Thursday, 31 May 2012

स्वप्न आणि सत्य.....


एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले..... विषय होता भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा.... दोघे ही खुप भांडले, झगडले पण निर्णय काही होईना.... शेवटी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ते आपल्या मानसपित्याकडे ब्रम्हदेवाकडे गेले.....

ब्रम्हदेवाने त्यांना सांगितले, "ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील आणि तरीही ज्याचे पाय जमिनीवर असतील, त्याचा... भविष्या घडविण्यात निर्णायक सहभाग असतो".... दोघेही परत आले.... स्वप्नाने आधी प्रयत्न केला.... एकाच उडीत त्याचे हात आभाळाला टेकले, पण त्याचे पाय जमिनीपासुन केंव्हाच उचलले गेले होते.....

सत्याने नंतर प्रयत्न केला..... त्याचे पाय कायम जमिनीवर होते, पण त्याचे हात आभाळापर्यंत कधीच पोहचु शकले नाहीत..... दोघांनीही खुप प्रयत्न केले, पण दोघांपैकी कोणीच यशस्वी होउ शकले नाही.... थकुन परत एकदा ते ब्रम्हदेवाकडे गेले, आणि या वेळेस ब्रम्हदेवाने त्यांना सांगितले..... "भविष्य घडविण्यात सत्य, आणि स्वप्न या दोघांचाही सहभाग तितकाच मोलाचा असतो..... खर्‍या अर्थाने यशस्वी भविष्य घडवायचे असेल, तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे  रहायला हवे......

Source : Internet......

No comments:

Post a Comment