Sunday, 16 March 2014


WISH ALL OF YOU A HAPPY & SAFE HOLI ..... 

Our happiness depends on the habit of mind we cultivate..... So practice happy thinking every day..... Cultivate the merry heart, develop the happiness habit, and life will become a continual feast.....also know that The dominant idea behind Holi festival is that we should live more in harmony with nature instead of trying to destroy her and make her our slave.... Enjoy nature friendly Holi With happiness..... Happy Holi..... 

ॐ श्री गुरुदेव दत्त....



होळी महात्म – होळी म्हणजे वाईट विचारांचे दहन......

होळी हा देशभर रंगांचा सण म्हणून ओळखला जात असला तरी महाराष्ट्रात त्याचे महत्त्व वेगळे आहे..... ग्रामीण भागात शिमगा या नावाने ओळखला जाणार्‍या सणामागे काही आख्यायिका आहेत...

लहान मुलांना पीडा देणार्‍या होलिका, ढुंढा, पुतना ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात.......

एका पौराणिक कथेनुसार विष्णूभक्त प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिकादेवीचा श्रीविष्णू देवाने वध केला होता...... होलिकेला वर होता की तिला अग्नि जाळू शकणार नाही..... परंतु प्रल्हादाला जाळ्ण्यासाठी त्याला मांडीवर घेऊन अग्नीकुडांत प्रवेश केला व प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले..... तसेच मदनदहना च्या कथेत ह्या उत्सवाची परंपराही काही लोक सांगतात......

हा उत्सव प्राचीन अग्निपूजनपरंपरेचा आविष्कार आहे..... हा सण मुळात लौकिक पालळीवरचा असावा.... त्यात कालांतराने उच्च संस्कृतीच्या लोकांकडून धार्मिक/सांस्कृतिक विधिविधानांची भर पडली असावी......

आजच्या लोकोत्सवात होळी, धूळवड आणि रंगपंचमी हे तीन मुख्य प्रकार दिसतात..... जडवाद आणि भोगवाद ह्यांना जाळून..... त्यांची धूळवड करून आयुष्यातल्या आनंदाचा रंगोत्सव साजरा करायचा किंवा समाजातल्या असद्वृत्ती भस्मसात करून त्यांच्या नावाने "शिमगा" करत सदवृत्तींचा जयघोष करायचा हा उत्सव आहे.......

वाईट आचार-विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना.... होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी..... हाच होळी साजरे करण्यामागचा उद्देश आहे..... या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा... जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुख-समाधानाचे जाईल......

अशी हि होळी सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो ..... सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा .....

ॐ श्री गुरुदेव दत्त....

Saturday, 8 March 2014


संवर्धिनी...   आदिशक्ती...      

स्त्री चे प्रत्येक नाते आजी, आई, बहिण, मैत्रीण, बायको, मुलगी आणि प्रेयसी अनुभवायची असेल तर आपणही स्त्री च्या ह्या प्रत्येक नात्याला जपण्याचा १०० % प्रयत्न नक्कीच केला पाहिजे... नात्यामधील सन्मानच नात्यात स्थिरता आणि जवळीक निर्माण करतो... स्त्री अश्या कित्येक भूमिका सहज रित्या पार पडते.... ती शिक्षित असली तरी वा अशिक्षित असली तरी.... संसारातले असो वा व्यवहारातले प्रश्न किती चूटकीनिशी सोडवते.... घरात रुचकर जेवण बनवणारी अन्नपुर्णा, मुलांना संस्काराचे बाळकडू पाजणारी संस्कारलक्षमी, शिक्षणाचे धडे देणारी सरस्वती ,चालायला बोलायला शिकवणारी माता, पतीने दिलेल्या सुखसोयींवर न जगता त्याच्या खांद्याला खांदा लावुन घर नोकरी सांभाळून घराला हातभार लावणारी अर्धांगिनी, घरातील आजारी व्यक्तींची काळजी  घेणारी आया, घरावरील प्रत्येक संकटांना सामर्थ्याने पेलणारी रक्षिका.... ह्या प्रत्येक भूमिका ती प्रामाणिकपणाने निस्वार्थ मनाने पार पाडते....
         मित्रांनो... स्त्री म्हणजे कुटुंबाचा पाया.... आदिमाया ,आदिशक्ती.. ह्या सगळ्या विशेषणांनी तीला गौरविल जात.... आणि ते उचितच आहे... स्त्रीमुळे कुटुंब बनत, घडत, साकारल जात आणि आकार ही घेत.... प्रत्येक नात्याला घडविण्याचा त्यांना एकसंध ठेवण्याचे काम हे त्या घरातील स्त्रीच करीत असते.... आणि अस असूनही आज मुलगी नको... का तर ती परक्याच धन, दुसऱ्याची वंशवेल वाढवणारी, कुटुंबाचा आधार न बनू शकणारी असा समज आहे.... आणि ह्या गैरसमजातूनच स्त्रीभृण हत्येसारखी महापातक घडत आहेत....
          जो पर्यंत समाजाची ही विकृत मानसिकता बदलत नाही तोपर्यंत स्त्रीला तिचा स्वतःचा असा एकही दिवस गवसणार नाही... आणि स्त्री सबलीकरण होत नाही, तोवर एका पित्याला आपल्या लेकीचा, एका पतीला आपल्या पत्नीचा, एका भावाला आपल्या बहिणीचा दिवस घालायची वेळ येईल... हे सगळ जेंव्हा थांबेल तेंव्हाच स्त्री खऱ्या अर्थाने मुक्त श्वास घेवू शकेल आणि खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल.... ॐ श्री गुरुदेव दत्त....

