नवे वर्ष आणि आत्मविकास.....
मित्रांनो....
नवे वर्ष अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे…. तीन दिवसानंतर नविन वर्ष सुरु होत आहे.... मागच्या वर्षात जे दु:ख,
शोककारक घडलं असेल ते मागे ठेवा... आणी
निर्धाराने पुढे चला यशस्वी भविष्याकडे.... सालाबादप्रमाणे ही वेळ असते
आत्मपरीक्षणाने सरत्या वर्षाचा आढावा घेण्याची आणि नववर्षाच्या योजना बनवण्याची….
आपला आतला आवाज आपल्या त्रुटी आपल्याला
दाखवत असतो आणि त्या सुधारायला सुरुवात करण्यासाठी नववर्षदिनासारखा मुहूर्त नसतो….
म्हणूनच प्रत्येक जण या दिवशी स्वत:ला
सुधारण्यासाठी अनेक निर्धार करत असतो…. स्वत:च्या
चुका समजणे आणि त्या सुधारण्याकरिता आपल्या नैसर्गिक भावनांना, सहज प्रतिक्रियांना मुरड घालून, योग्य पर्याय निवडण्याचे वरदान फक्त मानवालाच
मिळाले आहे…. हे वरदानच आपल्याला
फक्त एक दुष्पाद प्राणी राहू न देता माणूस बनवते….
मात्र
योग्य पर्याय निवडणे, मोहांना बळी न पडता
निवडलेल्या मार्गावरून जाणे हे सोपे नसते.... अशा वेळी स्व-सुधार करायला सल्ला
देणाऱ्या एखाद्या गुरूची गरज भासते.... मग कोणतरी गुरुरुपाने येतो... तो जरी खऱ्या
अर्थाने गुरु नसला तरी तो अचानकच जीवनात भेटणारा, आपल्याला वेगळेच ज्ञान, अनुभूती
देऊन जातो.... आपल्या चुकीच्या सवयी, वृत्तींवर
प्रहार करतो.... आणि एखाद्या गोष्टीचे मर्म जाणवून देणारा क्षण तो साधतो....
या
नववर्षात तुम्ही काय निर्धार करायचे ठरवले आहेत..?.. बहुतेकांचा अनुभव असाच असतो.... की, बरचसे निर्धार अपूर्णच राहतात.... बहुतेक निर्धार आपल्या जीवनशैलीत बदल
करण्याबद्दल असतात.... आणि जीवनशैलीत बदल करणे कठीण काम असते.... पण यासाठीच
निर्धार, मनाचा निग्रह
लागतो.... तरच आपली स्वप्न सत्यात येतात.... बघा, जर आपण योग्य पर्याय निवडले तर.... स्वत:च्या आजूबाजूला प्रेमळ, सकारात्मक आणि आनंदी जग निर्माण करण्याकरता आपण
प्रयत्नांची पराकाष्ठा करतो.... आणि जीवनात तेच महत्वाचे असते..... ॐ श्री गुरुदेव
दत्त....
No comments:
Post a Comment