Tuesday 27 November 2012

गुरुबोध ज्ञाने सगुण दृष्टी.... निर्गुण मार्गी गुरुकृपा पुष्टी.... 

गुरुबोध ज्ञान शिष्याने आत्मसात केलेच पाहिजे.... असाच एक गुरुबोध सांगतो.... एकदा एका शिष्याने गुरूला विचारले.... स्वामी, स्वर्ग कसा आहे, नरक कसा आहे...?... हे मला जाणून घ्यायचे आहे.... त्याच्या गुरूने त्याला म्हटले..... डोळे बंद कर आणि बघ.... शिष्याने डोळे बंद केले आणि एका शांत शून्यामध्ये त्याने प्रवेश केला.... गुरु त्याला म्हणाले.... हा बघ स्वर्ग.... मग थोड्या वेळाने गुरु म्हणाले.... आता नरक पहा..... त्यांच्या शिष्याने आश्चर्याने डोळे उघडले.... गुरूंनी त्याला विचारले.... काय बघितलेस..?... श्रीराम..... 

शिष्य म्हणाला.... स्वामीजी, लोक ज्या गोष्टीची चर्चा करतात.... त्या स्वर्गांत मला कुठेही दिसल्या नाहीत..... अमृताच्या नद्या दिसल्या नाहीत... की सोन्याचे महाल दिसले नाहीत.... तिथे तर काहीच नव्हते..... आणि नरकात सुद्धा काहीही नव्हते.... आगीच्या ज्वाला नव्हत्या... की पीडितांचे आक्रंदन नव्हते.... असे का व्हावे..?... की मला दिसला तो स्वर्ग नव्हता आणि नरकही नव्हता...?.. मी संभ्रमात पडलो आहे.... श्रीराम.... 

हे ऐकून गुरु हसायला लागले.... आणि म्हणाले.... तू पाहिलास तो स्वर्गही होता आणि नरकही होता..... परंतु अमृताच्या नद्या आणि सोन्याचे महाल किंवा आगीच्या ज्वाळा आणि पीडितांचे आक्रंदन.... हे सर्व तिथे स्वत:लाच न्यावे लागते..... ह्या गोष्टी तेथे मिळत नाहीत.... आपण ज्या गोष्टी बरोबर घेऊन जाऊ तेवढ्याच तिथे सापडतात..... स्वर्ग म्हणजे आपण स्वत: आणि नरक म्हणजे आपण स्वत:च..... श्रीराम..... 

बघा, यामागचे तात्पर्य किंवा गुरुबोध हाच कि.... जीवन जगताना आपणा स्वत: मध्ये सारे काहीं दडवले जाते.... जशी पेरणी करावी तशीच कापणी करावी लागते..... आपण अंतर्मनात जसा विचार करू तसेच विश्व निर्माण होते.... म्हणूनच असे विश्व निर्माण करण्याऐवजी निर्विचार होऊन स्वःताला शोधावे.... श्रीराम..... 

बघा, म्हणजेच काय तर.... अंतर म्हणजे मन आणि अंतर म्हणजे आकाश.... अंतराळ.... देव अंतरात असतात.... देव मनामनांत असतात... तसेच ते स्वर्गात असतात..... आता स्वर्ग म्हणजे काय...?... स्वर्ग म्हणजे सर्वोच स्थान नव्हेच.... देव स्वर्गात राहात असतीलही... पण मोक्ष ही स्वर्गापेक्षाही वरची आणि सर्वोच्च अशी पायरी आहे.... आणि मोक्षाशी निर्गुणाचे नाते आहे..... मोक्षाची संकल्पना निर्गुणाशी निगडित आहे.... निर्गुण म्हणजे ज्याला आकार, विकार काहीही नाही ते..... 

पण खरी मेख अशी कि.... सगुणाचा आधार घेतल्याशिवाय निर्गुणाकडे पोहोचता येणार नाही.... आणि हा सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा प्रवास अतिशय गहन आहे.... निर्गुणापर्यंत आपण पोहोचलो.... असे आपल्याला वाटे-वाटेपर्यंतच आपले पाऊल सगुणाच्या जाळीत अडकले आहे.... याची जाणीव होत राहाते..... म्हणूनच आपल्याला जशी पेरणी करावी तशीच कापणी करावी लागते..... नाहीतर साधक अंतापर्यंत सगुण आकाराच्याच भक्तीत रत राहतो.... म्हणून वेळीच सावध व्हा.... स्वःचा शोध घ्या.... श्रीराम.... 

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

No comments:

Post a Comment