Saturday, 1 March 2014


जीवन मार्गदर्शक तत्वे....
जेव्हा मनुष्याकडील धन नष्ट होते, तेव्हा वास्तविक त्याचे काहीच नष्ट होत नाही….. जेव्हा मनुष्याचे आरोग्य बिघडते, तेव्हा त्याचे थोडेफार काहीतरी नष्ट होते…. परंतु जेव्हा मनुष्याचे चारित्र्य बदनाम होते, तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ट होते.... लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते..... तोंडावर ओढुन घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात.... अशाप्रकारे जे घाईघाईने वर चढू पाहतात ते खूपवेळा कोसळतात हा जगाचा नियम आहे.... म्हणूनच स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.... चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो हे लवकरात लवकर जाणा….. जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.... आयुष्यात काय गमावलंत आणि काय कमावलंत ह्याचा विचार करा..... बघा, बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का..?..
शेवटी सार एकच... तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार..!.. आत्मउद्धार हा ज्याचा त्याने करायचा.... मार्गदर्शक फक्त मार्ग दाखवू शकतो..!!.. आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात.... फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते यासाठी मार्गदर्शक मदत करतो..... बघा, आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको..... कारण जे नंतर चांगले वाटते, तेच कृत्य नैतिक व जे नंतर दुःखकारक ठरते, ते अनैतिक असते..!... म्हणूनच आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही, सुविचार असावे लागतात....
सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे…. ज्या माणसांकडे योग्य विचारांचा भक्कम पाया नाही, त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही.... आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही....  जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात.... पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे योग्यतेने उभी राहतात.... आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवूनच ध्येयपूर्तीसाठी धडपडणं योग्य आहे.... एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद योग्य विचारांमध्ये असते.... कारण कोणत्याही कृतीच्या मुळाशी आपणच असतो....  आधी योग्य विचार करा मगच कृती करा आणि ओठी एक पोटी दुजे.... असे वागणे आपलाच ऱ्हास करते....  
स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका, चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून व्यवहार खोटे न बोलता सत्याने आणि सन्मानाने करा.... सत्याने मिळतं तेच टिकतं असे गीता सांगतेच, अयोग्य पद्धतीने केलेले काम विविध प्रकारे त्रासदायक होते.... मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी असते.... नेहमी तत्पर रहा, बेसावध आयुष्य जगू नका..... बघा, यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा कधीच होत नाही.... प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो..... गरज असते ती फक्त आपण शिकण्याची, त्या क्षणातील बोध जाणण्याची....
मित्रांनो, मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवावेत कारण  ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.... तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.... म्हणूनच आपल्यातील दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो, हे तत्व जीवनात पाळा.... स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता.... आयुष्यात असं ज्ञान मिळवा जे तुम्हाला आदर्श बनवेल.... एक माणूस म्हणूश यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायला हवं नव्हे, अगदी १००% आचरणात आणायला हवं..!..

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

Friday, 28 February 2014

New Presentation of Thoughts By Chetan K....     


