Tuesday 27 November 2012

गुरुबोध ज्ञाने सगुण दृष्टी.... निर्गुण मार्गी गुरुकृपा पुष्टी.... 

गुरुबोध ज्ञान शिष्याने आत्मसात केलेच पाहिजे.... असाच एक गुरुबोध सांगतो.... एकदा एका शिष्याने गुरूला विचारले.... स्वामी, स्वर्ग कसा आहे, नरक कसा आहे...?... हे मला जाणून घ्यायचे आहे.... त्याच्या गुरूने त्याला म्हटले..... डोळे बंद कर आणि बघ.... शिष्याने डोळे बंद केले आणि एका शांत शून्यामध्ये त्याने प्रवेश केला.... गुरु त्याला म्हणाले.... हा बघ स्वर्ग.... मग थोड्या वेळाने गुरु म्हणाले.... आता नरक पहा..... त्यांच्या शिष्याने आश्चर्याने डोळे उघडले.... गुरूंनी त्याला विचारले.... काय बघितलेस..?... श्रीराम..... 

शिष्य म्हणाला.... स्वामीजी, लोक ज्या गोष्टीची चर्चा करतात.... त्या स्वर्गांत मला कुठेही दिसल्या नाहीत..... अमृताच्या नद्या दिसल्या नाहीत... की सोन्याचे महाल दिसले नाहीत.... तिथे तर काहीच नव्हते..... आणि नरकात सुद्धा काहीही नव्हते.... आगीच्या ज्वाला नव्हत्या... की पीडितांचे आक्रंदन नव्हते.... असे का व्हावे..?... की मला दिसला तो स्वर्ग नव्हता आणि नरकही नव्हता...?.. मी संभ्रमात पडलो आहे.... श्रीराम.... 

हे ऐकून गुरु हसायला लागले.... आणि म्हणाले.... तू पाहिलास तो स्वर्गही होता आणि नरकही होता..... परंतु अमृताच्या नद्या आणि सोन्याचे महाल किंवा आगीच्या ज्वाळा आणि पीडितांचे आक्रंदन.... हे सर्व तिथे स्वत:लाच न्यावे लागते..... ह्या गोष्टी तेथे मिळत नाहीत.... आपण ज्या गोष्टी बरोबर घेऊन जाऊ तेवढ्याच तिथे सापडतात..... स्वर्ग म्हणजे आपण स्वत: आणि नरक म्हणजे आपण स्वत:च..... श्रीराम..... 

बघा, यामागचे तात्पर्य किंवा गुरुबोध हाच कि.... जीवन जगताना आपणा स्वत: मध्ये सारे काहीं दडवले जाते.... जशी पेरणी करावी तशीच कापणी करावी लागते..... आपण अंतर्मनात जसा विचार करू तसेच विश्व निर्माण होते.... म्हणूनच असे विश्व निर्माण करण्याऐवजी निर्विचार होऊन स्वःताला शोधावे.... श्रीराम..... 

बघा, म्हणजेच काय तर.... अंतर म्हणजे मन आणि अंतर म्हणजे आकाश.... अंतराळ.... देव अंतरात असतात.... देव मनामनांत असतात... तसेच ते स्वर्गात असतात..... आता स्वर्ग म्हणजे काय...?... स्वर्ग म्हणजे सर्वोच स्थान नव्हेच.... देव स्वर्गात राहात असतीलही... पण मोक्ष ही स्वर्गापेक्षाही वरची आणि सर्वोच्च अशी पायरी आहे.... आणि मोक्षाशी निर्गुणाचे नाते आहे..... मोक्षाची संकल्पना निर्गुणाशी निगडित आहे.... निर्गुण म्हणजे ज्याला आकार, विकार काहीही नाही ते..... 

पण खरी मेख अशी कि.... सगुणाचा आधार घेतल्याशिवाय निर्गुणाकडे पोहोचता येणार नाही.... आणि हा सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा प्रवास अतिशय गहन आहे.... निर्गुणापर्यंत आपण पोहोचलो.... असे आपल्याला वाटे-वाटेपर्यंतच आपले पाऊल सगुणाच्या जाळीत अडकले आहे.... याची जाणीव होत राहाते..... म्हणूनच आपल्याला जशी पेरणी करावी तशीच कापणी करावी लागते..... नाहीतर साधक अंतापर्यंत सगुण आकाराच्याच भक्तीत रत राहतो.... म्हणून वेळीच सावध व्हा.... स्वःचा शोध घ्या.... श्रीराम.... 

