Thursday, 31 May 2012

जीवन आणि मानसिकता…. (जीवनबोध)

एकदा कॉलेजचे काही मित्र अनेक वर्षानंतर भेटतात… ते सर्वजण आपल्या करियरमध्ये खूप चांगले कार्य करत असतात आणि भरपूर पैसेही कमावत असतात… एकमेकांशी बोलत असतांना खूप वेळेनंतर ते त्यांच्या कॉलेजचे सर्वांत आवडते प्रोफेसर यांना भेटण्याचे ठरवतात…

प्रोफेसरांच्या घरी गेल्यानंतर ते प्रोफेसर त्या सर्वांचे स्वागत करतात आणि सर्वांना त्यांच्या करियरबद्दल विचारतात… हळुहळू गप्पा रंगतात आणि त्यादरम्यान ते जीवनात येणाऱ्‍या अडचणी आणि कामात येणारा तणाव याविषयी चर्चा करतात… सर्वजण या मुद्दयाशी सहमत असतात की, जरी आपण आर्थिक स्थितीने मजबूत असलो तरी पण आपण पुर्वीच्या आयुष्यासारखे आता सुखी नाही…

ते प्रोफेसर सर्वांचे बोलणे खूप लक्ष देऊन ऐकत असतात.. आणि मग ते अचानक किचनमध्ये जातात आणि थोड्या वेळाने परतल्यावर सर्वांना म्हणतात की, मी सर्वांसाठी कॉफी आणली आहे… पण तुम्ही किचनमध्ये जाऊन एक-एक कप स्वतःसाठी घेऊन या...

सर्वजण किचनमध्ये जातात… तिथे अनेक प्रकारचे कप असतात… आपल्या आवडीप्रमाणे ते सर्वजण कप घेऊन येतात… मग ते प्रोफेसर कॉफी देतात आणि म्हणतात की, "तुम्ही सर्वांनी चांगला जो कप किंमतीने महाग आहे तोच निवडला… जे कप साधारण आहेत त्या कपांकडे तुम्ही लक्ष दिले नाही…

जेव्हा एकीकडे आपण स्वतःसाठी चांगली इच्छा मनात ठेवतो.. तर दुसरीकडे हीच इच्छा आपल्या जीवनात अडचणी आणि तणाव आणत असते… हे तर निश्चित आहे की, कॉफीच्या क्वालिटी मध्ये कोणताच बदल होणार नाही… कॉफी कप हा तर एक प्रकार आहे की, ज्याच्या माध्यमामधुन आपण कॉफी पित असतो…

तुमची खरी इच्छा कॉफी पिण्याची होती, कपाची नाही… तरीपण सर्वांनी चांगले आणि महागच कप निवडले…

आणि आपला कप निवडल्या नंतर तुम्ही दुसऱ्‍यांच्या कपाकडे लक्ष दिले… सर्वांनीच जरी कोणतेही कप निवडले असते तरी कॉफीची चव बदलली नसती…

तात्पर्य— आपले जीवन हे कॉफीसारखेच आहे… आपली नोकरी, पैसा व परिस्थिती हे सर्व कपांसारखे फक्त जीवन जगण्याचे साधने आहेत खरं जीवन नाही… म्हणून कॉफीची चिंता करा कपाची नाही… जगातील सर्वांत सुखी माणसे ती नसतात, ज्यांच्याकडे सर्व काही इतरांपेक्षा अधिक चांगलं असतं… तर ते सुखी असतात की जे त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा चांगला उपयोग करतात..!..

म्हणून मित्रांनो, साधेपणाने जगा... जीवनाचा योग्य अर्थ आणि समन्वय साधा... सर्वांशी प्रेमाने वागा... सर्वांची योग्यतेने काळजी घ्या... ॐ श्री गुरुदेव दत्त...
स्वप्न आणि सत्य.....


एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले..... विषय होता भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा.... दोघे ही खुप भांडले, झगडले पण निर्णय काही होईना.... शेवटी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ते आपल्या मानसपित्याकडे ब्रम्हदेवाकडे गेले.....

ब्रम्हदेवाने त्यांना सांगितले, "ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील आणि तरीही ज्याचे पाय जमिनीवर असतील, त्याचा... भविष्या घडविण्यात निर्णायक सहभाग असतो".... दोघेही परत आले.... स्वप्नाने आधी प्रयत्न केला.... एकाच उडीत त्याचे हात आभाळाला टेकले, पण त्याचे पाय जमिनीपासुन केंव्हाच उचलले गेले होते.....

सत्याने नंतर प्रयत्न केला..... त्याचे पाय कायम जमिनीवर होते, पण त्याचे हात आभाळापर्यंत कधीच पोहचु शकले नाहीत..... दोघांनीही खुप प्रयत्न केले, पण दोघांपैकी कोणीच यशस्वी होउ शकले नाही.... थकुन परत एकदा ते ब्रम्हदेवाकडे गेले, आणि या वेळेस ब्रम्हदेवाने त्यांना सांगितले..... "भविष्य घडविण्यात सत्य, आणि स्वप्न या दोघांचाही सहभाग तितकाच मोलाचा असतो..... खर्‍या अर्थाने यशस्वी भविष्य घडवायचे असेल, तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे  रहायला हवे......

Source : Internet......

Saturday, 26 May 2012

New Presentation of Thoughts By Chetan K.... 

Look at yourself first..... Change is up to you.... Get clear on your why..... Stand up for what you believe in..... Seek self knowledge.... ॐ श्री गुरुदेव दत्त ...... 

You can have everything in life you want.... if you will just help other people get what they want.... A life built around helping others will yield not just the joys of relationships..... but also the sweet success of achieving your own goals..... ॐ श्री गुरुदेव दत्त ..... 


To succeed you need to find something to hold on to.... something to motivate you.... something to inspire you.... We are sometimes so busy thinking about other things.... that we miss beautiful sources of inspiration..... ॐ श्री गुरुदेव दत्त .....


No one is perfect… you will become Perfect by your Self Study ….Good Thinking ….. Knowledge you Earn from others…… Remember that Life is possible only through challenges.... be careful to choose option what you think is Right , so that you will not blame yourself at the end of Day….. ॐ श्री गुरुदेव दत्त .... 


Where you are headed is very very important than how fast you are going….. Rather than always focusing on what's urgent, learn to focus on what is really important… When we spend the majority of our time doing what’s most important to us, we’ll create a wealth of value for ourselves and others…… ॐ श्री गुरुदेव दत्त .... 


Courage is not the absence of fear..... but rather the judgement that something else is more important than Fear...... Courage is looking fear right in the eye and saying..... Get the hell out of my way...... I’ve got things to do..... ॐ श्री गुरुदेव दत्त ......


You are today where your thoughts have brought you….. You will be tomorrow where your thoughts take you...... So always aim at purifying your thoughts and everything will be well..... Remember that … What we think, we become...... Man's greatness lies in his power of thought..... ॐ श्री गुरुदेव दत्त ...... 


If you believe in yourself and have dedication and pride and never quit attitude, you'll be a winner…… know that Losers live in the past….. Winners learn from the past and enjoy working in the present toward the future….. A winner never stops trying…… No failure if you thinks of Success….. But have to Remember that Winning isn't everything…. but the will to Win is everything….. and The real winners in life are the people who look at every situation with an expectation that they can make it work or make it better…… ॐ श्री गुरुदेव दत्त .....



दुस-याला हसणे फार सोपे असते..  पण दुस-याकरीता रडणे फार अवघड असते..  त्याला शुद्ध अंत:करण असावे लागते...ॐ श्री गुरुदेव दत्त...


पात्रता नाही म्हणून जर आपण..  परस्परांना भेटणे बंद केले..  तर आपल्यापैकी ब-याच जणांना..  अज्ञातवासात जावे लागेलॐ श्री गुरुदेव दत्त...


गरज कायदा ओळखत नाही…  शिस्त-नियम मानत नाही...  आपल्या अयोग्य सवयी वा इच्छा..  यांचे गरजेत रुपांतर करू नका...

