Monday 19 November 2012




झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा....  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.....
शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे एक असे नाव ज्याच्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास यापुढे लिहला जाऊ शकत नाही.... बाळासाहेब ठाकरे, एक महान व्यक्तिमत्व.... असामान्य माणुस.... युगपुरुष.... बघा, बाळासाहेबांनी एक ज्वलंत विचार मनाशी, अंगार मुखाशी घेऊन एक संघटना बनवली..... "शिवसेना"..... आज शिवसेनाचा विचार केल्या शिवाय एक ही राजकिय निर्णय घेतला जात नाही एवढी प्रचंड ताकत.... बाळासाहेबांच्या आवाजाने उभा पेटलेला महाराष्ट्र शांत होऊ शकतो.... तर शांत महाराष्ट्र पेटु शकतो..... खरोखरचे असामान्यत्व....
शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होय.... गेली ५० वर्ष साहेबांनी आपल्या वाणीने, लेखणीने आणि कुंचल्याने महाराष्ट्र गाजवला.... त्यांची भाषा तर 'ठाकरी भाषा' म्हणुन ओळखली जाते... तसे असले तरी एक व्यंगचित्रकार असल्यामुळे त्यांच्या भाषणात मिश्किलपणाही जाणवतो.... स्वःता एक कलावंत असल्यामुळे इतर राजकीय नेत्यांची नक्कल काढत असत.... अन त्यावेळी श्रोते हास्याच्या कारंज्यात बुडून जात असत..... त्यांचे शब्द म्हणजे एक धगधगता निखारा होता..... त्यांचे राष्ट्रवादी विचार , हिन्दुत्व आणि देशद्रोह्यांवर केलेला हल्ला वातावरण बदलून टाकत आणि जनसागर मंत्रमुग्ध होउन जात असे.....
महाराष्ट्राच्या जडणघडणीत बाळासाहेब यांचे योगदान म्हणजे माईलस्टोनच..... अगदी कलेपासुन ते खेळापर्यंत.... राजकरणापासून - समाजकार्यापर्यंत.... अर्थकारणापासून - ओद्योगिकीकरणा पर्यंत.... चित्रकलेपासून नाटक चित्रपटापर्यंत.... साहित्यापसून - संस्कृतीपर्यंत..... मराठीपासून - हिदुत्वापर्यंत..... एक ही क्षेत्र असे नाही की ज्याला शिवसेनाप्रमुखांचा परीसस्पर्श झालेला नाही....
महाराष्ट्राला आधी बाळासाहेबांची ओळख झाली.... ती त्यांच्या धडाकेबाज व्यंगचित्रामधून..... सर्व थरातील लोकांना विचार करायला लावणारी.... त्यांच्या मनाचा ठाव घेणारी व्यंगचित्रे बाळासाहेबांनी काढली..... या व्यंगचित्रातून ते निडरपणे सर्वांचे वाभाडे काढत असत.... त्यामुळे ती अधिक प्रभावी ठरत होती.... शिवसेनाप्रमुखांचे स्फूर्तीस्थान म्हणजे छत्रपति शिवाजी महाराज.... जुलमी मोगल सत्तेशी टक्कर देऊन शिवाजी महाराजानी हिंदवी स्वराज्य निर्माण केले..... त्याच धर्तीवर जुलमी कांग्रेस राजवटीवर विरुद्ध संघर्ष करण्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली.... एक व्यक्ति स्वःताच्या करिष्म्यावर उत्कृष्ट राजकरणातून समाजपरिवर्तनाचे एवढे प्रचंड काम करू शकतो हे त्यानी दाखवून दिले आहे..... शिवरायांचा कर्मयोगी आणि महर्षि विश्वामित्रांचा कर्मठपणा या गुणांचा संगम बाळासाहेबांच्यात पहायला मिळतो....
बघा, गर्विष्ट देवदेवतांना आव्हान देऊन विश्वमित्रानी जशी प्रतिसृष्टी निर्माण केली..... त्याच धर्तीवर दांभिक कांग्रेसला आव्हान देऊन बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय प्रतिसृष्टी निर्माण करून शिवरायांचा लढाऊ बाणा वापरून राजकरणातून समाजपरिवर्तनाचे महान कार्य केले आहे..... विश्वामित्रांनी नारळ निर्माण केला असे मानले जाते.... नारळाला वरून कठोर व कठीण कवच आणि आतून गोड़ खोबरे व त्यानंतर अमृतासारखे गोड़ पाणी असते.... बघा, बाळासाहेबांचे तसेच होते.... वरुकठोर पण आत हळवेपणा.... भावनाप्रधान आणि कठोरता याचा संगम विरळच असतो....
