निशब्द मन मौन | एकांती समाधी ध्यान |
अभ्यास श्वास ध्यास | उन्नती शुद्ध वास ||
सोहम देह स्थिती | अनुभूति विश्व मूर्ती |
करुनी देह पावरी | ऐकू हंसनाद अंतरी ||
आज आपण आपला देह बासरी कशी ते थोडक्यात
अभ्यासण्याचा प्रयत्न करू....
बघा, साधी बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून
तोडतात.... पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना
बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात.... त्याचं कारण म्हणजे या
तिथींमध्ये शेवटी ‘मी’ येतो.... याच ‘मी’पणाच्या अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत
नाही, असा समज आहे....
कृष्णाच्या बासरीत आणि आपल्यात बरेच साम्य
वाटते.... बांबूच्या नळीला आकार दिला जातो ह्या नळीत हवा खेळती राहावी अशी रचना
केली जाते आणि हीच बासरी पुढे आपल्या संगीताने जगाला आनंद देते.... तसेच आपल्या
शरीराचे आहे नाही का....? आपले शरीर सुद्धा एक प्रकारची बासरीच आहे.... निसर्गाने कान-नाक-डोळे देऊन
आपल्याला बनवलं आणि आणि तोच निसर्ग श्वासोच्छवास रूपाने आपल्यात फुंकर घालतोय.... तसेच षडरिपुः आपल्या देही असतात... याच देहरूपी अंगावरच्या सहा भोकांतून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे रिपू मी काढून टाकने आपले काम असते....
बासरी अगदी सरळ असते.... एखादी गाठ, ना एखादं वळण.... ती पोकळ
असते... तसेच साधकाने असावे.... सरळ आणि गाठ्बंधरहित देह बासरीच्या पोकळीतून माझा
माझा अहंकार गाळून पाडायचा....कृष्णाने सगळ्यांना बासुरी देऊन धरतीवर पाठवलं खरं…
पण त्या सहा छिद्रातून संगीत
नाही बाहेर पडले तर तो देह्जन्म व्यर्थच....
ॐ श्री गुरुदेव दत्त .....
No comments:
Post a Comment