Just walk along the road of life…. No matter how many times you try to move forward, but always staring at your past…. Know that past is a rear view mirror…. And remember, objects in mirror may be closer than they appear…. Too many times we overlook at our mistakes and not brood on them…. Once we self examined our self we saw things so much clearer with correct meaning in REARVIEWMIRROR…. Just live life based on true principles of…. If you always tell the truth, you don't have to remember anything…. ॐ श्री गुरुदेव दत्त .....









Thursday, 27 February 2014

महाशिवरात्री म्हणजे परिवर्तनाचा काळ.....
परमपिता शिव परमात्माबरोबर जोडली गेलेली `रात्री’ आध्यात्मिक रहस्याकडे संकेत करते…. आता शिवरात्री म्हणजे काय..?..  तर ‘रात्री’ या शब्दाचा अर्थ अज्ञानाशी संबंधित आहे.... अज्ञाननिद्रेत झोपलेल्या, बुद्धी तमोगुणांनी व्यापलेल्या आत्म्यामध्ये विकाररुपी चोर, लुटारु माणसांच्या सुखाला लुटून त्याला नष्ट भ्रष्ट करीत असतात आणि त्यांनाच तो मित्र समजून उशाला घेऊन झोपत असतो.... अशावेळी परमपिता, परमात्मा शिव विश्‍वाच्या कल्याणाकरिता अवतारित होतात.... जेव्हा सर्व मनुष्यात्मे `माया’ म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार ह्या पाच विकारांमुळे दुःखी, अशांत, पापी, भ्रष्टाचारी होऊन जातात…. तेव्हा त्यांना पुन्हा पावन व संपूर्ण ज्ञानी बनवण्याचे कल्याणकारी कर्तव्य करतात आणि म्हणूनच त्यांचे `शिव’ हे नाव सार्थक आहे….
शिव ह्या शब्दाचा अर्थ कल्याणकारी आहे…. शिव स्वयंभू आहेत.... सदा निराकारी स्थितीमध्ये, प्रकाशरुप, बिंदूरुप स्थितीमध्ये सहाव्या तत्त्वामध्ये किंवा अग्नितत्त्वामध्ये राहतात.... शिवतत्व मनुष्य सृष्टीचे चैतन्य बीजरूप आहेत आणि जन्ममरण, कर्म बंधनापासून मुक्त आहेत.... जेव्हा व्यक्ती जागृतीत येते तेव्हा ह्यालाच परमात्म्याचा दिव्य जन्म वा दिव्य अवतरण असे म्हटले जाते.... कारण ज्या शरीराचा परमात्मा आधार घेतात तो देखील एक जन्म-मरण-कर्म-बंधनाच्या चक्रामध्ये येणारा मनुष्य आत्मा आहे.... तो जो आहे, जसा आहे त्याला त्याच रुपामध्ये ओळखून त्यांच्या आठवणीत राहून आपल्याला आपल्या मूळ आत्मा स्वरुपाला ओळखून, आपल्या मूळ गुणांना धारण केले जाते.... आत्मस्थित शिवतत्त्व ज्ञानरुपी अमृत आणि योगरुपी प्रकाशाद्वारे मनुष्यमात्रास सतोप्रधान बनवितात....
मात्र या 'शिवशक्ती'ची आयुधे मात्र सर्वस्वी वैशिष्टपूर्ण आहेत..... डमरू, त्रिशूळ आणि शंख या तिहेरी आयुधांच्या वापरातून हा त्रिनेत्री देव आपले सातत्याने रक्षण करतो असे वाटते.... डमरू नादातून तो आपणास जागरूक करतो, त्रिशुळाच्या खणखणाटातून तो आपणास सजग ठेवतो तर शंखध्वनीतून तो आपणास भानावर आणतो....
म्हणजेच या रुद्रावतारी देवाचा या आयुधांचा प्रथम वापर हा नादब्रम्हातून आहे... गरज आहे... आपण आपले कान जागृतीने उघडे ठेवून ते ऐकण्याची.... डमरू' च्या आवाजातून जागरूक हो हे त्याचे सांगणे म्हणजे जगताना बरे वाईट, मोहमयी काय ते समजून घे....
या डमरूच्या आवाजातील संदेश जर आपल्यापर्यंत पोचलाच नाही.... तर 'त्रिशुळा' चा खणखणाट आपणास बजावतो.... अरे तुझे कान उघडे आहेत.. पण तू नाद ब्रह्मातील आवाज काय ध्वनित करतोय हेच ऐकत नाही आहेस.... आवाज कानावर पडला... पण तो आत पोचलाच नाही तर त्याचा उपयोग नाही, हे विसरू नकोस....
जर डमरू आणि त्रिशुळ यांच्या आवाजातील ध्वनित अर्थ भक्तासाठी अपुरे ठरले तर हा भैरव 'शंखा' च्या नाद लहरी अश्याप्रकारे उमटवतो.... कि त्या वाद-संवादी लहरीच्या नादमय लाटा भक्त शिष्यास वास्तवता दाखवून जागृत करून जगाच्या परिघाच्या पलीकडे नेवून जाणीवेतून नेणीवेत नेऊनच भानावर आणतात....
म्हणूनच आपण देखील रुद्राच्या अभिषेकातून स्वतःस शुचिर्भूत करून घेण्याचे भाग्य आपल्या पदरी पडून घेवू या... ओंकार रुपी शिवाचे अनुभूतीच्या पलीकडील अशा त्यास शरण जाऊ, यातच आपले परम भाग्य दडलेले आहे.... आजच्या ह्या शिवरात्रीच्या महान पर्वाच्या दिवशी आपण सर्वानी दृढ संकल्प करूया की, देहअभिमानाचा त्याग करून आत्मिक स्थितीमध्ये स्थित होऊन आत्म्यांच्या मूळ गुणांना धारण करून आपण आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न करू....
कदाचित या महारुद्राच्या निमित्ताने चराचरात दडून राहिलेले माझ्यातील विश्व अथवा विश्वातील मी यांचे परस्परातील नाते उलगडले जाईल.... आणि थोड्या काळात माझ्यात कालातीत बदल घडेल.... कदाचित मला अग्नीची होरपळ, पाण्याची तहान, विश्वाची व्याप्ती आणि श्रद्धेची अनुभूती यांची अल्पशी जाणीव होईल... आणि माझ्या ओठी नेहमीच राहिल ते शब्द ब्रम्ह असेल....
अहं निर्विकल्पो निराकार रूपो
विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वन्द्रियाणि ।
सदा मी समत्वं न मुक्तिर्न बन्धः
चिदानन्दरुपः शिवोSहं शिवो S हम ।।