ॐ श्री गुरुदेव दत्त .....
नित्य सत्कर्मे अहंकार दूर.... देहा चित्ती समाधानी सूर..... 

आज गुरुबोध कसा प्राप्त होतो ते सांगतो.... बघा, गुरु आपल्या शिष्यांना कुठल्या प्रकारे ज्ञानार्जन करतील.... हे केवळ गुरुच जाणोत त्याचीच ही एक बोध कथा.... श्रीराम..... 

एकदा गुरु आपल्या शिष्यांना वेगळ्या प्रकारे ज्ञानार्जन करण्याचे योजतात.... याकरिता एक दिवस ते आपल्या सर्व शिष्यांना सकाळी आपल्या नित्य बैठकीच्या खोलीत येण्यास सांगतात.... सारे शिष्य जमा होउन खोलीच्या एका कोपऱ्यात उभे राहतात.... आणि निरीक्षण करु लागतात.... पण ते पाहतात तर काय..?.. श्रीराम.... 

गुरुंनी त्यांना बोलावलेले असते..... पण ते शिष्यांशी एकही शब्द बोलत नाहीत.... आपल्या नित्यकर्मात व्यस्त असतात.... ते आपली बैठकीची खोली एका कापडाने स्वच्छ पुसुन घेतात.... जरा वेळ थांबतात आणि त्यावर गालिचा पसरतात.... बस्स इतकेच! हे झाल्यावर शिष्यांना परत पाठवतात..... श्रीराम..... 

शिष्यांना याचा काहीच उलगडा होत नाही..... शिष्यांची गोंधळलेली अवस्था बघुन... गुरु त्यांना झाल्या प्रकाराचा उलगडा करुन सांगतात.... ते म्हणतात, "निरीक्षण शक्ती हे माणसाला लाभलेले फार मोठे वरदान आहे, ते आत्मसात केले तर अनेक गोष्टींचा उलगडा सहज होतो.".... बैठकीची खोली पुसताना एक कपडा हातात घेउन एका टोकापासुन सुरवात करुन मागे मागे सरकत दुसऱ्या टोकापर्यन्त संपुर्ण खोली पुसुन काढली न की खोली पुसताना पुढे गेलो..... मागे येण्याची दिशा कायम ठेवली..... श्रीराम..... 

याचा अर्थ असा की माणसाच्या मनावरही दररोज क्रोध मोह इ. कुकर्माचा कचरा साचत असतो.... नित्यकर्माच्या कपड्याने ही असेच मागे येत..... म्हणजे अहंकार क्षीण करत चित्त शुद्ध करावयाचे असते.... जर अंहकार वाढला.... म्हणजेच जमीन पुसताना पुढे गेलो आणि मागे वळुन पाहिले... तर आपल्याच पायच्या ठश्याने जमीन मलिन दिसते व कार्य सफल होत नाही..... पण जमीन स्वच्छ करताना मध्ये मागे गेल्यास... म्हणजेच अहंकार क्षीण केल्यास मागे बघितल्यास किती मलिनता शिल्लक आहे हे कळते व पुढे पाहिल्यास किती स्वच्छ केले हे कळुन येते.... श्रीराम..... 

नंतर जमीन पुसुन झाल्यावर क्षणभर ती वाळेपर्यन्त थांबलो..... तद्वतच मनाला या कार्यानंतर थोड्या विश्रांतीची गरज असते..... त्यानंतर गालिच्याची गुंडाळी घेतली व दुसऱ्या टोकापासुन पहिल्या टोकापर्यन्त पुढे पुढे उलगडत गेलो.... न की पहिल्या टोकापासुन मागे उलगडली.... याचा अर्थ असा की सत्कर्म करताना पुढे पुढे जायचे असते..... जर ते करताना मागे हटलात... तर तोंडघशी पडण्याचा संभव येतो..... गालिचा संपुर्ण उलगडताना मध्येच मागे वळुन पाहिले तरी उलगडलेला गालिचाच दिसतो.... अन्‌ पुढे पाहिल्यास किती कार्य बाकी आहे याचे ज्ञान होते..... अशाप्रकारे आपल्या शिष्यांना ते खोली पुसुन त्यावर गालिचा का पसरवला या मागचे कारण समजावुन सांगितले..... श्रीराम..... 

