बुद्धी हे मानवाला मिळालेले नक्कीच वरदान आहे.... विवेक बुद्धीच्या जोरावर तो चांगल्या वाईटाची पारख करू शकतो... अनेक प्रकारचे ज्ञान मिळवू शकतो.... ८४ लक्ष योनी फिरल्यानंतर अतिशय दुर्लभ असा मानव देह आपल्याला प्राप्त होतो.... आणि जन्म मृत्युच्या या बंधनातून मुक्त व्हायचे असेल, तर सद्गुरूच्या साह्याने परमतत्वाच्या सन्निध जाता येईल.... जे आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे.... अध्यात्मात प्रगती करायची असेल तर गुरुतत्वाची साथ सोडता कामा नये.... पण हे जे वरदान म्हणून मिळालेली बुद्धी कोणत्या स्वरूपात कार्यरत आहे ते महत्वाचे....
आत्मबुद्धी ते वरदान आणि देहबुद्धी तो ताप हे लवकरात लवकर जाणणे साधकाचे कर्तव्य.... ॐ श्री गुरुदेव दत्त....
(निर्मुक्त : चिंतामणी) - देव मोठा की गुरू..?
एका शिष्याने सद्गुरुना प्रश्न केला ,"
स्वामीजी, देव श्रेष्ठ की गुरू श्रेष्ठ..?"
स्वामीजी म्हणाले, " गुरू श्रेष्ठ..!!शिष्य.. असे कसे
म्हणताय..???
असं समज.. एका
वाळवंटातून एक वाटसरू चाललाय.. उन
आग ओकतय.. प्रचंड तहान लागली आहे.. जवळचं पाणी कधीच संपलय..!! आता थरथर सुरू झालीय शरीरात..!! पाय कधीही कोसळून पडतील अशी स्थिती आहे..!! आणि अचानक त्याला
समोर एक विहीर दिसते..!! बाजूला थोडी हिरवळ पण आहे..!! म्हणजे नक्की
तिथे पाणी आहे..!!वाटसरू बळ
एकवटून पाय उचलतो, पण.. पण.. दोन
पावलांवरच तो कोसळतो..!! ताकदच संपते पायातली..!!पाणी तर समोरच दिसतंय.. पण पाण्यापर्यंत पोचता येत नाहीये..!!अशावेळी एक व्यक्ती तिथे येते..!! विहीरीतून पाणी शेंदते, लोटाभर पाणी घेऊन येते आणि त्या व्यक्तीला पाजते..!! त्याचा जीव वाचतो..!!आता प्रश्न असा आहे की त्या पांथस्थाचा जीव
कोणी वाचवला..? पाण्याने
की पाणी पाजणा-या व्यक्तीने..?
तर उत्तर फार अवघड नाहीये..!! ती व्यक्ती
महत्वाची..!! पाणी तर होतेच ना विहीरीत..!!
तसेच; परमात्मा आपल्या
जवळंच आहे.. हो, पण आपणंच दूर
आहोत त्याच्यापासून..!!
षड्रिपूंच्या वाळवंटातून चालताना पार थकून जातो
आपला जीव..!! अशावेळी मोठ्या प्रेमाने आपल्याला
जवळ घेऊन जो मदत करतो, परम तत्वापाशी घेऊन जातो, तो गुरूच श्रेष्ठ..!!.. ॐ श्री गूरूदेव दत्त...
No comments:
Post a Comment