Wednesday 2 May 2012

जीवन ओळखा ....  कष्ट करा ....  खरी गुंतवणुक स्वतःमध्येच करा...

आपण सुखी जीवनाविषयी एक प्रतिमा करून ठेवतो.... सुखी कोण तर.... कोणतेही शारीरिक कष्ट न करता जे जगतात ..... सुख म्हणजे सुरक्षित आयुष्य असा अर्थ  आपण करतो.... आयुष्यात कोणताही धोका न पत्करता जर जगता आलं, तर फारच उत्तम... अशीहि धारणा आपण ठेवतो....

पण एक विसरतो... जीवनाचे खरे स्वरूप.. मर्म तर कष्टाशी तडजोड न करण्यातच आहे .... यानेच आपले जीवन सुंदर, समृध्द होते.... जर का चांगल्या मूल्यांवर श्रद्धा.... समर्पण भावना.... कष्टाशी तडजोड न करता.... निरंतर कष्ट करण्याची वृत्ती ठेवल्यास जीवन ख-या अर्थाने फुलते.... आपण जीवनात यशस्वी होतो ....

आपणच बघा..... लता मंगेशकर, स्वामी विवेकानंद, डॉ. ए पी जे कलाम, रघुनाथ माशेलकर, आदी जग न्मान्य व्यक्ती प्रसिद्धीत येण्यापूर्वी जीवनात  किती कष्ट घेतले होते आणि त्यांनी स्वतःचे जीवन कसे घडवले, याचा मागोवा आपण घेतला पाहिजे.... अभ्यास केला पाहिजे....

आज आपण पाहतो..... कोणतीही गोष्ट सहज आणि पटकन मिळाली पाहिजे.... असा विचार आजच्या पिढीत बळावताना दिसत आहे..... या विचारातील फोलपणा ध्यानात येईपर्यंत उशीर झालेला असतो..... म्हणून आपण जीवनाकडे डोळसपणे पाहायला लवकर शिकले पाहिजे.... उत्तम शाश्वत विचारांना घरोघरी पोहोचविले पाहिजे..... अशा स्थितीत मनाला स्थैर्य देऊन आपल्या प्रगतीला सहाय्यक ठरणार्‍या विचारांची निकड आहे..... अशावेळी चांगले विचारच आपल्या मदतीला धावून येतात...... 

आपण काय करतो ..... आर्थिक गरजेपोटी आयुष्यभर धडपडत असतो.... पण एक विसरतो पैशाने माणसाला घडवले नसुन माणसाने पैसा बनवला आहे..... यासाठी चांगले ध्येय ठेवा.... योग्य गोष्टीसाठी अपार कष्ट करा..... मेहनत कधीच वाया जात नाही.... पण काम न करता केलेली बाप्ष्फळ बडबड माणसाला लयास नेल्या खेरिज राहत नाही..... हे विसरू नका.... 

जगताना तडजोड ही करावी लागते.... कारण मनाप्रमाणे नेहमी घडत नाही..... असा विचार करावा.... मी जे ठरवलं आहे.... ते करण्यात मला खरा रस आहे..... त्यातून मला जी उर्जा, चेतना मिळणार आहे.... तिला कोणीच थोपवणार नाही.... कारण सगळं माझ्यावरच अवलंबून आहे.... मी कष्ट, मेहनत करीन.... माझं कामावरच प्रेम असल्याने त्यातून जे काही मिळेल..... त्यात माझं समाधान आहे..... 

आपली परिस्थिती बघून पाऊल टाकता आले पाहिजे.... ज्यांना हे जमत नाही, त्यांना काळ कठीण आहे...... कठीण काळावरही मात करता येते, ती केली पाहिजे.....अल्बर्ट आईनस्टाइनचे एक वाक्य आहे..... माझे संशोधन सफल होवो अथवा न होवो, मी कसून प्रयत्न केला , ह्याचा मला आनंद होतो.... तसाच विचार आपण करून आपले प्रयत्न केले पाहिजेत.....

आपण आपले व्यक्तिमत्व परिपूर्ण बनविले पाहिजे.... . थोडक्यात आपलं व्यक्तिमत्व आपल्या हाती आहेच....  पण समाजाचं व्यक्तिमत्व आणि राष्ट्राचं व्यक्तिमत्व बदलण्याचं सामर्थ्यही आपल्याच हातात आहे..... वैचारिक स्पष्टता जपणारे..... मनाला उन्नत करण्यास सहाय्य करणारे.... देशभक्ती जागविणारे विचार घरोघरी पोहोचविण्याचा प्रयत्न करा.....

चला आपण खरी गुंतवणुक स्वतःमध्येच करुया.... चांगले विचार, संस्कार मनात रुजुवूया .... आणि एक सुखी, समाधानी आणी शांत जीवन जगुया......

ॐ श्री गुरुदेव दत्त .......

No comments:

Post a Comment