आयुष्याची खरी ओळख....
आयुष्यात प्रत्येक भेट ठरलेली असते... पण काही भेटी जुन्या होऊनही नवीनच राहतात..!!.. काही भेटींमध्ये उज्वल भविष्य दडलेलं असतं... अगदी कधीतरी भेटलेली एखादी साधी व्यक्ती सुद्धा कधी कधी आयुष्याला सुरेल वळण देऊन जाते... पण आपण आपल्याच गुर्मीत आयुष्य जगात राहिलो आणि मला काहीच नवे शिकायचे नाही.... मी जसा आहे तो योग्यच.... असे म्हटले की…. आयुष्याला नवे वळण कसे लाभेल बरे..?.. माणूस आपल्या देहबुद्धीच्या अभिमानानेच संपत असतो, म्हणून आयुष्यात पुढे जात असताना आत्मबुद्धीच्या जागृतीने…. आयुष्यात घडत असलेल्या घडामोडींचा मागोवा घेतल्यास, आपणास खूप काही शिकावयास मिळते.... त्यातून समृद्धीदेखील लाभते....
खरंय.... जग एका दिवसात नाही बदलत.... त्यासाठी हजारो पावलं उचलावी लागतात.... प्रश्न असतो तो फक्त, आपण किती योग्य पावलं उचलतो..?.. पण अशी घमेंड कदापी नको.... मीच माझ्या जीवनाला योग्य वळण देईन.... कोण कशाला माझ्या जीवनाला वळण देणार..?.. एखादी व्यक्ती अगदी अनाहतपणे आयुष्यात येते आणि प्रत्येक क्षणावर प्रभाव पाडून जाते.... आयुष्यातला त्यांचा प्रवेश काहीसा नकळत असाच होतो.... आणि जुळलेला स्नेह मानले तर आयुष्यभराची सुखद शिदोरी होऊन राहू शकतो.... पण दुराग्रहच जास्त असेल तर जुळत आलेले नाते तुटायला क्षणाचाही वेळ लागत नाही.... मलाच कळत... कळत... असा दुराग्रह प्रभावी शक्तीपासून आपणास नकळत दूर करतो.... जसा प्रवेश नकळत तसाच निरोपही..... विकृतीने अहंकाराचा वडवानल धगधगता ठेवला की आयुष्य त्यात पोळले जातेच जाते....

ॐ श्री गुरुदेव दत्त....
No comments:
Post a Comment