Friday 4 May 2012


आपला रोजचा दिनक्रम आपले व्यक्तिमत्व घडवतो.......

पाण्यात आपण पडलो की पोहता येत म्हणतात...... पण पोहण्यात प्राविण्य मिळवायचं... स्पर्धेत सहभागी व्हायचं.... जिंकायचं आणि आपल्यातील सुप्त गुण फुलवून त्याचं पारितोषिकात रूपांतर करायचं.... ही गोष्ट सोपी आणि सहजसाध्य नाही.... आयुष्य हे असेच असते ... जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल.... तर त्यासाठी लागते अविश्रांत मेहनत, एकाग्रता, जिद्द आणि ध्येयपूतीर्साठीची तळमळ.... हे सारे गुण अंगी असतील तर यश हाती येणारच....    यासाठीच आपला रोजचा दिनक्रम नियोजित हवा....    आपण आपल्या रोजच्या दिनक्रमानुसार वागू हे पाळले पाहिजे.....

वेळेचे महत्त्व ....आपल्याकडे वेळ फार कमी आहे हे प्रथम जाणून घ्यावे.... असलेल्या आयुष्याच्या वेळेत स्व विकास करणे सर्वस्वी आपल्याच हाती आहे.... आपले प्रत्येक कार्यच चांगले संस्कारयुक्त असावयास पाहिजे.... उदा. केळी खाऊन आपण साले टाकतो ही कृती आहे.... केळे खाऊन साल कचऱ्याच्या टोपलीत टाकणे ही प्रकृती आहे. .... केळे खाऊन साल रस्त्यावर टाकणे ही विकृती आहे. .... दुसऱ्याने रस्त्यावर टाकलेली साल कचऱ्याच्या डब्यात टाकणे ही झाली संस्कृती....

मनन करून, सर्वांगीण विचार करून.... कृती करतो तोच खरा माणूस..... विचार व कृती चांगल्या होण्यासाठी संस्कारांची गरज असते.... संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार व दोषांचा भागाकार..... संस्कार म्हणजे चांगल्या सवयी लावणे व वाईट सवयी काढून टाकणे होय...... यासाठीच आपला दिनक्रम चांगला व्यवस्थित नियोजित संस्कारी पाहिजे.... ज्यायोगे आपण आपला विकास साधू शकू.....

आपला रोजचा दिनक्रम असा असावा....

रोज सकाळी लवकर उठावे..... कराग्रे वसते लक्ष्मी: ... हा श्लोक म्हणून झाल्यावर भूमीला प्रार्थना करून पुढील श्लोक म्हणावा आणि भूमीवर पाऊल टाकावे..... समुद्रवसने देवि पर्वतस्तनमंडले । विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ।।..... श्रीराम

व आपल्या कार्यास प्रारंभ करावा... सकाळी गुरुनी दिलेली साधना किंवा नामस्मरण किंवा ध्यान धारणा करावी...... प्रभात फेरीला जावे.... ज्यामुळे शरीराला योग्य व्यायाम मिळेल..... आपले कपडे धुवावे... जीवनात स्वावलंबी व्हावे.... परावलंबी होऊ नये.... आई वडिलाना, मोठ्या माणसाना वंदन करावे..... सकाळचा हा दिनक्रम झाला कि आपल्या कामास जावे....असा दिनक्रम झाल्यास पूर्ण दिवस उत्तम जातो.....

आपल्याला जसा वेळ मिळेल तसा पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करावा कि ज्यायोगे आपल्या ज्ञानात भर पडेल..... आपल्या मनाला कशात न कशात तरी गुंतवून ठेवावे.... यावेळी पुस्तके वाचणे सर्वोत्तम... जो आवडेल त्या विषयाची पुस्तके वाचणे.... वाचाल तर वाचाल..... पुस्तकासारखा मित्र नाही...... प्रतिकूल परिस्थितीतही चांगले जीवन घडवण्याचे काम पुस्तके करतात....... 

विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वाचन करुन ज्ञान ग्रहण करायला हवे.,,,,, साहित्याकडे डोळसपणे पाहिल्यास उत्तम भवितव्य घडते.... आज चांगले वाचन केले तर उद्या उत्तम नेतृत्व करू शकू .... आपण जेवढ चांगल वाचू त्याच प्रतिबिंब आपल्या वागण्या बोलण्यात जाणवेल... शब्दांवर वर्चस्व येईल.... शक्यतो विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदांची पुस्तके वाचणे.....

रात्री आपण दिवस भरात काय केले याचा मागोवा घेणे फार महत्वाचे .... विचार मनन करणे... आपले काही चुकले का... कसे वागलो... ते बघणे.... दिवसभराच्या नोंदी डायरीत लिहिणे... डायरी लिहिण्याची सवय लावावीच... पुढील आयुष्यात फार उपयोगी पडते....

बघा प्रयत्न करा... आपल्या सर्वाना हे जमेलच... हा दिनक्रम अंगवळणी पडला कि आपणच त्याच्यात सुधारणा करू शकतो.... कारण तोपर्यंत आपले विचार प्रगल्भ झालेले असतील....

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

No comments:

Post a Comment