श्रद्धा - अश्रद्धा - गुरुकृपा....
अभ्यासानेच कळेल.... सध्याचा कालखंड आणि पूर्वजांचा कालखंड ह्यांत अजिबात फरक नाही.... कारण पूर्वीही सूर्य पूर्व दिशेला उगवायचा आणि आजही सूर्य पूर्व दिशेलाच उगवतो.... आजही आपला जन्म आपल्या हाती नाही.... मृत्यू आपल्या हाती नाही.... पण ह्या दोन टोकांतील जीवनात आपलं कर्तुत्व आहे.... बघा हे विचित्रच असे आयुष्य.... आणि या आयुष्यात ईश्वर-परमतत्व आहेच आहे..!.. पण आपली खरी निष्ठा असेल तरच त्याचे अस्तित्व जाणवते आणि अनुभवता येते.... आत ही निष्ठा येण्यासाठीच सद्गुरुंनी आपल्याला सहज-सोपा मार्ग म्हणजे सोहम् भजन आणि त्याला पूरक असे वाचन-चिंतन-मनन सांगितले आहे.... नित्य गुरु स्मरणाने ज्याला शरण जायचे तो काहीं दूर नाही.... अंतर्यामी आहे, ह्याची जाणीव जागृत होते... बहिर्मन आंत वळविल्या खेरीज खऱ्या शरणागतीला प्रारंभ होत नाही.... मुलाला बापाचे बारसे पाहता येणे शक्य नाही.... तसेच 'मी कोण' ..?.. हे बुद्धीने आकलन होणे शक्य नाही.... त्यासाठी गहन गहन श्रद्धाच हवी.... थोडीही अश्रद्धा नको.... श्रद्धा गहन स्वरूपाची नसेल तर अश्रद्धेचे रूप कधी घेते ते कळत नाही... नकळत होते... श्रद्धापूर्वक गुरुवाक्य प्रमाण मानले तर भरपूर साधता येतेच येते..!..
गुरुवाक्य म्हणजे कामधेनु | ऐसे बोलती वेद पुराण | आता नाही अनुमान | करीन सेवा स्वामिया ||
जय जय परम पुरुषा | तूची ब्रम्हा विष्णू महेश्वरा | तुझे वाक्य जाहले परीस | सुवर्ण केला माझा देह ||
तू तारावया विश्वासी | म्हणोनी भूमी अवतरलासी | त्रिमूर्ती तूची होसी | अन्यथा नव्हे स्वामिया ||
तुझी स्तुती करावयासी | अशक्य आपुले जिव्हेसी | अपार तुझ्या महिमेसी | नाही साम्य कृपा सिंधू ||
काही साधकांसाठी अहंकार अति सूक्ष्म असल्याने त्यांच्या प्रयत्नांनी तो नष्ट होत नाही, पण त्यांना हे आधी नीटपणे कळले की मगच खऱ्या शरणागतीचा आणि प्रार्थनेचा उगम होतो.... आणि मग गुरुआज्ञेप्रमाणे वर्तन करणाऱ्याला कधीही नड येत नाही....
I have seen better days... But I have also seen worse...
I don't have everything that I want... But i do have all I need....
I woke up with some aches & pains... but I woke up...
My life may not be perfect.... but I am blessed with GuruKrupa….
आपल्याकडे हीच श्रद्धा आणि विश्वास हवा गुरूप्रती.... मग संसार काय आणि साधना काय सर्व एकच होऊन आपण सूक्ष्म होऊन जातो.... संसारात राहूनही काहीच फरक पडत नाही... कारण सदैव पाण्यात राहूनही कोरडे राहणाऱ्या कमलदला सारखी निर्लेप वृत्ती होते साधकाची....
ॐ श्री गुरुदेव दत्त....
No comments:
Post a Comment