बघा, यामागचे तात्पर्य हेच कि आपण नित्यकर्माच्या कपड्याने नेहमी अंतर्मनातील कुकर्मांना स्वच्छ करुन मागे हटुन आपला अंहकार क्षीण करावा.... आणि सत्कर्म करताना मागे न हटता केवळ पुढेच जात यश कीर्ती दुर्लक्षून त्याकडे न पाहता समाधान आनंदाचा गालिचा दुरवर पसरवावा..... श्रीराम..... 

सत्कर्म करताना त्याच्यामागे भाव शुद्ध असावा लागतो..... कर्मामागचा भाव जर शुद्ध नसेल, तर ते कर्म शुद्ध न रहाता अशुद्ध कर्म होईल..... शुद्धभावाने केलेल्या कर्माला यश मिळते..... सतत शुभ विचार करणे हे हि सत्कर्म आहे..... आपली प्रत्येक कृती एक तात्पर्य जपते..... आपल्या सभोवती घडणारी प्रत्येक कृती आपल्याला सुसंस्कारित करण्यासाठीच असते.... फक्त डोळ्यांनीच नव्हे तर.... विवेक व विचारांच्या चक्षुंनी आपण संस्कारांच सार आत्मसात करून कृतीत आणलं पाहिजे..... तीच आपल्या सदगुरूंनी दिलीली शिदोरी.... कधीही न संपणारी..... श्रीराम.... 

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

Wednesday 21 November 2012


Pollution free Diwali…. Environmentally Safe Diwali….
Diwali is a day of light, dont pollute it to darkness with crackers… pollution free diwali is the best solution for clean air and green environment...
Pollution free diwali will be best, by this thing we can save money, paper & prevent noise and air pollution & instead of wasting money on fire crackers,  should donate the money in some charity…. We can celebrate it with lights… Its a festival of lights and joy…. pull out pollution this diwali burst happiness not crackers…
Know that, Fire crackers affect our environment as they create noise and air pollution… Other than that they work as torture for animals, and they feel threatened while you enjoy them…. The smoke that emerges out of these crackers also contributes to asthmatic and allergic diseases... They are dangerous as well as many of the time crackers lead to serious accidents that pose a threat to our safety….  All of us are educated, and we know the harmful effects of crackers, still we use them to enjoy our day…. 
Diwali is a festival of lights symbolizing the victory of good over evil and the glory of light…. Celebrate Diwali by spending time with family and friends... Enjoy this festival a lot…. But also know that some children are not able to enjoy this festival…. Bursting fireworks shortens the life of children working in fireworks factories... They also have the right to celebrate…. If we reduce the use of bursting crackers…, then only the children working in fireworks factories can celebrate Diwali…. They have to work day and night for making these fireworks... Therefore if we try not to burst fireworks, we can make the faces of millions like those children smile…. So, in my opinion Diwali should be celebrated, but in a different way…. Just remember that bursting Crackers spoil the nature…. Become environment-friendly this Diwali and celebrate it with lamps and lights….
Fight noise pollution…. Keep the decibels down… Diwali is about celebrating it isn`t about going deaf…. We can certainly reduce it to a large level by promising ourselves that we will celebrate this Diwali in an eco-friendly manner….  
Spend your money wisely to keep the environment green and pollution free…. Don`t contribute to smoke, make your Diwali special with sweets and other gifts…. Take a resolution on this Diwali of not bursting fire crackers and safeguarding our environment from smoke and noise pollution… From this time onwards, we will celebrate a green Diwali…. We will light up diyas, pray and visit our near and dear ones…. And later, we will feed the poor…  The best way to celebrate it is by bringing a smile on others' faces…. 
So this Diwali spread the wealth… without fire crackers whatever money left over, buy the poor kids in your block some new clothes…. Provide a meal for at least ten under-privileged children... Visit an orphanage…. Donate something to make their Diwali a better one... Diwali is all about dispelling darkness. Do what you can to dispel the darkness in people`s lives….  
Wish you all a very happy and safe Diwali…. Enjoy!!!
ॐ श्री गुरुदेव दत्त ....