सुधारणा म्हणजेच ज्याच्यामुळे मनुष्य आपले कर्तव्य बजावीत राहतो ते आचरण.


दुष्कृत्याची कबुली हीच सत्कृत्याचा प्रारंभ ठरतो... मग दुसर्‍यावर अन्याय करण्यापेक्षा तो अन्याय..  आपण स्वत: सहन करणे जास्त चांगले असते...



कर्ज काढणे ही एखादी जड वस्तू.. डोंगरमाथ्यावरून खाली लोटून देण्याइतके सोपे आहेपरंतु ते फेडणे म्हणजे तीच वस्तू खालून..  डोंगरमाथ्यावर वाहून नेण्याइतके कष्टप्रद आहे...ॐ श्री गुरुदेव दत्त...


गरज कायदा ओळखत नाही…  शिस्त-नियम मानत नाही...  आपल्या अयोग्य सवयी वा इच्छा..  यांचे गरजेत रुपांतर करू नका...ॐ श्री गुरुदेव दत्त...


दुष्कृत्याची कबुली हाच सत्कृत्याचा प्रारंभ ठरतो.मग दुसर्‍यावर अन्याय करण्यापेक्षा तो अन्याय.. आपण स्वत: सहन करणे जास्त चांगले असते... ॐ श्री गुरुदेव दत्त...

   
कोणतेही तत्व जोपर्यंत स्वत:च्या आड येत नाहीतोपर्यंत त्याची पूजा करायला लोक तयार असतातपण ज्या क्षणी ते त्यांच्यावर उलटतेत्याक्षणी ते त्याला दूर भिरकावून देतात...ॐ श्री गुरुदेव दत्त...


स्वार्थाची ढाल आणि दुष्कृत्यांची तलवार, हाती घेऊन लढणारा वीर.. स्वःताच्या ऱ्हासाला कारणीभूत होतो...ॐ श्री गुरुदेव दत्त...


योग्य विचार का करावा... कारण विचार हेतूकडे नेतो... हेतू कृतीकडे... कृतीमुळे सवय लागते... सवयीमुळे स्वभाव बनतो व  स्वभावामुळे साध्य प्राप्त होते...ॐ श्री गुरुदेव दत्त...


वाचनाने मनुष्याला आकार येतोसभेमुळे तो प्रसंगावधानी, तत्पर होतो  आणि लिखाणामुळे तो सर्वांगीण होतो...


तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ करालतर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल.. गोणपाटासारखा कराल, तर त्यातून परमेश्वर दिसणार कसाॐ श्री गुरुदेव दत्त...

मला हे पण, ते पण, सगळच हव.. हा झाला निरागस बालकांचा बालहट्ट.. पण मोठी माणसेही जेव्हा असे मागू लागतात.. तेव्हा त्यास काय म्हणावे, स्वार्थी /निगरगट्ट.. ॐ श्री गुरुदेव दत्त...


सर्वांमध्ये राहूनच अलिप्तपणा शिकता आला पाहिजे.. अलिप्तपणा असणे = आत्म्याशी एकरूप होणे आणि 
संसारात असणे = सर्वांच्या आत्म्याशी एकरूप होणे होय... ॐ श्री गुरुदेव दत्त...   



Thursday, 24 May 2012

आपल्या गरजा आता कमी करण्याची वेळ आली आहे .....

आताची परिस्थिती पाहता महागाई अजून वाढेल असे दिसते.... महागाई तर वाढतच आहे.... ती वाढली पाहिजे.... असे काणीच म्हणणार नाही.... पण तरीही आपण महागाईच्या संदर्भात काही वेगळा विचार करू शकत नाही का ? बघा आज लोकांकडे पैसा असूनही त्यांना पैसा कमी पडतात .....

विचार करा.... एवढा पैसा असून आणि आपल्याकडे एवढी चैनीची साधने असूनही आपली मने असमाधानी का...? उपभोगाची साधने अजून मिळतच रहावीत असे सतत का वाटते...? आपण सुखी आहोत असे आपल्याला का वाटत नाही... ? मग आता यावर उपाय काय ....

यावर एकच निष्कर्ष आहे.... की नवनव्या वस्तूंचा उपयोग करण्यात आणि उपभोग घेण्यात सुख नाही..... एखादी वस्तू वापरायला मिळावी असे वाटते..... ती मिळेपर्यंत तिचे महत्त्व फार वाटते.... पण एकदा ती हातात पडली की तिचे काही वाटेनासे होते.... मग नव्या वस्तूचे आकर्षण वाटायला लागते...

आता महत्वाचे म्हणजे... आपल्या गरजा आता कमी करण्याची वेळ आली आहे .....सतत उपभोग वाढवण्यात सुख नाही..... तर मर्यादित उपभोग आणि प्रदीर्घ चितन यात सुख आहे..... गरजा सतत वाढवत नेल्या की त्या वाढतच जातात..... त्यांना काही अंतच रहात नाही..... म्हणून आपल्या गरजा कमी केल्या पाहिजेत..... माणसाच्या गरजा जेवढ्या कमी असतील.... तेवढे तो अधिक सुखी होतो..... सतत महागाई वाढत गेली की माणूस त्रस्त होतो... पण माणसाने आपल्या गरजा कमी केल्या असतील.... तर तो वाढत्या किमतींनी त्रस्त आणि दुःखी होत नाही.....

गांधीजीनी तर मर्यादित गरजा हेच आपल्या सुखाचे रहस्य असल्याचे म्हटले होते.... काही लोक काहीही महाग झाले की लगेच आरडा ओरडा करायला लागतात.... आपल्या लहानपणी कशी स्वस्ताई होती हे सांगायला लागतात.... पण त्यांच्या लहानपणी सर्वांच्याच गरजा किती कमी होत्या... हे काही ते सांगत नाहीत....

आपल्या घरातल्या एकेक वस्तूवर नजर टाकली तरी आपल्याला हे सहजच लक्षात येते की आपल्या घरातल्या अगदी सवयीच्या झालेल्या किती तरी वस्तू आपल्या लहानपणी आपल्या वापरातही नव्हत्या..... आपण किती तरी अनावश्यक वस्तू आणि सेवा खरेदी करून ठेवलेल्या असतात.... आताचे जीवन आधुनिक आणि गतिमान झाले आहे... म्हणून यातल्या काही गोष्टी आपल्यासाठी आवश्यक झाल्या आहेत... पण यातली प्रत्येक गोष्ट आवश्यकच आहे का.... उपयोग गरजेचा आहे का.... याचा आपण विचार केला पाहिजे....

यातल्या काही गोष्टी नक्कीच अनावश्यक आहेत.... पण आपण त्यांचे गुलाम झालेलो असतो... त्यामुळे त्यांच्या शिवाय राहू शकत नाही.... आणि वीजदर कितीही वाढले... तरी आपल्या वीज वापरात काही काटकसर करण्याचा आपण विचार सुद्धा करीत नाही..... तसा विचार आपण केला पाहिजे.... आपल्या घरात किती वीज विनाकारण जळत असते.... याचा आपण आढावा घ्यावाच....

महागाईचे आपल्याला खरेच चटके बसत असतील.... तर अन्नाचा एकही कण वाया जाणार नाही.... अशी प्रतिज्ञा करा.... आपण हॉटेलात किती वेळा जातो याचा आढावा घ्या... हॉटेलात जाणे किती गरजेचे आहे ते बघा.... इकडे महागाईच्या नावाने आरडा ओरडा आणि तिकडे हॉटेलांत जेवायला येणारांची गर्दी हे दृष्य विसंगत वाटते... हॉटेलात केवळ गर्दीच होते असे नाही.... तर तिथेही ग्राहकांच्या रांगा लागलेल्या असतात..... हे काय महागाईने त्रस्त झाल्याचे लक्षण आहे का.... जरा विचार करा... ?

ॐ श्री गुरुदेव दत्त ......
साधेल साध्य हाच प्रत्याहार......

