Tuesday 15 October 2013

गुरु शरण  प्रार्थना....
उत्तमाचा ध्यास दे तू  |  प्रयत्नांची कास दे |
भक्ती, शुद्धी, संपन्नतेची  | आम्हा सदा तू आस दे ||
मार्ग तूची आमुचा  |  तू धैर्य दे, सामर्थ्य दे |
संघर्ष ही होती अहिंसक  | एवढा विश्वास दे ||
येतील ही कधी संकटे  |  त्या झेलण्या बळ खास दे |
जगणे माझे सार्थ व्हावे  | एवढे मज श्वास दे ||
सेवा घडावी योग्य येथे  |  हेवा नको ही बुद्धी दे |
ध्येय अन परिपुर्णतेचा  |  सदैव तू सहवास दे ||

शाश्वत एका क्षणात आणि विराट एका अणूत दडलेले असते.... जो अणूला अणुमात्र उमजून दुर्लक्ष करतो... तो विराटालाही मुकतो... क्षुद्र खोदल्यावर ' परम ' लाभते....

Sunday 13 October 2013


विजयादशमीच्या शुभदिनी वृक्षसंवर्धनाचा आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करुया....

दसऱ्याला शमीच्या झाडाचे महत्व आहेच.... याबाबत विविध कथा आहेत.... पण आज इथे एक वेगळी गोष्ट वृक्षसंवर्धनासाठी जाणून घेऊ.... शमी जपणारे खेजरली गाव....

वृक्षसंवर्धनासाठी कोणे एके काळी या गावातील लोकांनी केलेल्या बलिदानाची गोष्ट सांगितल्यावर वृक्षसंवधर्ननाचे महत्त्व कोणालाही सहज पटावे.... शमीच्या अनेक झाडांचे प्राणपणाने संवर्धन केल्यामुळे जोधपूरजवळील एका गावाला खेजरली असे नाव पडले आहे.... राजस्थानमध्ये शमी वृक्षास खेजडी या नावाने संबोधले जाते.... दसऱ्याच्या दिवशी तेथे शमी वृक्षाची पूजा करतात....

जोधपूरपासून 25 किलोमीटर दूर अंतरावर खेजरली गाव आहे.... गावात मोठ्या आकाराचे व अतिशय प्राचीन (200 वर्षांपेक्षाही जुने) असे खेजडी वृक्ष आढळून येतात.... खेजडी अर्थात शमी या वृक्षाचे शास्त्रीय नाव Prosopis cineraria असे आहे.... खेजरली गावात प्रामुख्याने विश्नोई समाजाचे लोक राहतात व त्यांचे गुरू श्री जांभेश्वमरजी यांनी घालून दिलेल्या 29 नियमांचे कडक पालन करतात.... या नियमांपैकी एक प्रमुख नियम वृक्ष व वन्यजीव संरक्षणाचा आहे....

खेजडी वृक्षांबाबतचा खेजरली गावातील इतिहास अत्यंत महत्त्वाचा व स्फूर्तिदायक असा आहे.... सन 1730मध्ये जोधपूरचे तत्कालीन महाराज श्री. अभयसिंहजी यांनी.... त्यांच्या सैन्यास त्यांचा राजवाडा बांधण्यासाठी चुना तयार करता यावा.... यासाठी खेजरली गावातून झाडे तोडून आणण्याचे फर्माविले.... या वृक्षतोडीस स्थानिक विश्नोईंनी विरोध दर्शविला.... 84 गावांतील अनेक विश्नोनईंनी या महत्त्वाच्या कार्यास सामूहिक पाठिंबा दर्शविला.... सैनिक मात्र खेजडीची झाडे तोडण्याबाबत आग्रह धरू लागले..... तेव्हा विश्नोई पुरुष व महिलांनी झाडांना चक्क मिठ्या मारल्या व पाहता पाहता 363 विश्नो ई वृक्षसंवर्धनार्थ धारातीर्थी पडले.... त्यानंतर मात्र वृक्षतोड थांबविण्यात आली....

वृक्षसंरक्षणाचे जगातील असे आगळेवेगळे उदाहरण खेजरली या गावामध्ये पाहावयास मिळते.... खेजरली येथे "राष्ट्रीय पर्यावरण शहीद स्मारक' आहे.... या तीन ते चार एकर क्षेत्रामध्ये भरपूर पक्षी व झाडे आहेत.... येथील शमी वृक्ष वाचविण्याच्या लढ्यात धारातीर्थी पडलेल्या अमृताबाईंचे स्मारक पर्यावरण रक्षणाची आणि वृक्षसंवर्धनाची स्फूर्ती देत राहते.... आपणही या गावकऱ्यांकडून वृक्षसंवर्धनाची प्रेरणा घ्यायला पाहिजे....