Monday 19 November 2012




झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा....  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.....
शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे एक असे नाव ज्याच्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास यापुढे लिहला जाऊ शकत नाही.... बाळासाहेब ठाकरे, एक महान व्यक्तिमत्व.... असामान्य माणुस.... युगपुरुष.... बघा, बाळासाहेबांनी एक ज्वलंत विचार मनाशी, अंगार मुखाशी घेऊन एक संघटना बनवली..... "शिवसेना"..... आज शिवसेनाचा विचार केल्या शिवाय एक ही राजकिय निर्णय घेतला जात नाही एवढी प्रचंड ताकत.... बाळासाहेबांच्या आवाजाने उभा पेटलेला महाराष्ट्र शांत होऊ शकतो.... तर शांत महाराष्ट्र पेटु शकतो..... खरोखरचे असामान्यत्व....
शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होय.... गेली ५० वर्ष साहेबांनी आपल्या वाणीने, लेखणीने आणि कुंचल्याने महाराष्ट्र गाजवला.... त्यांची भाषा तर 'ठाकरी भाषा' म्हणुन ओळखली जाते... तसे असले तरी एक व्यंगचित्रकार असल्यामुळे त्यांच्या भाषणात मिश्किलपणाही जाणवतो.... स्वःता एक कलावंत असल्यामुळे इतर राजकीय नेत्यांची नक्कल काढत असत.... अन त्यावेळी श्रोते हास्याच्या कारंज्यात बुडून जात असत..... त्यांचे शब्द म्हणजे एक धगधगता निखारा होता..... त्यांचे राष्ट्रवादी विचार , हिन्दुत्व आणि देशद्रोह्यांवर केलेला हल्ला वातावरण बदलून टाकत आणि जनसागर मंत्रमुग्ध होउन जात असे.....
महाराष्ट्राच्या जडणघडणीत बाळासाहेब यांचे योगदान म्हणजे माईलस्टोनच..... अगदी कलेपासुन ते खेळापर्यंत.... राजकरणापासून - समाजकार्यापर्यंत.... अर्थकारणापासून - ओद्योगिकीकरणा पर्यंत.... चित्रकलेपासून नाटक चित्रपटापर्यंत.... साहित्यापसून - संस्कृतीपर्यंत..... मराठीपासून - हिदुत्वापर्यंत..... एक ही क्षेत्र असे नाही की ज्याला शिवसेनाप्रमुखांचा परीसस्पर्श झालेला नाही....
महाराष्ट्राला आधी बाळासाहेबांची ओळख झाली.... ती त्यांच्या धडाकेबाज व्यंगचित्रामधून..... सर्व थरातील लोकांना विचार करायला लावणारी.... त्यांच्या मनाचा ठाव घेणारी व्यंगचित्रे बाळासाहेबांनी काढली..... या व्यंगचित्रातून ते निडरपणे सर्वांचे वाभाडे काढत असत.... त्यामुळे ती अधिक प्रभावी ठरत होती.... शिवसेनाप्रमुखांचे स्फूर्तीस्थान म्हणजे छत्रपति शिवाजी महाराज.... जुलमी मोगल सत्तेशी टक्कर देऊन शिवाजी महाराजानी हिंदवी स्वराज्य निर्माण केले..... त्याच धर्तीवर जुलमी कांग्रेस राजवटीवर विरुद्ध संघर्ष करण्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली.... एक व्यक्ति स्वःताच्या करिष्म्यावर उत्कृष्ट राजकरणातून समाजपरिवर्तनाचे एवढे प्रचंड काम करू शकतो हे त्यानी दाखवून दिले आहे..... शिवरायांचा कर्मयोगी आणि महर्षि विश्वामित्रांचा कर्मठपणा या गुणांचा संगम बाळासाहेबांच्यात पहायला मिळतो....
बघा, गर्विष्ट देवदेवतांना आव्हान देऊन विश्वमित्रानी जशी प्रतिसृष्टी निर्माण केली..... त्याच धर्तीवर दांभिक कांग्रेसला आव्हान देऊन बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय प्रतिसृष्टी निर्माण करून शिवरायांचा लढाऊ बाणा वापरून राजकरणातून समाजपरिवर्तनाचे महान कार्य केले आहे..... विश्वामित्रांनी नारळ निर्माण केला असे मानले जाते.... नारळाला वरून कठोर व कठीण कवच आणि आतून गोड़ खोबरे व त्यानंतर अमृतासारखे गोड़ पाणी असते.... बघा, बाळासाहेबांचे तसेच होते.... वरुकठोर पण आत हळवेपणा.... भावनाप्रधान आणि कठोरता याचा संगम विरळच असतो....