ॐ श्री गुरुदेव दत्त....

Monday, 17 February 2014


Standard of living is not important…. Know that living a life with correct standards is more important…. I think that living a life with the correct standards are more important than a life with a standard of living….     

If you carry yourself with dignity and integrity and good values like respect and compassion…. that is of more value then living in a mansion with no values of life… and no compassion for your fellow beings….     

Ones standard of living can improve with time…. Doing the right thing is important…. Honesty Integrity Loyalty and Compassion are better than cars and money…     

Your beliefs don’t make you a better person… Your behavior does….  When you stop chasing the wrong things….  you give the right things a chance to catch you....  

Remember that, You can overcome whatever is going on around you… if you believe in the light that lives within you…. Live Immaculate Pure Clear life and Shine brightly…. so you can help those who have not found their path a way through the darkness….    ॐ श्री गुरुदेव दत्त....     

Thursday, 6 February 2014


कलियुगी जीवन गीता...

पार्थ म्हणे 'गा हृषीकेशी | या संसार युद्धाची ऐशीतैशी |
बेहेत्तर आहे मेलो उपाशी | पण मी बदलणार नाही |
धोंड्यात जावो हा तत्वविचार | आपल्या कडून होणार नाही |
तुला नाही काही उद्योग | करी हा वाह्यातपणा कुठला |
अर्जुन म्हणे 'गा हरी | आता कटकट पुरे करी |
दहादा सांगितले तुला तरी | हेका का तुझा असला ? |
आपण काही लढत नाही | वेळ कोण देई तरी |
ढिला म्हण की भागूबाई | दे नाव वाटेल ते |
ऐसे बोलोनि आपला अर्जुन | दूर फेकूनि तत्व ज्ञान |
खेटरावाणी तोंड करून | मटकन खाली बैसला |
इति श्री अज्ञान गीतायाम प्रथमोध्यायः |


