ॥१२८२॥ रजतम करी । मानवासी बद्ध । सत्व तरी शुद्ध ।
असोनिया ॥१२८३॥ मग कसा करी । बद्ध मानवासी । शंका तुज ऐसी । वाटतसे ॥१२८४॥
सत्वगुणामुळे । ज्ञानाचा प्रकाश । सदा मानवास । मिळतसे ॥१२८५॥ ज्ञानाचाच त्या रे ।
चढे अहंकार । तुच्छ ते इतर । लेखितसे ॥१२८६॥ सदा म्हणे मनी । मी श्रेष्ठ मी ज्ञानी
। आपुलीच हानी । करितसे ॥१२८७॥ ऐसे हे त्रिगुण । जीवास वेढती । आत्मरूपप्राप्ती ।
कैसी होई ॥१२८८॥ यांचिया संगाने । दु:ख प्राप्त सदा । भोगिती आपदा । दारुण रे
॥१२८९॥ सत्व-रज-तम । वृत्ती या विलीन । तेव्हा होई ज्ञान । स्वरूपाचे ॥१२९०॥ म्हणे
दास सायास त्याचे करावे । जनीं जाणता पाय त्याचे धरावे । गुरुअंजनेवीण ते आकळेना ।
जुने ठेवणे मीपणें ते कळेना ॥१४१॥ अलिप्तपणाने । पाही साक्षीपणे । तेव्हाच
ज्ञानाने । समृद्ध तू ॥१२९१॥ अलिप्तपणाने । कसे ते पहावे । कसे अनुभावे । आत्मरूप
॥१२९२॥ हे तो सर्व कळे । सद्गुरुसंगती । तोचि तुजप्रती । पार करी ॥१२९३॥ त्याचे
मनोभावे । करावे पूजन । सर्व ते अज्ञान । जाई वेगे ॥१२९४॥ मनोभावे केली । अरे
त्यांची सेवा । आत्मरूपमेवा । प्राप्त होई ॥१२९५॥ मार्गदर्शक तो लाभता सद्गुरु ।
पाववी तो पारु । या भवाचा ॥१२९६॥ अरे त्रिभुवनी । सद्गुरुसारिखा । नाही पाठीराखा ।
सत्य जाण ॥१२९७॥ त्यांचिया कृपेने । मिळे तुज मुक्ती । सद्गुरुची शक्ती । ऐसी असे
॥१२९८॥ ज्ञानरूप घाली । डोळ्यात अंजन । देई आत्मधन । अती प्रेमे ॥ १२९९॥ त्यांचिये
संगती । आत्मरूप शोध । देती तुज बोध । परोपरी ॥१३००॥ कळेना कळेना कळेना ढळेना ।
ढळेना ढळे संशयो ही ढळेना । गळेना गळेना अहंता गळेना । बळे आकळेना मिळेना मिळेना
॥१४२॥ सद्गुरूची मज । काय ती गरज । आत्मरुप साज । घालण्यासी ॥१३०१॥ माझ्या बळावरी
। करून घेईन । आत्मरूप धन । आपुलेसे ॥१३०२॥ देहबुद्धी धरू -। निया अनंतासी । कशी
घालितोसी । गवसणी ॥१३०३॥ अरे ज्या गावाचा । माहीत ना मार्ग । मग कसा सांग । जाशी
तेथे ॥१३०४॥ कल्पनाही ज्याची । करू ना शकसी । अशा अनंतासी । पाही कसा ॥१३०५॥ अरे
जे सांडिले । तेज ते डोळ्याने । मग ते पाहणे । घडे केवी ॥१३०६॥ किंवा आहे तेज ।
परी नाही रवी । कशी ती पहावी । हर गोष्ट ॥१३०७॥ देह वाटे खरा । दिसतो तो डोळा ।
आत्मस्वरुपाला । अदृश्यता ॥१३०८॥ मग संशय तो । मनात वाढतो । आणि तो कल्पितो ।
दृश्य सत्य ॥१३०९॥ देहबुद्धीयोगे । मन नाही शुद्ध । म्हणोनिया बद्ध । होत असे
॥१३१०॥ अरे देहाहंता । जोवरी ना दूर । आत्मरूप दूर । दूर असे ॥१३११॥ सद्गुरुसंगती
। देहाहंता जाते । आणि उजळते । आत्मरूप ॥१३१२॥ अज्ञानतमासी । करितो तो दूर ।
म्हणोनिया धर । चरण तू ॥१३१३॥ अविद्यागुणे मानवा ऊमजेना । भ्रमे चूकले हीत ते
आकळेना । परीक्षेविणे बांधले दृढ नाणे । परी सत्य मिथ्या । असे कोण जाणे ॥१४३॥
दृश्य दिसे जे जे । मानितो तो साच । रे अविद्येनेच । ठकविले ॥१३१४॥ विपरीत तर्हे
। करूनिया देते । ज्ञान मानवाते । अविद्या ती ॥१३१५॥ दोरालाच साप । मानूनी ठोकतो ।
अरे तो भुलतो । अविद्येने ॥१३१६॥ अज्ञानहिम ते । जाई वितळोनी । ज्ञानसूर्य मनी ।
उगवता ॥१३१७॥ स्वरूपाची मग । होते ओळखण । भ्रमाचे ते ठाण । मोडताच ॥१३१८॥ भ्रमरूपी
मेघ । आला आड जर । स्वरुप भास्कर । दिसे कैसा ॥१३१९॥ भ्रमाने रे मना । हीत आकळेना
। रूप उमजेना । श्रीरामाचे ॥१३२०॥ पितळ घेतले । सोने म्हणोनिया । तरी जीवाची या ।
फसगत ॥१३२१॥ बद्ध दशेतच । सदा शोधी सुख । सुखाची ही भूक । वाढतसे ॥१३२२॥ विषयसुखात
। गुंतोनिया जाता । म्हणे कोण आता । भगवंत ॥१३२३॥ देहालाच दृढ । मनी धरोनिया ।
आत्मसुख वाया । म्हणतसे ॥१३२४॥ आत्मा जरी आहे । दिसेना दृष्टीसी । काय आहे त्यासी
। प्रमाण ते ॥१३२५॥ नाना विकल्प ते । धरोनी मानसी । मिथ्या या देहासी । मानी सत्य
॥१३२६॥ काय सांगू मना । साधी ना तो हित । हानि पदरात । पडतसे ॥१३२७॥ अविद्यरुपी ते
। खोटे नाणे मना । बाळगू नको ना । स्वत:पासी ॥१३२८॥ जगीं पाहता साच ते काय आहे ।
अती आदरे सत्य शोधूनि पाहे । पुढे पाहता पाहता देव जोडे । भ्रमें भ्रांति अज्ञान
हे सर्वमोडे ॥१४४॥ पाही जगाकडे । काय खरे असे । जे जे दृष्टी दिसे । ते ते नष्ट
॥१३२९॥ जन्म स्थिती लय । अनुभवा येई । त्यासी खरे काई । म्हणो येई ॥१३३०॥ ज्यासी
नाही जन्म । ज्यासी नाही मृत्यु । तीच एक वस्तू । सत्य होय ॥१३३१॥ नित्य अनित्याचा
। करोनी विवेक । अनुभवी एक । परब्रह्म ॥१३३२॥ नित्य एक काय । दृढ धरी मने । मग
त्या दिशेने । पाय टाक ॥१३३३॥ शोध घेता घेता । येई अनुभवा । एक त्याच देवा ।
पाहशील ॥१३३४॥ सत्यस्वरुपाची । होवोनी ओळाख । अज्ञानाची राख । रांगोळी रे ॥१३३५॥
भ्रम तो जाईल । भ्रांती ती उडेल । रूप पाहशील । आपुले तू ॥१३३६॥ सदा वीषयो चिंतिता
जीव जाला । अहंभाव अज्ञान जन्मासी आला । विवेके सदा स्वस्वरूपी भरावे । जिवा ऊगमीं
जन्म नाही स्वभावे ॥१४५॥ ऐसे जर होते । मन मग का ते । विवेकासी देते । ढकलुनी
॥१३३७॥ अनिच्छा असोनी । पापकर्मी लीन । पदरात शीण । का बा येई ॥१३३८॥ अशी एक शंका
। सहज उठते । तरी कारण ते । ऐक आता ॥१३३९॥ विषय चिंतन । एकचि कारण । जनन मरण ।
भोगी नित्य ॥१३४०॥ धावते ते मन । विषयांच्या मागे । विषयांच्या संगे । दु:ख आहे
॥१३४१॥ एक आस मना । होताची रे पूर्ण । दुजी आस जन्म । घेत असे ॥१३४२॥ विषयांची माळ
। होत जाते मग । एकतून एक । वाढतसे ॥१३४३॥ मग त्यातुनिया । अहंकार वाढे । विषयांचे
वेढे । वाढताती ॥१३४४॥ घेवोनिया मुखी । विषयांचे वीख । अहंकार नाग । फडा काढे
॥१३४५॥ स्वरुप विसर । पडोनिया मग । अज्ञानाचे भोग । घेत असे ॥१३४६॥ भोगण्यासाठी
त्या । अतृप्त वासना । जन्म घेइ नाना । मृत्युलोकी ॥१३४७॥ विषय संगती । असते घातक
। म्हणोनी विवेक । करी काही ॥१३४८॥ आत्म विवेकाने । स्वरूपी तू मीळ । विषयांचे गीळ
। गरळ तू ॥१३४९॥ विषयांच्या ठायी । आवड ती नको । नावडही नको । ऐके मना ॥१३५०॥
आसक्तीच मेली । मग ते विषय । करतील काय । सांगे मज ॥१३५१॥ मग स्वरूपीच । होशील तू दंग
। विषयांचा संग । सुटताच ॥१३५२॥ जिवाशिवाची ती । ऐक्यता घडेल । अज्ञान जाईल ।
रसातळा ॥१३५३॥ बिंबातच प्रति - । बिंब मिसळेल । अज्ञानाचे जल । सरताच ॥१३५४॥
ब्रह्मासी तो नाही । जन्म आणि मृत्यू । तीच एक वस्तू । सच्चिद्घन ॥१३५५॥ उगमात जीव
। मना स्थिरवता । जन्म-मृत्युवार्ता । त्यासी नाही ॥१३५६॥ दिसे लोचनी ते नसे
कल्पकोडी । अकस्मात आकारले काळ मोडी । पुढे सर्व जाईल काही न राहे । मना संत आनंत
शोधूनि पाहे ॥१४६॥ ऐक बा रे मना । लोचनी जे दिसे । त्यासी अंत असे । निश्चयत्वे
॥१३५७॥ आकारासी येते । ते ते लया जाते । शाश्वत नसते । काही येथे ॥१३५८॥ कधी
काळांतरी । कधी आकस्मिक । नाश तो होतोच । बा रे मना ॥१३५९॥ दृश्य नाशवंत । सांगे
वेद श्रुती । येथे ना शाश्वती । ब्रह्मावीण ॥१३६०॥ मग कशासाठी । करी खटाटोप । एक
आत्मरूप । विसरूनी ॥१३६१॥ मानूनिया सत्य । संसाराभास हा । यातनांच्या डोहा- । माजी
बुडे ॥१३६२॥ स्वरूपानुभव । येताच तुजसी । जन्मास येण्यासी । कारण ना ॥१३६३॥
जीव-शिव-ऐक्य । येइल घडोन । स्वरुपानुसंधान । राखताच ॥१३६४॥ अनादि अनंत । शाश्वत
नि सत्य । अव्यक्त अचिंत्य । परब्रह्म ॥१३६५॥ विवेकाने त्याचा । घेई बा रे शोध ।
अंतरी हा बोध ठसू दे रे ॥१३६६॥ फुटेना तुटेना चळेना ढळेना । सदा संचले मीपणे ते