आज राजकारणाच्या विश्वात हाच एक असा नेता होता..... ज्याने कधीही आपल्या शिवसैनिकाला दगा दिला नाही.... सर्व जबाबदारी स्वःता स्वीकारली.... 'मी असे बोललोच नाही' हे वाक्य बाळासाहेबांनी इतक्या वर्षात कधीकाढले नाही.... मग ते बाबरी मशीद बाबत असू दे नाहीतर दुसरे काहीही.... बाळासाहेबांनीच महाराष्ट्रातील मराठी माणसाचा आत्मविश्वास जागा केला..... खऱ्या  अर्थाने जागे करून स्वाभिमानी केले..... म्हणुनच मराठी मध्यमवर्गाला बाळासाहेबांविषयी विशेष प्रेम आहे..... ज्याच्या हाकेला काही तासातच लाखो लोक जमतील.... असा एकमेव नेता महाराष्ट्रात होता आणि तो म्हणजे फक्त शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे.....
शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांनी गरिबांना राजकारणात मोठी पदे आणि प्रतिष्ठा मिळवून दिली..... कांग्रेसी राजकारणात मागे पडलेले किंवा पडले असते अशा बहुजन समाजातील गरिबांच्या मनात बाळासाहेबांनी राजकीय महत्वकांक्षा निर्माण केली आणि वाढवतही नेली.....शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद आणि स्पर्श लाभला.... आणि जीवनाचे सोने झाले..... अशी कितीतरी उदाहरणे आज महाराष्ट्रात आहेत.....
बाळासाहेबांचे हिंदुत्व म्हणजे प्रखर राष्टीयत्व हे कधीही लपून राहिलेले नाही..... त्यांनी कधीही राष्ट्रवादी मुस्लिमांचा अपमान केला नाही.... उलट अशाच राष्ट्रवादी मुस्लिमांची देशाला गरज आहे असे सांगितले आहे..... बाळासाहेबांनी ५० वर्षात खुप वादळे निर्माण केली आणि खुप वादळे झेललीसुद्धा.... परंतु ते कधीही डगमगले नाहीत.... एक सामान्य नागरिक ते शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनाप्रमुख ते जगभर हिंदूंचे हिंदूहृदयसम्राट अशी झंजावती वाटचाल करीत असताना त्यानी शेवटपर्यंत स्वःतातील माणुस कटाक्षाने जपला.....
आज शिवसेना उभी करण्यासाठी घेतलेली त्यांनी मेहनत.... रेषांवरचे त्यांचे प्रभुत्व.... दिलखुलास व्यक्तिमत्व.... मराठी माणसासाठी त्यांची लढाई.... कधीही लिहून न आणलेली खणखणीत आवाजातली त्यांची भाषणे.... एक उत्कृत्ष्ट वक्ता.... एक प्रेमळ नेता... हे सगळे सगळे कायमचे संपले आहे.... त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही.... आज देशातल्या कोणी नेत्याने जर मराठी किंवा हिंदू वर आरोप केले.... तर आपल्या अग्रलेखातून त्याला सडेतोड उत्तर देणारे कोणी  नसेल.... आमच्या चेतना जागवणारा, रक्त उसळवणारा आमचा लाडका नेता नसेल...
शिवरायानंतर पूजन करावी अशी बाळासाहेब ही एकच व्यक्ती होती.... ज्यांनी मराठी माणसात हिंदुत्व अबाधित राहण्यासाठी आयुष्य वेचले....  आज एक प्रकारे महाराष्ट्राने दुसरा शिवाजी गमावला आहे..... असा शिवाजी जो वाघासारखा लढला म्हणून त्यांना वाघ म्हणतात..... आज असा शूर वाघ महाराष्ट्राने गमावला आहे याचे फार वाईट वाटते....
पण आज असेही वाटते.... मा. बाळासाहेब गेलेले नाहीत आणि जाणारही नाहीत.... बाळासाहेब हे केवळ व्यक्ती नाहीत..... तो एक जग घडवणारा चिरंजीव विचार आहे.... ज्यातुन कित्येकजण घडले, कित्येक सावरले.... अन जोपर्यंत ह्या देशात शेवटचा मराठी असेल तो पर्यंत बाळासाहेब जिवंतच आहेत.... एवढ मात्र निश्चित आहे.... 
म्हणूनच मित्रहो....
आपल्या लिखाणाला धार ठेवा.... आपल रक्त मराठी आहे... ते सळसळत ठेवा.... कोणीही नजर उठवून बघितल नाही  पाहिजे... आपल्या मराठी भूमीला.... तसेच आमच्यात फूट पाडण्याचा कोणी विचार सुद्धा करू नये... बघा, येणारा काळ खूप खडतर आहे.... म्हणूनच लक्षात ठेवा, आपल्या प्रत्येकात बाळासाहेबांचे अमूल्य विचार आहेत.... प्रयत्न करा त्यांच्या तेजस्वी विचारांना जिवंत ठेवण्याचा.... बघा, आज बाळासाहेब आपल्याला सांगत आहेत..... मी अजुन गेलो नाही.... जिवंत आहे.... अरे मर्द मराठ्या, बघ तुझ्या डोळ्यात, बघ तुझ्या सळसळत्या रक्तात.... फाडुन बघ तुझ्या ह्रदयात, मी आहे..... माझे विचार आहेत.... त्या विचारांची मशाल, भगव्याची शान, अशीच झळकत ठेव..... भिऊ नकोस..... माझा हात तुझ्या शिरावर सदैव आहे....   जय महारष्ट्र.....
ॐ श्री गुरुदेव दत्त ....