जयकृष्ण केशव उपाध्ये {१८८२-१९३७} यांनी लिहिलेली ही वरील कलियुगी गीता.... आज माणूस मायेच्या पाशात अडकून आपले खरे अस्तित्व विसरत चालला आहे... भरकटत अहंकाराने माझे माझे करीत विकृत बुद्धीचा होत आहे.... म्हणूनच आज आपण पाहतो... आचार भ्रष्टी…. सदा कष्टी…. कुणी वंदा…  कुणी निंदा… माझा स्वहिताचा धंदा….
याचेच विनोदी विडंबनात्मक वर्णन श्री उपाध्ये यांनी केले आहे.... माणूस यां मोह माया सागरी अडकून कसा वाहत जातो आणि कुणाचेही ऐकत नाही, कारण आपण करतो, वागतो, बोलतो ते त्यास योग्य प्रतीत होत असते.... हेतू शेवटी हाच यां प्रकारच्या बोधातून तरी हसत खेळत माणसाने थोडे आत्मपरीक्षण करून स्वःताला काही प्रमाणात भानावर आणावे.... अहंकार मी पणा सोडून योग्य-अयोग्य ओळखून आपली मार्गक्रमणा करावी.... जीवन सार्थकी लावावे....      ॐ श्री गुरुदेव दत्त .....

Friday, 24 January 2014


सद्गुरू तत्व....
 ** WHAT IS SADGURU TATVA.?. Tattva means the essence or the element... Guru Tattva, thus means Guru Essence or Element... In the most complete sense, Guru Tattva is the natural, inexorable mechanism or process by which manifest life moves from a relative state of ignorance of SELF to total awareness or SELF REALIZATION... obeying the orders of the spiritual master with faith and devotion and following in the footsteps under the direction of the spiritual master…
** सद्गुरुतत्व काय आहे.?.. ब्रह्म हे व्यापक असल्यामुळे सर्व पदार्थांना व्यापून आहे… म्हणून त्याचे तत् हे नांव होय…. त्याला भाव या अर्थी त्व प्रत्यय लागून तत्व शब्द तयार झाला…. गुरुतत्त्व म्हणजे निर्गुण ब्रह्माचे स्वरुप होय... जर शाश्वत काय असेल तर ते आहे सद्गुरुतत्व..!.. त्याचे अढळत्व वादातीत आहे, त्याचा वास सूक्ष्मतम सूक्ष्म आहे... अन त्याचा विस्तार अनंत आहे…. यां सद्गुरुतत्वाचे आदेश आज्ञापालन धृढ श्रद्धा-विश्वासाने करीत आपली मार्गक्रमणा त्याच्या पावलावर पाउल ठेऊन करणे हेच खऱ्या साधकाचे कर्तव्य आहे...   
** If you have unshakeable faith on the Guru Tattva, then there is no need for anything else... MORE U SURRENDER HIS LIABILITY INCREASES....
** एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा.... जर तुमच्याकडे गुरुतत्वाबद्दल संदेह न धरता जे होईल ते गुरुतत्वानुसार हा विश्वास दृढ असेल तर.... तुम्हाला दुसऱ्या कशाचीच गरज नाही.. तुम्ही जेव्हढे सद्गुरु तत्वाला शरण जाल, तेव्हढीच सद्गुरूची तुमच्यासाठीची जबाबदारी वाढेल... आणि सर्व काही सद्गुरुच करेल....  
** CONFESSION IS THE FIRST STEP TOWARDS CORRECTION....
आत्मसुधारणा - आत्मबदलासाठी प्रथम पायरी.... आपल्या चुकांची कबुली आणि आत्मपरीक्षणाने आत्मनिरीक्षण करून आत्मसुधारणा आणि हळू हळू होत जाणारे आत्मपरीवर्तन म्हणजेच  आत्मविकास....    
** TRY TO REALISE HIS ORDER & TUNE YOUR ACTIVITIES ACCORDINGLY... THEN NOT ONLY THE PATH BUT WAY TO DESTINATION WILL  BE FULL OF HAPPINESS....
** सद्गुरू आदेश-गुरुबोध ओळखायला शिका आणि आपले कृती कर्म त्यानुसार करा... मगच आपला जीवनाचा पथच नव्हे तर.... ध्येयमार्गही समाधान आनंदाने भरून संसार मोक्षमय होऊन आपला आत्मउद्धार होतो....
** BE CAREFUL, BE AMBITIOUS, HAVE FAITH IN HIM, YOUR SUCCESS IS ASSURED....
** खरे साधक व्हा... नेहमी सावध रहा... निश्चित निग्रहाने योग्य ते साधायचे पहा... सद्गुरुंतत्वावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा... आणि पहा यश समृद्धी तुमचीच असेल...