कळेना । तया एकरूपासी दुजे न साहे । मना संत आनंत शोधूनी पाहे ॥१४७॥ फुटेना ते कधी
। चळेना ते कधी । कळेना ते कधी । ढळेना ही ॥१३६७॥ अग्नी ते जाळीना । पाणी भिजवीना
। वारा सुकवी ना । परब्रह्म ॥१३६८॥ ऐसे परब्रह्म । सर्वत्र संचले । डोळा ना दिसले
। जरी बापा ॥१३६९॥ सर्वत्र ते असे । तरी का न दिसे । ऐसी शंका असे । तव मनीं
॥१३७०॥ तरी ऐके मना । वारा असोनिया । परी डोळ्यांना या । दिसे ना तो ॥१३७१॥
अनुभवानेच । लागते जाणावे । दुजी ती उद्भवे । शंका मनी ॥१३७२॥ मग अनुभवा । का ते
नाही येत । असोनी सर्वत्र । घनदाट ॥१३७३॥ प्रयत्नाने तेच । होते की रे साध्य । परी
तू प्रयत्न केलेस का ॥१३७४॥ अहंभावाने रे । घेरले तुजसी । सत्य तू मायेसी । मानले
रे ॥१३७५॥ सोडिल्याविना रे । मीपणाचा संग । परब्रह्मरंग । आकळेना ॥१३७६॥ तेच एक
असे । सर्वत्र संचले । द्वैतासी नुरले । ठिकाण रे ॥१३७७॥ परब्रह्मी लीन । होता
समाधान । मिळेल ते पूर्ण । तुजलागी ॥१३७८॥ मीपणाचा संग । मना सोडोनिया । पाही
शोधोनिया । यत्नबळे ॥१३७९॥ निराकार आकार ब्रह्मादिकांचा। जया सांगता शीणली वेदवाचा
। विवेके तदाकार होवोनी राहे । मना संत आनंत शोधूनि पाहे ॥१४८॥ त्यासी ना आकार ।
त्यासी ना आधार । परी ते आधार । सर्वांसीही ॥१३८०॥ प्रकटसे ब्रह्मा । याचिया आधारे
। विष्णु हर झाले । यापासून ॥१३८१॥ उत्पत्तीकाली ते । ब्रह्मदेव असे । विष्णु तेच
असे । स्थितीकाली ॥१३८२॥ संहार समयी । असे महादेव । एक तेच सर्व । व्यापले रे
॥१३८३॥ महाशून्य तेच । त्रिगुण लोपता । वेदादिक वार्ता । कथिती ना ॥१३८४॥ तद्रूप
होवोनी । घेई अनुभव । शोध त्याचा ठाव । विवेकाने ॥१३८५॥ जगीं पाहता चर्मचक्षी न
लक्षे । जगीं पाहता ज्ञानचक्षी न रक्षे । जगीं पाहता पाहणे जात आहे । मना संत आनंत
शोधूनि पाहे ॥१४९॥ चर्मचक्षू पाहे । सगुण साकार । असेल आकार । जो या सृष्टी ॥१३८६॥
परी ब्रह्मासी त्या । रंग ना आकार । कसा पाहे नर । चर्मदृष्टी ॥१३८७॥
ज्ञानचक्षूनेच । पाहू गेले त्यास । येई अनुभवास । सिद्धांत हा ॥१३८८॥ वाच्यांश
लक्ष्यांश । लोपूनी जाताती । येता अनुभूती । बा रे मना ॥१३८९॥ ऐसे तदाकार । होवोनि
पाहता । पाहणेही आता । नुरतसे ॥१३९०॥ दृश्य द्रष्टा आणि । बा मना दर्शन । त्रिपुटी
ही जाण । लोपतसे ॥१३९१॥ लक्ष्यांश पाहता । वाच्यांश तो नाही । लक्ष्यांशही नाही ।
वृत्तीलेशी ॥१३९२॥ ऐसिया क्रमाने । करी तू अभ्यास । शोधी तू ब्रह्मास । बा रे मना
॥१३९३॥ नसे पीत ना श्वेत ना शाम काही । नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाही । म्हणे
दास विश्वासता मुक्ती लाहे । मना संत आनंत शोधूनि पाहे ॥१५०॥ त्यासी नाही वर्ण ।
नसे पीत नीळ । श्वेत ना शामल । रंगहीन ॥१३९४॥ व्यक्तही ते नाही । अव्यक्तही नाही ।
परी भासे पाही । विश्वरूपे ॥१३९५॥ व्यक्त ना अव्यक्त । रंगहीन सत्य । अनुभवाप्रत ।
कसे येई ॥१३९६॥ ऐसी शंका मना । येई तुजप्रती । कशी मुक्त स्थिती । प्राप्त होई
॥१३९७॥ सद्गुरुवचनीं । दृढ तो विश्वास । ठेविता सायास । नाहीतच ॥१३९८॥ श्रद्धा तुज
नेई । भवाच्या रे पार । सद्गुरु ईश्वर । मानी सत्य ॥१३९९॥ खरे शोधिता शोधिता
शोधताहे । मना बोधिता बोधिता बोधताहे । परी सर्वही सज्जनाचेनि योगे । बरा निश्चयो
पाविजे सानुरगे ॥१५१॥ स्वबळे घेतला । शोध त्या ब्रह्माचा । पार काय त्याचा । न
लागे रे ॥१४००॥ ऐसी तू मानसी । घेशील आशंका । आता करू शंका - । निरसन ॥१४०१॥
बाहुबळे तूही । जाशील तरून । संसार सागर । बा रे मना ॥१४०२॥ भेटेल ते ब्रह्म ।
आत्यंतिक निष्ठा । यत्न पराकष्ठा । करशील ॥१४०३। सतत अभ्यास । अंतरी चिंतन । बाह्य
आचरण । शुद्ध जर ॥१४०४॥ परी सांगे काय । होडी ती सोडून । जाशील पोहून । कष्टवीत
॥१४०५॥ सद्गुरुजहाज । असता समर्थ । कासया ते व्यर्थ । परिश्रम ॥१४०६॥ सान सान
गोष्टी - । माजीही तू मना । गुरु करिसी ना । सांगे मज ॥१४०७॥ बालवयात ते । आईबाप
गुरु । शिक्षक ते गुरु । शाळे मधे ॥१४०८॥ प्रापंचिक बापा । शिकण्यासी कला । गुरु
असे केला । पदोपदी ॥१४०९॥ मग मोक्षदात्री । विद्या शिकण्यासी । गुरु अव्हेरिसी ।
कशासाठी ॥१४१०॥ शोध आणि बोध । सद्गुरुसंगती । अती सोपे होती । बा रे मना ॥१४११॥
सद्गुरुसंगती । संदेह निमती । मनाचीही भ्रांती । लय पावे ॥१४१२॥ ब्रह्माचा निश्चय
। करुनिया मनी । सद्गुरुचरणीं । लीन होई ॥१४१३॥ मग तुज तेच । नेती उद्धरून ।
संसारा मधून । मोक्षधामी ॥१४१४॥ बहुतांपरी कूसरी तत्वझाडा । परी अंतरी पाहिजे तो
निवाडा । मना सार साचार ते वेगळे रे । समस्तांमधे एक ते आगळे रे ॥१५२॥
नानाप्रकारीचे । तत्वविवरण । करिती विद्वान । सर्वकाळ ॥१४१५॥ परी ऐके मना । अनुभवावीण
। शून्य सर्व जाण । निरर्थक ॥१४१६॥ साखर ती कशी । वर्णाने ऐकली । चव ना पाहिली ।
रसनेने ॥१४१७॥ तत्वविवेचन । ऐकून वाचून । सद्वस्तु-दर्शन । होत नाही ॥१४१८॥
परब्रह्मासी त्या । दृष्टांत नाहीच । अनुभवानेच । जाणावे त्या ॥१४१९॥ तात्विक
बौद्धिक । आणिक शाब्दिक । ज्ञानाहून एक । वेगळे ते ॥१४२०॥ शास्त्रप्रचीतीचे ।
आत्मप्रचीतीत । रूपांतर होत । असे जेव्हा ॥१४२१॥ तेव्हा समाधान । मिळेल तुजसी ।
आत्मानुभवासी । सत्य मान ॥१४२२॥ नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्वज्ञाने । समाधान काही
नव्हे तानमाने । नव्हे योगयागे नव्हे भोगत्यागे । समाधान ते सज्जनाचेनि योगे ॥१५३॥
तुज समाधान । नव्हे पिंडज्ञाने । नव्हे तत्वज्ञाने । चिरकाल ॥१४२३॥ असो शारीरिक ।
वा पंचभौतिक । मिळेल क्षणिक । समाधान ॥१४२४॥ नाना कला विद्या । शिकशील मना ।
समाधान होण्या । खरोखरी ॥१४२५॥ यज्ञ याग केले । भोगही त्यागिले । आणि मिळवले ।
समाधान ॥१४२६॥ असे जरी तुज । वाटले रे मना । व्यर्थ अभिमाना । वाढविले ॥१४२७॥
योगसामर्थ्याने । प्राप्त समाधान । बा मना व्युत्थान । होतचि रे ॥१४२८॥ सर्वकाल
राही । ऐसेही तो नाही । म्हणोनिया काही । ऐक मना ॥१४२९॥ लाभे प्रसन्नता । अखंड
चित्ताची । समाधान तेचि । ऐक आता ॥१४३०॥ बा मना तुजसी । मिळे समाधान । संतसमागम ।
प्राप्त होता ॥१४३१॥ सज्जनसंगती । घडते श्रवण । बुद्धीचे मालिन्य । दूर होते
॥१४३२॥ अवगुणांचाही । होतो परिचय । नि यथासमय । त्याग घडे ॥१४३३॥ अरे बुद्धी शुद्ध
। होताच मी कोण । स्वरूपाचे ज्ञान । होत असे ॥१४३४॥ स्वस्वरूपाकार । होता
चित्तशुद्धी । मग तुज अंती । मोक्षधाम ॥१४३५॥ महावाक्य तत्वादिके पंचकर्णे । खुणे
पाविजे संतसंगे विवर्णे । द्वितीयेसी संकेत जो दाविजेतो । तया सांडुनी चंद्रमा
भाविजेतो ॥१५४॥ सद्गुरुसंगती । तुज साक्षात्कार । स्वस्वरूपाकार । मन तुझे ॥१४३६॥
महावाक्यांचे त्या । होता विवरण । परब्रह्मखूण । दाखविती ॥१४३७॥ तत्वमीमांसा नि ।
रे पंचीकरण । या सर्वांचे ज्ञान । तेचि देती ॥१४३८॥ ब्रह्मसाक्षात्कार । करुनिया
देती । संत ते जगती । मानवासी ॥१४३९॥ अस्पष्ट अशी । कोर द्वितीयेची । दाऊनि खूणेची
। वस्तू एक ॥१४४०॥ किंवा ध्रुवतारा । सप्तर्षी आधारे । दाखविती थोर । बालकासी
॥१४४१॥ परब्रह्मचंद्र । दाविती सज्जन । महावाक्यखूण । दाखवोनी ॥१४४२॥ दिसेना जनीं
तेचि शोधूनि पाहे । बरे पाहता गूज तेथेचि आहे । करी घेऊ जाता कदा आडळेना । जनी
सर्व कोंदाटले ते कळेना ॥१५५॥ घेई अनुभव । पब्रह्माचा त्या । तीच एक सत्ता ।
सर्वकाल ॥१४४३॥ पंचज्ञानेंद्रिया । पलिकडे आहे । शोधूनी तू पाहे । तेचि एक ॥१४४४॥
