Thursday 24 May 2012

साधेल साध्य हाच प्रत्याहार......

जगात दृष्य म्हणजे विषय असणारच..... साधकाच्या निर्वाहासाठी ते आवश्यक आहेत..... साधकाची ध्येय निश्चिती झाली असेल.... आणि ध्येय साध्य करण्याची तळमळ निर्माण झाली असेल तर कोणत्या विषयात किती प्रमाणात रस घ्यावयाचा.... आणि कोणत्या गोष्ठींचा त्याग करावयाचा हे साधकाला उमजते आणि तो त्याप्रमाणे वागतो..... म्हणूनच साधकाने विषयांपासून आवरण्याचा अभ्यास करावा लागतो..... ह्यास योगमार्गात ' प्रत्याहार ' म्हटले आहे...... ह्यासाठी साधकाला तारतम्य ठेवावे लागते. भूक लागली की माणूस जेवणारच..... पण खरा साधक इतकेच जेवेल की त्याचा साधनेवर प्रतिकूल परिणाम होणार नाहीं..... जप करताना झोप येणार नाहीं.....

सत्त्वगुणाला.... प्राबल्य देऊन रज आणि तम हे नियंत्रणाखाली ठेवायचे.... ही तर आयुष्यभराची साधना आहे..... नैसर्गिक प्रवृत्ती... हीच जर आपण प्रमाण मानली.... तर कोणत्याही क्षेत्रात प्रगती करता येणे आपल्याला शक्य नाही.....

इंद्रियांची ओढ ही नेहमी सुखाकडे असते... सुख या शब्दाची एक व्युत्पत्तीच ही ओढ स्पष्ट करते...... आता सुख म्हणजे काय.... " सु " म्हणजे चांगले आणि "ख " म्हणजे इंद्रिय..... सुख म्हणजे आपली इंद्रिये आनंदात असणे..... त्यांना आपला विषय चांगला उपभोगायला मिळाला... तरच ती समाधानात असतात.....

एक गोष्ट आहे.... एक बाबा होते..... ते एका डोंगरातल्या गुहेत राहत असत.... त्यांच्याजवळ एक रिकामा डबा होता.... तेवढीच त्यांची संपत्ती.... जवळच्या गावातला एक भक्त त्यांना आठवडय़ातून थोडी भगर पाठवून देई..... मूठभर भगर आणि थोडे पाणी त्या डब्यात घालून धुनीतल्या निखाऱ्यावर ठेवून द्यायचे..... आणि ते शिजल्यावर दुपारी १२ वाजता ते खायचे.... . २४ तासांत एवढाच आहार ते घेत असत.....

एकदा एक शिष्य गुरू सेवेसाठी त्यांच्याजवळ असता ते एकदम म्हणाले.... साले कुत्रे भरपूर त्रास देतात..... शिष्याला नवल वाटले..... कारण त्या जंगलातल्या गुहेत आसपास कोठेच कुत्रे वगैरे नव्हते..... नंतर शिष्याला उलगडा झाला.....

कुत्रे म्हणजे इंद्रिये होत.... ती सारखी मागतच असतात.... त्यांना शांत करण्यासाठी त्यांच्यासमोर तुकडा फेकावा लागतो.... आपण त्यांचे लाडच करीत राहिलो.... तर ती कधीच शांत होत नाहीत... आणि समजूत घालता घालता मनच आसक्त होऊन जाते.... त्याच्यावर म्हणजे मनावरच हुकूमत चालली पाहिजे..... उपभोग हा तृप्तीसाठी आहे.... हे मनाला पटले तर ते इंद्रियांच्या अधीन होत नाही.... उलट सारी इंद्रियेच त्याच्या ताब्यात येतात..... हीच प्रत्याहाराची साधना आहे....

जसे कि बँकेत काम करणाऱ्या कारकुनाच्या ताब्यात जरी तिजोरीच्या किल्ल्या असल्या.... तरी आत ठेवलेला पैसा हा त्याचा नाही... याची पक्की जाणीव त्याला असायलाच हवी..... अगदी तस्सेच साऱ्याच इंद्रियांना जाणीव हवी की.... विषयांचा उपभोग हा त्यांच्यासाठी नाही..... त्यांचा स्वामी जो मनाकरवी त्यांच्या शक्तींचा उपयोग करतो आहे.... त्याच्यासाठी आहे.... मग ती मनाला भुलवण्याचा प्रयत्न न करता आपल्या जागी शांत राहतात.... म्हणजे प्रत्याहार सिद्ध झाला असे म्हणता येईल....

हा प्रत्याहार... आपण कसा साधू तर नामाने.... सर्वसुख देण्याचे सामर्थ्य फक्त भगवंतात आहे... आणि भगवंत नामापासून वेगळा नाही.... हेही आपल्याला माहीत आहे.... म्हणून नामधारकाने अर्धघडीही रिकामे राहू नये... अखंड नामस्मरण करीत रहावे.... पूर्णसुखाचा लाभ होण्यासाठी क्षणभरदेखील नामाशिवाय राहू नये....

ॐ श्री गुरुदेव दत्त ......

No comments:

Post a Comment