अपयशाला घाबरू नका.... प्रयत्न करा.... यशस्वी व्हा....
अपयश आपल्याला चांगलेच शिकवून जाते..... आपण अपयश विसरून आणखी एका नव्या ध्येयासाठी सज्ज व्हायचे..... आपले सर्व लक्ष ध्येयाच्या तयारीवरच करायचे...... आतापर्यंत ज्या चुका केल्या, त्या पुन्हा करायच्या नाहीत..... हे मात्र यावेळी कटाक्षाने पाळायचे......
कुणाचेहि अनुकरण न करता नव्या वाटांचा शोध घेत असाल... तर यातून तुमचे वेगळेपण किंवा असामान्यत्व सिद्ध होऊ शकते..... यश आणि अपयश यातील सीमारेषा खूप धूसर आहे..... त्यामुळे अपयश पदरी येणार असेल, तरी आत्मविश्वास ढळू देऊ नका...... यातून पुढे उत्तुंग गरुड भरारी घेता येते.....
ॐ श्री गुरुदेव दत्त .....
एका बागेत लहान मुलगी सायकल शिकत असते..... सायकल चालवताना ती पडते आणि रडू लागते..... पडल्यानंतर मुलं रडतातच, त्यात विशेष ते काय ..... त्या मुलीला फार लागलेलं नसतं..... पण तिचे वडील मात्र तिच्या पडण्याने खूप धास्तावतात..... तिला उगी करता करता घरी जायच्या गडबडीत ते सायकलही तिथेच विसरतात.....
दुस-या दिवशी ती मुलगी सायकल शिकायला परत येत नाही..... लहान मूलच ते..... पडल्यानंतर थोडं तरी घाबरणारच..... सायकल चालवण्याची इच्छा त्या मुलीच्याही मनात असणार...... पण.. पण मुलांना अधिक लाडाकोडात, फार जपत वाढवण्यापेक्षा.... त्यांच्या मनीच्या गोष्टी पालकांनी समजून घेणं आवश्यक असतं......
मुलांचं पालनपोषण आज सहज होताना दिसत नाही..... तर विशिष्ट मानसिक दृष्टिकोनातून पालक ठरवून त्यांना मोठं करत असतात..... यात मुलांना पडण्याची संधी नसतेच.... म्हणूनच मग त्रास किंवा तणाव सहन करण्याची या मुलांना सवय राहात नाही..... पडणं किंवा पराजय कधी स्वीकारलाच नसल्याने... छोटय़ा अपयशाच्या विचारानेही ते आततायी कृत्य करून बसतात.....
अपयश अनेकदा एखाद्या समंजस माणसाचाही घात करतं..... अपयशाच्या गर्तेत माणूस इच्छाशक्ती, आत्मविश्वास, योग्य दिशा सारंच हरवून बसतो..... पण जो या गोष्टींना घट्ट चिकटून राहतो..... फक्त त्याच्यात अपयश यशात बदलण्याची क्षमता असते.....

दिवस-रात्रीच्या चक्राप्रमाणेच जय पराजयाचंही असतं... ना रात्रीचा अंधार कायम असतो.... ना दिवसाचा उजेड..... यशाच्या शिखरावरील व्यक्तीला अहंकाराचा वारा स्पर्शू शकतो..... तर अपयशी व्यक्ती विनम्र, सुधीर, आशादायी बनू शकते..... अपयशाने विवश झालेल्या व्यक्तीला अज्ञात रस्ते चाचपडताना नवा मार्ग सापडू शकतो.....
अपयश आपल्याला खूप काही शिकवते.... पण ते जे काही शिकवते ते जाणून, समजून, शिकून घेण्याची सर्वस्वी जबाबदारी हि आपलीच असते.... त्यातून योग्य बोध घ्यावा..... हे जाणून घ्या.....
अपयश आपल्याला खूप काही शिकवते.... पण ते जे काही शिकवते ते जाणून, समजून, शिकून घेण्याची सर्वस्वी जबाबदारी हि आपलीच असते.... त्यातून योग्य बोध घ्यावा..... हे जाणून घ्या.....
अपयश आपल्याला चांगलेच शिकवून जाते..... आपण अपयश विसरून आणखी एका नव्या ध्येयासाठी सज्ज व्हायचे..... आपले सर्व लक्ष ध्येयाच्या तयारीवरच करायचे...... आतापर्यंत ज्या चुका केल्या, त्या पुन्हा करायच्या नाहीत..... हे मात्र यावेळी कटाक्षाने पाळायचे......
संधी मिळाल्यास अवघड काम तडीस नेण्याची क्षमता आपल्यामध्ये असते..... फक्त स्वत:वरील विश्वास ढळू देऊ नका..... आयुष्यात जे काही कराल, ते मनापासून करा..... तरच तुमच्याकडून महान कार्य घडू शकेल......
कुणाचेहि अनुकरण न करता नव्या वाटांचा शोध घेत असाल... तर यातून तुमचे वेगळेपण किंवा असामान्यत्व सिद्ध होऊ शकते..... यश आणि अपयश यातील सीमारेषा खूप धूसर आहे..... त्यामुळे अपयश पदरी येणार असेल, तरी आत्मविश्वास ढळू देऊ नका...... यातून पुढे उत्तुंग गरुड भरारी घेता येते.....
No comments:
Post a Comment