Thursday, 15 November 2012


 सदगुरुक्रुपे आज समजते क्षण क्षण आहेत मोलाचे.… 
                               कर्तॄत्वाला नव दिशा देऊनी स्वागत करू नववर्षाचे.... श्रीराम....

किती उजळून निघतो सारा आसमंत...  अन होते लक्ष लक्ष दिव्यांची मोहक नक्षी.... साध्या मातीचीच पणती.... पण तिचे इवलेसे मांगल्यमय तेज दूर करते, पराकोटीचा अंधार.... अश्या अंध:कारातून सळसळत्या चैतन्याने घेतलेली एक तळपती झेपच जणू... एक झळकती ज्योती शलाका... एक मंद तेवणारी वात... तिमिर दूर सारून सत्याचा, चांगुलपणाचा उजेड देणारा एक महान मंगलस्त्रोत... चिमुकला पण नक्कीच आशादायी.... हा आतला अंधार, निराशेचे गडद तिमिर ओलांडून आशेची वात उजळण्यास कारणीभूत होऊ दे हीच इच्छा....  येणाऱ्या प्रत्येक अमावास्येत पुढच्या पौर्णिमेची आस मनात जागत राहू दे ही सदिच्छा....  अन ही दिवाळी तुम्हा सर्वांसाठी खूप खूप आनंद... सुख समृद्धी... अन आंतरिक समाधान घेऊन येवो या शुभेच्छासह.... श्रीराम....
      
             दिवाळी ज्योतीचा, उजेडाचा तेज उत्सव वाटे हवा हवा....
                                लावोनिया ज्ञानाचा दिवा उधळू प्रकाश नवा नवा.... श्रीराम....

        उजळली वात.... फाकला प्रकाश.... उटण्याचा गंध.... भारले आकाश.... 
                    मांगल्य घेउनी आली ही दिवाळी.... जीवनास लाभो सुवर्ण तेजाची झळाळी.... श्रीराम....  

         लक्ष लक्ष स्वप्नांना रंग नवे.... कल्पनांची रंगावली, लावुनी तेज दिवे....
                              नव उद्योगाची तोरणे... अन आखू नव धोरणे....
                                         दुख हरो... दैन्य सरो... याहुनी मग काय हवे... श्रीराम....

अमावास्येच्या अंधारात.... दिव्यांना आज प्रकाशित करा... तुम्हीही असेच तेजोमय व्हा... आणि संकटावर मात करा... विजयपताका तुमचीच असेल... फक्त थोडे प्रयत्न करा... श्रीराम....

रामनामाचे उटणे सर्वांगाला लावा.... सत्संगाचा साबण लावून, सत्सेवेच्या जलाने अभ्यंगस्नान करा.... व त्यात आपले स्वभावदोष आणि अहंधुवून काढा..... त्यागाने सर्व अंग कोरडे करा.... समाधानी आनंदाची नवीन वस्त्रे परिधान करा.... स्नेह - प्रीतीचा फराळ करून वाणी मधाळ व सात्त्विक बनवा.... अष्टांगसाधनेची ज्योत पेटवून औक्षण करा... व स्वत: अष्टांग पाकळयांचे परिपूर्ण पुष्प बनून गुरु माउलीच्या चरणी रहा.... श्रीराम....

         गुलाबी थंडी... आश्विन मास... दिवाळीची चाहूल... प्रत्येक मनास....
                   पणत्यांचा नाजूक.. सात्विक प्रकाश.... सडा रांगोळी.. रंगीत आकाश....
                            ज्ञान प्रकाशाची नवी वाट.... सोन्याच्या पावलांनी समृद्धीची साथ.... श्रीराम....

                  उत्कर्षाचे सुगंधी अत्तर चोहिकडे शिंपावे....
                                 सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे.....
                  श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे....
                                 सुख समृद्धीने अवघे अंगण तुमचे भरावे..... श्रीराम.....

दिवाळी म्हणजे दीपोत्सव.... बाहेर तर दिवे पणत्या पेटवायचेच.... पण खरा दिवा तर हृदयात पेटला पाहिजे.... हृदयात जर अंधार असेल तर बाहेर पेटविलेल्या हजारो पणत्या निरर्थक आहेत.... दिवा हे ज्ञानाचे प्रतिक आहे.... हृदयात दिवा लावणे म्हणजे निश्चित प्रकारच्या जाणीवेने दिवाळीचा सण साजरा करणे होय... धनत्रयोदशीच्या, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वित्ताला अनर्थ न मानता जीवन सार्थक करण्याची शक्ती मानून महालक्ष्मीची पूजा करायची... नरक चतुर्दशीच्या दिवशी जीवनात नरक निर्माण करणारा आळस, प्रमाद, अस्वच्छता, अनिष्टता, वगैरे नरकासुरांना मारणे आपले कर्तव्य ठरते.... दिवाळीच्या दिवशी तमसो मा ज्योतिर्गमयमंत्राची साधना करता करता आपणच आपला जीवन पथ प्रकाशित करायचा.... आपल्या जीवनाच्या वहीचा आढावा घेते वेळी जमेच्या बाजूला ईशकृपा राहावी.... ह्यासाठी प्रभूकार्याच्या प्रकाशाने जीवन भरून काढायचे.... राग, द्वेष, मत्सर यांना दूर करून नवीन वर्षाच्या दिवशी प्रेम, श्रद्धा आणि उत्साह वाढविण्याचा प्रयत्न करावा.... नव्या वर्षाच्या दिवशी जुने वैर विष विसरून शत्रूचेही शुभचिंतन करायचे.... नवे वर्ष म्हणजे शुभ संकल्पाचा दिवस.... भाऊबीजेच्या दिवशी स्त्रीकडे पाहणाऱ्या निर्मळ दृष्टीची शिकवण घ्यायची आणी बंधूच्या निर्व्याज प्रेमाने संपूर्ण स्त्री-समाज बहिणीच्या रुपात स्वीकारायचा.... सुंदर ज्ञान देणारा ज्ञानदीप जर हृदयात प्रकाशित केला तर... आपले जीवन सदैव दिपोत्सवी महोत्सवासमान नक्कीच बनेल.... म्हणूनच.... एक विश्वास असावा पुरता... कर्ता हर्ता गुरु ऐसा.... श्रीराम....

चेतनकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या व नववर्षाच्या शुभेच्छा....

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

No comments:

Post a Comment