Monday 25 November 2013

जीवनाचा अर्थ उलगडणारे क्षण….


प्रत्यक्ष जगताना, भोगताना नकोसे वाटलेले, असह्य क्षण, एकदा आठवणींच्या कोशात बंद झालेकी नंतर आपल्याच आठवणीत कधी कधी आपण त्यांना कुरवाळतो.... असे क्षण जगताना जीव कासावीस होतो, काही काही नकोसे वाटते.... पण कालांतराने आपण त्या अवघड वाटेवरून चालून गेलो.... याचा आनंदही होतो, कारण आज त्याच्यापासून बरेच लांब आलो असतो आपण..!.. मग त्याची तीव्रता ही कमी होते.... आणि जर त्या असह्यतेवर विजय मिळवला असेल तर त्या वेदनेला कुरवाळतानाही बरे वाटते....
प्रथमता होणाऱ्या दु:खाची जाणीव जीवन अर्थहीन असल्याचा भास निर्माण करु शकते.... पण आलेल्या परिस्थिती मागे काही अर्थ आहे.... हे कळले की मग दु:खही सुसह्य होते.... दु:ख भोगताना त्या दु:खाची नवी ओळख असते, नंतर तीच ओळख जुनी झालेली वाटते.... तेव्हा वाटलेल्या मरणयातना, जरी त्यांनी मरण दिले नसेल तरी त्यामुळे असेल, त्याला पुरून उरलोय ही भावना.... क्वचित काही लोकांना याचा अहंकार सुद्धा होतो....
चालताना एखादी वाट चालून जातोही आपण, तेव्हा कशाचेच भान नसते.... नंतर कधीतरी मागे वळून बघताना जाणवते.... हा, आपण तुडवून आलो ती वाट.. जी किती अशक्य, केवढी खडतर होती.... आपण स्वतःला शाबासकी देतो आणि भोगलेल्या दुखऱ्या क्षणांना आठवणीच्या कुपीमध्ये मोत्यागत मढवून टाकतो.... खूप एकटे एकांती असताना तो मोती काढून निरखत राहतो.... यातनेतील सुख उपभोगत राहतो.....
खरेतर जगताना, भोगताना त्या क्षण-नाट्यातले आपण एक पात्र असतो..... काळ सरून गेल्यावर त्याच नाट्याचं स्मरणातलं रेकॉर्डिंग पाहताना आपण एक प्रेक्षक असतो.... या दोन वेगवेगळ्या भुमिका आहेत.... त्यामुळे या दोन्ही वेळी वेगवेगळी अनुभूती असणं क्रमप्राप्त आहे, नाही का..?.. आपण सतत बदलत असतो, घडत असतो याचेच हे लक्षण आहे.... काहीवेळा गेलेला काळ.... पुन्हा संपूर्ण समग्रतेने.... जागृततेने, भोगण्याची उत्कट वासना (इच्छा) आसक्ती होते...कारण मागील दुःख/यातना भोगताना, आपण स्वतःला विसरलेलो होतो..!..
आपलं संस्कारित मन हे दुर्दैवानं आपल्या नकळत नकारात्मक बाबी स्वीकारण्यासाठी तुलनेनं जास्त अनुकूल असतं.... तरीही प्रत्यक्ष भोगताना नकोसे वाटलेले, असह्य क्षण, सहन करून आपण निग्रहाने पुढे आलेलो असतो.... घडलेलो असतो, ज्या घड्ण्यावर ते क्षण सोसण्याचेच संस्कार असतात.... त्यामुळे नंतर मागे वळून पाहणाऱ्या 'आपल्याला' ते क्षण फारसे त्रास तर देतच नाहीत.... उलट अभिमान आणि आत्मविश्वासच देतात..!...  
आता या सर्वाचे मर्म वा सार म्हणजे.... काही क्षण प्रसंग आपल्यालाच घडविण्यासाठी निर्माण केले जातात..... जर आपण त्यातून योग्य ते घेऊन घडलो तर साधले..... यासाठी अप्रत्यक्ष जगणे सोडले कि मग प्रत्यक्षात शक्यतो असह्य असे क्षण येत नाहीत असे वाटते....

चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती | व्याघ्र ते न खाती सर्प तया ||
विष ते अमृत आघात ते हित | अकर्तव्य ते नीत होय त्यासी ||
दुख ते देईल सर्व सुखफळ | होतील शीतल अग्नीज्वाळा ||
आवडेल जीवा जीवाचियापरी | सकळ अंतरी एक भाव ||
गुरुकृपा आज केली नारायणे | जाणीजेते येणे अनुभवे ||

ॐ श्री गुरुदेव दत्त.....

Saturday 23 November 2013




भारतरत्न पुरस्काराचे निकष..?..  
मित्रानोआज अशी वेळ आली आहे.... आपल्याला काही योग्य निर्णय घेता येत नसतील... तर काही काळ भारतरत्न पुरस्कार देणे बंद करा.... या देशात महागाईकुपोषणगरीबीअशा अनेक समस्या आहेत.... त्याकड़े कोणाचेही लक्ष्य नाही.... असल्या गोष्टीवर मात्र तावातावाने चर्चा चालतात....
मित्रानोसचिन व त्याचा खेळ हा काहीक्षणापुरता ठीक आहे.... क्रिकेट व क्रिकेटपटू यांना जास्त डोक्यावर घेतल्यामुळे आपण इतर खेळावर व खेळाडुवर अन्याय केल्यासारखे आहे.... सचिन हा चांगला माणुस म्हणून ठीक आहेच.... पण आपल्याकडे व्यक्ती स्तोम फार माजवले जाते.... बुद्धी गहाण टाकून लोकप्रियतेच्या मागे वाहत जाणे भारतीयांना आवडते.... भारतरत्न पुरस्कार फक्त भारतासाठी सर्वोच्च्य त्याग करणारे जसे सामाजिकसायण्टिस्ट वगैरेसाठीच असावा.... आणि त्याचे खरे निकष देखील हेच आहेत....
जेव्हा कधी देशावर भीषण संकट येतेत्या वेळी आपले सरकार क्रिकेटचा सहारा घेऊन आपले लक्ष क्रिकेटकडे आकर्षित करतेआपणाला याची जाणीव आहे..?.. आपला देश व ज़नतेची परिस्थिति फार वाईट आहे.... लवकरच सावध होऊन इतरांना सावध करा व क्रिकेट पाहण्याऐवजी माहितिपूर्ण चैनेल पहा.... सचिन आणि प्रा. सीएनआर राव यांच्यासारख्या संशोधकांस एकाच पंगतीत बसवून त्यांच्या मुखी भारतरत्न पुरस्काराचा घास भरवण्याचा प्रकार आपल्याकडेच होऊ शकतो..... जरी हे मान्य केले भारतरत्न कमाईवर नाही तर कर्तृत्वावर मिळतेमग भारताच्या प्रत्येक सैनिकाला भारतरत्न द्यावे लागेल....
माझ्यामतेसचिन उत्तम आहे की नाही हा चर्चेचा मुद्दा नाहीये..... आपल्याला सचिनपेक्षाही महान किंवा सचिन इतक्याच महान खेळाडूंचा विसर पडू नये.... असे अनेक खेळाडू भारतात होऊन गेले आणि आहेत.... मग भारतरत्नसाठी सचिनच्याच नावाचा अट्टाहास का..?..
नीट विचार केला पाहिजे.... एका सचिनसाठी ही नियमांची मोडतोड आहे का..!.. सध्या सरकार कठीण परिस्थितीतून जाते आहे.... एकूणच जनतेमधे रोष आहे..... त्यामुळे जनतेला खूष करण्यासाठी तर हा खटाटोप नव्हे ना असा विचार मनात येतो.....