Saturday 17 November 2012


झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा....

डबडबलेल्या अश्रुनीशी... महाराष्ट्र सारा उभा...
डोळे उघडून साहेब तुम्ही... एकदाच फक्त बघा....!
काय केली चूक आम्ही... कशाची दिलीत सजा...
बुद्धिबळाच्या पटावरून आज... राजाच झालाय वजा...
मातोश्रीच्या 'त्या' खिडकीतून... हात आम्हास कोण करणार ?
रणरणत्या ह्या उनात आता... छत्र आम्हावर कोण धरणार....?
तुमचा काय हो साहेबच तुम्ही... स्वर्गात पण तुमचीच चालणार...
पण "उठ माझ्या मर्द मावळ्या"... आता आम्हास कोण बोलणार....?
पहायचं आम्ही कुठे तुम्हाला... ''मार्मिक''पणे बोलताना...
वाजवायच्या कशा टाळ्या आता... शब्दांना तुमच्या झेलताना...
इथून पुढे दसरा ही आता... शिमग्यासारखाच भासेल...
कारण शिवतीर्थावर डरकाळी फोडणारा... माझा वाघ तिथे नसेल...!
व्यंगाचे तुम्ही चित्रकार पण... तुम्हास नव्हते कुठले व्यंग...
खेळायचे तुम्ही सप्तरंगाशी... पण भगवाशीच तुमचा संग....
वाघ होता एकलाच आमुचा... बाकी माकडाचाच खेळ सारा...
भगवे होते ते वादळच जणू.... कसली वावटळ अन कसला वारा...
भगव्या ध्वजाचं ओझं त्या... आता आम्ही कसं पेलायचं...
गेलात करून पोरकं आम्हांस.... आम्ही साहेब कुणाला बोलायचं....

