Thursday 10 October 2013




ज्ञानाची खूणगाठ.....
       द्रष्टेपणा म्हणजे ज्ञानाची खूणगाठ.... सामान्य माणूस केवळ माहितीचे तुकडे गोळा करतो, तर द्रष्टा हा त्याच तुकडय़ांना चिरंतन विचारांचा तात्त्विक आकार देतो..... द्रष्टा हा अर्थातच ज्ञानी असतो... ज्ञानी म्हणजे आत्मज्ञान अभ्यास करणारा.... पाप-पुण्याच्या शंका त्याला नसतात.... अशी माणसे इंद्रियांवर संयम ठेवतात....प्रसिद्धी आणि थोरपण घेऊ पहात नाही.... जेथें ज्ञान द्यायचे तेथे मात्र स्वःताचा अधिकार दाखवतात.... पण हे ज्ञान्याचे आत्मतेज सुख अज्ञानाला कसे कळणार..?.. तीर्थक्षेत्री भटकणारे भक्त देव शोधत फिरतात.... तिथं असतं तरी काय..?.. खरेतर उत्तम माणसं ही देवमाणसंच असतात.... आपल्या आसपासच ती वावरत असतात, पण आपण त्यांना किंमत देत नाही.... त्यांचं महत्त्व ओळखावं..... ज्ञानात बुडालेले मौन होतात.... मुनी ठरतात.... व्यर्थ बाता मारणारे ज्ञानाच्या भ्रमात अहंकार वाढवत राहतात.... स्व-स्वरूप त्यांना कळणार कसं..?.. अंतरात जे आहे, तेच सर्वत्र आहे.... हे जाणून घेतल्यावर साधकाचा शोध थांबतो.... माणूस म्हणून देवासारखे वागा.... चैतन्याचा झरा आतच आहे.... अंतर्चक्षू उघडा.... दीपज्योतीप्रमाणे मन स्थिर करा... निश्चिंत व्हा.... सद्गुरूवर श्रद्धा दृढ धरा... सद्गुरूला संपूर्णपणे शरण जा....  ॐ श्री गुरुदेव दत्त....

No comments:

Post a Comment