जगात दृष्य म्हणजे विषय असणारच..... साधकाच्या निर्वाहासाठी ते आवश्यक आहेत..... साधकाची ध्येय निश्चिती झाली असेल.... आणि ध्येय साध्य करण्याची तळमळ निर्माण झाली असेल तर कोणत्या विषयात किती प्रमाणात रस घ्यावयाचा.... आणि कोणत्या गोष्ठींचा त्याग करावयाचा हे साधकाला उमजते आणि तो त्याप्रमाणे वागतो..... म्हणूनच साधकाने विषयांपासून आवरण्याचा अभ्यास करावा लागतो..... ह्यास योगमार्गात ' प्रत्याहार ' म्हटले आहे...... ह्यासाठी साधकाला तारतम्य ठेवावे लागते. भूक लागली की माणूस जेवणारच..... पण खरा साधक इतकेच जेवेल की त्याचा साधनेवर प्रतिकूल परिणाम होणार नाहीं..... जप करताना झोप येणार नाहीं.....

सत्त्वगुणाला.... प्राबल्य देऊन रज आणि तम हे नियंत्रणाखाली ठेवायचे.... ही तर आयुष्यभराची साधना आहे..... नैसर्गिक प्रवृत्ती... हीच जर आपण प्रमाण मानली.... तर कोणत्याही क्षेत्रात प्रगती करता येणे आपल्याला शक्य नाही.....

इंद्रियांची ओढ ही नेहमी सुखाकडे असते... सुख या शब्दाची एक व्युत्पत्तीच ही ओढ स्पष्ट करते...... आता सुख म्हणजे काय.... " सु " म्हणजे चांगले आणि "ख " म्हणजे इंद्रिय..... सुख म्हणजे आपली इंद्रिये आनंदात असणे..... त्यांना आपला विषय चांगला उपभोगायला मिळाला... तरच ती समाधानात असतात.....

एक गोष्ट आहे.... एक बाबा होते..... ते एका डोंगरातल्या गुहेत राहत असत.... त्यांच्याजवळ एक रिकामा डबा होता.... तेवढीच त्यांची संपत्ती.... जवळच्या गावातला एक भक्त त्यांना आठवडय़ातून थोडी भगर पाठवून देई..... मूठभर भगर आणि थोडे पाणी त्या डब्यात घालून धुनीतल्या निखाऱ्यावर ठेवून द्यायचे..... आणि ते शिजल्यावर दुपारी १२ वाजता ते खायचे.... . २४ तासांत एवढाच आहार ते घेत असत.....

एकदा एक शिष्य गुरू सेवेसाठी त्यांच्याजवळ असता ते एकदम म्हणाले.... साले कुत्रे भरपूर त्रास देतात..... शिष्याला नवल वाटले..... कारण त्या जंगलातल्या गुहेत आसपास कोठेच कुत्रे वगैरे नव्हते..... नंतर शिष्याला उलगडा झाला.....

कुत्रे म्हणजे इंद्रिये होत.... ती सारखी मागतच असतात.... त्यांना शांत करण्यासाठी त्यांच्यासमोर तुकडा फेकावा लागतो.... आपण त्यांचे लाडच करीत राहिलो.... तर ती कधीच शांत होत नाहीत... आणि समजूत घालता घालता मनच आसक्त होऊन जाते.... त्याच्यावर म्हणजे मनावरच हुकूमत चालली पाहिजे..... उपभोग हा तृप्तीसाठी आहे.... हे मनाला पटले तर ते इंद्रियांच्या अधीन होत नाही.... उलट सारी इंद्रियेच त्याच्या ताब्यात येतात..... हीच प्रत्याहाराची साधना आहे....

जसे कि बँकेत काम करणाऱ्या कारकुनाच्या ताब्यात जरी तिजोरीच्या किल्ल्या असल्या.... तरी आत ठेवलेला पैसा हा त्याचा नाही... याची पक्की जाणीव त्याला असायलाच हवी..... अगदी तस्सेच साऱ्याच इंद्रियांना जाणीव हवी की.... विषयांचा उपभोग हा त्यांच्यासाठी नाही..... त्यांचा स्वामी जो मनाकरवी त्यांच्या शक्तींचा उपयोग करतो आहे.... त्याच्यासाठी आहे.... मग ती मनाला भुलवण्याचा प्रयत्न न करता आपल्या जागी शांत राहतात.... म्हणजे प्रत्याहार सिद्ध झाला असे म्हणता येईल....

हा प्रत्याहार... आपण कसा साधू तर नामाने.... सर्वसुख देण्याचे सामर्थ्य फक्त भगवंतात आहे... आणि भगवंत नामापासून वेगळा नाही.... हेही आपल्याला माहीत आहे.... म्हणून नामधारकाने अर्धघडीही रिकामे राहू नये... अखंड नामस्मरण करीत रहावे.... पूर्णसुखाचा लाभ होण्यासाठी क्षणभरदेखील नामाशिवाय राहू नये....

ॐ श्री गुरुदेव दत्त ......

Monday, 21 May 2012

जगाला उपदेश करणारे..... लोका सांगे ब्रम्हज्ञान.....

समुद्राकाठी एक टुमदार शहर होते..... तेथे पौर्णिमेचा चंद्र उदयास आला..... त्याचे सौन्दर्य काय वर्णावे ...? उगवला चंद्र पुनवेचा..... पण त्याच्याकडे पाहून त्या शहरातील कुत्र्यांना काहीं चैन पडेना....

चंद्राकडे पाहून सर्व कुत्रे भुंकायला लागले.... अर्थात त्यामुळे शहरातील शांतता भंग पावली.... कुत्र्यांमध्ये एक शहाणा कुत्रा होता.... तो मात्र आता पर्यंत शांत होता.....

इतर कुत्रे जेव्हा भुंकणे थांबवत नाही हे बघून.... तेव्हां तो त्यांना म्हणाला.... अरे कशाला भुंकता.... तुमचे भुंकणे काहीं चंद्रापर्यंत पोचणार नाही..... आणि उगीच पृथ्वीवरील शांतता मात्र भंग पावत आहे.... 

म्हणून गप्प बसा..... हे त्याचे बोलणे ऐकून सर्व कुत्रे भुंकण्याचे थांबले.... पण आता भुंकू नका.... म्हणणारा कुत्रा मात्र शांतता नांदावी..... म्हणून रात्रभर भुंकत राहिला....

आज आपण बघतो..... स्वतःला भाषाप्रभू म्हणवून घेणारे, पंडित समजणारे अनेक लोक आपण आपल्या अवतीभोवती पाहात असतो..... प्रत्यक्षात ते किती आणि कसे पोकळ आहेत... याचं दर्शनही आपल्याला अधूनमधून घडत असतं... अशा विद्वानांचा आणि त्यांच्या लटक्या पांडित्याचा समाजाला कवडीइतकाही उपयोग नसतो.....

संत रामदास स्वामींचा मनाच्या श्लोकामधील एक मर्मभेदी श्लोक कायम स्मरणात ठेवण्यासारखा आहे..... रामदास स्वामी सांगतात..... 
जनीं हीत पंडीत सांडीत गेले । अहंतागुणें ब्रह्मराक्षस जाले ॥ 
तयाहूनि व्यत्पन्न तो कोण आहे । मना सर्व जाणीव सांडूनि राहें॥

अर्थ :  हे मना, शब्द पांडित्य असणार्‍यांना खरे सत्य व हित गवसत नाही.... असे विद्वान अहंकारामुळे मृत्यूनंतर ब्रम्हराक्षस होतात..... भगवंताहून अधिक विद्वान असा कोण आहे...? याची जाणीव धरून नम्रतेने वागायला हवे.... 

शास्त्र, पुराणे, उपनिषेदे आदींचा अभ्यास करणार्‍या विद्वानांना त्यातील हितकारक गोष्टी माहिती असतात..... ते त्यावर वाद चर्चा करतात, व्याख्याने देतात, सभा गाजवतात..... तथापि वैयक्तिक आयुष्यात त्याविरूध्द आचरण करीत असतात.... शांततेचा उपदेश करणारे लोक स्वतः मात्र शीघ्रकोपी असू शकतात.... बालमुहूर्तावर उठावे... असे सांगणारे सकाळ उजाडल्यावरच उठणारे असले... तर हे म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान’ असेच ठरत नाही काय....

