Monday 14 May 2012

आत्मपरीक्षण...... आत्मसुधारणा..... नव्या क्षितिजाकडे गरुडझेप.....

आत्मसुधारणा म्हणजे काय तर स्वतःमध्ये बदल घडवून आणणे.... आत्मसुधारणेचा प्रयत्न करणे म्हणजेच आपल्या मनातील वादळास सामोरे जाणे होय...... म्हणजेच काय तर भावना, भ्रम, तुमची मते, व्यसने आणि वाईट सवयी इत्यादी गोष्टी ज्या तुम्हाला मागे खेचतात त्यावर मात करणे होय......

जुन्या, वाईट सवयींचा नायनाट केल्यावरच तुम्ही वर्तमान आणि भविष्याशी बांधील होऊ शकता... आता यासाठी गरजेचे काय तर आत्मपरीक्षण..... आत्मपरीक्षण सुरु करा..... आत्मपरीक्षणा मुळे आपल्याला आपण करीत असलेल्या चुका कळतात.... काय बदल अपेक्षित ते जाणवते....

तुमचा व्यवसाय सुधारण्यासाठीची क्षमता तुम्ही आत्मसुधारणा किती कराल यावर संबंधित आहे..... आपणच विचार करावा आता आपला व्यवसाय कुठे आहे आणि तो आपल्याला कुठवर न्यायचा आहे.... याचा विचार आताच करावा.....

पुढची पातळी गाठण्यासाठी जर तुम्हाला काही बदल करावे लागणार असतील तर स्वतःच्या विचारानुसार आणि इतरांच्या सल्ल्याने कोणत्या सुधारणा कराव्या लागतील हे शोधून काढा.... ज्या गोष्टींची वाढ होणे आवश्यक आहे..... त्यांचा पाठपुरवठा करत राहिलात..... तर तुमचा व्यवसाय वाढीस लागेल.....

या सर्व घडामोडीत आपण स्वतःमध्ये आत्मसुधारणा करू शकतो हा विश्वास महत्वाचा.... जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलात..... तर आव्हानांना सामोरे जाऊनही तुम्ही उत्तम उद्योजक बनाल...... 

मनुष्याने त्याच्या स्वतःच्या अनुभवांमधून सतत काहीतरी शिकावे..... त्यापासून योग्य तो बोध घेऊन आपण वैयक्तिक आणि सामाजिक प्रभावीपणा वाढवू शकतो आणि आपल्या व्यक्तिमत्त्वातील लपलेले मुळ नैसर्गिक नेतृत्वगुण शोधून काढू शकतो..... यामुळे आपण वैयक्तिक प्रभुत्व व्यवसायावर मिळवू शकतो.....

चला तर आपणही आत्मपरीक्षण करू...... आत्मसुधारणा करुया..... नव्या क्षितिजाकडे गरुडझेप घेऊया......

ॐ श्री गुरुदेव दत्त ....


करीन मी हें कृतार्थ जीवित... (मनशक्ती शिबीर – २००७)

स्वतःमधील चुका शोधण्यासाठी..‘ चुकणं ही प्रकृती'... आपली चूक मान्य करणं ही 'संस्कृती’... चांगल्या लोकांची इज्जत वा मान कधी कमी होत नाही... म्हणूनच कोणी कितीही मान तुडवला तरी आपण कशाला मनाला लावून घ्यायचे, हेच आपण जीवनात शिकले पाहिजे... सोन्याचे शंभर तुकडे करा, किंमत कमी होत नाहीं... माणसाने चुकणं ही प्रकृती', मान्य करणं ही 'संस्कृती ' आणि मग सुधारणा करणं ही 'प्रगती 'आहे... हे रस्ते लक्ष्यापर्यंत घेऊन जातीलच... तुम्ही योग्य तत्वांवर श्रद्धा आणि सबुरी ठेवा... आपण कधी ऐकलं आहे का... की रात्रीच्या काळोखानं सकाळ होऊच दिली नाही..!. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेमध्ये स्वभावदोष सारणी भरणे, ही महत्त्वाची कृती आहे. आता आपण ती कशी भरायची, हे जाणून घेऊया.