आज राजकारणाच्या विश्वात हाच एक असा नेता होता..... ज्याने कधीही आपल्या शिवसैनिकाला दगा दिला नाही.... सर्व जबाबदारी स्वःता स्वीकारली.... 'मी असे बोललोच नाही' हे वाक्य बाळासाहेबांनी इतक्या वर्षात कधीकाढले नाही.... मग ते बाबरी मशीद बाबत असू दे नाहीतर दुसरे काहीही.... बाळासाहेबांनीच महाराष्ट्रातील मराठी माणसाचा आत्मविश्वास जागा केला..... खऱ्या  अर्थाने जागे करून स्वाभिमानी केले..... म्हणुनच मराठी मध्यमवर्गाला बाळासाहेबांविषयी विशेष प्रेम आहे..... ज्याच्या हाकेला काही तासातच लाखो लोक जमतील.... असा एकमेव नेता महाराष्ट्रात होता आणि तो म्हणजे फक्त शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे.....
शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांनी गरिबांना राजकारणात मोठी पदे आणि प्रतिष्ठा मिळवून दिली..... कांग्रेसी राजकारणात मागे पडलेले किंवा पडले असते अशा बहुजन समाजातील गरिबांच्या मनात बाळासाहेबांनी राजकीय महत्वकांक्षा निर्माण केली आणि वाढवतही नेली.....शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद आणि स्पर्श लाभला.... आणि जीवनाचे सोने झाले..... अशी कितीतरी उदाहरणे आज महाराष्ट्रात आहेत.....
बाळासाहेबांचे हिंदुत्व म्हणजे प्रखर राष्टीयत्व हे कधीही लपून राहिलेले नाही..... त्यांनी कधीही राष्ट्रवादी मुस्लिमांचा अपमान केला नाही.... उलट अशाच राष्ट्रवादी मुस्लिमांची देशाला गरज आहे असे सांगितले आहे..... बाळासाहेबांनी ५० वर्षात खुप वादळे निर्माण केली आणि खुप वादळे झेललीसुद्धा.... परंतु ते कधीही डगमगले नाहीत.... एक सामान्य नागरिक ते शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनाप्रमुख ते जगभर हिंदूंचे हिंदूहृदयसम्राट अशी झंजावती वाटचाल करीत असताना त्यानी शेवटपर्यंत स्वःतातील माणुस कटाक्षाने जपला.....
आज शिवसेना उभी करण्यासाठी घेतलेली त्यांनी मेहनत.... रेषांवरचे त्यांचे प्रभुत्व.... दिलखुलास व्यक्तिमत्व.... मराठी माणसासाठी त्यांची लढाई.... कधीही लिहून न आणलेली खणखणीत आवाजातली त्यांची भाषणे.... एक उत्कृत्ष्ट वक्ता.... एक प्रेमळ नेता... हे सगळे सगळे कायमचे संपले आहे.... त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही.... आज देशातल्या कोणी नेत्याने जर मराठी किंवा हिंदू वर आरोप केले.... तर आपल्या अग्रलेखातून त्याला सडेतोड उत्तर देणारे कोणी  नसेल.... आमच्या चेतना जागवणारा, रक्त उसळवणारा आमचा लाडका नेता नसेल...
शिवरायानंतर पूजन करावी अशी बाळासाहेब ही एकच व्यक्ती होती.... ज्यांनी मराठी माणसात हिंदुत्व अबाधित राहण्यासाठी आयुष्य वेचले....  आज एक प्रकारे महाराष्ट्राने दुसरा शिवाजी गमावला आहे..... असा शिवाजी जो वाघासारखा लढला म्हणून त्यांना वाघ म्हणतात..... आज असा शूर वाघ महाराष्ट्राने गमावला आहे याचे फार वाईट वाटते....
पण आज असेही वाटते.... मा. बाळासाहेब गेलेले नाहीत आणि जाणारही नाहीत.... बाळासाहेब हे केवळ व्यक्ती नाहीत..... तो एक जग घडवणारा चिरंजीव विचार आहे.... ज्यातुन कित्येकजण घडले, कित्येक सावरले.... अन जोपर्यंत ह्या देशात शेवटचा मराठी असेल तो पर्यंत बाळासाहेब जिवंतच आहेत.... एवढ मात्र निश्चित आहे.... 
म्हणूनच मित्रहो....
आपल्या लिखाणाला धार ठेवा.... आपल रक्त मराठी आहे... ते सळसळत ठेवा.... कोणीही नजर उठवून बघितल नाही  पाहिजे... आपल्या मराठी भूमीला.... तसेच आमच्यात फूट पाडण्याचा कोणी विचार सुद्धा करू नये... बघा, येणारा काळ खूप खडतर आहे.... म्हणूनच लक्षात ठेवा, आपल्या प्रत्येकात बाळासाहेबांचे अमूल्य विचार आहेत.... प्रयत्न करा त्यांच्या तेजस्वी विचारांना जिवंत ठेवण्याचा.... बघा, आज बाळासाहेब आपल्याला सांगत आहेत..... मी अजुन गेलो नाही.... जिवंत आहे.... अरे मर्द मराठ्या, बघ तुझ्या डोळ्यात, बघ तुझ्या सळसळत्या रक्तात.... फाडुन बघ तुझ्या ह्रदयात, मी आहे..... माझे विचार आहेत.... त्या विचारांची मशाल, भगव्याची शान, अशीच झळकत ठेव..... भिऊ नकोस..... माझा हात तुझ्या शिरावर सदैव आहे....   जय महारष्ट्र.....
ॐ श्री गुरुदेव दत्त ....

No comments:

Post a Comment