विद्वत्ता वाईट नव्हे... पण तिच्यासोबत नम्रता हवी..... मनुष्याकडे विद्वत्ता, चातुर्य, वक्तृत्त्व, बुध्दिमत्ता हवी हे सर्व गुण प्रयत्नपूर्वक मिळवावे.... पण त्यांचा अहंकार होऊ देऊ नये.... मुळात हे कठीण आहे... पण अशक्य नाही.... 

आज सरकारी विद्वान, सरकारी इतिहास संशोधक अशा नवीन जमाती उदयाला आल्या आहेत.... काहीही करून सरकारी पुरस्कार पदरी पडले आणि चार-दोन महामंडळांवर आपली नियुक्ती करून घेतली की, त्या पुण्याईवर उभा जन्म आनंदात जातो.... 

समाजातही अशाच विद्वान म्हणवणार्‍यांची चलती असल्याने त्यांना आकाश ठेंगणे वाटू लागते.... सर्व गोष्टींवर ते अधिकारवाणीने मत नोंदवतात.... कधीतरी हा फुगा फुटतो.... पण तोवर त्यांचा क्षुद्र स्वार्थ साधलेला असतो.... अशांनी ब्रम्हराक्षस होण्याची तयारी करून ठेवावी.... तेव्हा अशा पंडितांचा विचार करण्याचं कारण नाही.....

ॐ श्री गुरुदेव दत्त ......
बलशाली भारत होवो..... विश्वात शोभूनी राहो.....

आजच्या पिढीने भारताला महासत्ता नव्हे "बलसागर भारत" बनविण्याचे स्वप्न पहावे.... ते पूर्ण करायचे असेल तर.... भ्रष्टाचाराचे निर्मूलन करावे लागेल... जात-धर्मभेदांना जाळून राख करावे लागतील... शेतकरी आत्महत्या, स्त्रीयांवरील अन्याय, थांबवावे लागतील.... ही यादी आणखीन मोठी होऊ शकते.... या सर्वांची सुरुवात करायची असेल तर सर्वप्रथम आपण जीवनात बलशाली झाले पाहिजे.....

देशापुढे आज जातीयवाद, भ्रष्टाचार, दहशतवाद, हिंसाचार, तरुणातील व्यसनाधीनता यासह अन्य विविध आव्हाने आ वासून उभी आहेत..... तरुण समाजसुधारक आणि शासन एकत्र आल्यास व त्याबाबत योग्य पद्धतीने जनजागृती झाल्यास वाईट रूढी नष्ट होऊन भारत नक्कीच बलशाली होऊन महासत्ता बनेल.....

या समाजविघातक प्रवृत्तींना समाजातून हद्दपार केल्यास.... बलशाली भारताची निर्मिती नव्या युगात नक्कीच होईल .... त्यानंतरचा भारत हा खूप सशक्त, बलशाली आणि सबळ असेल... " बलशाली भारत होवो, विश्वात शोभूनी राहो..." हे सूत्र तरुणांनी मनी बाळगावे.....

आजच्या पिढीने / तरुणांनी समजले पाहिजे.... धर्माने, विज्ञानाने, तुमच्या स्वार्थाने आणि निसर्ग-नियमानेही तुम्हाला दुसऱ्यासाठी काही काम करण्यास सांगितले आहे..... धनाने नाही तर श्रमाने... या संस्थेत नाही... तर त्या संस्थेत .... या उपक्रमात नाही तर दुसऱ्या.... पण कोठेतरी कामाला लागा.....

मी एकटा नाही, सारा समाज माझा आहे.... मी या समाजाचा एक घटक आहे... आणि समाज बलशाली करायचा तर.... मी बलशाली झाले पाहिजे.... ही भावना आणि प्रेरणा जागवण्याचा निर्धार करा... स्वःताला बलशाली बनवा.....

माझ्या ताकदीनुसार मी हा समाज बलशाली करण्याचा प्रयत्न करीन..... असा आपल्या मनाशी निर्धार करावा.... कुणी ना राहो दुबळा येथे, मनी असा निर्धार जागवू असा..... विज्ञान, प्रयत्न आणि पुरूषार्थ याने उद्याचा समाज संपन्न करता येईल.... हे सर्व करणे आपल्याच हाती आहे....

आत्मसंवर्धन, समाजसंवर्धन आणि राष्ट्रसंवर्धन हीच त्रिसूत्री तरुणांनी अंगी बाणवावी.... तरुणाईची हीच खरी शपथ..... स्वच्छ भारत... सुंदर भारत.... संकल्प आहे.... निर्मल समृध्द भारत देशाचा....

तर मग चला.... उठा.... आपण सगळे एकत्र येऊन आपल्या भारत देशाचे भाग्य सजवू.... बलशाली भारत होवो, विश्वात शोभूनी राहो....

ॐ श्री गुरुदेव दत्त ......

Sunday, 20 May 2012

प्रत्येकाच्या जीवनातील चार मित्र आणि वास्तव..... बोध कथा.....

एका गावात एक मुलगी राहात असते..... तिला चार मित्र असतात..... त्यापैकी चौथ्या मित्रावर ती जिवापाड प्रेम करत असते..... त्याला ती नेहमी मोठमोठ्या भेटवस्तू देत असते... . जगातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट त्याला मिळायला हवी, असा तिचा कटाक्ष असतो....

त्या खालोखाल तिसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते.... त्याला ती नेहमी शेजारची राज्ये दाखवत असते; मात्र, ते बघून तो आपल्याला कधीतरी सोडून जाईल.... अशी भीती तिच्या मनात नेहमीच असते.... दुसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते.... तिचा दुसरा मित्र अतिशय निष्ठावान असतो..... तिची संपत्ती, तिची मालमत्ता राखण्यात त्याचा मोठा सहभाग असतो.....

तिचा पहिला मित्र ...त्याचा आत्मविश्‍वास वाखाणण्यासारखा असतो..... मनाने तो खूप प्रेमळ, दयाळू आणि संयमी असतो.... तो तिला नेहमी समजून घेत असतो.... ती जेव्हा कधी संकटात सापडते, काही समस्या तिला भेडसावतात..... तेव्हा तेव्हा ती आपले मन त्याच्याकडे मोकळे करते..... तोही तिला समजून घेतो, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगतो..... तरीही, तिला तो फारसा आवडत नसतो..... तो मात्र तिच्यावर खूप मनापासून प्रेम करत असतो..... पण ती क्वचितच त्याची दखल घेत असते.....

एक दिवस ती मुलगी आजारी पडते..... उपचारांचाही काही परिणाम होत नाही..... आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, हे तिच्या लक्षात येते..... तिच्या मनात विचार येतो, माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे..... माझे जिवाभावाचे चार मित्र आहेत; पण जेव्हा माझा मृत्यू होईल, तेव्हा मी एकटीच असेन.... या विचारांनी ती अस्वस्थ होते....

ती आपल्या सर्वांत आवडत्या चौथ्या मित्राला म्हणते, मी तुझ्यावर सर्वाधिक प्रेम केले.... जगातल्या सर्वांत मौल्यवान भेटी मी तुला सतत दिल्या.... तुझी खूप काळजी घेतली..... आता माझा अंतकाळ जवळ आला आहे.... तू माझ्याबरोबर येशील ना..? माझी साथ करशील ना...? तो म्हणतो....अजिबात नाही..... असे म्हणून आणखी काहीही न बोलता तो मित्र निघून जातो.... त्याचे हे बोलणे तिचे काळीज चिरत जाते.....

त्यानंतर ती मुलगी तिसऱ्या मित्राकडे येते..... आयुष्यभर मी तुझ्यावर प्रेम केले..... आता मी काही दिवसांचीच सोबती आहे..... तू माझ्याबरोबर येशील ना...? तिच्या या बोलण्यावर तो थंडपणे "नाही" म्हणतो..... जीवन खूप सुंदर आहे.... तू गेल्यानंतर मी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करीन..... त्याच्या या बोलण्यावर ती निराश होते.....