बा चर्मचक्षूंना । अरे ते दिसेना । विवेकाने मना । शोध घेई ॥१४४५॥ सोडूनी मीपणा ।
घेई त्याचा शोध । स्वस्वरूपबोध । होई तुज ॥१४४६॥ मीपणे ते कधी । नाही हाती येत ।
भरले सर्वत्र । असूनही ॥१४४७॥ म्हणे जाणतां तो जनी मूर्ख पाहे । अतर्कासी तर्की
असा कोण आहे । जनी मीपणे पाहता पाहवेना । तया लक्षिता वेगळे राहवेना ॥१५६॥ म्हणेल
जो कोणी । ब्रह्म मी जाणले । अज्ञानी म्हटले । पाहिजे त्या ॥१४४८॥ वेगळेपणाने ।
पाहू गेले जर । न होय गोचर । परब्रह्म ॥१४४९॥ एकरुप जर । ज्ञाता ज्ञान ज्ञेय ।
तरीच तो होय । अनुभव ॥१४५०॥ त्रिपुटीचा अंत । ब्रह्मानुभवात । ‘मी’
न
उरे तेथ । येतुलाही ॥१४५१॥ मिठाची बाहुली । सागराची खोली । मोजावया गेली । परी काय
॥१४५२॥ परतोनी नाही । सांगावया आली । एकरूप झाली । सागरासी ॥१४५३॥ अतर्क्य
ब्रह्मासी । जाणेल रे कोण । धरोनी मीपण । मनाठायी ॥१४५४॥ वस्तू जी ना दिसे । वस्तू
जी ना भासे । ध्यानी यावे कसे । सांग बापा ॥१४५५॥ आणि जो जाणतो । एकरुप होतो ।
वेगळा नुरतो । सांगावया ॥१४५६॥ बहु शास्त्र धुंडाळिता वाड आहे । मना निश्चयो येक
तोही न साहे । मति भांडती शास्त्रबोधे विरोधे । गति खुंटिती ज्ञानबोधे प्रबोधे
॥१५७॥ अतर्क्य अचिंत्य । परब्रह्म असे । अनुभवा कसे । यावे आता ॥१४५७॥ आयुष्यही
थोडे । असते तत्वता । ग्रंथ तो कोणता । अभ्यासावा ॥१४५८॥ शास्त्राशास्त्रातही ।
ऐक्यमत नाही । आता खरे काही । उमजेना ॥१४५९॥ एकचि ती गीता । कोणी कर्मपर । कोणी
ज्ञानपर । सांगतसे ॥१४६०॥ मतभिन्नतेने । सर्वत्र सन्मान्य । एक तो निर्णय । नच घडे
॥१४६१। शास्त्रांच्या विरोधी । अर्थ ते करिती । आणि भांडिताती । बुद्धिमानी ॥१४६२॥
प्रत्येकास वाटे । आपलेच मत । असे सर्वश्रेष्ठ । दुजाहुनी ॥१४६३॥ मग ते पडते । मन
संशयात । काही हिताहित । ध्यानी न ये ॥१४६४। कोणते ते शास्त्र । वाचावे मी आता ।
धरावा कोणता । योग्य पथ ॥१४६५॥ अशा संशयात । पडू नको मना । वाचू नको नाना ।
शास्त्रग्रंथ ॥१४६६॥ एक तुज मार्ग । असे मी सांगत । घेई तू ध्यानात । बा रे मना
॥१४६७॥ मताभिमानी रे । तेचि ते भांडती । ज्ञानाने जागृती । झाली ज्यांची ॥१४६८॥
त्यांचा अहंपणा । पार लया गेला । वादही थांबला । सहजचि ॥१४६९॥ सिद्धांतासंबंधी ।
निश्चयही दृढ । संशयाचा पाड । राहिला ना ॥१४७०॥ मतिप्रकाशाने । झाले समाधान । आणि
ते अज्ञान । राहिले ना ॥१४७१॥ अशा जाणत्याची । धरी मना कास । नि पैलतीरास । जाई
आता ॥१४७२॥ श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे । स्मृती वेदवेदांतवाक्येविचित्रे
। स्वये शेष मौनावला स्थीर पाहे । मना सर्व जाणीव सांडूनि राहे ॥१५८॥ जाणताही तुज
। देईल प्रकाश । मार्ग तो तुलाच । चालणे रे ॥१४७३॥ तूच बा रे मना । करुनी साधना ।
प्राप्त निरंजना । करावे रे ॥१४७४॥ त्या निरंजनाचे । करिता वर्णन । श्रुती न्याय
तर्क । थकले रे ॥१४७५॥ नेति नेति ऐसे । म्हणती वेदही । स्वये तो शेषही । मौन धरी
॥१४७६॥ अहंभाव ज्ञाते - । पणाचा सोडून । घेई अनुभव । तुझा तूचि ॥१४७७॥ जेणे
मक्षिका भक्षिली जाणीवेची । तया भोजनाची रुची प्राप्त कैची । अहंभाव ज्या मानसीचा
विरेना । तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना ॥१५९॥ मिष्टान्नाची चव । जाईल क्षणात ।
मक्षिका पोटात । गेली जर ॥१४७८॥ तैसे बा रे मना । अमृत भोजन । करायालागून । गेले जर
॥१४७९॥ माशी ती गिळिली । बा ज्ञातेपणाची । रुची भोजनाची । मिळे कैशी ॥१४८०॥
अहंभावामुळे । ज्ञान अनुभवा । येत नाही मना । ध्यानी धरी ॥१४८१॥ भोजनाची रुची ।
तेव्हा होते प्राप्त । जेव्हा तादात्म्य ते । होते तेथे ॥१४८२॥ तैसा अहंभाव ।
विरोनिया जाई । अनुभवा येई । परब्रह्म ॥१४८३॥ अहंभाव हाच । द्वैतासी कारण ।
ज्ञानरूपी अन्न । पचवी ना ॥१४८४॥ नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना भेद
नाना विकारी । नको रे मना सीकवू पूढिलांसी । अहंभाव जो राहिला तूजपासी ॥१६०॥
जाणतेपणाचा । वाढे अभिमान । मीच एक ज्ञानी । ऐसे वाटे ॥१४८५॥ आणि इतरांसी ।
लेखोनिया कमी । रमतो स्वस्तोमी । जगामाजी ॥१४८६॥ उपदेशाचे तो । डोसही देतसे ।
लागले रे पिसे । ज्ञानाचेच ॥१४८७॥ दुसर्याचे मत । न पटे तयाला । सांगे ज्याला
त्याला । निजमत ॥१४८८॥ अहंभावे मग । करितसे वाद । साधी ना संवाद । इतरांशी ॥१४८९॥
वादासंगे द्वेष । क्रोध आणि काम । कलहाचे धाम । वाद असे ॥१४९०॥ वाद करू नको ।
म्हणोनिया मना । तो तुझ्या साधना । आड येई ॥१४९१॥ ज्ञानाने द्वैतासी । देवोनी
सोडून । एकत्वात लीन । होणे आहे ॥१४९२॥ दुष्ट जे विकार । उत्पन्न जो करी ।
द्वैतभाव दूरी । ठेवी मना ॥१४९३॥ दुजांसी तू ज्ञान । शिकवू नकोच । जोवरी आहेच ।
अहंभाव ॥१४९४॥ आपुले ते सोंग । उघडे पडेल । जनात होईल । मानहानी ॥१४९५॥ अहंतागुणे
सर्वही दु:ख होते । मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते । सुखी राहता सर्वही सूख आहे
। अहंता तु्झी तूचि शोधूनि पाहे ॥१६१॥ अहंभावामुळे । होत आहे हानि । काही बोल
ध्यानीं । धरी मना ॥१४९६॥ एक मी शहाणा । दुजा शिकवीन । दुजांचे अज्ञान । निवटीन
॥१४९७॥ ऐशा अहंतेत । मना नको पडू । अहंताच कडू । फळ देई ॥१४९८॥ देह अभिमान ।
दु:खाचे ते मूळ । करी तू निर्मूळ । वेगे आता ॥१४९९॥ स्वये जे पाहिले तेचि रे बोलले
। तैसेचि चालले । जनांमधे ॥१५००॥ तोचि नर वंद्य । होतसे जनांसी । नाही इतरांसी ।
ऐसे सुख ॥१५०१॥ आत्मसुखी मग्न । राहिले असता । सुखदु:खचिंता । स्पर्शी ना रे
॥१५०२॥ आत्मसुखालागी । पारखा तू होसी । अहंतेने होसी । अभिमानी ॥१५०३॥ मना तुझे
दोष । दाविले दुजाने । घेरले क्रोधाने । लगोलग ॥१५०४॥ म्हणोनिया करी ।
आत्मनिरीक्षण । काय अवगुण । अंगी तुझ्या ॥१५०५॥ शोधोनिया त्यांचा । करोनिया त्याग
। सुख मग भोग । सर्वकाळ ॥१५०६॥ अहंतागुणे नीति सांडि विवेकी । अनीतीबळे श्लाघ्यता
सर्व लोकी । परी अंतरी सर्वही साक्ष येते । प्रमाणांतरे बुद्धी सांडूनी जाते ॥१६२॥
पडता गळ्यात । अहंतेचा पाश । सर्वथा विनाश । होतो बापा ॥१५०७॥ विवेकही मग । जातो
सोडोनिया । मान मिळवाया । मन धावे ॥१५०८॥ लौकिक मोहाने । नीतीही सोडून । वागे
उंडारून । यथेच्छ रे ॥१५०९॥ मी मुक्त मी ज्ञानी । ऐशा मोठेपणी । आपुलीच हानी । करी
मन ॥१५१०॥ अनीतीच्या बळे । वाढवी लौकिक । भुलताती लोक । बहिरंगा ॥१५११॥ जना फसवितो
। आणि ठकवितो । लोकांसी दावितो । बाह्य रूप ॥१५१२॥ परी मनरूपी । स्वच्छ आरशात ।
असे त्या दिसत । प्रतिबिंब ॥१५१३॥ प्रमाण वचने । माहीत असून । तरी लाथाडून । जात
असे ॥१५१४॥ अहंता पगडा । असे बुद्धीवरी । विवेकाला सारी । दूरवरी ॥१५१५॥ आणि
बुद्धिनाश । घेतो ओढवून । मोहाने वागून । अनीतीने ॥१५१६॥ देहेबुद्धीचा निश्चयो दृढ
जाला । देहातीत ते हीत सांडीत गेला । देहेबुद्धी ते आत्मबुद्धी करावी । सदासंगती
सज्जनाची धरावी ॥१६३॥ बुद्धिनाश अंती । असे आत्मघात । सांगे भगवंत । गीतेमाजी
॥१५१७॥ विवेकाअभावी । देहबुद्धि वाढे । विषय कवाडे । उघडिता ॥१५१८॥ मूर्ख हा पढत ।
करी अनहित । जाई वाढवीत । देहबुद्धी ॥१५१९॥ बाह्य सुखालागी । भुलूनी विनाश । करी
सावकाश । आपुलाच ॥१५२०॥ चिरंतन सुख । देहाच्या अतीत । सांगतात संत । स्पष्टपणे
॥१५२१॥ परी नाशिवंत । देहासाठी धावे । हितासी मुकावे । लागतसे ॥१५२२॥ म्हणोनिया
मना । देहबुद्धी सोडी । स्वरूपी आवडी । धरावी रे ॥१५२३॥ देह तो मी नोहे । आत्मा तो