चला तर आपणही या दसरा - विजयादशमीच्या शुभदिनी वृक्षसंवर्धनाचा आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करुया....          ॐ श्री गुरुदेव दत्त....

Saturday 12 October 2013



नको अवगुणी रावणाची साथ.... करूया वाईटावर सद्गुणांनी मात.... 

आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो…. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र पाळले जाते…. खंडे नवमीला देव उठतात आणि मग येतो तो दसरा..... आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरा करण्यात येतो….. 

दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे.... दसऱ्याला `दशहरा’ असे म्हणतात…. दश म्हणजे दहा व हरा म्हणजे हरल्या आहेत…. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीने दाही दिशांवर विजय मिळवलेला असल्याने दाही दिशा देवीच्या नियंत्रणात आलेल्या असतात… व शक्ती ने भारलेल्या असतात…. आसुरी शक्तीं वर दैवी शक्तींपनी मिळविलेल्या विजयाचा हा दिवस… म्हणून या दिवसाला `विजयादशमी’ असेही म्हणतात… या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करतात….

या दिवशी आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची प्रथा आहे.... आपट्याची पाने हे आप आणि तेज ही तत्त्वे ग्रहण करू शकतात.... ही पाने एकमेकांना देतात... तेव्हा व्यक्तीच्या हातावरील देवतांची केंद्र असलेले बिंदु कार्यरत होतात... आणि त्या तत्त्वाचा लाभ त्या व्यक्तीला होतो.... सोने हे लहानांनी मोठ्यांना देण्याचा संकेत आहे.... हे सोने देवालाही वाहतात....

शमी व आपटा यांचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व : दसऱ्याला शमीची पाने घरी ठेवून आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची पद्धत आहे…. यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे….

१. दसऱ्याला रामतत्त्व व मारुतितत्त्व जास्त प्रमाणात कार्यरत असते….

२. आपल्यात क्षात्रभाव जागृत झाल्यास ही तत्त्वे ग्रहण होण्यास मदत होते….

३. शमीमध्ये तेजकण, तर आपट्यात आप व तेज कण अधिक असतात…. (पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश ही पंचतत्त्वे आहेत….)

४. शमीकडून प्रक्षेपित होणार्याल तेजलहरी आपट्याकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपकणांच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात….

५. जेव्हा आपट्याची पाने सोने म्हणून देतात… तेव्हा तेजलहरी जिवामध्ये आपकणामुळे लगेच झिरपतात… व जिवाचा क्षात्रभाव जागृत होतो….


विजयादशमी - दसऱ्याच्या....शुभ दिनी अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा…. आंनद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची…. यश किर्ती प्राप्त करायची धनसंपदा लुटायची… आणि लुटवायची हा दिवस…. म्हणूनच मित्रानो... 

नको अवगुणी रावणाची साथ.... करूया वाईटावर सद्गुणांनी मात.... लुटुनी सुवर्णमयी विचार धन.... करू समृद्ध सुविचारी आपले मन.... 

विजयादशमी - दसऱ्याच्या.... आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा....

ॐ श्री गुरुदेव दत्त ..... 

विजयादशमी आणि दस-याच्या हार्दिक शुभेच्छा....

आज आपण विजयादशमीचा नवा अर्थ जाणून घेऊ या.... अग्नीच्या दोन भार्या प्रसिद्ध आहेत - एक स्वाहा, दुसरी स्वधा... म्हणजेच अग्नीत झालेलें हवन स्वाहा ही देवतांना पोहोंचविते व स्वधा पितरांना पोहोंचविते....

उज्ज्वल मानवी देहाच्या ठिकाणीं ज्या इंद्रिय-शक्ति आहेत त्या देवताच होत.... आणि जे आनुवंशिक संस्कार आहेत ते पितर होत...  आता हे कसे ते अभ्यासू....

आपल्या उदरांत अग्नि आहे व अन्नाचें त्यांत हवन होत असतें....  हृदयांत अग्नि आहे, त्याला उत्कट-उज्वल भावना सारख्या समर्पण कराव्या लागतात....  आपल्याला लाभलेल्या बुध्दीचें अग्नि-तेज नवोनव, उच्च्-उदात्त विचारांच्या समिधांनीं उद्दीपित ठेवावें लागतें.... आणि इच्छाशक्तीच्या अग्निवेदींत धगधगीत ध्येयांचा हविर्भाग द्यावा लागतो....  म्हणजेच आपला जन्म आणि जीवन हा एक महायज्ञ आहे....