आपली निराशा लपवत ती दुसऱ्या मित्राकडे येते..... तू निष्ठेने माझ्या संपत्तीचे आणि मालमत्तेचे रक्षण केलेस...... यावेळीही तसाच वागशील ना...? येशील ना माझ्याबरोबर...? यावर तो उत्तरतो...... मी तुझ्याबरोबर जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंत येऊ शकेन.... त्यापुढे नाही..... त्याच्या या उत्तराने ती मुलगी पुरती कोलमडून जाते.... काय करावे तिला कळत नाही......

तेवढ्यात एक आवाज येतो.... मी येईन तुझ्याबरोबर..... तू जिथे जाशील, तिथे मी येईन.... ती मुलगी आवाजाच्या दिशेने बघते, तर समोर तिचा पहिला मित्र असतो..... पोषणाअभावी, दुर्लक्षामुळे खूप अशक्त झालेला..... मुलगी म्हणते, मी खरेतर तुझी खूप काळजी घ्यायला हवी होती.... पण आता वेळ निघून गेली आहे.....

वास्तवातही, विचार करा.... या मुलीप्रमाणे आपलेही चार मित्र असतात.... आपला चौथा मित्र म्हणजे शरीर..... त्याचे आपण कितीही कौतुक केले, कितीही चोचले पुरवले, तरीही मरणाच्या वेळी ते आपले साथ सोडते.....

तिसरा मित्र म्हणजे, आपली मालमत्ता, संपत्ती, आपली पत- प्रतिष्ठा..... आपल्या मरणानंतर हे सगळे आपोआप दुसऱ्याचे होते....

आपला दुसरा मित्र म्हणजे, आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवार.... ते आपल्या कितीही जवळचे असले, तरी आपली सोबत ते जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंतच करू शकतात.... आणि पहिला मित्र म्हणजे कोण...?

आपला पहिला मित्र म्हणजे आपला आत्मा..... सत्ता, संपत्ती, भौतिक सुखे मिळविण्याच्या नादात त्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष होते..... खरे तर आत्मा ही अशी एकमेव गोष्ट आहे.... जी नेहमी आपल्याबरोबर असते..... शेवटपर्यंत आपली साथ करते......

ॐ श्री गुरुदेव दत्त ....

Thursday, 17 May 2012

Today's Thoughts.....  @ Chetanthinks.... 

Where you are headed is very very important than how fast you are going….. Rather than always focusing on what's urgent, learn to focus on what is really important… When we spend the majority of our time doing what’s most important to us, we’ll create a wealth of value for ourselves and others…… ॐ श्री गुरुदेव दत्त ....











Monday, 14 May 2012

आत्मपरीक्षण...... आत्मसुधारणा..... नव्या क्षितिजाकडे गरुडझेप.....

आत्मसुधारणा म्हणजे काय तर स्वतःमध्ये बदल घडवून आणणे.... आत्मसुधारणेचा प्रयत्न करणे म्हणजेच आपल्या मनातील वादळास सामोरे जाणे होय...... म्हणजेच काय तर भावना, भ्रम, तुमची मते, व्यसने आणि वाईट सवयी इत्यादी गोष्टी ज्या तुम्हाला मागे खेचतात त्यावर मात करणे होय......

जुन्या, वाईट सवयींचा नायनाट केल्यावरच तुम्ही वर्तमान आणि भविष्याशी बांधील होऊ शकता... आता यासाठी गरजेचे काय तर आत्मपरीक्षण..... आत्मपरीक्षण सुरु करा..... आत्मपरीक्षणा मुळे आपल्याला आपण करीत असलेल्या चुका कळतात.... काय बदल अपेक्षित ते जाणवते....

तुमचा व्यवसाय सुधारण्यासाठीची क्षमता तुम्ही आत्मसुधारणा किती कराल यावर संबंधित आहे..... आपणच विचार करावा आता आपला व्यवसाय कुठे आहे आणि तो आपल्याला कुठवर न्यायचा आहे.... याचा विचार आताच करावा.....

पुढची पातळी गाठण्यासाठी जर तुम्हाला काही बदल करावे लागणार असतील तर स्वतःच्या विचारानुसार आणि इतरांच्या सल्ल्याने कोणत्या सुधारणा कराव्या लागतील हे शोधून काढा.... ज्या गोष्टींची वाढ होणे आवश्यक आहे..... त्यांचा पाठपुरवठा करत राहिलात..... तर तुमचा व्यवसाय वाढीस लागेल.....

या सर्व घडामोडीत आपण स्वतःमध्ये आत्मसुधारणा करू शकतो हा विश्वास महत्वाचा.... जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलात..... तर आव्हानांना सामोरे जाऊनही तुम्ही उत्तम उद्योजक बनाल...... 

मनुष्याने त्याच्या स्वतःच्या अनुभवांमधून सतत काहीतरी शिकावे..... त्यापासून योग्य तो बोध घेऊन आपण वैयक्तिक आणि सामाजिक प्रभावीपणा वाढवू शकतो आणि आपल्या व्यक्तिमत्त्वातील लपलेले मुळ नैसर्गिक नेतृत्वगुण शोधून काढू शकतो..... यामुळे आपण वैयक्तिक प्रभुत्व व्यवसायावर मिळवू शकतो.....

चला तर आपणही आत्मपरीक्षण करू...... आत्मसुधारणा करुया..... नव्या क्षितिजाकडे गरुडझेप घेऊया......

ॐ श्री गुरुदेव दत्त ....


करीन मी हें कृतार्थ जीवित... (मनशक्ती शिबीर – २००७)

स्वतःमधील चुका शोधण्यासाठी..‘ चुकणं ही प्रकृती'... आपली चूक मान्य करणं ही 'संस्कृती’... चांगल्या लोकांची इज्जत वा मान कधी कमी होत नाही... म्हणूनच कोणी कितीही मान तुडवला तरी आपण कशाला मनाला लावून घ्यायचे, हेच आपण जीवनात शिकले पाहिजे... सोन्याचे शंभर तुकडे करा, किंमत कमी होत नाहीं... माणसाने चुकणं ही प्रकृती', मान्य करणं ही 'संस्कृती ' आणि मग सुधारणा करणं ही 'प्रगती 'आहे... हे रस्ते लक्ष्यापर्यंत घेऊन जातीलच... तुम्ही योग्य तत्वांवर श्रद्धा आणि सबुरी ठेवा... आपण कधी ऐकलं आहे का... की रात्रीच्या काळोखानं सकाळ होऊच दिली नाही..!. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेमध्ये स्वभावदोष सारणी भरणे, ही महत्त्वाची कृती आहे. आता आपण ती कशी भरायची, हे जाणून घेऊया.

आपल्याकडून दिवसभरात घडलेल्या चुका स्वभावदोष-निर्मूलन सारणीत (डायरीत) वेळोवेळी लिहायच्या असतात... प्रथम चुका म्हणजे काय, ते समजून घेऊया... काही वेळा आपल्याकडून एखाद्या परिस्थितीत माझे माझे होते, मग कोणी विरोध केला कि यावर विचार न होता, माझा अपमान होतोय असे आपण समजतो... मग अशावर चुकीचे बोलले जाते किंवा निरर्थक हट्ट करण्यासारखी एखादी अयोग्य कृती होते... या जशा चुका आहेत, तसेच मनात अयोग्य विचार, प्रतिक्रिया किंवा भावना निर्माण होणे, यासुद्धा चुका आहेत... उदा. दुसर्‍याविषयी मनात राग-द्वेषाची भावना निर्माण होणे इत्यादी... याशिवाय कोणत्याही विषयात आपला मनोनिग्रह, सातत्य, कष्टप्रवृत्ती नसणे याही आपल्या मानसिक-शारीरिक चुकाच... या सर्व चुका कशा शोधायच्या, हे आता पाहूया...