मी आहे । ऐशा दृष्टी पाहे । सर्वकाल ॥१५२४॥ देहबुद्धीलय । आत्मज्ञानोदय ।
अज्ञानविलय । सत्संगती ॥१५२५॥ म्हणोनिया मना । धरि सत्संगती । जेथे बळावे ती ।
आत्मबुद्धी ॥१५२६॥ मने कल्पिला विषयो सोडवावा । मने देव निर्गुण तो ओळखावा । मने
कल्पिता कल्पना ते सरावी । सदा संगती सज्जनाची धरावी ॥१६४॥ मनासी सर्वदा ।
कल्पायाची सवे । विषय देखावे । नित्य नवे ॥१५२७॥ मनाचे जीवन । विषय चिंतन ।
विषयांच्यावीण । राहे ना ते ॥१५२८॥ कधी ते अशुद्ध । कधी अति शुद्ध । विषयांनी बद्ध
। मन राहे ॥१५२९॥ विषयांपासून । सोडविल्याविना । कसा देवराणा । भेटेल रे ॥१५३०॥
बुद्धीकल्पनेच्या । असे तो अतीत । मग कसा प्राप्त । होई तुज ॥१५३१॥ कल्पनेत जन्म ।
दुजा कल्पनेसी । तिजी तिच्यापाशी । जन्म घेई ॥१५३२॥ मनाचे हे खाद्य । तोडोनिया
टाकी । प्राप्त एकाएकी । परब्रह्म ॥१५३३॥ नि:संग हे मन । कसे ते करावे । शिक तू
स्वभावे । सत्संगती ॥१५३४॥ देहदीक प्रपंच हा चिंतियेला । परी अंतरी लोभ निश्चित
ठेला । हरिचिंतने मुक्तिकांता वरावी । सदा संगती सज्जनाची धरावी ॥१६५॥ मी आणि हा
माझा । असे हा संसार । चिंता निरंतर । वाही त्याची ॥१५३५॥ कन्या आणि पुत्र । आप्त
सगे मित्र । कनक कलत्र । माझे मानी ॥१५३६॥ त्यांच्यासाठी मग । धावे नानापरी ।
स्वहीत विसरी । लोभे मोहे ॥१५३७॥ अंत:करणात । प्रपंच आसक्ती । द्रव्यदारा भक्ती
वसतसे ॥१५३८॥ विषयोपभोगी । अंती आहे दु:ख । म्हणोनिया मख्ख । राहू नको ॥१५३९॥
हरिचे चिंतन । करी सर्वकाळ । नाही काळवेळ । नाम घेता ॥१५४०॥ मुक्तिकांतेचा तू ।
होसी अधिकारी । स्मरता श्रीहरी । अंतरात ॥१५४१॥ मार्गदर्शक ते । होती तुज संत ।
तयांची संगत । धरावी रे ॥१५४२॥ अहंकार विस्तारला या देहाचा ।
स्त्रिया-पुत्र-मित्रादिके मोह त्यांचा । बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी । सदा
संगती सज्जनाची धरावी ॥१६६॥ अहंकार वृक्ष । जाई फोफावत । आधारासी घेत । देह मन
॥१५४३॥ स्त्रिया पुत्रादिक । फांद्या फुटताच । मोहाचे मूळच । दृढ होई ॥१५४४॥ ममत्व
ते वाढे । प्रपंच तो ओढे । मनासी वावडे । निजसुख ॥१५४५। स्त्रियापुत्रादिक ।
सुखासी कारण । होतील म्हणोन । दृढ धरी ॥१५४६॥ परी एके दिनी । सोडोनिया जावे । लागे
रे स्वभावे । अंतकाळी ॥१५४७॥ तेव्हा कोणी नाही । येत बरोबर । जंगम स्थावर । येथे राही
॥१५४८॥ ममत्व भावना । हीच आहे भ्रांती । भोगावे लागती । जन्म मृत्यू ॥१५४९॥ असे
किती घ्यावे । फेरे सांग मना । किती त्या यातना । भोगाव्या रे ॥१५५०॥ म्हणोनी ही
भ्रांती । द्यावी सोडोनिया । चित्ती स्मरूनिया । अनंतासी ॥१५५१॥ सत्संगाच्या योगे
। लाभेल प्रकाश । अहंचा अंकुश । दूर होई ॥१५५२॥ नित्य अनित्याचा । करोनी विचार ।
सत्य दृढ धरी । अंतरात ॥१५५३॥ बरा निश्चयो शाश्वताचा करावा । म्हणे दास संदेह तो
वीसरावा । घडीने घडी सार्थकाची करावी । सदा संगती सज्जनाची धरावी ॥१६७॥ नित्य काय
जगी । पाही तू विचारे । अनित्य ते सारे । नष्ट होई ॥१५५४॥ परब्रह्म एक । असे ते
शाश्वत । नको संदेहात । पडू मना ॥१५५५॥ आत्मस्वरूप ते । सत्य मानूनिया । दिशेने
त्याचिया । चाल वाट ॥१५५६॥ एकदा निश्चय । होताच रे मना । संदेह ते नाना । दूर करी
॥१५५७॥ अरे नरदेह लाभला तुजसी । काही सार्थकासी । करी बा रे ॥१५५८॥ आत्मस्वरूपाची
। होईल रे प्राप्ती । याचि देही, मती । शुद्ध करी ॥१५५९॥ हां हां म्हणताच ।
आयुष्य संपेल । काळ तो जाईल । सर्व व्यर्थ ॥१५६०॥ अंतकाळघडी । येवोनी ठेपेल । पाश
आवळेल । यमदूत ॥१५६१॥ पापपुण्य झाडा । द्यावा जेव्हा लागे । करीशील सांगे । काय मग
॥१५६२॥ अरे प्राप्त घडी । गेल्यावर काही । उपयोग नाही । साधनाचा ॥१५६३॥ म्हणोनिया
अंगी । असे रे जोवरी । बळ रे तोवरी । करी हित ॥१५६४॥ शक्य जो नसेल । तुज एकट्यासी
। संतांचिया कासी । लागावे रे ॥१५६५॥ नि:संदेह वृत्ती । आत्मज्ञानप्राप्ती ।
होण्या सत्संगती । आवश्यक ॥१५६६॥ करी वृत्ती जो संत तो संत जाणा । दुराशागुणे तो
नव्हे दैन्यवाणा । उपाधी देहेबुद्धीते वाढवीते । परी सज्जना केवी बांधू शके ते
॥१६८॥ संत म्हणू कोणा । काय त्यांच्या खुणा । शंका तुज मना । ग्रासताती ॥१५६७॥
संतही जेविती । प्रपंचीहि खाती । परी त्यांची वृत्ती । भिन्न असे ॥१५६८॥
ब्रह्मस्वरूपात । वृत्ती ज्यांची स्थिर । आणि बा आचार । शुद्ध असे ॥१५६९॥ दुजाचीही
वृत्ती । त्या शाश्वतावर । करू शके स्थिर । तोचि संत ॥१५७०॥ प्रपंच आसक्ती ।
स्पर्शेना रे ज्यासी । नाही विषयासी । विकलेला ॥१५७१॥ निष्काम आणिक । निरासक्त असे
। निरपेक्ष असे । निरंतर ॥१५७२॥ देहबुद्धी ज्याची । झाली असे क्षीण । संत तोचि जाण
। निश्चयत्वे ॥१५७३॥ बाह्यात्कारी असे । जरी प्रपंचात । परी तो अलिप्त । अंतरात
॥१५७४॥ जनात असून । जनात नसतो । परी जनहीत । पाहतसे ॥१५७५॥ बहिरंगासी तू । भुलोनी
न जावे । अंतर पहावे । डोकावून ॥१५७६॥ नसे अंत आनंत संता पुसावा । अहंकार विस्तार
हा नीरसावा । गुणेवीण निर्गुण तो आठवावा । देहेबुद्धीचा आठवू नाठवावा ॥१६९॥
संतांसीही मग । काय विचारावे । ऐसे हे स्वभावे । म्हणशील ॥१५७७। संत स्वरुपात ।
स्थिर असतात । ब्रह्म प्रचीतीत । आणतात ॥१५७८॥ अंत नाही ज्यासी । त्याची अनंतासी ।
ते अनुभवासी । घेति सदा ॥१५७९॥ असे जे अनंत । नित्य नि शाश्वत । अनुभवाप्रत । कसे
येई ॥१५८०॥ हेचि विचारावे । या संतालागून । विनम्र होऊन । अतिशय ॥१५८१॥ देह अहंकार
। वाढतची जातो । विषयी रमतो । नित्य जीव ॥१५८२॥ मग स्वरूपाची नाही होत प्राप्ती ।
अरे नाही मती । शुद्ध जर ॥१५८३॥ अहंकारलय । कसा तो करावा । कसा तो पावावा ।
परमेश्वर ॥१५८४॥ गुणांच्या अतीत । असे भगवंत । गुणांनी तो लिप्त । नव्हे बापा
॥१५८५॥ अशा निर्गुणासी । आकळावे कसे । अनुभावे कसे । परब्रह्म ॥१५८६॥ पुसावे हे
मना । संतसज्जनांना । अनुभव ज्यांना । आला असे ॥१५८७॥ देहबुद्धीनेच । होत आहे घात
। जरी अंतरात । परब्रह्म ॥१५८८॥ शरीर जीवासी । प्राप्त झाले असे । मग व्हावे कसे ।
देहातीत ॥१५८९॥ निर्गुण रे ब्रह्म । होई तुज प्राप्त । तू रे गुणातीत । झाल्यावर
॥१५९०॥ अहंकार कसा । करावा तो नष्ट । पहावे ते स्पष्ट । परब्रह्म ॥१५९१॥
देहबुद्धिलय । कसा तो करावा । अनुभव घ्यावा । कसा मग ॥१५९२॥ कसे ते निर्गुण । पडेल
पदरी । सर्व हे विचारी । साधुसंता ॥१५९३॥ असे देव कोण । असे मी ही कोण । घ्यावे
विचारुन । संतांपासी ॥१५९४॥ अभ्यास तो कर । स्थिर आत्मभाव । देहबुद्धीभाव । नष्ट
व्हाया ॥१५९५॥ देहेबुद्धी हे ज्ञानबोधे त्यजावी । विवेके तये वस्तूची भेट घ्यावी ।
तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे । म्हणोनी सदा ते चि शोधीत जावे ॥१७०॥ संतांनी ते
ज्ञान । सांगितल्यावर । अभ्यासाचा जोर । कशासाठी ॥१५९६॥ शंकेचे उत्तर । ऐक रे
सत्वर । आणखी धुमारे । येण्या आधी ॥१५९७॥ ताकाचा तो थेंब । पडताच काही । दुधाचे ते
दही । होत नाही ॥१५९८॥ मार्ग तो ठाऊक । असोनिया मना । परी गेल्यविना । पोचे कैसा
॥१५९९॥ श्रीगुरुपासून । केले जे श्रवण । त्याचेच चिंतन । करावे रे ॥१६००॥
देहबुद्धीलय । आत्मज्ञानोदय । होतसे निश्चये । अभ्यासाने ॥१६०१॥ असे होण्यासाठी ।
ब्रह्म-अनुभव । देहबुद्धीभाव । सोडावा रे ॥१६०२॥ जशी बुद्धी स्थिर । आत्मनुभवात ।
देहबुद्धीअंत । होत असे ॥१६०३॥ मनासी सर्वदा । विषयांची ओढ । विषयची गोड । वाटती