आपल्याकडून दिवसभरात घडलेल्या चुका स्वभावदोष-निर्मूलन सारणीत (डायरीत) वेळोवेळी लिहायच्या असतात... प्रथम चुका म्हणजे काय, ते समजून घेऊया... काही वेळा आपल्याकडून एखाद्या परिस्थितीत माझे माझे होते, मग कोणी विरोध केला कि यावर विचार न होता, माझा अपमान होतोय असे आपण समजतो... मग अशावर चुकीचे बोलले जाते किंवा निरर्थक हट्ट करण्यासारखी एखादी अयोग्य कृती होते... या जशा चुका आहेत, तसेच मनात अयोग्य विचार, प्रतिक्रिया किंवा भावना निर्माण होणे, यासुद्धा चुका आहेत... उदा. दुसर्‍याविषयी मनात राग-द्वेषाची भावना निर्माण होणे इत्यादी... याशिवाय कोणत्याही विषयात आपला मनोनिग्रह, सातत्य, कष्टप्रवृत्ती नसणे याही आपल्या मानसिक-शारीरिक चुकाच... या सर्व चुका कशा शोधायच्या, हे आता पाहूया...

स्वतःच्या चुका शोधायची स्वतःला सवय लावून घ्या : आपण दैनंदिन व्यवहार करतांना ‘मला माझ्या चुका शोधायच्याच आहेत’, असा दृढ निश्चय करून सतर्कता बाळगली, तर स्वतःच्या पुष्कळ चुका स्वतःच्या लक्षात येतात... मात्र यासाठी आपण मागे घडलेली प्रत्येक गोष्ट त्रयस्थ दृष्टीकोनातून पाहिली पाहिजे... कमीपणा आपण आपल्याकडे घेण्यास शिकले पाहिजे, मोठेपणाने पाहिल्यास आपला मान आणि अहंकार आपले दोष लपवतो... 

‘चुकीमध्ये स्वतःचा किती सहभाग होता’, असा संकुचित विचार करू नका : कधी कधी चूक स्वीकारली जाते; परंतु ती स्वीकारतांना ‘चुकीमध्ये माझा अत्यल्प सहभाग होता’, असा विचार आपल्याकडून केला जातो... मुलांनो, असा विचार करणेही आपल्यात सुधारणा होण्याच्या दृष्टीने हानीकारक ठरते... झालेल्या चुकीमध्ये स्वतःचा थोडासा जरी सहभाग असला, तरी त्याचे पूर्ण दायित्व (जबाबदारी) आपणच घेऊन चूक स्वीकारावी... 

स्वतःच्या चुका कळण्यासाठी दुसर्‍यांचे साहाय्य घ्या : मुलांनो, कधी कधी काही चुका स्वतःच्या लक्षात येत नाहीत... अशा चुका लक्षात आणून देण्यास आई-वडील, भाऊ-बहीण, मित्रपरिवार इत्यादींना सांगून ठेवावे... वारंवार त्यांची फीडब्याक घ्यावी, आणि आपल्यात सुधारणा करावी... सर्वच बाबतीत आपण नम्रतेने कमीपणा घेऊन पुढे गेलो कि आपली खूप प्रगती करतो... 

यासाठी आपण आपल्यास तयार करणे फार महत्वाचे ठरते... इतरांनी लक्षात आणून दिलेली चूक प्रथम मान्य करावी : कधी कधी दुसर्‍या कोणी एखादी चूक सांगितल्यावर काही मुले चूक मान्य करत नाहीत... तसेच ‘ही चूक नाहीच वा मी केली नाही, तर याने केल-त्याने केले, असे सांगून स्वतःची चूक दुसर्‍यावर ढकलतात... याने आपल्या चुकांवर पांघरून घालण्याची सवय लागते... काहीवेळा पालकही आपल्या मुलांवरील प्रेमाने चुका झाकतात वा चारचौघांसमोर त्यांचीच बाजू घेतात... त्यामुळे त्यांच्याकडून सुधारण्यासाठी चांगले प्रयत्न होऊन त्यांचे स्वभावदोषही लवकर दूर होत नाहीत... यासाठी मुलांनो, कोणीही सांगितलेल्या चुकीवर समर्थन न करता ती चूक स्वीकारावी... जरी आपणास आपले चूक नाही असे वाटले तरी नम्रतेने ते स्वीकारावे, त्यावर चिंतन-मनन करावे... 