स्वतःच्या चुका शोधायची स्वतःला सवय लावून घ्या : आपण दैनंदिन व्यवहार करतांना ‘मला माझ्या चुका शोधायच्याच आहेत’, असा दृढ निश्चय करून सतर्कता बाळगली, तर स्वतःच्या पुष्कळ चुका स्वतःच्या लक्षात येतात... मात्र यासाठी आपण मागे घडलेली प्रत्येक गोष्ट त्रयस्थ दृष्टीकोनातून पाहिली पाहिजे... कमीपणा आपण आपल्याकडे घेण्यास शिकले पाहिजे, मोठेपणाने पाहिल्यास आपला मान आणि अहंकार आपले दोष लपवतो... 

‘चुकीमध्ये स्वतःचा किती सहभाग होता’, असा संकुचित विचार करू नका : कधी कधी चूक स्वीकारली जाते; परंतु ती स्वीकारतांना ‘चुकीमध्ये माझा अत्यल्प सहभाग होता’, असा विचार आपल्याकडून केला जातो... मुलांनो, असा विचार करणेही आपल्यात सुधारणा होण्याच्या दृष्टीने हानीकारक ठरते... झालेल्या चुकीमध्ये स्वतःचा थोडासा जरी सहभाग असला, तरी त्याचे पूर्ण दायित्व (जबाबदारी) आपणच घेऊन चूक स्वीकारावी... 

स्वतःच्या चुका कळण्यासाठी दुसर्‍यांचे साहाय्य घ्या : मुलांनो, कधी कधी काही चुका स्वतःच्या लक्षात येत नाहीत... अशा चुका लक्षात आणून देण्यास आई-वडील, भाऊ-बहीण, मित्रपरिवार इत्यादींना सांगून ठेवावे... वारंवार त्यांची फीडब्याक घ्यावी, आणि आपल्यात सुधारणा करावी... सर्वच बाबतीत आपण नम्रतेने कमीपणा घेऊन पुढे गेलो कि आपली खूप प्रगती करतो... 

यासाठी आपण आपल्यास तयार करणे फार महत्वाचे ठरते... इतरांनी लक्षात आणून दिलेली चूक प्रथम मान्य करावी : कधी कधी दुसर्‍या कोणी एखादी चूक सांगितल्यावर काही मुले चूक मान्य करत नाहीत... तसेच ‘ही चूक नाहीच वा मी केली नाही, तर याने केल-त्याने केले, असे सांगून स्वतःची चूक दुसर्‍यावर ढकलतात... याने आपल्या चुकांवर पांघरून घालण्याची सवय लागते... काहीवेळा पालकही आपल्या मुलांवरील प्रेमाने चुका झाकतात वा चारचौघांसमोर त्यांचीच बाजू घेतात... त्यामुळे त्यांच्याकडून सुधारण्यासाठी चांगले प्रयत्न होऊन त्यांचे स्वभावदोषही लवकर दूर होत नाहीत... यासाठी मुलांनो, कोणीही सांगितलेल्या चुकीवर समर्थन न करता ती चूक स्वीकारावी... जरी आपणास आपले चूक नाही असे वाटले तरी नम्रतेने ते स्वीकारावे, त्यावर चिंतन-मनन करावे... 

दुसर्‍याच्या चूक सांगण्याच्या पद्धतीकडे लक्ष न देता चूक स्वीकारावी : मुलांनो, काही वेळा ताई (किंवा दादा) तुमची चूक सांगते; पण तिचा स्वर चढलेला (रागाचा) असतो... खरेतर तुमच्याकडून चूक झाली आहे, हे तुम्हाला मनातल्या मनात मान्य असते; परंतु ताईची सांगण्याची पद्धत न आवडल्याने तुम्ही तिने सांगितलेली चूक स्वीकारत नाही... मात्र असे करणे योग्य नाही... ताईच्या (किंवा दादाच्या) बोलण्याच्या पद्धतीकडे लक्ष न देता तिने सांगितलेली चूक स्वीकारावी... 

आपण वयाने लहान असू किंवा मोठे... आयुष्याच्या आरंभापासून ते अंतापर्यंत आपण नेहमी शिकत असतो... आपली ही प्रक्रिया निरंतर सुरू असते... त्यामुळे आपल्याला गुरु किंवा शिक्षक कोणीना कोणीतरी असतोच... लहान असताना आपली आई आपला गुरु असते... शाळेत जायला लागल्यानंतर शाळेतील शिक्षक, पुढे महाविद्यालयातील शिक्षक आपले गुरु होतात... एखाद्या कलेचे शिक्षण आपण घेत असू तर ती कला शिकण्यासाठी आपण ज्यांच्याकडे जातो, ते आपले गुरु असतात... या सर्व गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या चुका कमी करत पुढे वाटचाल करीत जावे... 

आपले शैक्षणिक शिक्षण संपल्यानंतर आपण नोकरी-व्यवसायाला सुरुवात करतो... येथेही आपल्याला सुरुवातीला कोणीना कोणी शिकवत असतात... त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्याला करून देतात जेणे आपल्या चुका कमी होतात... त्या शिदोरीवर आपण आपली प्रगती करून घेत असतो... जो आपली प्रगती करतो तो गुरु... गुरु हा वयाने लहान किंवा मोठा असू शकतो... गुरु म्हणजे तो आपल्यापेक्षा मोठाच असला पाहिजे असे नाही... आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्याकडूनही आपण काही शिकत असतो...

आपल्या आय़ुष्यात तसेच समाजात वावरताना आपण शिकण्याची सवय ठेवावी... मला सर्व काही येते, हे माहित आहे, अशी भावना ठेवणे योग्य नाही... आपल्यात काही कमीपणा असेल, तर तो मोकळेपणाने मान्य करण्यात काही चूक नाही... तुम्हालाही असा अनुभव कधी ना कधी आला असेल की आपल्याला न येणारी किंवा न जमणारी एखादी गोष्ट आपण दुसऱयाकडून शिकलो आहोत... जे दुसऱयाकडून शिकणे आहे, त्यालाच समोरच्याला मोठेपणा देणे आणि आपण शिष्यत्व पत्करणे असे म्हणता येईल... हि नम्रता आपण आयुष्यभर ठेवली तर जीवन कृतार्थ होण्यास कितीसा अवधी लागेल... करीन मी हें कृतार्थ जीवित | गुरुसवे मम यथार्थ ओळख ||..    ॐ श्री गुरुदेव दत्त... 



Sunday, 13 May 2012

आपले अस्तित्व घडवणारी.... आई म्हणजे आई.....

आई हा एक शब्द आहे.... असं म्हणण व्यर्थ आहे..... कारण त्यात आहे जे वात्सल्य शब्दात उतरवणं आहे ते अशक्य.... आई म्हणजे आई... जशी वात्सल्याची दाई.... आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर..... आई म्हणजे मंदिराचा कळस, आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस....

जेव्हा फळाच्या टोकरीत ४ आंबे असतात आणि घरात ५ सदस्य असतात.......तेव्हा आई म्हणते मला आंबा आवडत नाही.... अशीच असते आई... आई म्हणजे आई असते कारण वेदनेनंतरची पहिली आरोळी.... आईच असते.... खरच. स्पर्शातली जादू कुणाजवळ असेल...? उत्तर एकच... आई जवळ ..... ममता, माया आणि खरा आपलेपणा..... ओलाव्याचा तो स्पर्श.... अनेक समस्यांवरचा तो एकच उपाय.... आईचा मायेचा स्पर्श ...... 
 
आई अशी एकच व्यक्ती आहे....जी तुम्हाला इतरांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखत असते..... आई, हजार जन्म घेतले तरी एका जन्माचे ऋण फीटणार नाही..... आई म्हणजे देव पृथ्वीवरचा.... आई म्हणजे साठा सुखाचा.... आई म्हणजे मैत्रीण गोड.... आई म्हणजे मायेची ओढ.... 

आई म्हणजे प्रेमाची माउली..... आई म्हणजे दयेची सावली..... आई म्हणजे स्वतः उपाशी राहून....आपल्याला भरवणारी..... आई म्हणजे जीवाचं रान करून....आपल्यासाठी राबणारी.....आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी..... व कधी ओरडून समजावणारी.... आईच बोट धरून चालायला शिकवणारी..... आईच आपले अस्तित्व घडवणारी.....त्याची किमयागार म्हणजे आई.....