रे ॥१६०४॥ विषयांमधून । काढूनिया मन । आत्मरूप धन । दावी त्यासी ॥१६०५॥ सतत
प्रयत्ने । शोध बा मना तू । परमात्मवस्तू । जीवभावे ॥१६०६॥ परमात्मवस्तूसी ।
विवेके भेटावे । नि अनुभवावे । ऐक्यरूपे ॥१६०७॥ अरे सार साचार ते चोरलेसे । येहि
लोचनी पाहता दृश्य भासे । निराभास आभास ते आकळेना । अहंतागुणे कल्पिताहि कळेना
॥१७१॥ दिसेना म्हणोन । असोनिया सत्य । वाटते असत्य । परब्रह्म ॥१६०८॥ सर्वदा सार
ते । गुप्त रे असते । दिसेना दृष्टीते । मना जरी ॥१६०९॥ गरे फणसात । धान्य ते
भुशात । आणि नारळात । खोबरे ते ॥१६१०॥ जरी बाह्यरूप मानले रे सत्य । पदरी असत्य ।
पडते रे ॥१६११॥ काटे पाहोनिया । फणस टाकला । गर्यांसी मुकला । मूढ तोचि ॥१६१२॥
तद्वत् मना सार । अनुभवायासी । नश्वर दृश्यासी । दूर सारी ॥१६१३॥ कारण दृश्य रे ।
वाटतसे खरे । परब्रह्म ते रे । न च लभे ॥१६१४॥ निराभास सत्य । निर्गुण नि नित्य ।
त्रिगुण अतीत । असल्याने ॥१६१५॥ सर्व मानवांना । न च आकळेना । रे भेदभवना । बाळगून
॥१६१६॥ देहाहंता असे । अंगी रे जोवरी । ब्रह्म ते तोवरी । न च कळे ॥१६१७॥ स्फुरे
वीषयीं कल्पना ते अविद्या । स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या । मुळी कल्पना दो
रूपे तेचि जाली । विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली ॥१७२॥ ब्रह्म ते निर्गुण । सत्य जर
असे । अनुभावे कसे । याची देही ॥१६१८॥ ऐसी शंका असे । सांप्रत तुजसी । दूर करू
तिसी । लगोलग ॥१६१९॥ अनुभवायाचे । सूक्ष्म ब्रह्म जर । सूक्ष्म मन तर । व्हावे
लागे ॥१६२०॥ परी मन रमे । स्थूल विषयात । राहते पाहत । दिवास्वप्न ॥१६२१॥ विषय
चिंतन । अविद्या ति हीच । वेढिले हिनेच । मानवांना ॥१६२२॥ आणि मने जर । चिंतिले
ब्रह्मासी । सुविद्या तिजसी । बोलिताती ॥१६२३॥ मुळात कल्पना । एकचि रे असे ।
वृत्तिभेदे भासे । दोनरूपे ॥१६२४॥ भासे कल्पनेने । पाप आणि पुण्य । मोक्ष नि बंधन
। जीवासी या ॥१६२५॥ अविद्यारूपाने । विषयचिंतन । नि ब्रह्मचिंतन । विद्यारूपे
॥१६२६॥ विषयचिंतने । जन्ममृत्यू लागे । जिवाचिया मागे । अखंडित ॥१६२७॥ म्हणोनिया
मना । ब्रह्मचिंतनात । राहे तू खेळत । सर्वकाळ ॥१६२८॥ द्वैत-अद्वैताचे । तुटोनिया
भान । मनाचे उन्मन । होई मग ॥१६२९॥ करोनी विवेक । नित्य अनित्याचा । त्याग
विषयांचा । तोही करी ॥१६३०॥ मग ऐशा स्थिती । तुज होई प्राप्त । वृत्ती स्वरूपात ।
मिळताच ॥१६३१॥ स्वरूपी उदेला अहंकार राहो । तेणे सर्व आच्छादले व्योम पाहो । दिशा
पाहता ते निशा वाढताहे । विवेके विचारे । विवंचूनि पाहे ॥१७३॥ वृत्ती स्वरूपात ।
मिळण्यासी आड । देह अहंकार । येत असे ॥१६३२॥ दृढ देहबुद्धी । सृष्टी सत्य मानी ।
कारण नयनी । दिसतसे ॥१६३३॥ दृश्यापलिकडे । सूक्ष्म तत्व असे । तेथे न विश्वासे ।
कदापी तो ॥१६३४॥ अहंकार राहू । येता उदयासी । स्वरूप व्योमासी । आच्छादितो ॥१६३५॥
सर्वस्थळी मग । अज्ञानांध:कार । आत्मसाक्षात्कार । नच होई ॥१६३६॥ अशुद्ध विचार ।
विवेकाने वारी । मन दृढ करी । स्वरूपात ॥१६३७॥ आरसा तो जर । धुळीने माखला । आणि जो
पाहिला । मुखचंद्र ॥१६३८॥ प्रतिबिंब कसे । दिसावे ते भले । अति स्पष्टपणे । सांगे
मज ॥१६३९॥ अहंकार झडे । अज्ञान ते उडे । स्वरूप रूपडे । स्पष्ट होई ॥१६४०॥
त्याचसाठी मना । करी तू विवेक । देहबुद्धी एक । नष्ट करी ॥१६४१॥ जया चक्षूने
लक्षिता लक्षवेना । भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना । क्षयातीत तो अक्षै मोक्ष देतो
। दयादक्ष तो साक्षिने पक्ष घेतो॥ १७४॥ चर्मचक्षूनेच । जासी पहायासी ।
आत्मस्वरूपासी । जरी मना ॥१६४२॥ तुज ना दिसे ती । आत्मरूप प्राप्ती । अनुभवा अंती
। होत असे ॥१६४३॥ ज्ञानदृष्टीनेच । पाहसील तीज । मग काय काज । संसाराचे ॥१६४४॥
संसार मिथ्याच । वाटेल साचार । स्वस्वरुपाकार । मन होता ॥१६४५॥ अक्षय्य सुख जे ।
सायुज्य मुक्ती ती । देतो तुजप्रती । परमात्मा ॥१६४६॥ करुनी आश्रय । मायेचा साचार
। भक्तांचा ईश्वर । बनतसे ॥१६४७॥ सर्व जग जाणे । तो साक्षीरूपाने । भक्त अभिमाने ।
रक्षितसे ॥१६४८॥ मिळे भगवद्शक्ती । संसारविरक्ती । आणि मोक्षप्राप्ती । होत असे
॥१६४९॥ विधी निर्मिता लीहितो सर्व भाळी । परी लीहितो कोण त्याचे कपाळी । हरु जळितो
लोक संहारकाळी । परी शेवटी शंकरा कोण जाळी ॥१७५॥ असा कोण देव । देईल रे मुक्ती ।
ऐक स्थिरमती । बा रे मना ॥१६५०॥ सृष्टीचे निर्माण । करी ब्रह्मदेव । लिही भवितव्य
। कपाळी तो ॥१६५१॥ त्याचे भवितव्य । कोण लिहीतसे । कर्ता जो तो असे । अशाश्वत
॥१६५२॥ उत्पन्न जीवांचा । करितो संहार । तामसी शंकर । अंतकाळी ॥१६५३॥ त्याही असे
नाश । कल्पांताच्या वेळी । सृष्टीच्या उदयी । पुन्हा जन्म ॥१६५४॥ जन्म स्थिती लय ।
देवांसीही जर । मुख्य तो ईश्वर । वेगळाच ॥१६५५॥ जगीं द्वादशादित्य हे रुद्र अक्रा
। असंख्यात संख्या करी कोण शक्रा । जगीं देव धुंडाळिता आडळेना । जगीं मुख्य तो कोण
कैसे कळेना ॥१७६॥ आदित्य ते बारा । रुद्र ते अकरा । असंख्यात इंद्रा । कोण मोजी
॥१६५६॥ अशा या देवांना । निर्मिणारा देव । कोण असे ठाव । घेई मना ॥१६५७॥ मुख्य देव
कोण । असतो तो कसा । शोध घेऊ जाता । आकळेना ॥१६५८॥ देवा धुंडाळिता । मायेचा पडदा ।
आड येइ सदा । दृश्य जगी ॥१६५९॥ तुटेना फुटेना कदा देवराणा । चळेना ढळेना कदा
दैन्यवाणा । कळेना कळेना कदा लोचनासी । वसेना दिसेना जगी मीपणासी ॥१७७॥ देव तो
तुटेना । देव तो फुटेणा । कधी तो चळेना । ढळेनाही ॥१६६०॥ असतो तो सदा । सर्व
परिपूर्ण । शब्द दैन्यवाणा । नाही तेथे ॥१६६१॥ कळे ना मनासी । दिसे ना चक्षूसी ।
मीपणाने त्यासी । पाहू जाता ॥१६६२॥ अहंतेने त्याची । होई ना धारणा । मुख्य देवराणा
। अनुभविता ॥१६६३॥ जया मानला देव तो पूजिताहे । परी देव शोधून कोणी न पाहे । जगीं
पाहता देव कोट्यानुकोटी । जया मानसीं भक्ती जे तेचि मोठी ॥१७८॥ हरेक मानव । देवाचे
भजन । देवाचे पूजन । करीतसे ॥१६६४॥ अरे ज्या नरासी । देव आवडतो । त्याचेची करितो ।
पूजन तो ॥१६६५॥ कोण भजे राम । कोण भजे कृष्ण । कोण भजे विष्णु । मारुतीही ॥१६६६॥
वाहोनिया त्यासी । गंध पुष्प माळा । भाव तो मोकळा । व्यक्त करी ॥१६६७॥ परी खरा देव
। कोणी ना पाहती । कोरडी ती भक्ती । जाण मना ॥१६६८॥ पाहता जगात । देव ते अनेक ।
भक्तीही अनेक । प्रकारीची ॥१६६९॥ परी सर्व देव । असतात एक । त्यांच्यामधे भेद ।
करू नको ॥१६७०॥ कोणत्याही देवा । केला नमस्कार । पोचतो अखेर । मुख्य देवा ॥१६७१॥
दश इंद्रियांनी । विषय सेविले । शेवटी पोचले । भोक्त्यालागी ॥१६७२॥ तरी मुखानेच ।
घ्यावा लागे घास । नाकानेच वास । हुंगावा रे ॥१६७३॥ तैसेचि रे मना । मुख्य देव कोण
। त्यासी ओळखून । भजावे रे ॥१६७४॥ प्रतीक पूजने । आत्मा हृदयस्थ । करावा जागृत ।
बा रे मना ॥१६७५॥ सगुण निर्गुण । एकाच नण्याच्या । दोन बाजू साच्या । असती रे
॥१६७६॥ तिन्ही लोक जेथून निर्माण झाले । तया देवरायासी कोणी न बोले । जगी थोरला
देव तो चोरलासे । गुरूवीण तो सर्वथाही न दीसे ॥१७९॥ स्वर्ग मृत्यु आणि । पाताळ हे
तीन । जाहले निर्माण । ब्रह्मातून ॥१६७७॥ तैसे सर्व देव । सृष्टी जीवमय । पावली
उदय । ब्रह्मातून ॥१६७८॥ परब्रह्म हेच । स्वरुप तुझेच । जाणोनिया साच । घेई मना
॥१६७९॥ मायिक देवांना । मानसी तू सत्य । परब्रह्म सत्य । मानसी ना ॥१६८०॥