आपला जन्म सफल आणि सत्कारणी लावायचा असेल तर.... दैनिक आचरणाची यज्ञ-ज्वाला, उत्कट भावना, उच्च्-उदात्त विचार व श्रेष्ठतम ध्येयें यांनी प्रज्वलित ठेवली पाहिजे....   'संयम' अग्नीत सर्व उपभोगांची आहुति प्रथम देऊन नंतर यज्ञ-शिष्ट असा सुखाचा अनुभव घेतल्यानेंच जीवन सर्वांगाने प्रदीप्त होतें व रहातें....

आपल्या प्राप्त झालेल्या जन्माचे सार ध्येय कर्तव्य हेच.... सर्वांगानें दहाही इंद्रियांचा संयम साधणें व त्यांच्यावर विजय मिळविणें ही जीवनांतली खरी विजयादशमी होय....

अशा या विजयादशमी - दसऱ्याच्या.... आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.... दस-याच्या या  शुभ दिनी, सुख-सम्रुद्धी नांदो आपल्या जीवनी.... आजचा दिवस आपणां सर्वांना खूप सुंदर जाओ.... एक - एक सुंदर विचार एक सुंदर आयुष्य बनविणारा ठरो.... असेच सुंदर सुंदर विचार माझे आणि तुमचे जीवन समृद्ध करो...  या विजयादशमीच्या दिवशी आपण सर्वांनी अपयशाचं सीमोल्लंघन करून यशाकडे वाटचाल करावी हीच माझी सद्गुरुंकडे मनोकामना....  


ॐ श्री गुरुदेव दत्त....

Friday 11 October 2013



भक्ती, श्रद्धा आणि विश्वास....

I have seen better days...  But I have also seen worse...
I don't have everything that I want... But i do have all I need....
I woke up with some aches & pains... but I woke up...
My life may not be perfect.... but I am blessed with GuruKrupa (गुरुकृपा)….

 आपल्याकडे हीच श्रद्धा आणि विश्वास हवा गुरूप्रती.... मग संसार काय आणि साधना काय सर्व एकच होऊन आपला प्रवास सुरु होतो स्थूलातून सूक्ष्म जाणण्याचा.... संसारात राहूनही काहीच फरक पडत नाही... कारण सदैव पाण्यात राहूनही कोरडे राहणाऱ्या कमलदला सारखी निर्लेप वृत्ती होते साधकाची.... यासाठीच होणारा गुरुबोध योग्य रीतीने आत्मसात करणे हे साधकाचे आद्य कर्तव्य…. नाहीतर, मीपणात सर्व वाया जाते... आणि अमोलिक असे क्षण आपण दवडतो.... खरेतर आयुष्यातील हेच क्षण टिपून काळ आणि वेळ साधून आपल्या उच्चतम ध्येयाला गवसणी घालायची असते.... पण आपण हे मी नंतर करेन म्हणत राहिलो तर फार उशीर झालेला असू शकतो.... काही क्षण आयुष्यात परत येत नाहीतच.... आपलेच कर्तव्य आपण हे गुरुबोधी क्षण अभ्यासून आपल्यात आमुलाग्र बदल करून आत्मविकास करून घेणे.... नाहीतर स्थिती वाईट होते... आपण पुनश्च मायेच्या दुष्टचक्रात अडकत जातो.... मुक्तीपासून लांब जातो.... असे होऊ देऊ नका.... वेळीच भानावर या.... सद्गुरूला शरण जा.... If you’re having a bad days, consider what powerful forces may be playing a part in it.... and take comfort in knowing that things really are going to get better.... Know that True Guru never goes away until it teaches you what you need to know....  ॐ श्री गुरुदेव दत्त....

Thursday 10 October 2013





       Know that Darkness cannot drive out darkness, only light can do that. …. That’s why true spiritual master (गुरुतत्त्व) Lead your life in way that always choose the harder right… rather than the easier wrong for lesson of true life light… Know that this kind of leadership is not about titles, positions or flowcharts… It is about one life influencing another to become the leader of true life and know truly that your success and happiness lie in you… ॐ श्री गुरुदेव दत्त....