शोधून मिळत नाही पुण्य.... सेवार्थाने व्हावे धन्य..... कोण आहे तुजविण अन्य...? ‘आई’ तुजविण जग हे शून्य.....

लक्षात ठेवा..... आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा..... पण कोणत्याही गोष्टीसाठी आई-वडिलांना सोडू नका..... कारण जीवनात एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल.... पण आई-वडिलांची साथ ही नेहमीच तुमच्याबरोबर आयुष्यभर असेल....

खालील कविता.... श्री मुकुंद आनंद ढाके यांनी आई, प्रमिला आनंद ढाके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पाठविलेली ....

जगी माऊली सारखे कोण आहे ।
जिचे जन्मजन्मांतरी ऋण आहे ।।

असे ऋण हे की जया व्याज नाही ।
ऋणाविन त्या जीवना साज नाही ।।

जिने सोसल्या यातना कोटी कोटी ।
तुला जन्म लाभे तिच्या पुण्य पोटी ।।

जिच्या यातनाचे जगी मोल नाही ।
तिच्या सारखा लाघवी बोल नाही ।।

जिने लाविला लेकरांना लळा या ।
तिच्या दैवी लेखी उन्हाळी झळा या ।।

जिच्या पूजनाला जगी फूल नाही ।
अशा देवतेचे जगी नाव आई ।।

ॐ श्री गुरुदेव दत्त ....

Wednesday, 9 May 2012

Thought of the day...



From our parents we learn how to walk in life…. But when we opened books we discover that we have Wings… we can Fly….. Reading Books can make a Difference in Your Life... ॐ श्री गुरुदेव दत्त ....


Cold is not the opposite of heat... And darkness is not the opposite of light… They are just the absence of heat or the absence of light… So.. Evil is not the opposite of good, but the absence of good… 

Evil is the disturbance of natural law by an agent of free will, in this case human beings… All naturally occurring things in the universe obey God's law… Only those with the capability of disobeying God's law (natural law) cause Evil…

Problems are a test for human beings to choose the right or wrong thing to so in the situation… Sure, some things that may seem to be Evil occur in Solutions… The question is: how do we react.?. The choices we make are what we will be judged upon… That’s in Geeta called Karma…ॐ श्री गुरुदेव दत्त ....


























Friday, 4 May 2012


आपला रोजचा दिनक्रम आपले व्यक्तिमत्व घडवतो.......

पाण्यात आपण पडलो की पोहता येत म्हणतात...... पण पोहण्यात प्राविण्य मिळवायचं... स्पर्धेत सहभागी व्हायचं.... जिंकायचं आणि आपल्यातील सुप्त गुण फुलवून त्याचं पारितोषिकात रूपांतर करायचं.... ही गोष्ट सोपी आणि सहजसाध्य नाही.... आयुष्य हे असेच असते ... जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल.... तर त्यासाठी लागते अविश्रांत मेहनत, एकाग्रता, जिद्द आणि ध्येयपूतीर्साठीची तळमळ.... हे सारे गुण अंगी असतील तर यश हाती येणारच....    यासाठीच आपला रोजचा दिनक्रम नियोजित हवा....    आपण आपल्या रोजच्या दिनक्रमानुसार वागू हे पाळले पाहिजे.....

वेळेचे महत्त्व ....आपल्याकडे वेळ फार कमी आहे हे प्रथम जाणून घ्यावे.... असलेल्या आयुष्याच्या वेळेत स्व विकास करणे सर्वस्वी आपल्याच हाती आहे.... आपले प्रत्येक कार्यच चांगले संस्कारयुक्त असावयास पाहिजे.... उदा. केळी खाऊन आपण साले टाकतो ही कृती आहे.... केळे खाऊन साल कचऱ्याच्या टोपलीत टाकणे ही प्रकृती आहे. .... केळे खाऊन साल रस्त्यावर टाकणे ही विकृती आहे. .... दुसऱ्याने रस्त्यावर टाकलेली साल कचऱ्याच्या डब्यात टाकणे ही झाली संस्कृती....

मनन करून, सर्वांगीण विचार करून.... कृती करतो तोच खरा माणूस..... विचार व कृती चांगल्या होण्यासाठी संस्कारांची गरज असते.... संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार व दोषांचा भागाकार..... संस्कार म्हणजे चांगल्या सवयी लावणे व वाईट सवयी काढून टाकणे होय...... यासाठीच आपला दिनक्रम चांगला व्यवस्थित नियोजित संस्कारी पाहिजे.... ज्यायोगे आपण आपला विकास साधू शकू.....

आपला रोजचा दिनक्रम असा असावा....

रोज सकाळी लवकर उठावे..... कराग्रे वसते लक्ष्मी: ... हा श्लोक म्हणून झाल्यावर भूमीला प्रार्थना करून पुढील श्लोक म्हणावा आणि भूमीवर पाऊल टाकावे..... समुद्रवसने देवि पर्वतस्तनमंडले । विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ।।..... श्रीराम

व आपल्या कार्यास प्रारंभ करावा... सकाळी गुरुनी दिलेली साधना किंवा नामस्मरण किंवा ध्यान धारणा करावी...... प्रभात फेरीला जावे.... ज्यामुळे शरीराला योग्य व्यायाम मिळेल..... आपले कपडे धुवावे... जीवनात स्वावलंबी व्हावे.... परावलंबी होऊ नये.... आई वडिलाना, मोठ्या माणसाना वंदन करावे..... सकाळचा हा दिनक्रम झाला कि आपल्या कामास जावे....असा दिनक्रम झाल्यास पूर्ण दिवस उत्तम जातो.....

आपल्याला जसा वेळ मिळेल तसा पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करावा कि ज्यायोगे आपल्या ज्ञानात भर पडेल..... आपल्या मनाला कशात न कशात तरी गुंतवून ठेवावे.... यावेळी पुस्तके वाचणे सर्वोत्तम... जो आवडेल त्या विषयाची पुस्तके वाचणे.... वाचाल तर वाचाल..... पुस्तकासारखा मित्र नाही...... प्रतिकूल परिस्थितीतही चांगले जीवन घडवण्याचे काम पुस्तके करतात....... 

विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वाचन करुन ज्ञान ग्रहण करायला हवे.,,,,, साहित्याकडे डोळसपणे पाहिल्यास उत्तम भवितव्य घडते.... आज चांगले वाचन केले तर उद्या उत्तम नेतृत्व करू शकू .... आपण जेवढ चांगल वाचू त्याच प्रतिबिंब आपल्या वागण्या बोलण्यात जाणवेल... शब्दांवर वर्चस्व येईल.... शक्यतो विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदांची पुस्तके वाचणे.....

रात्री आपण दिवस भरात काय केले याचा मागोवा घेणे फार महत्वाचे .... विचार मनन करणे... आपले काही चुकले का... कसे वागलो... ते बघणे.... दिवसभराच्या नोंदी डायरीत लिहिणे... डायरी लिहिण्याची सवय लावावीच... पुढील आयुष्यात फार उपयोगी पडते....

बघा प्रयत्न करा... आपल्या सर्वाना हे जमेलच... हा दिनक्रम अंगवळणी पडला कि आपणच त्याच्यात सुधारणा करू शकतो.... कारण तोपर्यंत आपले विचार प्रगल्भ झालेले असतील....

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

Wednesday, 2 May 2012

अपयशाला घाबरू नका....  प्रयत्न करा....  यशस्वी व्हा....

एका बागेत लहान मुलगी सायकल शिकत असते..... सायकल चालवताना ती पडते आणि रडू लागते..... पडल्यानंतर मुलं रडतातच,  त्यात विशेष ते काय ..... त्या मुलीला फार लागलेलं नसतं..... पण तिचे वडील मात्र तिच्या पडण्याने खूप धास्तावतात..... तिला उगी करता करता घरी जायच्या गडबडीत ते सायकलही तिथेच विसरतात..... 