मायावरणाने । ब्रह्म ते झाकले । नच तुज आले । अनुभवा ॥१६८१॥ म्हणोनिया जाई ।
गुरूसी शरण । अज्ञानावरण । तोडिति ते ॥१६८२॥ गुरु पाहता पाहता लक्ष कोटी । बहुसाल
मंत्रावळी शक्ती मोठी । मनीं कामना चेटके धातमाता । जनीं वेर्थ रे तो नव्हे
मुक्तिदाता ॥१८०॥ लक्षावधी देव । कोट्यावधी गुरु । कैसे आता करु । आत्महीत ॥१६८३॥
वाटत असेल । ऐसी शंका तुज । सांगतसे गूज । ऐक आता ॥१६८४॥ देवाच्या सारिखे । गुरूही
अनेक । विद्या त्या अनेक । म्हणोनिया ॥१६८५॥ एक मातागुरु । एक पितागुरु । एक
विद्यागुरु । पोटभरु ॥१६८६॥ कामना मनात । ठेविती अनेक । आव आणतात । सद्गुरूचा
॥१६८७॥ चेटूक करीती । कल्पित सांगती । आणि दाविताती । चमत्कार ॥१६८८॥ एक मंत्रगुरु
एक यंत्रगुरु । परी मोक्षगुरु । वेगळाच ॥१६८९॥ नव्हे चेटकी चाळकु द्रव्यभोंदु ।
नव्हे निंदकु मत्सरु भक्तिमंदु । नव्हे उन्मनु वेसनी संगबाधु । जगीं ज्ञानिया तोचि
साधु अगाधु ॥१८१॥ मोक्षगुरु कोण । काय त्याची खूण । लक्ष ते देऊन । ऐके आता ॥१६९०॥
मोहन स्तंभन । किंवा उच्चाटन । वा वशीकरण । । करीना तो ॥१६९१॥ द्रव्य जो उकळी ।
फसवून जना । नको मानू मना । त्यास गुरु ॥१६९२॥ निंदा नि मत्सर । नाही त्या जवळी ।
भक्तीची टवाळी । करीना तो ॥१६९३॥ असे तो उन्मत्त । चित्त व्यसनात । नाही बा तो संत
। निश्चयत्वे ॥१६९४॥ आणि ऐके मना । तयाची संगत । कोणासी बाधक । होत नाही ॥१६९५॥
आत्मज्ञानयुक्त । प्रसन्न ते चित्त । तोचि एक संत । जाण जगी ॥१६९६॥ नव्हे वाउगी
चाहुटी काम पोटी । क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी । मुखे बोलिल्यासारखे चालताहे ।
मना सद्गुरु तोचि शोधुनी पाहे ॥१८२॥ बोलिल्यासारखे । नाही आचरण । परी सांगे ज्ञान
। अलौकिक ॥१६९७॥ ब्रह्मज्ञान बोले । अनुभवावीण । वसनाही क्षीण । नाही ज्याची
॥१६९८॥ त्यास नको देऊ । मना गुरुपद । तो रे मोक्षपद । देत नाही ॥१६९९॥ व्यर्थ बडबड
। करीना जो मना । विषयी कामना । प्रबळे ना ॥१७००॥ जैसा बोलतसे । तैसा चालतसे ।
तोचि एक असे । मोक्ष गुरु ॥१७०१॥ अशाची गुरूसी । पाही तू शोधून । वैराग्यसंपन्न ।
असेल जो ॥१७०२॥ जनीं भक्त ज्ञानी विवेकी विरागी । कृपाळु मनस्वी क्षमावंत योगी ।
प्रभु दक्ष वित्पन्न चातुर्य जाणे । तयाचेनि योगे समाधान बाणे ॥१८३॥ ज्ञानी असूनीही
। असतो जो भक्त । तोचि जाण संत । बा रे मना ॥१७०३॥ त्यासी प्राप्त झाले । जरी
आत्मज्ञान । भक्ती जी सगुण । उच्छेदिना ॥१७०४॥ असते त्यापासी । संपूर्ण विरक्ती ।
तरीही विवेकी असतो तो ॥१७०५॥ असते स्वाधीन । तयाचे रे मन । कदापि चळण । पावेना ते
॥१७०६॥ असे याचे सुख । दुजांच्या सुखात । पाही आत्मवत । सर्व जना ॥१७०७॥ कृपेचा तो
ओघ । सदा अंतरात । करी निजहित । निजेच्छेने ॥१७०८॥ असतो तो संत । मनाचा उदार ।
क्षमेनेच पार । पावी शिष्या ॥१७०९॥ समत्व बुद्धीने । सुख दु:ख पाही । स्थितप्रज्ञ
राही । योगबळे ॥१७१०॥ दुजा तो प्रभूच । धरेवरी आला । उद्धरिण्याला । निजभक्त
॥१७११॥ असोनिही मना । सामर्थ्यसंपन्न । राही सावधान । सर्वकाळ ॥१७१२॥ विद्वान असून
। शिष्यप्रबोधन । करितो जाण । चातुर्याने ॥१७१३॥ प्रसन्न दर्शने । समाधान बाणे ।
अरे पूर्णपणे । शिष्याअंगी ॥१७१४॥ नव्हे तेचि जाले नसे तें चि आले । कळो लागले
सज्जनाचेनि बोले । अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे । मना संत आनंत शोधीत जावे
॥१८४॥ ब्रह्म ते अव्यक्त । अज नि शाश्वत । स्वयंभू अनंत । निराकार ॥१७१५॥ मायेचेनि
मिसे । विश्वरूप भासे । सत्य वाटतसे । अज्ञानाने ॥१७१६॥ सद्गुरु संगती । नासते
अज्ञान । स्वस्वरूपज्ञान । कळो येई ॥१७१७॥ योग्य ते साधन । सद्गुरुसंगती । आणि
चालविती । अती प्रेमे ॥१७१८॥ तुजसी शब्दाने । सांगितल्यावीण । काहीच कळेना ।
म्हणूनी रे ॥१७१९॥ ब्रह्म अनिर्वाच्य । असोनीही मना । तुज समजण्या । वर्णिती ते
॥१७२०॥ तुझे समाधान । देती वाढवून । करावे साधन । म्हणोनिया ॥१७२१॥ परमात्मवस्तूचा
। शोध करी मना । सांडूनी कल्पना । नाना परी ॥१७२२॥ लपावे अति आदरे रामरूपी ।
भयातीत निश्चित ये स्वस्वरूपी । कदा ते जनी पाहता ही दिसेना । सदा ऐक्य ते
भिन्नभावे वसेना ॥१८५॥ भयाच्या अतीत । असते शाश्वत । त्य़ा आत्मरूपात । रंगावे रे
॥१७२३॥ रंगताच मना । आत्मस्वरूपात । जीवशिवभेद । मावळेल ॥१७२४॥ मग भयातीत । होशील
सहज । आणि मुक्तिराज । भोगशील ॥१७२५॥ जन्ममरणाचे । फेरे किती घ्यावे । किती ते
भोगावे । सुखदु:ख ॥१७२६॥ दुखविरहित । सुख नसे प्राप्त । पूर्णसुख प्राप्त ।
आत्मरूपी ॥१७२७॥ निजानंदाचा तू । अधिकारी होई । गुरु तुज देई । ज्ञानदृष्टी ॥१७२८॥
चर्मचक्षूने ते । तुज दिसे कैसे । म्हणूनी विश्वासे । गुरुवचनी ॥१७२९॥ स्वस्वरूपात
। रमती ते संत । सदा आत्मतृप्त । असताती ॥१७३०॥ जनात असून । जनात नसती । दूरच
राहती । जनातून ॥१७३१॥ मना ऐक्यभावे । वसती ते सदा । भिन्नभावे कदा । राहती ना
॥१७३२॥ सदा सर्वदा राम संनीध आहे । मना सज्जना सत्य शोधूनि पाहे । अखंडीत भेटी
रघुराज योगु । मना सांडी रे मीपणाचा वियोगु ॥१८६॥ ऐक्यभाव हाच । ब्रह्माचा स्वभाव
। घेई त्याचा ठाव । निजबळे ॥१७३३॥ आत्माराम तर । आत नि बाहेर । जवळ नि दूर ।
सर्वांठायी ॥१७३४॥ म्हणोनिया शोध । निजांतरी त्यास । आणिक सायास । करू नको ॥१७३५॥
आत्माराम जर । येई अनुभवे । सर्व विश्व भावे । ब्रह्मरूप ॥१७३६॥ तोचि एक असे ।
देवांचाही देव । येथे तू अभाव । धरू नको ॥१७३७॥ भेट होता त्याची । तटातूट नाही ।
संगतीत राही । सर्वकाळ ॥१७३८॥ देहबुद्धी एक । आहे अडसर । बाजूस तू सार । विवेकाने
॥१७३९॥ भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे । परी सर्वही स्वस्वरूपी न साहे । मना
भासले सर्व काही पहावे । परी संग सोडूनि सूखी रहावे ॥१८७॥ देहात राहूनी ।
देहबुद्धी नाही । अवस्था कशी ही । प्राप्त होई ॥१७४०॥ कोणत्या उपाये । देहबुद्धी
गळे । स्वस्वरूपी मिळे । सुखरूप ॥१७४१॥ ब्रह्मांड ते असे । पंचभूतात्मक । देहही
नि:शंक । त्य़ा पाचाचा ॥१७४२॥ परि आत्मरूप । असते वेगळे । देहभाव गळे । तेव्हा कळे
॥१७४३॥ दृश्यात राहता । दृश्य अनुभवे । येणार स्वभावे । बा रे मना ॥१७४४॥ परि
सृष्टी नाही । आहे एक भास । समजावी मनास । सर्वकाळ ॥१७४५॥ जनात रहावे । होऊनी
नि:संग । देहबुद्धी मग । दूर होई ॥१७४६॥ मालकाच्या घरी । दासी काम करी । असते ती
तरी । अलिप्तच ॥१७४७॥ यातील आपुले । नसे काही एक । असते ठऊक । तिजलागी ॥१७४८॥
ममत्व भवना । तिच्याठायी नाही । म्हणोनिया राही । अलिप्त ती ॥१७४९॥ देहाठायी नको ।
ममत्वभावना । नि:संग तू मना । होशील रे ॥१७५०॥ देहेभान हे ज्ञानशास्त्रे खुडावे ।
विदेहीपणे भक्तिमार्गेचि जावे । विरक्तिबळे निंद्य सर्वै त्यजावे । परि संग सोडूनि
सूखी रहावे ॥१८८॥ ज्ञानाने आपुले । स्वरूप तू जाणी । नि विदेहीपणी । रहावे रे
॥१७५१॥ अहं ब्रह्मास्मि हे । आत्मज्ञान कळे । आणि ते निवळे । देहभान ॥१७५२॥
ज्ञानशस्त्रानेच । देहभान नष्ट । भक्तिमार्गे स्पष्ट । विदेहावस्था ॥१७५३॥
म्हणोनिया मना । भक्तिमार्गे जाई । विलीन तू होई । स्वरूपात ॥१७५४॥ स्वरूपाचे
ज्ञान । तुज झाले जरी । वैराग्याने तरी । रहावे रे ॥१७५५॥ ज्ञानाभिमानाने । वागशील
स्वैर । निंद्य कर्म जर । करू जासी ॥१७५६॥ देहबुद्धीलिप्त । ते रे कैसे ज्ञान ।
दंभाचार पूर्ण । बा रे मना ॥१७५७॥ स्वरूपी आसक्त । विषयी विरक्त । तरीच तू भक्त ।