याची दुसरी महत्वाची बाजू म्हणजे..... 'आजवर खेळाडू यामधे समाविष्ट का नव्हते'  याचाही विचार झाला पाहिजे..... बघा, 'भारतरत्नपुरस्कार अशा व्यक्तीला दिला जातो ज्या व्यक्तीचा देशाच्या उभारणीमध्ये प्रगतीमधे मोठा वाटा आहे..... भारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च त्याग करणार्या किंवा भारताची किर्ती जगभरात वृद्धीगंत करणार्या व्यक्तीस भारत रत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देवून गौरविले जाते. ....
आपल्या देशात खेळाच्या क्षेत्रात काम करणार्यान व्यक्तीला सर्वोच्च खेलरत्न दिला जातो.... भारतीय चित्रपटाच्या क्षेत्रात भरीव काम करणार्यार कलाकाराला 'दादासाहेब फाळके पुरस्कारदिला जातो.... पण आपल्या क्षेत्राचे कुंपण ओलांडून या लोकांचे देशासाठी नेमके योगदान काय असाही एक प्रश्न डोकावतो..... भारतरत्नच्या बाबतीत सचिनशाहरुखसलमान यांचे योगदान त्यांच्या क्षेत्रात सारखेच असेल, मग सचिनला दिले तर शाहरुखसलमान यांना का नको असाही एक प्रश्न पडतो.....
क्षणभर म्हणूया सचिन देवच आहेपण तो क्रिकेटपुरता..... त्याच्यापलिकडे काय...
ज्याप्रमाणे खेळाडुंना 'खेलरत्नआणि 'अर्जुन पुरस्कार' त्यांच्या सर्वोत्क्रुष्ट कामगिरीसाठी दिले जातातत्याचप्रमाणे भारतीय सैन्यातील जवानांना 'परमवीरचक्र',  'वीरचक्रआणि महावीरचक्रहे अवार्ड दिले जातात.... त्यामुळेच खेळ आणि लष्कर ही क्षेत्रे भारतरत्न पुरस्कारापासुन वेगळी ठेवली होती.... आपले जवान तर आपल्या देशासाठी म्हणजेच तुमच्यासाठी आपले प्राण कुर्बान करतात.... मग त्या जवानांना सुद्धा 'भारतरत्नदेण्यासाठी नियम बदलायला तुम्ही ओरड मारणार आहात का..?.. तस करण तुम्हाला व्यवहार्य वाटत नसेलतर तुमच्या एका लाडक्या सचिनसाठी भारतरत्नसारख्या प्रतिष्ठीत पुरस्काराचे नियम सरकारला का बदलण्यास भाग पाडले..?..
'भारतरत्नहा अजुनही देशातील सर्वोच्च पुरस्कार समजला जात होता.... कारण तो उगाच कोणाला पण दिला जात नाही.... काही व्यक्ती इतक्या कर्तृत्ववान असतात, कि त्यांच्या नावापुढे पुरस्कार गौण ठरतो, तर काहींना ओळख टिकवण्यासाठी पुरस्कार लागतात..... पण स्वतः गरीब राहून समाजाला श्रीमंत करणारे 'महर्षिजेव्हा भारतरत्नच्या पंक्तीत जाऊन बसतात, तेव्हाच भारतीय मनाला खरा आनंद होतो असे वाटते....


