Sunday 13 May 2012

आपले अस्तित्व घडवणारी.... आई म्हणजे आई.....

आई हा एक शब्द आहे.... असं म्हणण व्यर्थ आहे..... कारण त्यात आहे जे वात्सल्य शब्दात उतरवणं आहे ते अशक्य.... आई म्हणजे आई... जशी वात्सल्याची दाई.... आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर..... आई म्हणजे मंदिराचा कळस, आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस....

जेव्हा फळाच्या टोकरीत ४ आंबे असतात आणि घरात ५ सदस्य असतात.......तेव्हा आई म्हणते मला आंबा आवडत नाही.... अशीच असते आई... आई म्हणजे आई असते कारण वेदनेनंतरची पहिली आरोळी.... आईच असते.... खरच. स्पर्शातली जादू कुणाजवळ असेल...? उत्तर एकच... आई जवळ ..... ममता, माया आणि खरा आपलेपणा..... ओलाव्याचा तो स्पर्श.... अनेक समस्यांवरचा तो एकच उपाय.... आईचा मायेचा स्पर्श ...... 
 
आई अशी एकच व्यक्ती आहे....जी तुम्हाला इतरांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखत असते..... आई, हजार जन्म घेतले तरी एका जन्माचे ऋण फीटणार नाही..... आई म्हणजे देव पृथ्वीवरचा.... आई म्हणजे साठा सुखाचा.... आई म्हणजे मैत्रीण गोड.... आई म्हणजे मायेची ओढ.... 

आई म्हणजे प्रेमाची माउली..... आई म्हणजे दयेची सावली..... आई म्हणजे स्वतः उपाशी राहून....आपल्याला भरवणारी..... आई म्हणजे जीवाचं रान करून....आपल्यासाठी राबणारी.....आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी..... व कधी ओरडून समजावणारी.... आईच बोट धरून चालायला शिकवणारी..... आईच आपले अस्तित्व घडवणारी.....त्याची किमयागार म्हणजे आई.....

शोधून मिळत नाही पुण्य.... सेवार्थाने व्हावे धन्य..... कोण आहे तुजविण अन्य...? ‘आई’ तुजविण जग हे शून्य.....

लक्षात ठेवा..... आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा..... पण कोणत्याही गोष्टीसाठी आई-वडिलांना सोडू नका..... कारण जीवनात एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल.... पण आई-वडिलांची साथ ही नेहमीच तुमच्याबरोबर आयुष्यभर असेल....

खालील कविता.... श्री मुकुंद आनंद ढाके यांनी आई, प्रमिला आनंद ढाके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पाठविलेली ....

जगी माऊली सारखे कोण आहे ।
जिचे जन्मजन्मांतरी ऋण आहे ।।

असे ऋण हे की जया व्याज नाही ।
ऋणाविन त्या जीवना साज नाही ।।

जिने सोसल्या यातना कोटी कोटी ।
तुला जन्म लाभे तिच्या पुण्य पोटी ।।

जिच्या यातनाचे जगी मोल नाही ।
तिच्या सारखा लाघवी बोल नाही ।।

जिने लाविला लेकरांना लळा या ।
तिच्या दैवी लेखी उन्हाळी झळा या ।।

जिच्या पूजनाला जगी फूल नाही ।
अशा देवतेचे जगी नाव आई ।।

ॐ श्री गुरुदेव दत्त ....

No comments:

Post a Comment