दुसर्‍याच्या चूक सांगण्याच्या पद्धतीकडे लक्ष न देता चूक स्वीकारावी : मुलांनो, काही वेळा ताई (किंवा दादा) तुमची चूक सांगते; पण तिचा स्वर चढलेला (रागाचा) असतो... खरेतर तुमच्याकडून चूक झाली आहे, हे तुम्हाला मनातल्या मनात मान्य असते; परंतु ताईची सांगण्याची पद्धत न आवडल्याने तुम्ही तिने सांगितलेली चूक स्वीकारत नाही... मात्र असे करणे योग्य नाही... ताईच्या (किंवा दादाच्या) बोलण्याच्या पद्धतीकडे लक्ष न देता तिने सांगितलेली चूक स्वीकारावी... 

आपण वयाने लहान असू किंवा मोठे... आयुष्याच्या आरंभापासून ते अंतापर्यंत आपण नेहमी शिकत असतो... आपली ही प्रक्रिया निरंतर सुरू असते... त्यामुळे आपल्याला गुरु किंवा शिक्षक कोणीना कोणीतरी असतोच... लहान असताना आपली आई आपला गुरु असते... शाळेत जायला लागल्यानंतर शाळेतील शिक्षक, पुढे महाविद्यालयातील शिक्षक आपले गुरु होतात... एखाद्या कलेचे शिक्षण आपण घेत असू तर ती कला शिकण्यासाठी आपण ज्यांच्याकडे जातो, ते आपले गुरु असतात... या सर्व गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या चुका कमी करत पुढे वाटचाल करीत जावे... 

आपले शैक्षणिक शिक्षण संपल्यानंतर आपण नोकरी-व्यवसायाला सुरुवात करतो... येथेही आपल्याला सुरुवातीला कोणीना कोणी शिकवत असतात... त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्याला करून देतात जेणे आपल्या चुका कमी होतात... त्या शिदोरीवर आपण आपली प्रगती करून घेत असतो... जो आपली प्रगती करतो तो गुरु... गुरु हा वयाने लहान किंवा मोठा असू शकतो... गुरु म्हणजे तो आपल्यापेक्षा मोठाच असला पाहिजे असे नाही... आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्याकडूनही आपण काही शिकत असतो...

आपल्या आय़ुष्यात तसेच समाजात वावरताना आपण शिकण्याची सवय ठेवावी... मला सर्व काही येते, हे माहित आहे, अशी भावना ठेवणे योग्य नाही... आपल्यात काही कमीपणा असेल, तर तो मोकळेपणाने मान्य करण्यात काही चूक नाही... तुम्हालाही असा अनुभव कधी ना कधी आला असेल की आपल्याला न येणारी किंवा न जमणारी एखादी गोष्ट आपण दुसऱयाकडून शिकलो आहोत... जे दुसऱयाकडून शिकणे आहे, त्यालाच समोरच्याला मोठेपणा देणे आणि आपण शिष्यत्व पत्करणे असे म्हणता येईल... हि नम्रता आपण आयुष्यभर ठेवली तर जीवन कृतार्थ होण्यास कितीसा अवधी लागेल... करीन मी हें कृतार्थ जीवित | गुरुसवे मम यथार्थ ओळख ||..    ॐ श्री गुरुदेव दत्त... 



1 comment:

  1. स्वतःचा विकास- स्वविकास करून घ्यायचा असेल..... तर प्रथम स्वतः ला मनापासून अगदी खरे ओळखायला शिकले पाहिजे..... म्हणजेच आत्मपरीक्षण... आत्मनिरीक्षण केले पाहिजे...... स्वतःचे गुण आणि दुर्गुण मनापासून समजून घेणे हि पहिली पायरी आहे..... आत्म परिवर्तन ...आत्मसुधारणा हि दुसरी पायरी आहे..... ॐ श्री गुरुदेव दत्त .....

    ReplyDelete