होसी मना ॥१७५८॥ वाढते ज्यामुळे । मना देहबुद्धी । अवघ्या त्या उपाधी । दूर ठेवी
॥१७५९॥ अलिप्तपणाने । राहूनिया मना । रे कालक्रमणा । सुखे करी ॥१७६०॥ मही निर्मिली
देव तो ओळखावा । जया पाहता मोक्ष तात्काळ जीवा । तया निर्गुणालागी गूणीं पहावे ।
परी संग सोडूनि सूखी रहावे ॥१८९॥ जयाने निर्मिली । असे सर्व सृष्टी । त्याचीच तू
भेटी । घ्यावी मना ॥१७६१॥ दृश्याच तो पक्ष । आटूनिया मोक्ष । मिळेल ही साक्ष । देत
असे ॥१७६२॥ सर्वांठायी असे । देव तो निर्गुण । भजावे सगुण । कशासाठी ॥१७६३॥
सगुणींही मना । निर्गुण असते । तेचि रे व्यापते । सर्व काही ॥१७६४॥ मग सगुण ते ।
कशासी टाकावे । तेही तू भजावे । अत्यादरे ॥१७६५॥ ऐक्यपणाचा तू । घेई अनुभव । अनन्य
होऊन । आत्मरूपी ॥१७६६॥ परी कोणतीच । नको रे आसक्ती । निष्काम तू भक्ती । करावी रे
॥१७६७॥ नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता । परेहूनि पर्ता न लिंपे विवर्ता । तया
निर्विकल्पासी कल्पित जावे । परी संग सोडूनि सूखी रहावे ॥१९०॥ सगुण भजावे ।
निर्गुण जाणावे । आणि ओळखावे । अभिन्नत्व ॥१७६८॥ सृष्टीकर्ता ब्रह्मा । देव नव्हे
रे तो । पालन कर्ता तो । विष्णु नव्हे ॥१७६९॥ संहार कर्ता तो । मानावा शंकर । हेचि
असे घोर । अज्ञानत्व ॥१७७०॥ कोणत्याही गुणे । नाही रे तो लिप्त । सर्वथा अलिप्त ।
परमात्मा ॥१७७१॥ वाणीही जयाचे । स्वरूप वर्णिना । तो रे देवराणा । वेगळाच ॥१७७२॥
वाचा त्या वर्णिना । माया त्या स्पर्शेना । कल्पिता कल्पना । थिटी पडे ॥१७७३॥ असे
निर्विकल्प । परमात्मरूप । जाणोनी सुखरूप । होई मना ॥१७७४॥ देहेबुद्धीचा निश्चयो
ज्या टळेना । तया ज्ञान कल्पांत काळी कळेना । परब्रह्म ते मीपणे आकळेना । मनीं
शून्य अज्ञान हे मावळेना ॥१९१॥ परी देह मीच । भ्रम झाला हाच । परब्रह्म साच ।
असोनिया ॥१७७५॥ अविद्येचे वारे । मायेचे भोवरे । त्यात गरगरे । भ्रांतीस्तव ॥१७७६॥
तयालागी ज्ञान । कल्पांती होईना । ब्रह्म आकळेना । कदापीही ॥१७७७॥ मीपणे ते ब्रह्म
। आकळेना कधी । अज्ञान ते बांधी । तुजलागी ॥१७७८॥ मीपणे अज्ञान । वाढतच जाइ ।
ज्ञानसूर्य तोही । ग्रासतसे ॥१७७९॥ म्हणोनी मीपणा । टाकोनिया मना । ब्रह्म अनुमाना
। आणावे रे ॥१७८०॥ मना ना कळे नाढळे रूप त्याचे । दुजेवीण ते ध्यान सर्वोत्तमाचे ।
तया खूण ते हीन दृष्टांत पाहे । तेथे संग नि:संग दोनी न साहे ॥१९२॥ द्वैतपणाने रे
। पाहू जाता त्यासी । परब्रह्म तूसी । आकळेना ॥१७८१॥ तयाचे स्वरूप । कळेना मनासी ।
रूपही डोळ्यांसी । दिसेना रे ॥१७८२॥ परब्रह्म नाही । इंद्रियगोचर । देहबुद्धी सार
। दूर मना ॥१७८३॥ दुजेपणावीण । भजसील त्यासी । येई अनुभवासी । तेचि तुज ॥१७८४॥
तयाचे वर्णन । जावे करायासी । दृष्टांत द्यायासी । सापडेना ॥१७८५॥ सर्वही दृष्टांत
। पडतात फिके । परमात्मवस्तूते । वर्णिता रे ॥१७८६॥ परब्रह्म एक । सर्वत्र संचले ।
तया न साहिले । द्वैतपण ॥१७८७॥ परमात्मवस्तूचा । कोणाशी संयोग । कोणाशी वियोग ।
अज्ञान हे ॥१७८८॥ कल्पना या मना । असती सापेक्ष । कल्पनेचा पक्ष । दूर सांडी
॥१७८९॥ अद्वैतभावाने । करूनिया ध्यान । मने सार मन । दूरवरी ॥१७९०॥ नव्हे जाणता
नेणता देवराणा । न ये वर्णिता वेदशास्त्रां पुराणां । नव्हे दृश्य अदृश्य साक्षी
तयाचा । श्रुती नेणती नेणाती अंत त्याचा ॥१९३॥ परब्रह्मरूपी । जाणीवही नाही ।
नेणीवही नाही । बा रे मना ॥१७९१॥ नेति नेति इति । वेद ते बोलती । शास्त्रे पुराणे
ती । अपुरीच ॥१७९२॥ वर्णावया त्यासी । सर्वही थकले । शब्दांनी धरिले । मौन बापा
॥१७९३॥ पलिकडे रे ते । दृश्य अदृश्याच्या । मग साक्षी त्याचा । कोण असे ॥१७९४॥
वेदांसीही त्याचा । लागेना रे अंत । असे ते अनंत । अवर्ण्य रे ॥१७९५॥ वसे हृदयी
देव तो कोण कैसा । पुसे आदरे साधकु प्रश्न ऐसा । देहे टाकिता देव कोठे रहातो । परि
मागुता ठाव कोठे पहातो ॥१९४॥ ते रे सांत नाही । अनंतही नाही । दृश्यादृश्य नाही ।
परब्रह्म ॥१७९६॥ ते रे परब्रह्म । नाही स्थूल सूक्ष्म । आपलेही रूप । तेचि असे
॥१७९७॥ हृदयी वसतो । देव रे कसा तो । प्रश्न हा पडतो । साधकासी ॥१७९८॥ परब्रह्म
रूप । असते अनंत । देहासी तो अंत । निश्चयत्वे ॥१७९९॥ देहातच होती । आधी त्याची
वस्ती । मग देहाअंती । जातो कोठे ॥१८००॥ देहाच्या आधारे । देव जो राहतो । देह
सांडिता तो । कोठे जाई ॥१८०१॥ पुन्हा देहाधारे । कसा घेई जन्म । अशी शंका येई ।
मनामधे ॥१८०२॥ वसे हृदयी देव तो जाण ऐसा । नभाचे परी व्यापकु जाण तैसा । सदा संचला
येत ना जात काही । तयावीण कोठे रिता ठावा नाही ॥१९५॥ हृदयी वास्तव्य । करणारा देव
। मर्यादेचा भाव । त्यासी नाही ॥१८०३॥ गगनाप्रमाणे । व्यापक तो जाण । उरला व्यापून
। अंतर्बाह्य ॥१८०४॥ परब्रह्म रूप । सर्वत्र संचले । ते रे ना जन्मले । निमलेही
॥१८०५॥ मडके ते केले । किंवा ते फोडिले । आकाश राहिले । जैसे तैसे ॥१८०६॥ सागरी
तरंग । उठले रे मना । तेथे काय जन्मा । आले सांग ॥१८०७॥ किंवा लाटेचा त्या ।
होताची रे अंत । तेथे काय मृत्य । झाले असे ॥१८०८॥ आदिअंती एक । जलची राहिले ।
तेथे काही आले । गेलेही ना ॥१८०९॥ देह ते जन्मले । राहिले नि गेले । देवा ना घडले
। जाणे येणे ॥१८१०॥ परब्रह्मरूप । सर्वत्र संचले । सर्वांसी व्यापिले । पूर्णपणे
॥१८११॥ रीता ठाव नाही । तयाविण कोठे । सर्वत्र गोमटे । तेचि एक ॥१८१२॥ नभीं वावरे
जो अणूरेणु काही । रिता ठाव या राघवेवीण नाही । तया पाहता पाहता तेचि आले । तेथे
लक्ष आलक्ष सर्वै बुडाले ॥१९६॥ सूक्ष्म अणू व्यापे । जेवढी रे जागा । तेवढीही जागा
। रीती नाही ॥१८१३॥ विश्वी घनदाट । भरोनी राहिले । त्यानेच व्यापिले । सर्व काही
॥१८१४॥ तेचि रूप असे । आपुल्याही देही । त्याचाच तू घेई । शोध मना ॥१८१५॥ भजता ते
रूप । होसील तद्रूप । द्वैत आपोआप । मावळेल ॥१८१६॥ भजता तयासी । मनाचाच अंत । होईल
निश्चित । सांगतसे ॥१८१७॥ ज्या मनाने तुज । भास भासवले । विश्व दाखवले ।
सत्यत्वाने ॥१८१८॥ तेचि मन मग । स्वरूपी रमेल । भ्रम तो करील । तोंड काळे ॥१८१९॥
ज्ञाता ज्ञान ज्ञेय । त्रिपुटीचा लय । मग तुज काय । जन्ममृत्यू ॥१८२०॥ नभासारिखे
रूप या राघवाचे । मनीं चिंतिता मूळ तूटे भवाचे । तया पाहता देहबुद्धी उरेना । सदा
सर्वदा आर्त पोटी पुरेना ॥१९७॥ आकाशा सारिखे । रूप राघवाचे । चिंतन तयाचे । करताच
॥१८२१॥ भवाचे ते मूळ । जाईल तुटोन । रमी तू म्हणोन । स्वरूपात ॥१८२२॥ प्रचीती
तयाची । येताच रे मना । जराही उरेना । देहभाव ॥१८२३॥ येता अनुभवा । मना आत्मसुख ।
इतर ते सुख । तुच्छ वाटे ॥१८२४॥ सुखी रमण्याचा । स्वभाव मनाचा । आहे तुज त्याचा ।
परिचय ॥१८२५॥ आत्मसुख श्रेष्ठ । अनंतपटीने । म्हणोनी भोगणे । संपेनाच ॥१८२६॥ नभे
व्यापिले सर्व सृष्टीस आहे । रघूनायेका ऊपमा ते न साहे । दुजेवीण जो तोचि तो हा
स्वभावे । तया व्यापकु व्यर्थ कैसे म्हणावे ॥१९८॥ नभाने व्यापिले । सर्वही सृष्टीस
। परी हिणकस । दृष्टांत हा ॥१८२७॥ असे नभाहून । परब्रह्म भिन्न । नभा असे जन्म ।
तमोगुणी ॥१८२८॥ शोक आणि मोह । क्रोध आणि काम । अज्ञान नि भव । शून्यत्वही ॥१८२९॥
सप्तगुणी युक्त । आकाश हे लिप्त । उपमेरहित । परब्रह्म ॥१८३०॥ रामावीण काही । अरे
येथे नाही । व्याप्य व्यापकही । भाषा खोटी ॥१८३१॥ अती जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे
। तेथे तर्क संपर्क तोही न साहे । अती गूढ ते दृढ तात्काळ सोपे । दुजेवीण जे खूण
स्वामीप्रतापे ॥१९९॥ परब्रह्मरूप । आहे सनातन । आणि ते विस्तीर्ण । सांगितले
॥१८३२॥ तर्काची संगत । धरोनिया त्यासी । जासी पहायासी । सापडेना ॥१८३३॥ असे
तर्कातीत । पार ना लागत । होईना ते ज्ञात । अहंभावे ॥१८३४॥ तयाचे स्वरूप । असते रे
गूढ । धारणा ती दृढ । होईना बा ॥१८३५॥ म्हणोनी संतांसी । जाऊनी शरण । तयांचे चरण ।
दृढ धरी ॥१८३६॥ दाखवून देती । तयाचे रे वर्म । मार्ग तो सुगम । करिताती ॥१८३७॥
तयांची ती कृपा । प्राप्त करी बापा । मार्ग हाचि सोपा । कैवल्याचा ॥१८३८॥
त्यांचिया वाचून । नाही अधिकार । आत्मरूप थोर । दविण्याचा ॥१८३९॥ कळे आकळे रूप ते
ज्ञान होता । तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था । मना उन्मनी शब्द कुंठित आहे । तो गे
तोचि तो राम सर्वत्र पाहे ॥२००॥ सद्गुरुकृपेने । ज्ञान होता तुज । आकळे सहज ।
ब्रह्मरूप ॥१८४०॥ आत्मस्वरूपात । मन होता लीन । तुझे द्रष्टेपण । तेही संपे ॥१८४१॥
संकल्प विकल्प । द्वैताचा हा खेळ । मना मावळेल । आत्मरूपी ॥१८४२॥ मनाचे उन्मन ।
होईल रे मग । आत्मरूप भोग । सर्वकाळ ॥१८४३॥ करावया जासी । तयाचे वर्णन । शब्द धरी
मौन । निश्चयत्वे ॥१८४४॥ वर्णवया त्यासी । यावे लागे द्वैती । मन ते स्वरूपी ।
मावळले ॥१८४५॥ ऐशा या स्थितीचा । घेई अनुभव । पाही आत्मदेव । सर्वत्र तू ॥१८४६॥
राघवाचा पंथ । सांगितला तुज । केले हितगुज । तुजपाशी ॥१८४७॥ वाटचाल कशी । करावी तू
हेही । स्पष्टपणे पाही । कथिले रे ॥१८४८॥ याच मार्गाचा तू । होवोनिया पांथ । क्रमी
रामपंथ । निश्चयाने ॥१८४९॥ कदा वोळखीमाजी दूजे दिसेना । मनी मानसी द्वैत काही
वसेना । बहुता दिसां आपुली भेटी जाली । विदेहीपणे सर्व काया निवाली ॥२०१॥ रामा
व्यतिरिक्त । तुजसी कोठेही । दिसेना काहीही । बा रे मना ॥१८५०॥ आत्मसाक्षात्कारी ।
साक्षित्व संपले । मनाचे जाहले । उन्मन रे ॥१८५१॥ मायेचा पडदा । विरोनिया गेला ।
भेटी झाली जिवा । आणि शिवा ॥१८५२॥ अनंत जन्मांचे । चुकले निधान । तेचि साधनेने ।
प्राप्त झाले ॥१८५३॥ सद्गुरुकृपेचे । सामर्थ्य अगाध । भेटला साक्षात । आत्माराम
॥१८५४॥ देहभावासीही । पडला विसर । आनंदासी भर । आला आला ॥१८५५॥ झाले समाधान । जन्म
झाला धन्य । झाले आत्मज्ञान । म्हणोनिया ॥१८५६॥ मना गूज रे तूज हे प्राप्त जाले ।
परी अंतरी पाहिजे यत्न केले । सदा श्रवणे पाविजे निश्चयासी । धरी सज्जनसंगती धन्य
होसी ॥२०२॥ तेच समाधान । सतत टिकण्या । प्रयत्न तू मना । करावेस ॥१८५७॥ जाहले ते
ज्ञान । म्हणोन साधन । मना तू सोडून । देऊ नको ॥१८५८॥ बद्धाचा मुमुक्षु । साधनेने
झाला । आणि सिद्ध झाला । साधनेने ॥१८५९॥ सिद्ध अवस्थाही । रहण्या सहज । । यत्न मना
तुज । करणे रे ॥१८६०॥ पोट ते भरले । जेवण सोडले । ऐसे ना घडले । कधी बापा ॥१८६१॥
सतत श्रवण । सतत मनन । सतत चिंतन । करावे रे ॥१८६२॥ घेतली जरी ही । एकदा प्रचीती ।
रहावे त्या स्थिती । सर्वकाळ ॥१८६३॥ ज्ञातेपणाचाही । सोडी अभिमान । संगत सज्जन ।
धरोनिया ॥१८६४॥ मना सर्वहि संग सोडोनि द्यावा । अति आदरे सज्जनाचा धरावा । जयाचेनि
संगे महा दु:ख भंगे । जनीं साधनेवीण सन्मार्ग लागे ॥२०३॥ देहाची संगती । विषयांची
प्राप्ती । होई तुजप्रती । बा रे मना ॥१८६५॥ देहप्रपंचाचा । सोडावा तो संग । अरे
आत्मरंग । भोगण्यास ॥१८६६॥ सर्वही तो संग । सोडोनिया द्यावा । परी तो धरावा ।
सज्जनांचा ॥१८६७॥ जन्ममरणाचे । महादु:ख नष्ट । संत संगतीत । होत असे ॥१८६८॥ सज्जन
संगती । गेले तरोनिया । पशू पक्षी स्त्रिया । आणि पापी ॥१८६९॥ काय वर्णावी ती ।
सत्संग महती । तेच सोडविती । भवातून ॥१८७०॥ सहज बोलणे । हित उपदेश । अज्ञानाचा पाश
। तुटतसे ॥१८७१॥ संत संगतीने । मार्ग तो सुगम । हेचि असे वर्म । सत्संगाचे ॥१८७२॥
म्हणोनी सत्संग । सर्वदा धरावा । अभ्यास करावा । सर्वकाळ ॥१८७३॥ मना संग हा सर्व
संगास तोडी । मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी । मना संग साधका शीघ्र सोडी । मना संग
द्वैत नि:शेष मोडी ॥२०४॥ सज्जनसंगती । क्षीण त्या वासना । सहजचि मना । होत जाती
॥१८७४॥ पौर्णिमेनंतर । चंद्र होई क्षीण । अवसेच्या दिनी । अदृश्य तो ॥१८७५॥ तैशाच
वासना । पावतात लोप । मना आपोआप । सत्संगती ॥१८७६॥ संतांच्या संगती । मोक्षाची रे
प्राप्ती । सोडविती अंती । भवातून ॥१८७७॥ बंधनांचे पाश । गळून पडती । मग
मोक्षस्थिती । सहजची ॥१८७८॥ सज्जनसंगती । बाणते विरक्ती । आत्मरूप प्राप्ती । होई
तुज ॥१७७९॥ अनंत जन्मांचे । ठेवणे चुकले । प्राप्त ते जाहले । साधकासी ॥१८८०॥
नि:शेष मोडला । द्वैताचा रे बोध । अद्वैताचा बोध । दृढ झाला ॥१८८१॥ मनाची शतें
ऐकता दोष जाती । मतीमंद ते साधनायोग्य होती । चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी ।
म्हणे दास विश्वासता मुक्ति भोगी ॥ २०५॥ बंध मोक्षालागी । कारण हे मन । तयासी
म्हणोन । उपदेश ॥१८८२॥ मना सांगितला । तुजसी हा बोध । मनाशी संवाद । साधी आता
॥१८८३॥ आचार साधन । भक्ती आणि ज्ञान । मार्ग समजून । सांगितले ॥१८८४॥ से ते चालावे
। कसे ते बोलावे । कसे ते वागावे । जीवनात ॥१८८५॥ सर्वकाही तुज । सांगितले स्पष्ट
। विवेकाने इष्ट । मार्ग धरी ॥१८८६॥ करिता श्रवण । सतत रे मना । दोष जे ते नाना ।
लुप्त होती ॥१८८७॥ मतीमंद होती । साधनेसी योग्य । येई त्यांचे भाग्य । उदयाला
॥१८८८॥ चढते वाढते । फळ ते लाभेल । जो जो रे वाचेल । मनोबोध ॥१८८९॥ साधनेने वाढे ।
प्रेमाचा अंकुर । फोफावेल तरु । भक्तिमार्गे ॥१८९०॥ विषयी वैराग्य । होईल उत्पन्न
। तुज आत्मज्ञान । प्राप्त होई ॥१८९१॥ ऐसे हे सामर्थ्य । तुजसी रे प्राप्त ।
मायेने तू लिप्त । नच होसी ॥१८९२॥ दास म्हणताती । जे जे विश्वासती । तयांसी रे
मुक्ती । प्राप्त होई ॥१८९३॥ मनोबोध कूपी खोलून पाहिली । तेव्हा हाती आली । नाना
रत्ने ॥१॥ त्यांच्या त्या तेजाने । भुलोनिया गेले । म्हणोनिया केले । धाडस हे ॥२॥
लागला जो अर्थ । या मनोबोधाचा । तोच सांगण्याचा । मोह केला ॥३॥ नाना ग्रंथांचाही ।
घेतला आधार । ऋण त्यांचे फार । मजवर ॥४॥ नाही अनुभव । नाही आत्मज्ञान । तरी निवेदन
। केले असे ॥५॥ अपराध क्षमा । करावा संतांनी । एक विनवणी । असे पायी ॥६॥
मनोबोधरूपी । अभंगसुमने । वाहिली प्रेमाने । दासपायी ॥७॥ अभंग पुष्प हे । घ्यावे
हो मानून । न्यावे उद्धरून । मजलागी ॥८॥ शके एकोणीस । अकरा माझारी । दासनवमी आली ।
त्याच दिनी ॥९॥ झाला असे पूर्ण । अर्थ अनुवाद । गुरु कृपावंत । म्हणोनिया ॥१०॥
सद्गुरुकृपेने । मना जे भावले । तेच येथे केले । निवेदन ॥११॥ मम शिरावरी । ठेविला
हो हात । गुरु कृपवंत । पांवसीचा ॥१२॥ स्वरूपानंद माझे । गुरुमहाराज । त्यांनीच हो
मज । वदविले ॥१३॥ परी दोष जे जे । त्यासी मी कारण । राहिले जे न्यून । क्षमावे ते
॥१४॥ नंदकांता म्हणे । द्यावा मज ठाव । स्वामीपदी भाव । नित्य राहो ॥१५॥ आता मज
काही । उणे नाही जगी । रंगो निजरंगी । मन माझे ॥१६॥ आहे माझी स्वामी । ऐसी हे
मनीषा । तोडी भवपाशा । झडकरी ॥१७॥ ऐसा कृपाहस्त । राहो सदोदित । हाच एक हेत ।
पूर्ण करी ॥१८॥ नंदकांतेचे ह्या । शिर पायावरी । स्वामी तूच तारी । मायबापा ॥१९॥
श्रीकृष्णार्पणमस्तु । शुभं भवतु । शुभां भवतु । शुभं भवतु । हरि ॐ । ॐ श्री गुरुदेव दत्त II