Monday 21 May 2012

बलशाली भारत होवो..... विश्वात शोभूनी राहो.....

आजच्या पिढीने भारताला महासत्ता नव्हे "बलसागर भारत" बनविण्याचे स्वप्न पहावे.... ते पूर्ण करायचे असेल तर.... भ्रष्टाचाराचे निर्मूलन करावे लागेल... जात-धर्मभेदांना जाळून राख करावे लागतील... शेतकरी आत्महत्या, स्त्रीयांवरील अन्याय, थांबवावे लागतील.... ही यादी आणखीन मोठी होऊ शकते.... या सर्वांची सुरुवात करायची असेल तर सर्वप्रथम आपण जीवनात बलशाली झाले पाहिजे.....

देशापुढे आज जातीयवाद, भ्रष्टाचार, दहशतवाद, हिंसाचार, तरुणातील व्यसनाधीनता यासह अन्य विविध आव्हाने आ वासून उभी आहेत..... तरुण समाजसुधारक आणि शासन एकत्र आल्यास व त्याबाबत योग्य पद्धतीने जनजागृती झाल्यास वाईट रूढी नष्ट होऊन भारत नक्कीच बलशाली होऊन महासत्ता बनेल.....

या समाजविघातक प्रवृत्तींना समाजातून हद्दपार केल्यास.... बलशाली भारताची निर्मिती नव्या युगात नक्कीच होईल .... त्यानंतरचा भारत हा खूप सशक्त, बलशाली आणि सबळ असेल... " बलशाली भारत होवो, विश्वात शोभूनी राहो..." हे सूत्र तरुणांनी मनी बाळगावे.....

आजच्या पिढीने / तरुणांनी समजले पाहिजे.... धर्माने, विज्ञानाने, तुमच्या स्वार्थाने आणि निसर्ग-नियमानेही तुम्हाला दुसऱ्यासाठी काही काम करण्यास सांगितले आहे..... धनाने नाही तर श्रमाने... या संस्थेत नाही... तर त्या संस्थेत .... या उपक्रमात नाही तर दुसऱ्या.... पण कोठेतरी कामाला लागा.....

मी एकटा नाही, सारा समाज माझा आहे.... मी या समाजाचा एक घटक आहे... आणि समाज बलशाली करायचा तर.... मी बलशाली झाले पाहिजे.... ही भावना आणि प्रेरणा जागवण्याचा निर्धार करा... स्वःताला बलशाली बनवा.....

माझ्या ताकदीनुसार मी हा समाज बलशाली करण्याचा प्रयत्न करीन..... असा आपल्या मनाशी निर्धार करावा.... कुणी ना राहो दुबळा येथे, मनी असा निर्धार जागवू असा..... विज्ञान, प्रयत्न आणि पुरूषार्थ याने उद्याचा समाज संपन्न करता येईल.... हे सर्व करणे आपल्याच हाती आहे....

आत्मसंवर्धन, समाजसंवर्धन आणि राष्ट्रसंवर्धन हीच त्रिसूत्री तरुणांनी अंगी बाणवावी.... तरुणाईची हीच खरी शपथ..... स्वच्छ भारत... सुंदर भारत.... संकल्प आहे.... निर्मल समृध्द भारत देशाचा....

तर मग चला.... उठा.... आपण सगळे एकत्र येऊन आपल्या भारत देशाचे भाग्य सजवू.... बलशाली भारत होवो, विश्वात शोभूनी राहो....

ॐ श्री गुरुदेव दत्त ......

1 comment:

  1. आज फक्त स्वप्रगतीवर लक्ष देणे एवढेच ध्येय झाले आहे.... स्व प्रगती करावीच.... आपण बलशाली होणे गरजेचे.... पण सामाजिक दृष्ट्या योगदान असणे हि महत्वाचे आहे.... विज्ञान, प्रयत्न आणि पुरूषार्थ याने उद्याचा समाज संपन्न करता येईल.... हे सर्व करणे आपल्याच हाती आहे.... ॐ श्री गुरुदेव दत्त ......

    ReplyDelete