ॐ श्री गुरुदेव दत्त....

Thursday 21 November 2013

 
जीवनाची ओळख.....

आपला जन्म जीवन हेच मोठे महाभारतीय युद्ध आहे.... मग हे जाणूनच भगवंताने गीतेचे प्रयोजन केले... आपले मन हा अर्जुन आणि आपले गुरुतत्वांनुसार विचार-बुद्धी म्हणजे सारथीरूपी भगवंत... आपला देह हा रथ.... आपला आत्मा हा देहरथाचा स्वामी.... मग असे असता आपल्या आयुष्याच्या अनुभवांती महाभारत हा प्रत्येकाचा ग्रंथ तयार होतच जातो.... बघा, शेवटी प्रत्यक्ष भगवंत हाच अंतापर्यंतचा द्रष्टा, पण कलियुगाच्या परिस्थितीत अवतार घेणे दुरापास्तच.... किती अर्जुनांना उत्तरे देत बसणार हे जाणुनच त्याने द्वापार युगात गीता तयार केली व तिची ओळख ज्ञानदेव अवतारामार्फत तळापर्यंत करून दिली....

"आता गीता हाच अवतार समजायचा”.... गीता-ज्ञानेश्वरी-अभंग ज्ञानेश्वरी वाचताना.... आपण अज्ञानी आहोत ही जाणीव ज्या क्षणी होते, त्याक्षणी ते अज्ञान नाहीसे होऊन त्याच्या ऐवजी `आपण अज्ञानी आहोत' हे ज्ञान येते.... हेच ज्ञानबीज हळू हळू फोफावते.... आपल्या डोळ्यावरची अज्ञानपट्टी काढून आपणास डोळस करते....

 ॐ श्री गुरुदेव दत्त....

Monday 18 November 2013

आत्मबुद्धी ते वरदान आणि देहबुद्धी तो ताप

आत्मबुद्धी ते वरदान आणि देहबुद्धी तो ताप

 

बुद्धी हे मानवाला मिळालेले नक्कीच वरदान आहे.... विवेक बुद्धीच्या जोरावर तो चांगल्या वाईटाची पारख करू शकतो... अनेक प्रकारचे ज्ञान मिळवू शकतो.... ८४ लक्ष योनी फिरल्यानंतर अतिशय दुर्लभ असा मानव देह आपल्याला प्राप्त होतो.... आणि जन्म मृत्युच्या या बंधनातून मुक्त व्हायचे असेल, तर सद्गुरूच्या साह्याने परमतत्वाच्या सन्निध जाता येईल.... जे आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे.... अध्यात्मात प्रगती करायची असेल तर गुरुतत्वाची साथ सोडता कामा नये.... पण हे जे वरदान म्हणून मिळालेली बुद्धी कोणत्या स्वरूपात कार्यरत आहे ते महत्वाचे.... आत्मबुद्धी ते वरदान आणि देहबुद्धी तो ताप हे लवकरात लवकर जाणणे साधकाचे कर्तव्य....   ॐ श्री गुरुदेव दत्त....




(निर्मुक्त : चिंतामणी) - देव मोठा की गुरू..?

एका शिष्याने सद्गुरुना प्रश्न केला ," स्वामीजी, देव श्रेष्ठ की गुरू श्रेष्ठ..?"
स्वामीजी म्हणाले, " गुरू श्रेष्ठ..!!शिष्य.. असे कसे म्हणताय..???
असं समज.. एका वाळवंटातून एक वाटसरू चाललाय.. उन आग ओकतय.. प्रचंड तहान लागली आहे.. जवळचं पाणी कधीच संपलय..!!  आता थरथर सुरू झालीय शरीरात..!! पाय कधीही कोसळून पडतील अशी स्थिती आहे..!! आणि अचानक त्याला समोर एक विहीर दिसते..!! बाजूला थोडी हिरवळ पण आहे..!! म्हणजे नक्की तिथे पाणी आहे..!!वाटसरू बळ एकवटून पाय उचलतो, पण.. पण.. दोन पावलांवरच तो कोसळतो..!! ताकदच संपते पायातली..!!पाणी तर समोरच दिसतंय.. पण पाण्यापर्यंत पोचता येत नाहीये..!!अशावेळी एक व्यक्ती तिथे येते..!! विहीरीतून पाणी शेंदते, लोटाभर पाणी घेऊन येते आणि त्या व्यक्तीला पाजते..!! त्याचा जीव वाचतो..!!आता प्रश्न असा आहे की त्या पांथस्थाचा जीव कोणी वाचवला..? पाण्याने की पाणी पाजणा-या व्यक्तीने..?
तर उत्तर फार अवघड नाहीये..!! ती व्यक्ती महत्वाची..!! पाणी तर होतेच ना विहीरीत..!!
तसेच; परमात्मा आपल्या जवळंच आहे.. हो, पण आपणंच दूर आहोत त्याच्यापासून..!!
षड्रिपूंच्या वाळवंटातून चालताना पार थकून जातो आपला जीव..!! अशावेळी मोठ्या प्रेमाने आपल्याला जवळ घेऊन जो मदत करतो, परम तत्वापाशी घेऊन जातो, तो गुरूच श्रेष्ठ..!!.. ॐ श्री गूरूदेव दत्त...