मा. बाळासाहेब ठाकरेना भावपूर्ण श्रद्धांजली.....

अखेरचा हा तुला दंडवत.... 

आज एक प्रकारे महाराष्ट्राने दुसरा शिवाजी गमावला आहे..... असा शिवाजी जो वाघासारखा लढला म्हणून त्यांना वाघ म्हणतात..... आज असा शूर वाघ महाराष्ट्राने गमावला आहे फार वाईट वाटते....

पण आज असेही वाटते.... मा. बाळासाहेब गेलेले नाहीत आणि जाणारही नाहीत.... बाळासाहेब हे केवळ व्यक्ती नाहीत..... तो एक जग घडवणारा चिरंजीव विचार आहे.... ज्यातुन कित्येकजण घडले, कित्येक सावरले.... अन जोपर्यंत ह्या देशात शेवटचा मराठी असेल तो पर्यंत बाळासाहेब जिवंतच आहेत.... एवढ मात्र निश्चित आहे....

मित्रहो......

लिखाणाला धार ठेवा, आपल रक्त मराठी आहे, ते सळसळत ठेवा.... कोणी नजर उठवून बघितल न पाहिजे या मराठी भूमीला, तसेच कोणी विचार सुद्धा करू नये... आमच्यात फोड पाडण्याचा.... येणारा काळ खूप खडतर आहे, लक्षात ठेवा आपल्या प्रत्येकात बाळासाहेबांचे विचार आहेत.... प्रयत्न करा त्यांच्या तेजस्वी विचारांना जिवंत ठेवण्याचा ....

मा. बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण आदरांजली.....

जय महाराष्ट्र.....

Thursday 15 November 2012


 सदगुरुक्रुपे आज समजते क्षण क्षण आहेत मोलाचे.… 
                               कर्तॄत्वाला नव दिशा देऊनी स्वागत करू नववर्षाचे.... श्रीराम....

किती उजळून निघतो सारा आसमंत...  अन होते लक्ष लक्ष दिव्यांची मोहक नक्षी.... साध्या मातीचीच पणती.... पण तिचे इवलेसे मांगल्यमय तेज दूर करते, पराकोटीचा अंधार.... अश्या अंध:कारातून सळसळत्या चैतन्याने घेतलेली एक तळपती झेपच जणू... एक झळकती ज्योती शलाका... एक मंद तेवणारी वात... तिमिर दूर सारून सत्याचा, चांगुलपणाचा उजेड देणारा एक महान मंगलस्त्रोत... चिमुकला पण नक्कीच आशादायी.... हा आतला अंधार, निराशेचे गडद तिमिर ओलांडून आशेची वात उजळण्यास कारणीभूत होऊ दे हीच इच्छा....  येणाऱ्या प्रत्येक अमावास्येत पुढच्या पौर्णिमेची आस मनात जागत राहू दे ही सदिच्छा....  अन ही दिवाळी तुम्हा सर्वांसाठी खूप खूप आनंद... सुख समृद्धी... अन आंतरिक समाधान घेऊन येवो या शुभेच्छासह.... श्रीराम....
      
             दिवाळी ज्योतीचा, उजेडाचा तेज उत्सव वाटे हवा हवा....
                                लावोनिया ज्ञानाचा दिवा उधळू प्रकाश नवा नवा.... श्रीराम....

        उजळली वात.... फाकला प्रकाश.... उटण्याचा गंध.... भारले आकाश.... 
                    मांगल्य घेउनी आली ही दिवाळी.... जीवनास लाभो सुवर्ण तेजाची झळाळी.... श्रीराम....  

         लक्ष लक्ष स्वप्नांना रंग नवे.... कल्पनांची रंगावली, लावुनी तेज दिवे....
                              नव उद्योगाची तोरणे... अन आखू नव धोरणे....
                                         दुख हरो... दैन्य सरो... याहुनी मग काय हवे... श्रीराम....