ज्ञानाची खूणगाठ.....
       द्रष्टेपणा म्हणजे ज्ञानाची खूणगाठ.... सामान्य माणूस केवळ माहितीचे तुकडे गोळा करतो, तर द्रष्टा हा त्याच तुकडय़ांना चिरंतन विचारांचा तात्त्विक आकार देतो..... द्रष्टा हा अर्थातच ज्ञानी असतो... ज्ञानी म्हणजे आत्मज्ञान अभ्यास करणारा.... पाप-पुण्याच्या शंका त्याला नसतात.... अशी माणसे इंद्रियांवर संयम ठेवतात....प्रसिद्धी आणि थोरपण घेऊ पहात नाही.... जेथें ज्ञान द्यायचे तेथे मात्र स्वःताचा अधिकार दाखवतात.... पण हे ज्ञान्याचे आत्मतेज सुख अज्ञानाला कसे कळणार..?.. तीर्थक्षेत्री भटकणारे भक्त देव शोधत फिरतात.... तिथं असतं तरी काय..?.. खरेतर उत्तम माणसं ही देवमाणसंच असतात.... आपल्या आसपासच ती वावरत असतात, पण आपण त्यांना किंमत देत नाही.... त्यांचं महत्त्व ओळखावं..... ज्ञानात बुडालेले मौन होतात.... मुनी ठरतात.... व्यर्थ बाता मारणारे ज्ञानाच्या भ्रमात अहंकार वाढवत राहतात.... स्व-स्वरूप त्यांना कळणार कसं..?.. अंतरात जे आहे, तेच सर्वत्र आहे.... हे जाणून घेतल्यावर साधकाचा शोध थांबतो.... माणूस म्हणून देवासारखे वागा.... चैतन्याचा झरा आतच आहे.... अंतर्चक्षू उघडा.... दीपज्योतीप्रमाणे मन स्थिर करा... निश्चिंत व्हा.... सद्गुरूवर श्रद्धा दृढ धरा... सद्गुरूला संपूर्णपणे शरण जा....  ॐ श्री गुरुदेव दत्त....





निशब्द मन मौन | एकांती समाधी ध्यान |

अभ्यास श्वास ध्यास | उन्नती शुद्ध वास || 

सोहम देह स्थिती | अनुभूति विश्व मूर्ती |

करुनी देह पावरी | ऐकू हंसनाद अंतरी ||

आज आपण आपला देह बासरी कशी ते थोडक्यात अभ्यासण्याचा प्रयत्न करू....

बघा, साधी बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात.... पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात.... त्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी मीयेतो.... याच मीपणाच्या अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही, असा समज आहे....

कृष्णाच्या बासरीत आणि आपल्यात बरेच साम्य वाटते.... बांबूच्या नळीला आकार दिला जातो ह्या नळीत हवा खेळती राहावी अशी रचना केली जाते आणि हीच बासरी पुढे आपल्या संगीताने जगाला आनंद देते.... तसेच आपल्या शरीराचे आहे नाही का....? आपले शरीर सुद्धा एक प्रकारची बासरीच आहे.... निसर्गाने कान-नाक-डोळे देऊन आपल्याला बनवलं आणि आणि तोच निसर्ग श्वासोच्छवास रूपाने आपल्यात फुंकर घालतोय.... तसेच षडरिपुः आपल्या देही असतात... याच देहरूपी अंगावरच्या सहा भोकांतून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे रिपू मी काढून टाकने आपले काम असते....

बासरी अगदी सरळ असते.... एखादी गाठ, ना एखादं वळण.... ती पोकळ असते... तसेच साधकाने असावे.... सरळ आणि गाठ्बंधरहित देह बासरीच्या पोकळीतून माझा माझा अहंकार गाळून पाडायचा....कृष्णाने सगळ्यांना बासुरी देऊन धरतीवर पाठवलं खरंपण त्या सहा छिद्रातून संगीत नाही बाहेर पडले तर तो देह्जन्म व्यर्थच.... 

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

Friday 4 October 2013

जसा काळ बदलतो तसे अनेक गोष्टींमध्ये बदल होतातच.... पण ज्ञानी साधक स्वःताच्या व इतरांच्या जीवनातील सर्व दु:खे, शारीरिक पिडा, अपमानाचे प्रसंग, कठोर शब्द-वागणूक.... यांस निश्चलतेणे सामोरा जातो.... तो यावर कोणालाही काही बोलत नाही.... उलट माझी भक्ती वाढावी.... हाच खरा परीक्षा काळ.... म्हणून ईश्वराच्या इच्छेनेच हे घडते आहे असे तो म्हणतो.... दु:ख – भोग त्याला घाबरवू शकत नाही.... तो आपले मन अधिकाधिक ईश्वराकडे लावून अशा प्रसंगाचा उत्कृष्ट फायदा करून घेतो.... मन नामात गुंतवून भगवंत अनुसंधानी लावतो.... म्हणूनच.....

नामस्मरणी अखंड रहावे | नित्य रामानुसंधानी असावे ||
वाईट कुविचार दुर्लक्षावे | नामे निर्मळ समाधान साधावे ||    ..... ॐ श्री गुरुदेव दत्त.....