गुरु शरण प्रार्थना....
उत्तमाचा ध्यास दे तू | प्रयत्नांची कास दे |
भक्ती, शुद्धी, संपन्नतेची | आम्हा सदा तू आस दे ||
भक्ती, शुद्धी, संपन्नतेची | आम्हा सदा तू आस दे ||
मार्ग तूची आमुचा | तू धैर्य दे, सामर्थ्य दे |
संघर्ष ही होती अहिंसक | एवढा विश्वास दे ||
संघर्ष ही होती अहिंसक | एवढा विश्वास दे ||
येतील ही कधी संकटे | त्या झेलण्या बळ खास दे |
जगणे माझे सार्थ व्हावे | एवढे मज श्वास दे ||
जगणे माझे सार्थ व्हावे | एवढे मज श्वास दे ||
सेवा घडावी योग्य येथे | हेवा नको ही बुद्धी दे |
ध्येय अन परिपुर्णतेचा | सदैव तू सहवास दे ||
ध्येय अन परिपुर्णतेचा | सदैव तू सहवास दे ||
शाश्वत एका क्षणात आणि विराट एका अणूत दडलेले असते.... जो अणूला अणुमात्र उमजून दुर्लक्ष करतो... तो विराटालाही मुकतो... क्षुद्र खोदल्यावर ' परम ' लाभते....
No comments:
Post a Comment