दुस-या दिवशी ती मुलगी सायकल शिकायला परत येत नाही..... लहान मूलच ते..... पडल्यानंतर थोडं तरी घाबरणारच..... सायकल चालवण्याची इच्छा त्या मुलीच्याही मनात असणार...... पण.. पण मुलांना अधिक लाडाकोडात, फार जपत वाढवण्यापेक्षा.... त्यांच्या मनीच्या गोष्टी पालकांनी समजून घेणं आवश्यक असतं......

मुलांचं पालनपोषण आज सहज होताना दिसत नाही..... तर विशिष्ट मानसिक दृष्टिकोनातून पालक ठरवून त्यांना मोठं करत असतात.....   यात मुलांना पडण्याची संधी नसतेच.... म्हणूनच मग त्रास किंवा तणाव सहन करण्याची या मुलांना सवय राहात नाही..... पडणं किंवा पराजय कधी स्वीकारलाच नसल्याने... छोटय़ा अपयशाच्या विचारानेही ते आततायी कृत्य करून बसतात.....

अपयश अनेकदा एखाद्या समंजस माणसाचाही घात करतं..... अपयशाच्या गर्तेत माणूस इच्छाशक्ती, आत्मविश्वास, योग्य दिशा सारंच हरवून बसतो..... पण जो या गोष्टींना घट्ट चिकटून राहतो..... फक्त त्याच्यात अपयश यशात बदलण्याची क्षमता असते..... 

दिवस-रात्रीच्या चक्राप्रमाणेच जय पराजयाचंही असतं...  ना रात्रीचा अंधार कायम असतो.... ना दिवसाचा उजेड..... यशाच्या शिखरावरील व्यक्तीला अहंकाराचा वारा स्पर्शू शकतो..... तर अपयशी व्यक्ती विनम्र, सुधीर, आशादायी बनू शकते..... अपयशाने विवश झालेल्या व्यक्तीला अज्ञात रस्ते चाचपडताना नवा मार्ग सापडू शकतो.....

अपयश आपल्याला खूप काही शिकवते.... पण ते जे काही शिकवते ते जाणून, समजून, शिकून घेण्याची सर्वस्वी जबाबदारी हि आपलीच असते.... त्यातून  योग्य बोध घ्यावा..... हे जाणून घ्या.....   

अपयश आपल्याला चांगलेच  शिकवून जाते.....  आपण अपयश विसरून आणखी एका नव्या ध्येयासाठी सज्ज व्हायचे..... आपले सर्व लक्ष ध्येयाच्या तयारीवरच करायचे...... आतापर्यंत ज्या चुका केल्या, त्या पुन्हा करायच्या नाहीत..... हे मात्र यावेळी कटाक्षाने पाळायचे...... 

संधी मिळाल्यास अवघड काम तडीस नेण्याची क्षमता आपल्यामध्ये असते..... फक्त स्वत:वरील विश्‍वास ढळू देऊ नका..... आयुष्यात जे काही कराल, ते मनापासून करा..... तरच तुमच्याकडून महान कार्य घडू शकेल...... 

कुणाचेहि अनुकरण न करता नव्या वाटांचा शोध घेत असाल... तर यातून तुमचे वेगळेपण किंवा असामान्यत्व सिद्ध होऊ शकते..... यश आणि अपयश यातील सीमारेषा खूप धूसर आहे..... त्यामुळे अपयश पदरी येणार असेल, तरी आत्मविश्‍वास ढळू देऊ नका...... यातून पुढे उत्तुंग गरुड भरारी घेता येते.....

ॐ श्री गुरुदेव दत्त .....


जीवन ओळखा ....  कष्ट करा ....  खरी गुंतवणुक स्वतःमध्येच करा...

आपण सुखी जीवनाविषयी एक प्रतिमा करून ठेवतो.... सुखी कोण तर.... कोणतेही शारीरिक कष्ट न करता जे जगतात ..... सुख म्हणजे सुरक्षित आयुष्य असा अर्थ  आपण करतो.... आयुष्यात कोणताही धोका न पत्करता जर जगता आलं, तर फारच उत्तम... अशीहि धारणा आपण ठेवतो....

पण एक विसरतो... जीवनाचे खरे स्वरूप.. मर्म तर कष्टाशी तडजोड न करण्यातच आहे .... यानेच आपले जीवन सुंदर, समृध्द होते.... जर का चांगल्या मूल्यांवर श्रद्धा.... समर्पण भावना.... कष्टाशी तडजोड न करता.... निरंतर कष्ट करण्याची वृत्ती ठेवल्यास जीवन ख-या अर्थाने फुलते.... आपण जीवनात यशस्वी होतो ....

आपणच बघा..... लता मंगेशकर, स्वामी विवेकानंद, डॉ. ए पी जे कलाम, रघुनाथ माशेलकर, आदी जग न्मान्य व्यक्ती प्रसिद्धीत येण्यापूर्वी जीवनात  किती कष्ट घेतले होते आणि त्यांनी स्वतःचे जीवन कसे घडवले, याचा मागोवा आपण घेतला पाहिजे.... अभ्यास केला पाहिजे....

आज आपण पाहतो..... कोणतीही गोष्ट सहज आणि पटकन मिळाली पाहिजे.... असा विचार आजच्या पिढीत बळावताना दिसत आहे..... या विचारातील फोलपणा ध्यानात येईपर्यंत उशीर झालेला असतो..... म्हणून आपण जीवनाकडे डोळसपणे पाहायला लवकर शिकले पाहिजे.... उत्तम शाश्वत विचारांना घरोघरी पोहोचविले पाहिजे..... अशा स्थितीत मनाला स्थैर्य देऊन आपल्या प्रगतीला सहाय्यक ठरणार्‍या विचारांची निकड आहे..... अशावेळी चांगले विचारच आपल्या मदतीला धावून येतात...... 

आपण काय करतो ..... आर्थिक गरजेपोटी आयुष्यभर धडपडत असतो.... पण एक विसरतो पैशाने माणसाला घडवले नसुन माणसाने पैसा बनवला आहे..... यासाठी चांगले ध्येय ठेवा.... योग्य गोष्टीसाठी अपार कष्ट करा..... मेहनत कधीच वाया जात नाही.... पण काम न करता केलेली बाप्ष्फळ बडबड माणसाला लयास नेल्या खेरिज राहत नाही..... हे विसरू नका.... 

जगताना तडजोड ही करावी लागते.... कारण मनाप्रमाणे नेहमी घडत नाही..... असा विचार करावा.... मी जे ठरवलं आहे.... ते करण्यात मला खरा रस आहे..... त्यातून मला जी उर्जा, चेतना मिळणार आहे.... तिला कोणीच थोपवणार नाही.... कारण सगळं माझ्यावरच अवलंबून आहे.... मी कष्ट, मेहनत करीन.... माझं कामावरच प्रेम असल्याने त्यातून जे काही मिळेल..... त्यात माझं समाधान आहे..... 

आपली परिस्थिती बघून पाऊल टाकता आले पाहिजे.... ज्यांना हे जमत नाही, त्यांना काळ कठीण आहे...... कठीण काळावरही मात करता येते, ती केली पाहिजे.....अल्बर्ट आईनस्टाइनचे एक वाक्य आहे..... माझे संशोधन सफल होवो अथवा न होवो, मी कसून प्रयत्न केला , ह्याचा मला आनंद होतो.... तसाच विचार आपण करून आपले प्रयत्न केले पाहिजेत.....

आपण आपले व्यक्तिमत्व परिपूर्ण बनविले पाहिजे.... . थोडक्यात आपलं व्यक्तिमत्व आपल्या हाती आहेच....  पण समाजाचं व्यक्तिमत्व आणि राष्ट्राचं व्यक्तिमत्व बदलण्याचं सामर्थ्यही आपल्याच हातात आहे..... वैचारिक स्पष्टता जपणारे..... मनाला उन्नत करण्यास सहाय्य करणारे.... देशभक्ती जागविणारे विचार घरोघरी पोहोचविण्याचा प्रयत्न करा.....

चला आपण खरी गुंतवणुक स्वतःमध्येच करुया.... चांगले विचार, संस्कार मनात रुजुवूया .... आणि एक सुखी, समाधानी आणी शांत जीवन जगुया......

ॐ श्री गुरुदेव दत्त .......