अमावास्येच्या अंधारात.... दिव्यांना आज प्रकाशित करा... तुम्हीही असेच तेजोमय व्हा... आणि संकटावर मात करा... विजयपताका तुमचीच असेल... फक्त थोडे प्रयत्न करा... श्रीराम....

रामनामाचे उटणे सर्वांगाला लावा.... सत्संगाचा साबण लावून, सत्सेवेच्या जलाने अभ्यंगस्नान करा.... व त्यात आपले स्वभावदोष आणि अहंधुवून काढा..... त्यागाने सर्व अंग कोरडे करा.... समाधानी आनंदाची नवीन वस्त्रे परिधान करा.... स्नेह - प्रीतीचा फराळ करून वाणी मधाळ व सात्त्विक बनवा.... अष्टांगसाधनेची ज्योत पेटवून औक्षण करा... व स्वत: अष्टांग पाकळयांचे परिपूर्ण पुष्प बनून गुरु माउलीच्या चरणी रहा.... श्रीराम....

         गुलाबी थंडी... आश्विन मास... दिवाळीची चाहूल... प्रत्येक मनास....
                   पणत्यांचा नाजूक.. सात्विक प्रकाश.... सडा रांगोळी.. रंगीत आकाश....
                            ज्ञान प्रकाशाची नवी वाट.... सोन्याच्या पावलांनी समृद्धीची साथ.... श्रीराम....

                  उत्कर्षाचे सुगंधी अत्तर चोहिकडे शिंपावे....
                                 सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे.....
                  श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे....
                                 सुख समृद्धीने अवघे अंगण तुमचे भरावे..... श्रीराम.....

दिवाळी म्हणजे दीपोत्सव.... बाहेर तर दिवे पणत्या पेटवायचेच.... पण खरा दिवा तर हृदयात पेटला पाहिजे.... हृदयात जर अंधार असेल तर बाहेर पेटविलेल्या हजारो पणत्या निरर्थक आहेत.... दिवा हे ज्ञानाचे प्रतिक आहे.... हृदयात दिवा लावणे म्हणजे निश्चित प्रकारच्या जाणीवेने दिवाळीचा सण साजरा करणे होय... धनत्रयोदशीच्या, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वित्ताला अनर्थ न मानता जीवन सार्थक करण्याची शक्ती मानून महालक्ष्मीची पूजा करायची... नरक चतुर्दशीच्या दिवशी जीवनात नरक निर्माण करणारा आळस, प्रमाद, अस्वच्छता, अनिष्टता, वगैरे नरकासुरांना मारणे आपले कर्तव्य ठरते.... दिवाळीच्या दिवशी तमसो मा ज्योतिर्गमयमंत्राची साधना करता करता आपणच आपला जीवन पथ प्रकाशित करायचा.... आपल्या जीवनाच्या वहीचा आढावा घेते वेळी जमेच्या बाजूला ईशकृपा राहावी.... ह्यासाठी प्रभूकार्याच्या प्रकाशाने जीवन भरून काढायचे.... राग, द्वेष, मत्सर यांना दूर करून नवीन वर्षाच्या दिवशी प्रेम, श्रद्धा आणि उत्साह वाढविण्याचा प्रयत्न करावा.... नव्या वर्षाच्या दिवशी जुने वैर विष विसरून शत्रूचेही शुभचिंतन करायचे.... नवे वर्ष म्हणजे शुभ संकल्पाचा दिवस.... भाऊबीजेच्या दिवशी स्त्रीकडे पाहणाऱ्या निर्मळ दृष्टीची शिकवण घ्यायची आणी बंधूच्या निर्व्याज प्रेमाने संपूर्ण स्त्री-समाज बहिणीच्या रुपात स्वीकारायचा.... सुंदर ज्ञान देणारा ज्ञानदीप जर हृदयात प्रकाशित केला तर... आपले जीवन सदैव दिपोत्सवी महोत्सवासमान नक्कीच बनेल.... म्हणूनच.... एक विश्वास असावा पुरता... कर्ता हर्ता गुरु ऐसा.... श्रीराम....

चेतनकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या व नववर्षाच्या शुभेच्छा....

ॐ श्री गुरुदेव दत्त .....